महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण माहिती Mahatma Jyotiba Phule Information In Marathi

Mahatma Jyotiba Phule Information In Marathi महात्मा ज्योतिबा फुले हे १९ व्या शतकातील एक थोर समाजसुधारक होते ,त्यांनी बाल – विवाह यांसारख्या अन्य रूढींना विरोध केला आणि त्या रूढी बंद होण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.महात्मा फुले हे एक समाजसेवक असून त्यांनी आपले आयुष्य मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केले.अशाच या थोर समाजसेवकाबद्दल म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाद्वारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाविषयी माहिती जाणून घेऊयात.

Mahatma Jyotiba Phule Information In Marathi

महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण माहिती Mahatma Jyotiba Phule Information In Marathi

नाव –महात्मा ज्योतिबा फुले
जन्म –११ एप्रिल १८२७
जन्म ठिकाण –सातारा ,महाराष्ट्र
पत्नीचे नाव –सावित्रीबाई फुले
मुलाचे नाव –यशवंत फुले
मृत्यू –२८ नोव्हेंबर १८९०

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म / Birth of Mahatma Jyotiba fule in Marathi

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली महाराष्ट्र राज्यातील सातारा येथे  झाला.महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आणि महात्मा फुले जेव्हा एक वर्षाचे होते ,तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले.आईच्या निधनानंतर लहान ज्योतिबा फुले यांचे पालन पोषण सगुनाबाई नावाच्या महिलेने केले. सगुनाबाई यांनी ज्योतिबा फुले यांना आईची कमी जाणवू दिली नाही.

७ वर्षाच्या वयामध्ये आई वडिलांनी ज्योतिबा फुले यांना शाळेत घातले ; परंतु त्या काळात शाळेत होत असलेल्या जाती भेदभावामुळे ज्योतिबा फुले यांना शाळेत जायला आवडत नसे ,परंतु त्यांच्या अंगी शिकण्याची कला लहानपणापासून होती.त्यांची आई सगुनाबाई ह्या घरची कामे करत आणि त्यातून राहिलेल्या वेळेत ज्योतिबा फुले यांना शिकवत.ज्योतिबा फुले हे लहान वयातच सामाजिक चर्चेत सहभाग घेत आणि लोक त्यांच्या बौद्धिक चर्चा पाहून प्रभावित होत.

त्याकाळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण घेतले होते आणि त्यांच्या घरातील लोकांना वाटत होते की ,”ज्योतिबा फुले यांनी नोकरी करावी.परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्रियांच्या हक्कासाठी लढण्यामध्ये घालवण्याचे ठरवले .

महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य विधवा महिलांच्या हक्कासाठी लढण्यासाठी घालवले ,त्यांनी शेतकऱ्यांना देखील न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला.

देशातील पहिली मुलींची शाळा / First women school in the country in Marathi

महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांची बायको सावित्रीबाई फुले यांनी वर्ष १८४८ मध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे भारत देशातील पहिली मुलींची शाळा स्थापन केली आणि ज्योतिबा फुले यांच्या पत्नी म्हणजे सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या.

त्या काळी घरातील मुलींनी चुल आणि मूल या दोनच गोष्टी कराव्यात असा समाजाचा समज होता.त्याकाळी घरात जर एका स्त्रीच्या पोटी मुलीने जन्म घेतला,तर वंशाचा दिवा जन्माला आला नाही म्हणून ,त्या मुलींचा तिरस्कार केला जात होता.

मुलींनी न शिकता लग्न करणे आणि आयुष्यभर आपल्या पतीची आणि आपल्या मुलांची सेवा करणे ,हा त्याकाळचा समज होता ; परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांना वाटत होते की ,” मुली देखील समाजातील एक प्रमुख हिस्सा आहेत.

मुलींनी देखील शिक्षण घेतले पाहिजे “,यासाठी त्यांनी मुलींची शाळा स्थापन केली ; परंतु या शाळेत सुरवातीला खूप कमी मुलींनी दाखला घेतला होता,परंतु जसा जसा काळ गेला ,तसा तसा समाजाला लोकांना मुलींच्या शिक्षणाचे महत्व पटले आणि त्यांनी आपल्या मुलींना शिकवण्यासाठी त्यांना शाळेत पाठवयला सूरवात केली.

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा देशातील पहिली मुलींची शाळा स्थापन केली ,तेव्हा सुरवातीला त्यांना खूप समस्यांचा सामना करावा लागला ,महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले जेव्हा रस्त्याने जात असत,तेव्हा त्याकाळच्या समाजातील माणसे त्याच्यावरती शेन टाकत असत.परंतु महात्मा ज्योतिबा फुले त्या लोकांना जुमानत नसत ,ते डगमगले नाही आणि त्यांनी शेवटपर्यंत मुलींना शिकवण्याचा ध्यास काही सोडला नाही.

हिंदू समाजात चालत आलेल्या काही रूढी परंपरा जसे की ,बालविवाह ,सती परंपरा ,विधवा विवाह ,इत्यादी परंपरेने चालत आल्या होत्या.महात्मा ज्योतिबा फुले यांनी या चालत आलेल्या रूढी परंपरा बंद पाडण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले.महात्मा ज्योतिबा फुले यांनी जातीव्यवस्था मध्ये आवश्यक सुधार आणण्यासाठी देशभर सामाजिक आंदोलने केली.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य विधवा स्त्री साठी लढण्यामध्ये ,शेतकऱ्यांसाठी लढण्यामध्ये ,मुलींच्या हक्कासाठी लढण्यामध्ये खर्च केले.महात्मा फुले यांनी लोकमान्य टिळक , न्या. रायडू यांच्यासोबत येऊन समाज हिताची कामे केली ,परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांना काही ठिकाणी वरच्या मंडळींचा निर्णय चुकीचा वाटत असे ,त्यावेळी ते शांत न बसता,ते त्यांच्यावर टिक्का करत.

सत्यशोधक समाजाची स्थापना / Establishing Satya Shodhak Samaj in Marathi

१९४८ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा चालू केल्यानंतर २४ सप्टेंबर १८७३ साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली .या सत्यशोधक समाजाचा मुख्य उद्देश हा होता की ,” समाजातील क्षुद्र लोकांच्या हक्कासाठी लढणे आणि त्यांना समाजामध्ये ताठ मानेने वावरण्यासाठी प्रयत्न करणे .”

त्या काळी ब्रिटिश राजवट होती.त्याकाळी बऱ्यापैकी लोकांना ब्रिटिश राजवट बद्दल तिरस्कार होता ,परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांचा ब्रिटिश राजवट बद्दल सकारात्मक दृष्टिकोन होता ,”त्यांच्यामते ब्रिटिश राजवट समाजाला सामाजिक समानता देत आहे. “

महात्मा ज्योतिबा फुले यांना वाटत होतें की ,” समाजामध्ये जोपर्यंत जाती वरून भेदभाव होत राहील ,तो पर्यंत आपला समाज प्रगती करू शकणार नाही. त्यांचे असे ही मत होते की ,” जोपर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना समान अधिकार मिळणार नाही ,तोपर्यंत आपला भारत देश प्रगती करू शकणार नाही.”

आज बऱ्यापैकी सर्व ठिकाणी सर्व क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत ,याचे कुठे ना कुठे श्रेय महात्मा ज्योतिबा फुले यांना जाते.महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामाजिक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले .त्यांच्या या अमूल्य कामासाठी वर्ष १८८८ मध्ये मुंबईत झालेल्या एक सभेमध्ये त्यांना ” महात्मा ” ही पदवी दिली आणि तेव्हापासूनच ज्योतिबा फुले हे महात्मा म्हणून ओळखू लागले.

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मुल बाळ न्हवते ,म्हणून त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला होता आणि तो मुलगा पुढे शिकून डॉक्टर झाला .त्या मुलाने नंतर पुढे जाऊन आपल्या आई वडिलांच्या सामाजिक कार्यामध्ये हात मिळवला.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन / Death of Mahatma Jyotiba fule in Marathi

वर्ष १८८८ मध्ये एके दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांना अटॅक आला आणि या अटॅक मुळे त्यांचे शरीर दिवसेंदिवस कमजोर होत होते ,परंतु त्यांचे मन आजही उत्साहाने आणि सामाजिक कार्य करण्यासाठी तयार होते.२८ नोव्हेंबर १८९० मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झाले .या दिवशी आपले संपूर्ण आयुष्य महिलांसाठी लढलेल्या एका महात्माचा अंत झाला.

FAQ

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म केव्हा झाला ?

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ मध्ये महाराष्ट्र राज्यातील सातारा येथे झाला.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते ?

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नीचे नाव ” सावित्रीबाई फुले ” होते.

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या वर्षी देशातील पहिली मुलींची शाळा चालू केली ?

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी वर्ष १८४८ मध्ये देशातील पहिली मुलींची शाळा चालू केली.

महात्मा ज्योतिबा फुले यांना ” महात्मा ” ही पदवी कोणी दिली ?

महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी वर्ष १८८८ मध्ये मुंबईत झालेल्या सभेमध्ये ” विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर” यांनी दिली.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना का केली ?

महात्मा ज्योतिबा फुले यांनी क्षुद्र लोकांच्या हक्कासाठी लढण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

६) महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन केव्हा झाले ?

वर्ष १८८८ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना अटॅक आला आणि २८ नोव्हेंबर १८९० मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झाले.

आजच्या लेखामध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी आणि त्यांनी केलेल्या सामजिक कार्याविषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment