लता मंगेशकर यांची संपूर्ण माहिती Lata Mangeshkar Information In Marathi

Lata Mangeshkar Information In Marathi ज्यांना लोक देवी सरस्वती चा साक्षात अवतार मानतात ,अशा लता मंगेशकर यांनी भरपूर गाणी गायली. लता मंगेशकर या भारतासोबत जगभरात देखील प्रसिद्ध होत्या.लता मंगेशकर या एक पाश्र्व संगीत गायिका होत्या आणि त्यांनी हिंदी भाषेसोबत इतर भाषांमध्ये देखील गाणी गायली.लता मंगेशकर यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील आहे ,लता मंगेशकर यांनी ३६ वेगवेगळ्या भाषेमध्ये गाणी गायली आणि भारत सरकार कडून  भारताचा सर्वोच्च पुरस्कार असणारा  भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता ,अशाच या भारतरत्न पुरस्कार भेटलेल्या लता मंगेशकर यांच्या विषयी आपण आजच्या लेखामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाला सुरवात करूयात.

Lata Mangeshkar Information In Marathi

लता मंगेशकर यांची संपूर्ण माहिती Lata Mangeshkar Information In Marathi

लता मंगेशकर यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब / Birth of Lata mangeshkar and his family in Marathi

लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ साली मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथे झाला.त्यांच्या वडिलांचे नाव पंडित दीनानाथ मंगेशकर होते ,तर त्यांच्या आईचे नाव शेवंती मंगेशकर असे होते ,लता मंगेशकर यांचे वडील पेशाने मराठी गायक ,कलाकार होते ,तर त्यांच्या आई एक गुजराती होत्या.पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव नर्मदा होते ,परंतु नर्मदा यांच्या मृत्यूनंतर पंडित दीनानाथ मंगेशकर यांनी नर्मदा यांच्या छोट्या बहिणीशी म्हणजे शेवंती शी लग्न केले.

नाव –लता मंगेशकर
जन्म –२८ सप्टेंबर १९२९
आईचे नाव –शेवंती मंगेशकर
वडिलांचे नाव –दीनानाथ मंगेशकर
पुरस्कार –पद्मविभूषण ,दादासाहेब फाळके पुरस्कार ,भारतरत्न
मृत्यू –६ फेब्रुवारी २०२२

लता मंगेशकर यांच्या नावाची कहाणी / Intresting story of Lata mangeshkar Name in Marathi

पंडित दीनानाथ मंगेशकर यांचे पूर्वीचे आडनाव हर्डीकर असे होते परंतु ते गोव्यामध्ये राहत असल्यामुळे त्यांनी आपले आडनाव बदलून आपले आडनाव “मंगेशकर” असे ठेवले.लता मंगेशकर या दीनानाथ मंगेशकर आणि शेवंती मंगेशकर यांच्या पहिल्या मुलगी होत्या.

सुरवातीला जन्माच्या नंतर लता मंगेशकर यांचे नाव हेमा असे ठेवण्यात आले होते , परंतु काही काळानंतर त्यांचे नाव लता ठेवण्यात आले.दीनानाथ मंगेशकर यांच्या एका “भावबंधन ” नाटकामधील एका महिला पात्राचे नाव लतिका होते ,या नावाला प्रभावित होऊन दीनानाथ मंगेशकर यांनी आपल्या मुलीचे नाव लता ठेवले .

लता मंगेशकर यांच्या नंतर त्यांच्या आई वडिलांना तीन मुली झाल्या ,ज्यांना त्यांनी मीना , आशा, उषा अशी नावे दिली आणि त्यांच्या आई वडिलांना  मुलगा झाला ,त्याचे नाव त्यांनी हृदयनाथ नाव ठेवले.

लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे स्वतः एक गायक असल्यामुळे लहानपापासूनच लता मंगेशकर यांना संगीतामध्ये आवड निर्माण होऊ लागली.लता मंगेशकर जेव्हा पाच वर्षाच्या झाल्या तेव्हा त्यांचे वडील त्यांच्याकडून गाण्याचा रियाज करून घेत असत.लता मंगेशकर यांनी लहान असताना वडिलांच्या नाटकामध्ये देखील सहभाग घेतला होता.

जेव्हा लता मंगेशकर १३ वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले.घरामधील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे घराची सगळी जबाबदारी लता मंगेशकर यांच्यावर पडली ,लता मंगेशकर यांच्यावर खूप कमी वयामध्ये घरची सर्व जबाबदारी पडली.यातच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक विनायक मंगेशकर यांनी लता मंगेशकर यांनी गायिका किंवा कलाकार बनावे असे लता मंगेशकर यांना सुचवले.

लता मंगेशकर यांना अभिनय करायला आवडत नव्हते ,परंतु घरावरती आलेल्या परिस्थिती मुळे त्यांना चित्रपटात अभिनय करावा लागला.लता मंगेशकर यांनी मंगळा गौर (१९४२ ) ,माझे बाळ (१९४३), बडी मा (१९४५) आणि जीवन यात्रा (१९४६ ) यांसारख्या चित्रपटात छोटा मोठा रोल केला.लता मंगेशकर यांनी आपल्या सुरवातीच्या करिअर मध्ये मराठी ,तसेच हिंदी चित्रपटामध्ये अभिनय केला होता.

१९४२ मध्ये सदाशिव नेवरेकर यांनी एका चित्रपटामध्ये लता मंगेशकर यांना गाणे गाण्याची संधी दिली ,ते गाणे रेकॉर्ड देखील केले ,परंतु चित्रपटाच्या शेवटच्या कट वेळी ,ते गाणे चित्रपटातून हटवण्यात आले. १९४२ मध्ये रिलीज झालेल्या मंगळा गौर चित्रपटामध्ये लता मंगेशकर यांनी गाणे गायले आणि या चित्रपटातून प्रथम लता मंगेशकरांचा आवाज संपूर्ण जगाने ऐकला.१९४३ मध्ये रिलीज झालेल्या गजाभाऊ चित्रपटामध्ये लता मंगेशकर यांनी हिंदी गाणे गायले.

१९४५ मध्ये लता मंगेशकर ह्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथे आल्या .येथे त्यांची भेट अमन अली खान यांचाशी झाली .अमन अली खान यांनी लता मंगेशकर यांना शास्त्रीय संगीत शिकवले.१९४५ मध्ये रिलीज झालेल्या हिंदी चित्रपट बडी मा मध्ये लता मंगेशकर यांनी एक भजन गायले , तर १९४६ मध्ये रिलीज झालेल्या “आपकी सेवा ” चित्रपटामध्ये एक गाणे गायले.या दोन गाण्यामुळे लता मंगेशकर यांना प्रसिध्दी मिळाली .

लता मंगेशकर आणि गुलाम हैदर यांची भेट / Meeting of Lata mangeshkar and his mentor Gulam Haidar in Marathi

पुढे काही काळानंतर लता मंगेशकर यांची भेट वसंत देसाई आणि गुलाम हैदर यांसारख्या थोर संगीतकारकांशी झाली.गुलाम हैदर ह्यांना लता मंगेशकर यांचे मेंटोर म्हणले जाते.गुलाम हैदर हे लता मंगेशकर यांना घेऊन शशधर मुखर्जी यांच्याकडे घेऊन गेले ,शशधर मुखर्जी त्याकाळी शहीद चित्रपट बनवत होते ,शशधर मुखर्जी यांनी लता मंगेशकर यांचा आवाज खूप कमी आहे ,म्हणून त्यांना चित्रपटात गाणे गाण्यासाठी नाकारले .

गुलामी हैदर यांना लता मंगेशकर यांच्या कौशल्या वरती संपूर्ण विश्वास होता ,त्यामुळे त्यांनी बळजबरी लता मंगेशकर यांच्याकडून ” दिलं मेरा तोडा ” आणि ” मुझे कही का ना छोडा” हे गीत गायले.लता मंगेशकर यांच्या करियर मधील सर्वात पहिली हो दोन गाणी हिट झाली आणि नंतर लता मंगेशकर यांचे करिअर यशाची पायरी चढतच गेले.

लता मंगेशकर यांचे गाणे ८० आणि ९० च्या दशकात देखील गाजले जात होते ,लता मंगेशकर यांचे वय वाढत होते ,परंतु लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये दम आजही होता.लता मंगेशकर यांनी भरपूर गाणी गायली .

१९६२ मध्ये लता मंगेशकर यांना अन्नातून विष द्यायचा प्रयत्न करण्यात आला होता ,लता मंगेशकर जेव्हा त्या सकाळी उठले तेव्हा ,त्यांच्या पोटामध्ये दुखू लागले ,ते जेव्हा दवाखान्यात गेले तेव्हा ,त्यांना समजले की त्यांना कोणीतरी अन्नातून विष देण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु आजही त्यांना विष कोणी दिले हे समजले नाहीये.

लता मंगेशकर यांच्या डोक्यावर लहानपापासूनच जबाबदारी चे ओझे होते ,त्यांच्या वडिलांच्या मृत्यू नंतर त्यांना सर्व भावंडे आणि आपल्या आईची काळजी घ्यायची होती ,त्यामुळे लता मंगेशकर यांनी लग्न केले नाही.

लता मंगेशकर यांना मिळालेले पुरस्कार / Awards recived by Lata mangeshkar in Marathi

लता मंगेशकर यांच्या कामासाठी भारत सरकारकडून त्यांचा भरपूर पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आहे.१९६९ मध्ये लता मंगेशकर यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला ,तर १९८९ मध्ये चित्रपट जगतातील सर्वोच्च पुरस्कार असणारा दादासाहेब फाळके पुरस्कार लता मंगेशकर यांना मिळाला.१९९९ मध्ये लता मंगेशकर यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आणि २००१ मध्ये भारत सरकारने लता मंगेशकर यांचा भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान केला.

लता मंगेशकर यांचे निधन / Death of Lata Mangeshkar in Marathi

लता मंगेशकर यांनी आपल्या गायिका करियर मध्ये ३०,००० पेक्षा जास्त गाणी गायली.लता मंगेशकर यांचे निधन ६ फेब्रुवारी २०२२ मध्ये वयाच्या ९२ व्या वर्षी झाले.

FAQ

लता मंगेशकर यांचा जन्म केव्हा झाला ?

लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ साली इंदोर येथे झाला.

लता मंगेशकर यांच्या आईचे आणि वडिलांचे नाव काय होते ?

लता मंगेशकर यांच्या आईचे नाव “शेवंती मंगेशकर” आणि वडिलांचे नाव “दीनानाथ मंगेशकर” होते.

लता मंगेशकर यांनी आपल्या संगीत करियर मध्ये किती गाणी गायली ?

लता मंगेशकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात विविध भाषेत ३०,००० पेक्षा जास्त गाणी गायली.

लता मंगेशकर यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले ?

लता मंगेशकर यांना पद्मविभूषण, दादासाहेब फाळके, भारतरत्न आणि इतर पुरस्कार मिळाले.

लता मंगेशकर यांचे निधन केव्हा झाले ?

वयाच्या ९२ व्या वर्षी ६ फेब्रुवारी २०२२ मध्ये लता मंगेशकर यांचे निधन झाले.

आजच्या लेखामध्ये आपण भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या लता मंगेशकर यांच्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment