लाल बहादुर शास्त्री यांची संपूर्ण माहिती Lal Bahadur Shastri Information In Marathi

Lal Bahadur Shastri Information In Marathi आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये भरपूर स्वातंत्र्य सेनानींचा मोलाचा वाटा आहे. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका स्वातंत्र्य सेनानी आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान “लाल बहादूर शास्त्री” यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

 Lal Bahadur Shastri Information In Marathi

लाल बहादुर शास्त्री यांची संपूर्ण माहिती Lal Bahadur Shastri Information In Marathi

नाव लाल बहादूर शास्त्री
जन्म २ ऑक्टोंबर १९०४
जन्म स्थान मुगलसराय, उत्तर प्रदेश
आईचे नाव रामदुलारी
वडिलांचे नाव शारदा प्रसाद श्रीवास्तव
पत्नीचे नाव ललिता शास्त्री
धर्म हिंदू
पंतप्रधान कार्यकाळ ९ जुन १९६४ – ११ जानेवारी १९६६
पुरस्कार मरणोपरांत भारतरत्न
मृत्यू ११ जानेवारी १९६६

लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब (Birth of Lal Bahadur Shastri and his family in Marathi)

लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोंबर १९०४ मध्ये उत्तर प्रदेश राज्यातील मुगलसराय येथे झाला होता. लाल बहादूर शास्त्री यांच्या वडिलांचे नाव “शारदा प्रसाद श्रीवास्तव” होते ,तर त्यांच्या आईचे नाव “रामदुलारी” असे होते. लाल बहादूर शास्त्री हे घरामध्ये सर्वात छोटे होते ,त्यामुळे लहानपणी घरातील वरिष्ठ मंडळी त्यांचा खूप लाड करत असत.

लाल बहादूर शास्त्री यांचे वडील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करत होते. लाल बहादूर शास्त्री हे जेव्हा अठरा महिन्याचे होते ,तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आपल्या पतीच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री यांच्या आई त्यांना घेऊन आपल्या वडिलांकडे मिर्झापूर येथे गेल्या. काही दिवसात रामदुलारी यांच्या वडिलांचे देखील निधन झाले. लाल बहादूर शास्त्री यांना लहानाचे मोठे करण्यामध्ये त्यांच्या आईची मदत त्यांच्या काकांनी “रघुनाथ प्रसाद” यांनी केली.

लाल बहादूर शास्त्री यांचे शिक्षण (Education Of Lal Bahadur Shastri In Marathi)

लाल बहादूर शास्त्री यांचे प्राथमिक शिक्षण हे मिर्झापूर येथे झाले. पुढे जाऊन त्यांनी काशी विद्यापीठातील हरिशचंद्र हायस्कूल मध्ये एडमिशन घेतले. काशी विद्यापीठात लाल बहादूर शास्त्री यांना शास्त्री ची उपमा मिळाली.

लाल बहादूर शास्त्री यांनी घरामध्ये पिढी दर पिढी चालत आलेली “श्रीवास्तव” नाव लावण्याची परंपरा बंद केली आणि आपल्या नावातून श्रीवास्तव नाव हटवले आणि त्याजागी “शास्त्री” नाव लावले. पुढे जाऊन शास्त्री नावानेच लाल बहादूर शास्त्री यांची देशभर ओळख झाली.

लाल बहादूर शास्त्री यांचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग ( Lal Bahadur Shastri Participate in Freedom struggle in Marathi)

त्याकाळी ब्रिटिश सत्ते विरुद्ध महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभर असह्योग आंदोलन चालू होते. या आंदोलनामध्ये लाल बहादुर शास्त्री यांनी सहभाग घेतला होता. यामुळे १९२१ मध्ये लाल बहादुर शास्त्री यांना काही काळासाठी जेल मध्ये देखील जावे लागले होते. जेल मधुन आल्यानंतर लाल बहादूर शास्त्री हे भारतीय स्वयं सेवक संघात शामिल झाले आणि आपले पुढचे आयुष्य देशसेवेसाठी खर्च करायचे ,असा त्यांनी निर्णय घेतला.

लाल बहादूर शास्त्री हे गांधीवादी विचारांचे व्यक्ती होती. त्यांनी आपले जीवन साध्या पद्धतीने जगण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी जीवनभर देशातील गरीब लोकांची सेवा केली. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या बऱ्यापैकी सर्व आंदोलनामध्ये लाल बहादूर शास्त्री यांनी सहभाग घेतला होता.

लाल बहादूर शास्त्री यांनी १९२१ मध्ये झालेल्या असह्योग आंदोलनामध्ये ,तसेच १९४२ मधे झालेल्या भारत चोडो आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. लाल बहादूर शास्त्री हे बऱ्याच आंदोलनामध्ये सहभागी झाले होते ,त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा जेल मध्ये देखील जावे लागले होते.

लाल बहादूर शास्त्री आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची भेट (Meeting of Lal Bahadur Shastri and pandit Jawaharlal Nehru in Marathi)

त्याकाळी पंडित जवाहरलाल नेहरू हे लाल बहादूर शास्त्री यांचे राजकीय आदर्श होते. लाल बहादूर शास्त्री हे प्रयागराज येथे राष्ट्रीय स्वयम सेवक संघाचे सचिव म्हणून कार्यरत होते. इथेच त्यांची भेट पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी झाली. दोघांमध्ये दिवसेंदिवस दोस्ती वाढू लागली आणि पुढे जाऊन लाल बहादूर शास्त्री हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्री मंडळात गृहमंत्री म्हणून शामिल झाले.

देशाचे दुसरे पंतप्रधान – लाल बहादूर शास्त्री (India’s Second prime minister – Lal Bahadur Shastri)

१९६१ मध्ये लाल बहादूर शास्त्री यांना गृहमंत्री बनवण्यात आले होते. त्यांनी गृहमंत्री पदावर राहून तीन वर्षे देशाची सेवा केली ,तसेच विकासाची कामे देखील. पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांची तब्येत हळू हळू खराब होऊ लागली आणि १९६४ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाल्यानंतर “लाल बहादूर शास्त्री” हे देशाचे दुसरे पंतप्रधान झाले.

पंतप्रधान झाल्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांनी देशाच्या आणि लोकांच्या हिताची कामे केली. काही गोष्टींमुळे लाल बहादूर शास्त्री यांना विरोधकांच्या आलोचनाचा देखील सामना करावा लागला. परंतु १९६५ मध्ये जम्मू आणि काश्मीर वादावरून भारत आणि पाकिस्तान मध्ये झालेल्या युद्ध वेळी लाल बहादूर शास्त्री यांनी दाखवलेल्या दृढते मुळे देशभरातील लोकांनी त्यांची प्रशंसा देखील केली.

लाल बहादूर शास्त्री हे जोपर्यंत देशाचे पंतप्रधान होते ,तोपर्यंत त्यांनी देशाच्या विकासाची कामे केली ,तसेच देश हितासाठी टोकाचे निर्णय घेतले. त्यांच्या या कार्यामुळे लाल बहादूर शास्त्री यांची भारताच्या इतिहासातील एक इमानदार पंतप्रधान म्हणून आजही ओळख आहे.

लाल बहादूर शास्त्री यांचे निधन (Death of Lal Bahadur Shastri in Marathi)

लाल बहादूर शास्त्री यांनी देशाच्या स्वांतत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला होता ,यासाठी खूप वेळा त्यांना जेल मद्ये देखील जावे लागले होते ; परंतु त्यांनी हार मानली नाही आणि ते देशासाठी लढत राहिले.

पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर त्यांना देशाचे दुसरे पंतप्रधान बनवण्यात आले होते. देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर देखील लाल बहादूर शास्त्री यांनी देशहितासाठी कार्य केले. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना १९६६ मद्ये मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. देशभक्त ,इमानदार पंतप्रधान म्हणून लाल बहादूर शास्त्री यांची ओळख होती. अशा या महान अशा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे निधन ११ जानेवारी १९६६ मद्ये झाले.

FAQ

लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला होता ?

लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोंबर १९०४ मद्ये उत्तर प्रदेश राज्यातील मुगलसराय येथे झाला होता.

लाल बहादूर शास्त्री यांच्या आईचे नाव काय होते ?

लाल बहादूर शास्त्री यांच्या आईचे नाव “रामदुलारी” असे होते.

लाल बहादूर शास्त्री यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

लाल बहादूर शास्त्री यांच्या वडिलांचे नाव “शारदा प्रसाद श्रीवास्तव” असे होते.

लाल बहादूर शास्त्री यांच्या पत्नीचे नाव काय होते ?

लाल बहादूर शास्त्री यांच्या पत्नीचे नाव “ललिता शास्त्री” असे होते.

लाल बहादूर शास्त्री यांनी कोणते शिक्षण घेतले होते होते ?

लाल बहादूर शास्त्री यांनी कशी विद्यापीठातून संस्कृत भाषेत मास्टर पर्यंतचे शिक्षण घेतले होते. इथेच त्यांना शास्त्री ही पदवी मिळाली होती.

लाल बहादूर शास्त्री हे कोणत्या वर्षी देशाचे पंतप्रधान झाले ?

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर ९ जुन १९६४ मद्ये लाल बहादूर शास्त्री हे देशाचे दुसरे पंतप्रधान झाले.

लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या कार्यासाठी कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत ?

लाल बहादूर शास्त्री यांचे निधन झाल्यानंतर १९६६ मद्ये मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

लाल बहादूर शास्त्री यांचे निधन केव्हा झाले ?

लाल बहादूर शास्त्री यांचे निधन ११ जानेवारी १९६६ मद्ये झाले.

आजच्या लेखामध्ये आपण भारत देशाच्या दुसऱ्या पंतप्रधान विषयी म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब,लाल बहादूर शास्त्री यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कार्य ,लाल बहादूर शास्त्री यांनी पंतप्रधान पदी केलेली देशाची सेवा ,लाल बहादूर शास्त्री यांना मिळालेले पुरस्कार आणि त्यांचे निधन ,लाल बहादूर शास्त्री यांच्या विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment