महेंद्र सिंग धोनी यांची संपूर्ण माहिती Mahendra Singh Dhoni Information In Marathi

Mahendra Singh Dhoni Information In Marathi महेंद्र सिंग धोनी हे जगातील महान कप्तान पैकी एक कप्तान आहे. महेंद्र सिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये टी -२० वर्ल्ड कप ,२०११ मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तसेच महेंद्र सिंग धोनी यांनी आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग संघाकडून खेळून ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

Mahendra Singh Dhoni Information In Marathi

महेंद्र सिंग धोनी यांची संपूर्ण माहिती Mahendra Singh Dhoni Information In Marathi

आजच्या लेखामध्ये आपण महेंद्र सिंग धोनी यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे भारतीय संघाचे महान कप्तान “महेंद्र सिंग धोनी” यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

नाव महेंद्र सिंग धोनी
जन्म ७ जुलै १९८१
जन्म स्थळ रांची ,झारखंड
आईचे नाव देवकी देवी
वडिलांचे नाव पान सिंग
पत्नीचे नाव साक्षी धोनी
मुलीचे नाव जिवा धोनी
आयसीसी ट्रॉफी टी -२० वर्ल्ड कप,एकदिवसीय वर्ल्ड कप,चॅम्पियन्स ट्रॉफी,इत्यादी.
आयपीएल ट्रॉफी २०१०,२०११,२०१८,२०२१,२०२३

महेंद्र सिंग धोनी यांचा जन्म आणि त्यांचे प्रारंभिक जीवन (Birth of Mahendra Singh Dhoni and his family in Marathi)

महेंद्र सिंग धोनी यांचा जन्म ७ जुलै १९८१ मध्ये झारखंड राज्यातील रांची येथे झाला होता. महेंद्र सिंग धोनी यांच्या वडिलांचे नाव “पान सिंग धोनी” आहे ,तर त्यांच्या आईचे नाव “ देवकी देवी” असे आहे. महेंद्र सिंग धोनी यांचे वडील पान सिंग धोनी हे मॅनेजमेंट चे काम करत होते ,तर त्यांच्या आई देवकी देवी या गृहिणी होत्या.

महेंद्र सिंग धोनी यांचे प्राथमिक शिक्षण जवाहर विद्या मंदिर ,रांची येथे पूर्ण झाले. महेंद्र सिंग धोनी यांना लहानपणापासूनच खेळामध्ये रुची होती. शाळेत असताना त्यांना बॅडमिंटन आणि फुटबॉल खेळण्याचा छंद होता. महेंद्र सिंग धोनी यांनी फुटबॉल आणि बॅडमिंटन खेळामध्ये भरपूर जिल्हा स्तरीय सामने खेळले होते.

भारतीय संघामध्ये येण्यापूर्वी महेंद्र सिंग धोनी यांचा संघर्ष (Early Struggle of Mahendra Singh Dhoni in Marathi)

महेंद्र सिंग धोनी हे फुटबॉल संघामध्ये गोलकीपर ची भूमिका निभावत होते. त्यांच्या फुटबॉल संघाचे कोच महेंद्र सिंग धोनी यांच्या किपिंग करण्याच्या कौशल्यावर इतके प्रभावित झाले होते की ,“त्यांनी महेंद्र सिंग धोनी यांना क्रिकेट खेळामध्ये कीपिंग करण्याचा सल्ला दिला होता.”

आपल्या कोच च्या सांगण्यावरून महेंद्र सिंग धोनी यांनी १९९५ ते १९९८ या तीन वर्षाच्या कालावधी मध्ये कमांडो क्रिकेट क्लब संघाकडून विकेट किपींग केली. महेंद्र सिंग धोनी यांच्या क्रिकेट खेळातील कौशल्यामुळे त्यांची निवड १९९७-९८ मध्ये झालेल्या मांकंड चॅम्पियनशिप साठी झाली. ही मांकंड चॅम्पियनशिप स्पर्धा अंडर १६ स्पर्धा होती.

२००१ ते २००३ च्या दरम्यान महेंद्र सिंग धोनी हे पश्चिम बंगाल जवळील खडगपुर येथील रेल्वे स्टेशन मध्ये तिकीट चेकर ची नोकरी करत होते. ही नोकरी करत असताना महेंद्र सिंग धोनी यांचे जे सहकारी होते ,ते आजही महेंद्र सिंग धोनी यांची एक इमानदार आणि मस्तीखोर सहकारी म्हणून आठवण काढतात.

महेंद्र सिंग धोनी यांचे वैवाहिक जीवन (Married Life of Mahendra Singh Dhoni in Marathi)

महेंद्र सिंग धोनी यांचे लग्न होण्याअगोदर त्यांचे प्रेम प्रियांका नावाच्या मुलीवर होते ; परंतु २००२ मध्ये त्यांच्या प्रियसी चा अपघात झाला होता. त्याकाळी महेंद्र सिंग धोनी हे भारतीय क्रिकेट संघात येण्यासाठी संघर्ष करत होते.

महेंद्र सिंग धोनी यांचा विवाह “साक्षी सिंग रावत” यांच्याशी ४ जुलै २०१० मध्ये झाला. साक्षी सिंग रावत या महेंद्र सिंग धोनी यांच्या शाळेतील मैत्रीण होत्या. महेंद्र सिंग धोनी आणि साक्षी सिंग धोनी यांना ६ फेब्रुवारी २०१५ मध्ये मध्ये मुलगी झाली आणि त्या मुलीचे नाव त्यांनी “जिवा” असे ठेवले. जेव्हा महेंद्र सिंग धोनी यांच्या मुलीचा जन्म झाला तेव्हा ,महेंद्र सिंग धोनी हे ऑस्ट्रेलिया देशात होते आणि ऑस्ट्रेलिया देशामध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप चालू होते.

तेव्हा महेंद्र सिंग धोनी यांना आपल्या मुलीच्या जन्मा विषयी प्रश्न विचारला तेव्हा ,महेंद्र सिंग धोनी यांनी त्या प्रश्नाचे उत्तर “मी सध्या देशाजी ड्युटी करत आहे” असे दिले. यावरून आपल्याला समजते की महेंद्र सिंग धोनी हे आपल्या देशाला सर्वोपरी समजत होते.

महेंद्र सिंग धोनी यांचे क्रिकेट करियर (Cricket Career of Mahendra Singh Dhoni in Marathi)

२००४ मध्ये बांग्लादेश संघाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यामध्ये महेंद्र सिंग धोनी यांनी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघामध्ये पदार्पण केले होते.

टी – २० वर्ल्ड कप २००७ (T20 World Cup 2007 in Marathi)

२००७ मध्ये झालेल्या टी – २० वर्ल्ड कप मध्ये महेंद्र सिंग धोनी यांची निवड भारताच्या कप्तान पदी झाली आणि महेंद्र सिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने हा २००७ मध्ये झालेला टी -२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली.

२००७ टी – २० वर्ल्ड कप खेळणारा हा भारतीय संघ तरून खेळाडूंनी भरला होता आणि या तरुण खेळाडूंच्या संघाचे नेतृत्व महेंद्र सिंग धोनी यांनी केले होते. २००७ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्ड कप च्या फायनल मध्ये भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा पराभव केला होता.

एकदिवसीय वर्ल्ड कप २०११ (Oneday World Cup 2011 in Marathi)

नंतर २०११ मध्ये झालेला एकदिवसीय वर्ल्ड कप मध्ये देखील भारतीय संघ महेंद्र सिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. भारतीय संघाने २०११ च्या एकदिवसीय वर्ल्ड कप च्या फायनल सामन्यामध्ये श्रीलंका संघाचा पराभव केला होता.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ (Champion trophy 2013 in Marathi)

महेंद्र सिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारताने २०१३ मध्ये इंग्लंड येथे झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. या चॅम्पियन्स ट्रॉफी च्या फायनल मध्ये भारताने इंग्लंड संघाचा पराभव केला होता.

या चॅम्पियन्स ट्रॉफी च्या विजयानंतर महेंद्र सिंग धोनी हे एकदिवसीय वर्ल्ड कप , टी – २० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकनारे एकमेव कप्तान बनले होते.

महेंद्र सिंग धोनी यांचे आयपीएल करियर (IPL Career of Mahendra Singh Dhoni in Marathi)

महेंद्र सिंग धोनी यांनी चेन्नई सुपर किंग संघाकडून खेळून ५ वेळा आयपीएल ची ट्रॉफी जिंकली आहे. महेंद्र सिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग संघाने अनुक्रमे २०१० ,२०११ ,२०१८,२०२१ आणि २०२३ मध्ये आयपीएल ची ट्रॉफी जिंकली होती.

यातील २०१० मध्ये चेन्नई सुपर किंग संघाने फायनल मध्ये मुंबई इंडियन्स चा पराभव करून आपली पहिली आयपीएल ची ट्रॉफी जिंकली होती. तसेच २०११ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर,२०१८ मध्ये हैद्राबाद ,२०२१ मध्ये कोलकता नाईट रायडर्स आणि २०२३ मध्ये गुजरात टायटन्स संघाचा पराभव करून आयपीएल ची ट्रॉफी जिंकली होती.

FAQ

महेंद्र सिंग धोनी यांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला ?

महेंद्र सिंग धोनी यांचा जन्म ७ जुलै १९८१ मध्ये रांची येथे झाला.

महेंद्र सिंग धोनी यांच्या आईचे नाव काय होते ?

महेंद्र सिंग धोनी यांच्या आईचे नाव “देवकी देवी” असे होते.

महेंद्र सिंग धोनी यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

महेंद्र सिंग धोनी यांच्या वडिलांचे नाव “पान सिंग” असे होते.

महेंद्र सिंग धोनी यांनी भारतीय संघात कोणत्या वर्षात पदार्पण केले होते ?

महेंद्र सिंग धोनी यांनी २००४ वर्षामध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले होते.

महेंद्र सिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कोणकोणत्या आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत ?

महेंद्र सिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये टी – २० वर्ल्ड कप ,२०११ मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

महेंद्र सिंग धोनी हे आयपीएल च्या कोणत्या संघातून खेळतात ?

महेंद्र सिंग धोनी हे आयपीएल च्या चेन्नई सुपर किंग संघाकडून खेळतात आणि महेंद्र सिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग संघाने २०१० ,२०११ ,२०१८ ,२०२१ आणि २०१३ मध्ये आयपीएल ची ट्रॉफी जिंकली आहे.

महेंद्र सिंग धोनी यांनी भारताकडून शेवटचा सामना कोणता खेळला होता ?

महेंद्र सिंग धोनी यांनी भारतीय संघाकडून खेळलेला शेवटचा सामना हा २०१९ मध्ये झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप मधील सेमी फायनल चा सामना होता ,जो की न्युझीलंड संघा विरुद्ध खेळला गेला होता.

आजच्या लेखामध्ये आपण एका थोर भारतीय क्रिकेट कप्तान च्या जीवना विषयी म्हणजे महेंद्र सिंग धोनी यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment