महात्मा फुले यांची संपूर्ण माहिती Mahatma Phule Information In Marathi

Mahatma Phule Information In Marathi आपल्या भारत देश मध्ये विविध सामाजिक कार्यकर्ते लाभले ज्यांनी आपला भारत देश विकसित होण्याच्या मार्गाने स्वतःच आयुष्य पणाला लावले . ज्यांचे विचार , कार्य हे आजतागायत जिवंत आहेत . त्यातलीच एक महात्मा ज्योतिराव फुले . महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले असे त्यांचे पूर्ण नाव , यांचा जन्म ११ एप्रिल , १८२७ रोजी त्यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यातील कटगुण येथे झाला . महात्मा ज्योतिराव फुले हे थोर विचारवंत होते ते उत्तम लेखक होते . त्यांनी समाजाच्या परिवर्तनाचे महान क्रांतिकारी कार्य केले .

Mahatma Phule Information In Marathi

महात्मा फुले यांची संपूर्ण माहिती Mahatma Phule Information In Marathi

महात्मा फुले हे नावाने महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते , समाजसुधारक ज्यांनी जातीविरोधी अन्यायविरोधी लढा दिला , पुरोहितांची गरज नाही असे म्हणून सत्यशोषक समाजाची स्थापना केली , त्याचबरोबर स्त्रियांना मुलींना शिक्षण किती महत्वाचे आहे ह्याची जाणून करून दिली.  त्यासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले , त्याचबरोबर ते लेखक होते त्यांनी खूप पुस्तक लिहिली त्यातील गुलामगिरी , शेतकऱ्यांचा आसूड हे खूप प्रसिद्ध पुस्तके आहेत आजच्या ह्या लेखात आपण महात्मा ज्योतिराव फुले ह्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत .

आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने तीन समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्याला  ‘ फुले – शाहू – आंबेडकर ‘ असे म्हंटले जाते .

पूर्ण नावमहात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले
जन्म११ एप्रिल , १८२७
जन्म ठिकाणसातारा जिल्हा , महाराष्ट्र
इतर नावेज्योतिबा फुले , महात्मा  फुले
वडिलांचे नावगोविंदराव फुले
आईचे नावचिमणाबाई फुले
पत्नीचे नावसावित्रीबाई फुले
विशेष ओळखनैतिकता , मानवतावाद , सत्यशोधक समाज संस्थापक
निधन२८ नोव्हेंबर , १८९० ( वय वर्षे ६३ )

महात्मा ज्योतिबा फुले यांचे सुरुवातीचे जीवन  (Early Life of Mahatma Jyotiba Phule) 

महात्मा ज्योतिबा फुले ह्यांचा जन्म सातारा जिल्ह्यामधील फुल माली गोरहे या कुटुंबात झाला.  महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव होते , ते भाजीपाल्याचा व्यापार करत होते . महात्मा फुले यांचे आजोबा पुण्यामध्ये स्थायिक झाले होते . शेवटच्या पेशव्यांच्या काळामध्ये महात्मा फुले यांचे वडील त्याचबरोबर त्यांचे दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते म्हणूनच त्यांच्या नावाची ओळख फुले म्हणून ओळखले जाऊ लागले .

महात्मा फुले यांच्या आईचे निधन , महात्मा फुले लहान असतानाच झाले ते त्यावेळी नऊ वर्षाचे होते . त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि नंतर ते त्यांच्या वडिलांसोबत शेतातील कामात हातभार लावू लागले .  महात्मा फुले ह्यांचा विवाह केवळ ते १२ वर्षाचे असताना झाला .

महात्मा फुले ह्यांचे शैक्षणिक जीवन (Academic life of Mahatma Phule ) 

महात्मा फुले ह्यांची बौद्धिक क्षमता चांगली असल्याने त्यांच्या वडिलांना आसपास च्या लोकांनी सुचवलं कि , त्यांनी पुढे शिक्षण घेतले पाहिजे . त्यांच्या म्हणण्याला होकार देऊन फुले ह्यांनी १८४७ साली स्कॉटिश मिशन महाविद्यालय मध्ये पुढील शिक्षण पूर्ण केल . थॉमस पेन ह्यांनी सन १७९१ मध्ये मानवी हक्क विषयावर पुस्तक फुले ह्यांनी वाचाल आणि ह्या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव पडला .

सामाजिक न्याय ह्यासारख्या विषयावर फुले यांच्या मनात विचार येऊ लागले . आपल्या समाजात विषमता आहे , ती मुळापासून दूर करणे आणि स्त्रियांना शिक्षण भेटले पाहिजे ह्यासाठी त्यांनी त्याचे कार्य करण्यास सुरुवात केली . समाज मध्ये जो भेदभाव होत आहे तो कश्या प्रकारे कमी करता येईल ह्यावर त्यांनी भूमिका घेण्याचे ठरविले .   

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. (Mahatma Phule founded Satyashodhak Samaj)

महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७४ रोजी स्त्रिया , दलित त्याचबरोबर वंचित असलेले गटांच्या हक्का वर कार्य करण्यासाठी त्याच्यावर लक्ष केंद्रित करून आपली भूमिका मांडली आणि ह्याच उद्देशाला समोर ठेऊन सत्यशोधक समाजाची स्थापना केली . सत्यशोधक समाजाच्या आधारे त्यांनी मूर्तीच्या पूजेला विरोध करून , जातीयवाद चा निषेध नोंदविला . सत्यशोधक समाज मध्ये सामाजिक प्रबोधन करून पुरोहितांची गरज हि नाकरण्यात आली .

सत्यशोधक समाजाची स्थापना करताना महात्मा फुले यांनी मानवी कल्याण , आनंद , एकता , समता आणि विधी यांचा आदर्श घेऊन स्थापना केली , त्याचबरोबर त्यांनी पुण्यातील दीनबंधू या वृत्तपत्राने समाजाच्या मतांना आवाज दिला .

महात्मा फुले यांनी १८७३ साली जातीतील भेदभाव आणि अत्याचार अस्पृश्यता यांची जाणीव करून देण्यासाठी समाजातील दलित वर्गातील लोकांसाठी “गुलामगिरी” हा ग्रंथ लिहिला .

महात्मा फुले यांचा व्यवसाय काय होता ?  (What was the profession of Mahatma Phule?)

महात्मा फुले हे सामाजिक कार्यकर्ते होतेच पण ते त्याचबरोबर व्यापारीही होते . त्यांनी १८८२ मध्ये स्वतः व्यापारी , शेतकरी त्याचबरोबर नगरपालिकेमध्ये कार्य करत होते . फुले यांच्या कडे पुण्याच्या जवळील मांजरी येथील शेतजमीन होती .

महात्मा फुले यांचे महिला कल्याण मधील योगदान . (Mahatma Phule’s contribution to women’s welfare)

महात्मा फुले यांनी स्त्रियांनी शिकावे म्हणून पुढाकार घेतला . सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले याना शिकविले . आज प्रत्येक मुलगी , स्त्री हि घराबाहेर पडून शिकते , नोकरी करते स्वतःच्या पायावर उभी राहून आर्थिक दृष्ट्या सबळ आहे ते केवळ सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यामुळे शक्य झालं आहे . फुले यांनी त्यांच्या पत्नीला शाळेत पाठवून शिकविले .

पती पत्नी या दोघांनी मिळून १८४८ मध्ये पुणे येथील विश्रामबाग वाडा येथील भारतातील पहिली मुलींची शाळा सुरु केली . त्या नंतर त्यांनी विधवा पुर्नविवाह ला प्रोत्साहन दिले आणि १८६३ मध्ये गर्भवती विधवा यांच्यासाठी सुरक्षित ठिकाणी जन्म देण्यासाठी घर सुरु केले . त्याचप्रमाणे नंतर फुले यांनी भ्रूणहत्येचे प्रमाण कमी करण्याच्या प्रयन्त्नत त्यांनी अनाथाश्रम स्थापन केले.

महात्मा या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये महान म्हणजे आत्मा , पूज्य असा केला जातो . १८८८ मध्ये मुंबईत एका विशेष कार्यक्रमात त्यांना सन्मानित महात्मा म्हणून लागू करण्यात आले .

“ विद्येविना मती गेली।

मतिविना नीती गेली।

नीतिविना गती गेली।

गतिविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले।

इतके अनर्थ एका अविद्येने केले।। “

महात्मा फुलेंनी शिक्षणाचे महत्व पटवून देताना या ओळींचा उल्लेख केला जो कि अजूनहि आपल्या प्रत्येकाच्या मुखात हा शिक्षणाचे महत्व किती आहे हे दर्शवून देतो .

महात्मा फुले यांची प्रकाशित कार्ये ? (Published works of Mahatma Phule?) 

  • ब्राह्मणाचे कसाब १८६९
  • तृतीय रत्न १८५५
  • अस्पृश्यांची कैफियत
  • गुलामगिरी , १८७३
  • शेतकऱ्याचा आसूड १८८१
  • इशारा , १८८५
  • सत्यशोधक समाजाची मंगलाष्टके सर्व पूजा विधी , १८८७

FAQ

महात्मा फुले यांची जयंती कधी असते?( When is Mahatma Phule’s birth Date )

महात्मा फुले यांची जयंती ११ एप्रिल , १८२७ ह्या दिवशी असतो .

महात्मा फुले यांचा जन्म कोठे झाला ?  (Where was Mahatma Phule born? )

महात्मा फुले यांचा जन्म साताऱ्यातील कटगुण या गावी झाला .

सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते ?( Who was the father of social revolution? )

सामाजिक , शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले ह्यांना म्हंटले जाते . 

महात्मा फुले यांचे मूळ नाव काय होते ? (What was the original name of Mahatma Phule?)

महात्मा फुले ह्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोंविदराव फुले आहे .

सत्यशोधक सभा संस्थापक कोण आहेत ? (Who is the founder of Satyashodak Sabha?)

महात्मा फुले यांनी १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची  स्थापना केली मात्र समाज अधिवेशनाची सुरुवात हि १९११ पासून करण्यात आली .अश्या ह्या थोर सामाजिक कार्यकर्ता यांचे निधन २८ नोव्हेंबर , १८९० वय वर्ष ६३ असताना झाले .अश्याप्रकारे आपण या लेखात महात्मा फुले यांच्याबद्दल सखोल माहिती मांडली , तुम्हाला हि माहिती फायदेशीर वाटली तर नक्की तुमच्या मित्रपरिवार सोबत शेअर करा .

Leave a Comment