महाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती Maharashtra State Information In Marathi

Maharashtra State Information In Marathi राकट देशा ,कणखर देशा ,दगडाच्या देशा , प्रणाम माझा घ्यावा ,हे श्री महाराष्ट्र देशा.आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्र राज्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे महाराष्ट्र राज्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Maharashtra State Information In Marathi

महाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती Maharashtra State Information In Marathi

राज्याचे नाव महाराष्ट्र
राजधानी मुंबई
उपराजधानी नागपूर
क्षेत्रफळ ३०७,७१३ चौरस किमी
लोकसंख्या ११.४२ करोड
भाषा मराठी

महाराष्ट्र राज्य (Maharashtra State in Marathi)

महाराष्ट्र हे भारत देशातील एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे आणि हे भारत देशाच्या पश्चिम दिशेला स्थित आहे. महाराष्ट्र राज्य हे आर्थिक दृष्ट्या देखील प्रबळ आहे आणि भारताची आर्थिक राजधानी असणारी मुंबई ही महाराष्ट्र राज्याची देखील राजधानी आहे.

महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० मध्ये झाली होती आणि १ मे दिवशी दरवर्षी “महाराष्ट्र दिवस” साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य हे ३०७,७१३ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये विस्तारले आहे. महाराष्ट्र राज्याची एकूण लोकसंख्या ही ११.४२ करोड इतकी आहे. महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहराला स्वप्नांची नगरी म्हणले जाते. देशातील मोठे मोठे कलाकार ,तसेच क्रिकेटर आणि नेते हे महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथे राहत असतात.

महाराष्ट्र राज्याची भौगोलिक रचना (Geographical Structure of Maharashtra State in Marathi)

महाराष्ट्र राज्याच्या जवळच अरबी समुद्र आहे. महाराष्ट्र राज्यातून कृष्णा ,गोदावरी आणि तापी सारख्या प्रमुख नद्या वाहतात. कळसूबाई शिखर हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे पर्वत आहे. या कळसूबाई शिखर ची उंची १६४६ मीटर इतकी आहे. महाराष्ट्र राज्याच्या आसपास असणाऱ्या समुद्राची लांबी ७२० किलो मीटर इतकी आहे.

महाराष्ट्र राज्याची संस्कृती (Tradition of Maharashtra State in Marathi)

आपल्या भारत देशाच्या संस्कृती मध्ये महाराष्ट्र राज्याच्या संस्कृतीचे विशेष महत्व आहे. महाराष्ट्र राज्याचे पारंपरिक भोजन हे “पुरळ पोळी” आहे. इथल्या मराठी भूमीत थोर संतांनी जन्म घेतला होता आणि त्या संतांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला महाराष्ट्र राज्याच्या संस्कृती विषयी माहिती सांगितली होती.

महाराष्ट्र राज्यातील पुरुष लोक शर्ट आणि पैंट घालतात ,तर महाराष्ट्र राज्यातील महिला वर्ग साडी घालतात. महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायातील मंडळी डोक्यावर पांढरी टोपी घालतात. हिंदू धर्मातील सर्व सण महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात.या सन्नापैकी इथे गणेशोत्सव , नवरात्री ,रामनवमी ,दिवाळी ,दसरा ,आणि इतर सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

महाराष्ट्र राज्यातील पर्यटन (Tourist places in Maharashtra State in Marathi)

महाराष्ट्र राज्यामध्ये शेकडो पर्यटन स्थळे आहेत ,जे भारतासोबत विदेशी लोकांची मने आपल्याकडे खेचत असतात. विविध देशातील पर्यटक महाराष्ट्र राज्याच्या संस्कृती अनुभवायला ,तसेच महाराष्ट्र राज्यातील पर्यटन स्थळे पाहायला इथे नेहमी येत असतात.

महाराष्ट्र राज्याच्या राजधानी मुंबई मध्ये असणारे “गेट वे ऑफ इंडिया” हे एक महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे “गेट वे ऑफ इंडिया” पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक लोक येथे नेहमी येत असतात. तसेच २६/११ चा हल्ला मुंबई येथील ताज हॉटेल वर झाला होता ,ते ताज हॉटेल पाहण्यासाठी देखील लोक येथे येत असतात.

महाराष्ट्र राज्याच्या शेजारीच समुद्र असल्यामुळे येथील कोकण परिसराला विशेष पर्यटकांचा दर्जा लाभला आहे. महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हे पर्यटकांसाठी प्रसिद्ध जिल्हे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग किल्ल्याला ,विजयदुर्ग किल्ल्याला एतहासिक महत्व आहे.

तर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आसपास स्कुबा डायव्हिंग, पैरा सेलिंग सारख्या वॉटर ॲक्टीविटिज देखील केल्या जातात. आपण महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ जाऊन या वॉटर ॲक्टीवीटिज चा आनंद घेऊ शकतो.

महाबळेश्वर हे महाराष्ट्र राज्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात महाबळेश्वर मध्ये पर्यटकांची गर्दी असते. तसेच महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे “राजीव गांधी प्राणी संग्रहालय” आहे. या प्राणी संग्रहालयात विविध प्रजातीचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. हे विशिष्ट प्रजातीचे प्राणी पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येथे नेहमी येत असतात.

महाराष्ट्र राज्यामध्ये असणारी धार्मिक स्थळे (Religious places in Maharashtra State in Marathi)

महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर धार्मिक स्थळे आहेत. महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर येथे विठ्ठल आणि रुक्मिणीचे मंदिर आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकऱ्यांनी पंढरपूर अगदी गजबजलेले असते. वारकरी पायी वारी करून आषाढी एकादशीला आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूर येते येत असतात आणि विठू माऊलीचे दर्शन घेत असतात.

महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर येथे महालक्ष्मीचे मंदिर आहे. तसेच कोल्हापूरच्या जवळच दख्खनचा राजा असणाऱ्या जोतिबा देवाचे मंदिर आहे. तुळजाभवानी अंबाबाई चे मंदिर महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे आहे. नवरात्रीला लाखो भाविक आईचे दर्शन घेण्यासाठी तुळजापूर येथे येत असतात.

महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यामधे गणपतीपुळे येथे गणपती बाप्पांचे मंदिर आहे. हे मंदिर समुद्री किनारी स्थित आहे. महाराष्ट्र राज्याची राजधानी असणाऱ्या मुंबई येथे मुंबा देवीचे मंदिर आहे. ह्या मुंबा देवी मुळेच मुंबई चे नाव “मुंबई” असे पडले होते.

महाराष्ट्र राज्यातील काही किल्ले (Some forts in Maharashtra State in Marathi)

१) शिवनेरी किल्ला – महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रसिध्द आणि एतहासिक किल्ला आहे.

२) सिंधुदुर्ग किल्ला – सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग नावाचा समुद्री किल्ला आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे हाताचे आणि पायाचे ठसे आहेत.

३) रायगड – रायगड किल्ला हा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी होता. या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी देखील आहे.

४) सिंहगड – सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव “कोंढाणा किल्ला” असे होते. हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी व इतर मावळ्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली होती. हा किल्ला आपल्या मावळ्यांनी जिंकून घेतला ; परंतु हा किल्ला जिंकताना सुभेदार तानाजी मालुसरे आणि इतर मावळ्यांना आपला जीव गमवावा लागला होता.

सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या निधनाची बातमी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांना समजते तेव्हा त्यांच्या तोंडून शब्द निघतात की ,“गड आला पण ,पण माझा सिंह गेला”. तेव्हापासून या कोंढाणा किल्ल्याचे नाव “सिंहगड” असे पडले होते.

FAQ

महाराष्ट्र राज्य हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे ?

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य हे भारत देशातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.

महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे ?

महाराष्ट्र राज्याची राजधानी ही मुंबई आहे.

महाराष्ट्र राज्य हे किती क्षेत्रफळामध्ये विस्तारले आहे ?

महाराष्ट्र राज्य हे ३०७,७१३ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये विस्तारले आहे.

महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या किती आहे ?

महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या ही ११.४२ करोड इतकी आहे.

महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली होती ?

महाराष्ट्र राज्याची स्थापना ही १ मे १९६० मध्ये झाली होती.

महाराष्ट्र राज्यामध्ये कोणती भाषा बोलली जाते ?

महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते.

महाराष्ट्र राज्यामध्ये कोणकोणती पर्यटन स्थळे आहेत ?

महाराष्ट्र राज्यामध्ये कोकण ,महाबळेश्वर ,लोणावळा ,मुंबई ,इत्यादी पर्यटन स्थळे आहेत.

महाराष्ट्र राज्यामध्ये कोणकोणती धार्मिक स्थळे आहेत ?

महाराष्ट्र राज्यामध्ये पंढरपूर ,तुळजापूर, कोल्हापूर ,शिर्डी ,अक्कलकोट ,गणपतीपुळे ,इत्यादी धार्मिक स्थळे आहेत.

आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्र राज्याविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण महाराष्ट्र राज्याची भौगोलिक रचना ,महाराष्ट्र राज्याची संस्कृती ,महाराष्ट्र राज्यात असणारी पर्यटन स्थळे ,महाराष्ट्र राज्यातील धार्मिक स्थळे ,तसेच महाराष्ट्र राज्यातील काही किल्ले ,महाराष्ट्र राज्याविषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

1 thought on “महाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती Maharashtra State Information In Marathi”

  1. अप्रतिम माहिती दिली आहे
    पण शेती विषयी व शेतकऱ्यांविषयी वेगवेगळ्या विभागातील प्राणी विषयी माहिती दिलेली नाही

    Reply

Leave a Comment