सिंह प्राण्याची संपूर्ण माहिती Lion Animal Information In Marathi

Lion Animal Information In Marathi सिंह हा प्राणी जमिनीवरील सर्वात ताकदवर प्राण्यांपैकी एक प्राणी आहे. तसेच सिंहाला जंगलाचा राजा देखील म्हणले जाते. सिंहाच्या डरकाळीचा आवाज एका मील पर्यंत लांब जाऊ शकतो. आजच्या लेखामध्ये आपण याच जंगलाच्या राज्या विषयी म्हणजे सिंहा विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे सिंह या प्राण्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Lion Animal Information In Marathi

सिंह प्राण्याची संपूर्ण माहिती Lion Animal Information In Marathi

प्राण्याचे नाव सिंह
वैज्ञानिक नाव पँथेरा लिओ
कुळ मार्जार कुळ
जात सस्तन

सिंह (Lions in Marathi)

सिंह हा एक साहसी प्राणी आहे. सिंहाला ताकदीचे प्रतीक देखील मानले जाते ,म्हणून आपल्या भारताच्या अशोक स्तंभावर सिंहाचे चिन्ह आहे. सिंह हा एक मांसाहारी प्राणी आहे आणि तो जंगलातील इतर प्राण्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करत असतो. जास्तकरून सिंह हे आफ्रिकेतील जंगलांमध्ये आढळतात.

सिंह जास्तकरून झुंड मध्ये राहणे पसंद करतात. सिंहाच्या झुंड मध्ये साधारण १५ ते २० सिंह असतात. ते झुंड ने शिकार देखील करतात. जिथे दाट झाडे आहेत ,अशा ठिकाणी सिंह राहत नाहीत. सिंहांना डोंगरी भागांवर राहणे पसंद आहे. पाण्याविना एक सिंह साधारण चार दिवस पर्यंत जिवंत राहू शकतो.

सिंह हे दुसऱ्या प्राण्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करत असतात ; परंतु जेव्हा सिंहांना अन्नपचनची समस्या उद्भवते ,तेव्हा ते हिरवे काँग्रेस खातात. काँग्रेस खाण्याचे मुख्य कारण हे की ,”काँग्रेस खाल्यानंतर त्यांना उलटी होते आणि त्यांचे अन्न पचण्यास मदत होते.”

सिंहाचे वर्णन (Description of Lions in Marathi

सिंह हा एक जंगली प्राणी आहे आणि त्याला चार पाय असतात. सिंहाला मागे शेपटी असते ,सिंह त्या शेपटीच्या मदतीने उंच उडी मारू शकतो. नर सिंहाच्या मानेवर आयाळ असते. जसे जसे नर सिंहाचे वय वाढत जाते ,तसे तसे त्यांच्या आयाळामध्ये केसांची संख्या देखील वाढत जाते. नर सिंहाच्या मानेवर आयाळ असते ,तर मादी सिंहाच्या मानेवर आयाळ नसते.

सिंह हा एक धिप्पाड आकाराचा प्राणी आहे ,परंतु सिंहाचे कान हे छोट्या आकाराचे असतात. नर सिंहाची उंची १० फूट इतकी असते ,तर त्याची लांबी ४ फूट असते. साधारण सिंहाचे वजन हे २०० किलो ग्रॅम च्या आसपास असते.

भारत देशातील सिंहाचे घर – गुजरात (Home of Lions in India -Gujarat )

आपल्या भारत देशामध्ये जितके पण सिंह आढळतात , तेवढे सगळे सिंह हे आशियाई प्रजातीचे सिंह आहेत. आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त सिंह हे गुजरात राज्यामध्ये आढळतात. गुजरात राज्यामध्ये सिंहाची संख्या जास्त असल्यामुळे ,इथे सिंहाला

 पाहण्यास येणाऱ्यांची संख्या देखील जास्त असते. दरवर्षी जगभरातून हजारो पर्यटक सिंह पाहण्यासाठी गुजरात येथे येत असतात. गुजरात मध्ये आशियाई प्रजातीचे सिंह आढळले जातात ,म्हणून त्यांना “एशियाटिक लायन्स” म्हणले जाते. गुजरात मध्ये वर्तमानात एकूण ६७५ सिंह आहेत.

सिंहाची शिकार करण्याची पद्धत (Lions hunting method in Marathi)

नर सिंहाच्या तुलनेत मादी सिंह शिकार करत असतात. नर सिंह आपल्या कुटुंबाचे रक्षण करत असतो. जर शिकार आकाराने मोठी असेल तर ,नर सिंह त्या मोठ्या शिकराची शिकार करतो.

नर सिंह आणि मादी सिंहाला साधारण दिवसाला ८ किलो मांस खाण्याची आवश्यकता असते. सिंह जास्तकरून हरीण ,जिराफ या प्राण्यांची शिकार करतात. सिंहाची गर्जना जंगलामध्ये खूप दूरवर एकी जाते.

सिंह जंगलातील इतर मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करतात. हाती आणि जिराफ सारख्या मोठ्या प्राण्यांची शिकार सिंह झुंडने करतात. दिवसाच्या तुलनेत सिंह हे जास्तकरून रात्रीची शिकार करणे पसंद करतात . रात्रीची शिकार करण्यामागे महत्वाचे कारण हे असते की ,”रात्री अंधारामध्ये इतर प्राणी सिंहांना व्यवस्थीत रित्या पाहू शकत नाही ,त्यामुळे सिंह हे त्या प्राण्यांची शिकार सहजरीत्या करू शकतात”.

सिंहाचे संवर्धन (Lions Conservation in Marathi)

पूर्वी राजे – महाराजे छंद म्हणून जंगली प्राण्यांची शिकार करत होते. आजकाल देखील काही लोक सिंहाची शिकार करतात. सिंहाची शिकार केल्यामुळे दिवसेंदिवस जगभरामध्ये सिंहाची संख्या कमी होत चालली आहे. सिंहाचे संवर्धन व्हावे म्हणून जगभरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

सिंहाचे संवर्धन व्हावे आणि सिंहाची शिकार कोणीही करू नये ,यासाठी भारत सरकारने जंगली प्राण्यांची शिकार करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यासाठी काही कायदे लागू केले आहेत. त्या कायद्या अंतर्गत कोणीही सिंहासोबत इतर जंगली प्राण्यांची शिकार करू शकत नाही.

सिंहांचा जीवन काळ (LifeSpan of Lions in Marathi)

साधारण एक मादा सिंहाचा जीवन काळ हा १५ ते १६ वर्षाचा असतो ,तर नर सिंहाचा जीवन काळ हा ८ ते १० वर्षाचा असतो. काही सिंह ह्या जीवन काळापेक्षा जास्त काळ देखील जगतात. सिंह आपल्या जीवन काळातील जास्त वेळ हा झोपण्यामध्ये घालवतात. नर सिंह साधारण एका दिवसामध्ये वीस तास इतकी झोप घेतो ,तर मादा सिंह एका दिवसामध्ये साधारण सोळा तास इतकी झोप घेते.

सिंह या प्राण्याविषयी असणाऱ्या १५ रोचक गोष्टी (15 interesting facts about Lions in Marathi)

१) नर सिंह आपल्या झुंड चे रक्षण करतात ,तर मादी सिंह इतर प्राण्यांची शिकार करतात.

२) सिंह हे साधारण दिवसामध्ये १६ ते २० तास झोप घेत असल्यामुळे ,त्यांना आळसी प्राणी देखील म्हणले जाते.

३) आफ्रिकेतील सिंह माणसांची देखील शिकार करतात.

४) सिंह काही दिवस पाण्याविना राहू शकतात ; परंतु ते अन्न विना राहू शकत नाहीत.

५) सिंहाला प्राचीन काळापासूनच जंगलाचा राजा मानले जात होते.

६) सिंहाना पोहण्याचे कौशल्य प्राप्त असते. ते पाण्यामध्ये पोहू शकतात.

७) सिंह हा मांजरांच्या प्रजातीतील एक प्राणी आहे.

८) इतर प्राण्यांच्या तुलनेत सिंहाची ऐकण्याची क्षमता जास्त असते. सिंह आपल्या शिकारीचा आवाज खूप लांबूनही एकु शकतात.

९) सिंह हे दिवसातील २४ तासापैकी १६ ते २० तास झोप घेतात आणि इतर वेळ ते शिकार करण्यामध्ये घालवतात.

१०) सिंह या प्राण्याचा वेग हा ५० किलो मीटर पर तास इतका असतो. तो वेगाने धावून इतर प्राण्यांची शिकार करतो.

११) सिंह हा प्राणी भरपूर देशांचा राष्ट्रीय प्राणी देखील आहे. सिंह हा प्राणी नेदरलँड ,बेल्जियम या देशांचा राष्ट्रीय प्राणी आहे. १९७२ च्या अगोदर सिंह हा भारत देशाचा देखील राष्ट्रीय प्राणी होता ; परंतु १९७२ मध्ये वाघाला आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय प्राणी करण्यात आले होते.

१२) दरवर्षी जगभरामध्ये १० ऑगस्ट ला “जागतिक सिंह दिवस” मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या “जागतिक सिंह दीन” दिवशी जगभरामध्ये सिंह हा प्राण्या संबंधी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

१३) भारत देशाचे राष्ट्रीय चिन्ह हे “अशोक स्तंभ” आहे आणि या अशोक स्तंभावर सिंहाचे चिन्ह आहे.

१४) सिंहाचे वैज्ञानिक नाव हे “Panthera Leo” आहे.

१५) मादी सिंह एकावेळी सहा छोट्या छाव्यांना जन्म देऊ शकते.

FAQ

सिंहाचे वैज्ञानिक नाव काय आहे ?

सिंहाचे वैज्ञानिक नाव “Panthera Leo” असे आहे.

सिंहाचा जीवन काळ हा साधारण किती वर्षांचा असतो ?

नर सिंहाचा जीवन काळ हा साधारण १५ ते १६ वर्षाचा असतो ,तर मादी सिंहाचा जीवन काळ हा साधारण ८ ते १० वर्षांचा असतो.

सिंह हा दिवसातून साधारण किती वेळ झोप घेतो ?

सिंह हा प्राणी दिवसातून साधारण १६ ते २० तास झोप घेतो.

दरवर्षी जागतिक सिंह हा दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

दरवर्षी जागतिक सिंह दिवस हा १० ऑगस्ट ला जगभरामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या दिवशी सिंह या प्राण्या संबंधी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

जंगलाचा राजा कोणत्या प्राण्याला म्हणले जाते ?

सिंहाला जंगलाचा राजा म्हणले जाते.

आजच्या लेखामध्ये आपण जंगलाचा राजा असणाऱ्या सिंह या प्राण्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment