महाराणी अहिल्याबाई होळकर यांची संपूर्ण माहिती Maharani Ahilyabai Holka Information In Marathi

Maharani Ahilyabai Holka Information In Marathi भारतवर्षामध्ये भरपूर असे राजे होऊन गेले ,ज्यांनी लोकहिताची कामे केली. तसेच आपल्या भारत देशामध्ये अशा भरपूर महाराणी देखील होऊन गेल्या ,ज्यांनी शत्रूपासून आपल्या प्रजेचे रक्षण केले. आजच्या लेखामध्ये आपण अशाच भारतवर्षामध्ये जन्म घेतलेल्या एका थोर महाराणी म्हणजे “महाराणी अहिल्याबाई होळकर ” यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Maharani Ahilyabai Holka Information In Marathi

महाराणी अहिल्याबाई होळकर यांची संपूर्ण माहिती Maharani Ahilyabai Holka Information In Marathi

आजच्या लेखामध्ये आपण महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे बालपण ,त्यांचा विवाह ,महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जीवन संघर्ष ,त्यांनी आपल्या शासन काळात केलेली कार्य आणि महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत ,चला तर मग आजच्या लेखाद्वारे महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवना विषयी माहिती जाणून घेऊयात.

नाव महाराणी अहिल्याबाई होळकर
जन्म ३१ मे १७२५
वडिलांचे नाव माणकोजी शिंदे
पतीचे नाव खंडेराव होळकर
मुलाचे नाव – मुलीचे नाव मालेराव होळकर मुक्ताबाई
राज्य माळवा
मृत्यू १३ ऑगस्ट १७९५

महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म आणि त्यांचे लहानपण (Birth of Maharani Ahilyabai Holkar and his childhood days in Marathi)

महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे झाला. महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या वडिलांचे नाव ” माणकोजी शिंदे” होते आणि माणकोजी शिंदे हे एक शेतकरी होते. माणकोजी शिंदे यांना अहिल्याबाई होळकर या एकमेव कन्या होत्या.

लहानपणापासून अहिल्याबाई होळकर यांना देवाची भक्ती करण्याची आवड होती. त्या भगवान शिवजी च्या भक्त होत्या आणि त्या दररोज महादेवांच्या देवळात जाऊन महादेवांची पूजा करत.

महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा विवाह ( Married Life of Maharani Ahilyabai Holkar in Marathi)

कमी वयातच अहिल्याबाई होळकर यांचा विवाह मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी म्हणजे खंडेराव होळकर यांच्याशी झाला. लग्न झाल्यानंतर महाराणी अहिल्याबाई होळकर आणि खंडेराव होळकर यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. अहिल्याबाई होळकर यांच्या मुलाचे नाव “मालेराव” आणि मुलीचे नाव “मुक्ताबाई” असे ठेवण्यात आले. लग्नानंतर काही वर्षातच महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या पतीचे म्हणजे खंडेराव होळकर यांचे निधन झाले.

अहिल्याबाई होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर हे खूप पराक्रमी राजे होते. मल्हारराव होळकर हे माळवा ते पंजाब प्रांताचे राजे होते.

१७६६ मध्ये मल्हारराव होळकर यांचे निधन झाले ,मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर त्यांच्या साम्राज्याचे रक्षण त्यांच्या मुलाने केले ; परंतु त्यांच्या मुलाचे म्हणजे खंडेराव होळकर यांचे निधन काही वर्षातच झाल्यामुळे राज्याची सर्व जबाबदारी महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्यावर आली आणि महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या पतिच्या निधनानंतर आपल्या साम्राज्याचे रक्षण केले. माळवा साम्राज्यातील लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांना ” राजमाता” म्हणून देखील हाक मारत असत.

महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जीवन संघर्ष (Life struggles of Maharani Ahilyabai Holkar in Marathi)

महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर यांना १७५४ मध्ये एका युद्धात वीरगती प्राप्त झाली. महाराणी अहिल्याबाई होळकर या आपल्या पतीवर खूप प्रेम करत होत्या. त्याकाळी पतीच्या निधनानंतर पत्नीने सती जाण्याची प्रथा होती. आपल्या पतीच्या निधनानंतर महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी देखील सती जाण्याचा निर्णय घेतला ; परंतु आपल्या पिता समान असणाऱ्या सासऱ्यांच्या म्हणजे मल्हारराव होळकर यांच्या सांगण्यावरून त्या सती गेल्या नाहीत.

१७६६ मध्ये मल्हारराव होळकर यांचे देखील निधन झाले आणि त्याच्या पुढच्याच वर्षी १७६७ मध्ये महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या मुलाचे निधन झाले. आपल्या सासऱ्याच्या मृत्यूच्या दुःखातून अहिल्याबाई होळकर बाहेर पडल्या न्हवत्या त्यातच पुढच्याच वर्षी त्यांच्या मुलाचे निधन झाल्यामुळे महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला ; परंतु अशा परिस्थितीत देखील महाराणी अहिल्याबाई होळकर या डगमगल्या नाहीत आणि त्यांनी माळवा राज्य सांभाळण्याची जबाबदारी योग्य रीत्या पार पाडली.

अहिल्याबाई होळकर यांचे कार्य ( Work of Maharani Ahilyabai Holkar in Marathi)

आपल्या पतीच्या निधनानंतर अहिल्याबाई होळकर यांच्यावर माळवा साम्राज्याची जबाबदारी पडली होती. अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या शासन काळात भरपूर प्रजा हिताची कामे केली. आपल्या भारत देशात राज्य करणाऱ्या काही मुस्लिम राजवटिंनी आपल्या देशातील एतहासिक जुनी मंदिरे तोडण्याचा प्रयत्न केला होता ,या मध्ये काही ज्योतिर्लिंग चा देखील समावेश होता. अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या शासन काळात या तोडलेल्या मंदिरांना नवे रूप देण्याचे कार्य केले.

महाराणी अहिल्याबाई होळकर ह्यांचा प्रवास गरीब शेतकरी कुटुंबापासून झाला होता ,त्यामुळे त्यांना गरीब शेतकऱ्यांच्या व्यथा माहीत होत्या. त्यामुळे त्यांनी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी देखील प्रयत्न केले. अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या शासन काळात महिलांच्या विकासासाठी देखील प्रयत्न केले. त्यांनी महिलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आणि राज्यातील जास्तीत जास्त महिलांना शिकण्याचे विविध मार्ग उपलब्ध करून दिले.

“एका पुत्र नसलेल्या महिलेच्या पतीचे निधन झाले तर त्या विधवा महिलेच्या पतीची सर्व जमीन ही सरकारला द्यावी लागत होती “,असा पूर्वीच्या काळातील नियम होता. महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी हा नियम बंद केला आणि त्यांनी पुत्र नसलेल्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या पतीच्या जमिनीचा सर्व अधिकार विधवा महिलेकडे सोपवला.

महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे निधन (Death of Maharani Ahilyabai Holkar in Marathi)

महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य माळवा राज्यातील पर्जेच्या हिताची कामे करण्यासाठी खर्च केले. अशा या थोर महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे निधन १३ ऑगस्ट १७९५ मध्ये इंदोर येथे झाले.

FAQ

महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म केव्हा झाला ?

महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ मध्ये महाराष्ट्र राज्यातील जामखेड येथे झाला.

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या वडिलांचे नाव “माणकोजी शिंदे” असे होते.

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या पतीचे नाव काय होते ?

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या पतीचे नाव “खंडेराव होळकर” हे होते.

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या सासर्यांचे नाव काय होते ?

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या सासऱ्यांचे नाव “मल्हारराव होळकर” असे होते.

महाराणी अहिल्याबाई होळकर यांना किती मुले होती आणि त्यांचे नावे काय होती ?

महाराणी अहिल्याबाई होळकर यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती आणि त्यांच्या मुलाचे नाव “मालेराव ” आणि मुलीचे नाव ” मुक्ताबाई” असे होते.

महाराणी अहिल्याबाई होळकर या कोणत्या राज्याच्या महाराणी होत्या ?

महाराणी अहिल्याबाई होळकर या ” माळवा” राज्याच्या महाराणी होत्या.

महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या शासन काळात कोणकोणती कार्ये केली ?

महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या शासन काळात भरपूर प्रजा हिताची कामे केली. त्यांनी राज्यातील महिलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले ,तसेच त्यांनी आपल्या राज्यातील विधवा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी काही तोडलेल्या मंदिरांची बांधणी करून त्या मंदिरांना नवे रूप देण्याचा प्रयत्न केला.

महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे निधन केव्हा झाले ?

महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे निधन १३ ऑगस्ट १७९५ मध्ये इंदोर येथे झाले.

आजच्या लेखामध्ये आपण मालवा प्रांताच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली.तसेच आजच्या लेखामधून आपण महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे बालपण ,त्यांचा विवाह ,महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जीवन संघर्ष ,त्यांनी आपल्या शासन काळात केलेली कार्य आणि महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या विषयी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment