लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची संपूर्ण माहिती Lokshahir Annabhau Sathe Information In Marathi

Lokshahir Annabhau Sathe Information In Marathi आजच्या लेखामध्ये आपण अशा व्यक्तीमत्वाबद्दल माहिती पाहणार आहोत ,ज्यांचा भारत स्वातंत्र्य लढ्यामध्ये ,महाराष्ट्र मुक्ती संग्राम मध्ये आणि गोवा मुक्ती संग्राम मध्ये महत्वाचा वाटा आहे. आजच्या लेखामध्ये आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Lokshahir Annabhau Sathe Information In Marathi

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची संपूर्ण माहिती Lokshahir Annabhau Sathe Information In Marathi

नाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
जन्म १ ऑगस्ट १९२०
आईचे नाव वालूबाई साठे
वडिलांचे नाव भाऊराव साठे
तमाशाचे नाव लाल क्रांती कलामंच
मृत्यू १८ जुलै १९६९

अण्णाभाऊ साठे यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब (Birth of Lokshahir Annabhau Sathe and his family in Marathi)

अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० मध्ये महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यात झाला. अण्णाभाऊ साठे यांचे खरे नाव “तुकाराम भाऊराव साठे ” असे होते. अण्णाभाऊ साठे यांच्या वडिलांचे नाव “भाऊराव साठे ” होते ,तर त्यांच्या आईचे नाव “वालुबाई साठे” होते.

अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एका दलीत कुटुंबात झाला होता ,त्यामुळे त्यांच्या कुटंबियांना समाजातील काही लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्याकाळी समाजातील काही माणसे दलीत समाजाला कमी लेखत होती आणि त्याकाळची माणसे दलीत समाजातील माणसांना स्पर्श देखील करत न्हवती. अण्णाभाऊ साठे यांना देखील समाजातील या लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला.

त्याकाळी होत असलेल्या जातीय भेदभाव मुळे अण्णाभाऊ साठे यांना आपले शिक्षण देखील पूर्ण करता आले नाही. अण्णाभाऊ साठे हे लहानणापासूनच विठ्ठल भक्त होते. विठ्ठलाची भक्ती करण्यामध्ये त्यांचे मन रमत असत.

अण्णाभाऊ साठे यांचे लोकशाहीर बनन्यासाठीचे पाहिले पाऊल (Annabhau Sathe step towards becoming a Lokshahir)

अण्णाभाऊ साठे यांचे वडील भाऊराव साठे हे नोकरीच्या शोधात मुंबई येथे आले होते. भाऊराव साठे सोबत अण्णाभाऊ साठे हे देखील मुंबई येथे आले होते.

अण्णाभाऊ साठे यांच्या नातेवाईकांपैकी बापू साठे नावाचे नातेवाईक हे एक तमाशा मंडळी चालवत होते. अण्णाभाऊ साठे यांना अगोदर पासून गाणे गाण्याचा छंद होता , जेव्हा बापू साठे यांना समजले की अण्णाभाऊ साठे यांना गाणे गाण्याचा छंद आहे ,तेव्हा त्यांनी अण्णाभाऊ साठे यांना आपल्या भजनी मंडळी मध्ये शामिल होण्यासाठी विनंती केली. अण्णाभाऊ साठे यांनी विनंती ला मान राखून ते  बापू साठे यांच्या भजनी मंडळी मध्ये शामिल झाले.

असाच एकदा एका गावामध्ये तमाशा चा फड रंगणार होता. त्यादिवशी त्या गावामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील हे भाषण देण्यासाठी आले होते आणि त्यांनी त्या तमाशा वेळी भाषण दिले होते ,ज्या भाषणातून अण्णाभाऊ साठे यांचा कलेकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला. क्रांतिसिंह नाना पाटील हे त्या भाषणामध्ये “ब्रिटिश भारतीय लोकांवर करत असलेल्या अन्याया विषयी बोलत होते”. ते पुढे भाषणामध्ये भारतातील कामगार आणि मजदुर लोकांवर होत असलेल्या अन्याया विषयी बोलले होते.

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलेल्या भाषणाने संपूर्ण प्रेक्षकांचे मन खेचले. अण्णाभाऊ साठे यांना देखील वाटले की ,”कला ही फक्त लोकांचे मनोरंजन करण्यासाठी नाही तर , कलेच्या माध्यमातून आपण समाजामध्ये जन जागृती देखील करू शकतो”. याच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भाषणामुळे अण्णाभाऊ साठे यांचा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि हा प्रसंग म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील क्रांतिसिंह बनण्याचे पाहिले पाऊल होते.

लोकशाहीर – अण्णाभाऊ साठे ( Lokshahir – Annabhau Sathe in Marathi)

१९४४ मध्ये अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने नवीन तमाशा मंडळी ची निर्मिती केली आणि या तमाशा मंडळी ला त्यांनी “लाल क्रांती कलामंच” असे नाव दिले. या नवीन तमाशाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे देशातील दलीत समाजातील लोकांची व्यथा ,गरीब शेतकऱ्यांची व्यथा समाजापुढे मांडत असत.

तसेच ते तमाशाच्या माध्यमातून ब्रिटिश सत्ता भारतीय लोकांवर करत असलेल्या अन्यायाविरुद्ध लोकांना जागृत करत ,तसेच ते तमाशाच्या माध्यमांतून  लोकांच्या मनामध्ये देशाभिमान जागवण्यासाठी प्रयत्न करत असत.

त्याकाळी ब्रिटिश सत्ते विरुद्ध लोकांच्या मनामध्ये चीड होती आणि तमाशा हे ब्रिटिश सत्ते विरुद्ध लोकांना जागृत करणारे एक माध्यम बनले होते. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्र राज्यासोबत देशातील इतर राज्यांमध्ये देखील तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करत होते.

अण्णाभाऊ साठे यांच्या या कार्यामुळे त्यांची प्रसिध्दी दिवसेंदिवस वाढू लागली. लोक त्यांना शाहीर म्हणू लागले आणि पुढे अण्णाभाऊ साठे हे लोकांना जागृत करण्याचे काम करत होते ,त्यामुळे त्यांना सर्व जण लाडाने ” लोकशाहीर” म्हणून हाक मारू लागले.

याचदरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मुंबईतील एका मिल कंपनीमध्ये नोकरी करू लागले. कंपनीतील कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला त्यांनी जवळून पाहिले आणि त्यांनी तमाशाच्या माध्यमातून देशातील लोकांपुढे कामगारांची व्यथा मांडली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे लोकगीतांच्या माध्यमातून मुंबईतील बस कामगारांची व्यथा समाजापुढे मांडत होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जीवनभर आपल्या लेखणीतून समाजाला जागृत करण्याचे काम केले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजाची व्यथा साहित्यांच्या माध्यमातून लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ४० हून अधिक कादंबऱ्या देखील लिहिल्या आहेत.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य (Work of Annabhau Sathe in Marathi)

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांनी देशाच्या स्वांतत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता ,याचसोबत अण्णाभाऊ साठे यांनी गोवा मुक्ती संग्राम आणि महाराष्ट्र राज्य मुक्ती संग्राम यामध्ये देखील सहभाग घेतला होता.

अण्णाभाऊ साठे हे एक कलाकार होते आणि त्यांनी आपल्या कलेतून देशातील समाजाला जागृत करण्याचे काम केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आंदोलना दरम्यान पोवाडे आणि लावण्यांच्या मार्फत समाजातील तरूनांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये दलीत साहित्याची सुरवात केली आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे काही काळ दलीत साहित्याचे अध्यक्ष देखील राहिले होते. 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे निधन (Death of Lokshahir Annabhau Sathe in Marathi)

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर कलेच्या माध्यमातून समाजाची व्यथा लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अशा या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे निधन वयाच्या ४९ वर्षी १८ जुलै १९६९ मध्ये झाले.

FAQ

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म केव्हा झाला होता ?

अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० मध्ये झाला होता.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे खरे नाव काय होते ?

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे खरे नाव “तुकाराम भाऊराव साठे” हे होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वडिलांचे नाव ” भाऊराव साठे” हे होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आईचे नाव काय होते ?

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आईचे नाव ” वालूबाई साठे” हे होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी स्थापन केलेल्या तमाशा मंडळीचे नाव काय होते ?

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी तमाशा मंडळीची स्थापना केली होती आणि त्यांनी त्या तमाशा मंडळीचे नाव “लाल क्रांती कलामंच” असे ठेवले होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कोणते कार्य केले ?

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी तमाशाच्या माध्यमातून समाजातील गरीब लोकांची ,दलीत समाजाची , शेतकऱ्यांची व्यथा लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला ,तसेच त्यांनी ४० हून अधिक कादंबऱ्या देखील लिहिल्या आणि त्यांनी या कादंबऱ्यांच्या माध्यमातून समाजामध्ये जन जागृत करण्यासाठी प्रयत्न केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे निधन केव्हा झाले ?

वयाच्या ४९ व्या वर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे निधन १८ जुलै १९६९ मध्ये झाले.

आजच्या लेखामधून आपण तमाशाच्या माध्यमातून समाजातील लोकांची व्यथा लोकांपुढे मांडणाऱ्या थोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment