क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती Krantijyoti Savitribai Phule Information In Marathi

Krantijyoti Savitribai Phule Information In Marathi सावित्रीबाई फुले यांचे पुर्ण नाव सावित्रीबाई जोतीराव फुले होत. या केलव भारताच्या पहिल्या महिला शिक्षिकाच नव्हत्या तर एक समाजसुधारक आणि पहिली महिला विद्यार्थिनी पण होत्या. सावित्रीबाईनी त्यांचे पती यांच्याकडून त्याकाळात आधी विद्याग्रहन केले आणि मग महिलांना पण शिक्षणाचा अधिकार आहे, महिलांनी शिकावे,प्रगती करावी यासाठी आपले पूर्ण जीवन खर्च केले.

Krantijyoti Savitribai Phule Information In Marathi

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती Krantijyoti Savitribai phule Information In Marathi

टोपणनावज्ञानज्योती, क्रांतिज्योती
जन्म3 जानेवारी 1831 नायगाव, जिल्हा.सातारा महाराष्ट्र
आईलक्ष्मीबाई नेवसे.
वडीलखंडोजी नेवसे.
पतीजोतीराव फुले
अपत्येयशवंत फुले
धर्महिंदू
चळवळमुलींची पहिली शाळा सुरू करणे.
संघटनासत्यशोधक समाज
पुरस्कारक्रांतिज्योती
प्रमुख स्मारकेजन्मभूमी नायगाव
मृत्यू10 मार्च ,1897 पुणे, महाराष्ट्र.

सावित्रीबाई फुले यांचे बालपण || Childhood of Savitribai phule:

सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी, इ.स. 1831 रोजी

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला.सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते, वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते.सावित्रीबाईंचे वडील गावचे पाटील होते. लग्नाच्या आधी सावित्रीबाई निरक्षर होत्या. त्या काळातील परंपरेप्रमाणे वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी सावित्रीबाईंचे लग्न झाले.

सावित्रीबाईंचे वैवाहिक जीवन आणि शिक्षण: || Marriatal life and education of Savitribai phule:

वयाच्या 9 व्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह 13 वर्षांच्या जोतीराव फुले यांच्याशी झाला. मुळात जोतीरावांचे आडनाव गोरे होते पण वडीलांच्या फुलांच्या व्यवसायामुळे त्यांना “फुले” हे आडनाव मिळाले.

सावित्रीबाईंचे पती जोतीराव यांना आईवडील नव्हते त्यामुळे त्यांची मावस आत्या सगुणाऊ यांनी त्यांचा सांभाळ केला.

सावित्रीबाई लग्नाआधी निरक्षर होत्या. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या घरी काम करायच्या, त्यामुळे त्यांना इंग्रजीचे ज्ञान होते. त्यांनी जोतीरावांना शिक्षणासाठी प्रेरित केले. त्यामुळे जोतीराव शिक्षणाकडे आकर्षित होत गेले. सावित्रीबाईंना लग्नापूर्वी एक पुस्तक भेटले होते,ते पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. अशा प्रकारे जोतीराव शिक्षणाकडे आकर्षित होत गेले.

जोतीराव स्वतः शिकले आणि सावित्रीबाईंना शिकवले. जोतिरावांनी प्राथमिक शिक्षण सावित्रीबाईंना घरातच दिले आणि पुढील शिक्षणाची जबाबदारी   यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर या जोतिबांच्या मित्रांनी पर पाडली. सगुणाऊ आणि सावित्रीबाई या दोघींनी  शिक्षण घेतले.

सावित्रीबाईंचे शैक्षणिक कार्य || Educational work of Savitribai phule :

भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ज्यांनी ख्याती मिळवली त्या म्हणजेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाईंनी आधी जोतिबांकडून शिक्षण घेतले आणि नंतर सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागास वस्तीत 1 मे 1847 रोजी शाळा काढून दिली.

सगुणाऊ तेथे आनंदाने शिकऊ लागल्या.नंतर ही शाळा बंद पडली. पुढे पुण्यातील भिडे यांच्या वाड्यात 1 जानेवारी 1848 रोजी सावित्रीबाई आणि जोतिराव यांनी मुलींची पहिली शाळा काढली.तो भिडे वाडा हे तात्यासाहेब भिडे यांचे घर होते.

या शाळेत गणित, विज्ञान आणि सामाजिक अभ्यास या पाश्चात्य अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात  आला होता.ही शाळा भारतातील पहिली मुलींची शाळा ठरली.सावित्रीबाई येथे मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या.सुरुवातीला शाळेत 4..5 मुली होत्या पण नंतर त्यांची संख्या 40..45 पर्यंत जाऊन पोहोचली.

 सावित्रीबाईंनी समाजाच्या विरोधाला न जुमानत शिक्षण घेतले आणि त्या शाळेत पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका बनून मुलींना शिक्षण देखील दिले.नंतर 1852 पर्यंत म्हणजेच 4 वर्षांतच सावित्रीबाई आणि ज्योतिबांनीं 18 शाळा उघडल्या.

 हा शाळेचा यशस्वी प्रवास उच्चवर्णीयांना बघवला नाही,लोकांनी अंगावर शेण फेकले, काहींनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली , पण सावित्रीबाईंनी ह्या विरोधाला जुमानले नाही आणि आपला शिक्षणप्रसार चालूच ठेवला, त्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. घर सोडावे लागले, सगुणाऊ सोडून सोडून गेली.पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत त्यांनी आपले शिक्षणप्रसाराचे कार्य चालूच ठेवले.

सावित्रीबाईंचे सामजिक कार्य || Social work of Savitribai phule :

शैक्षणिक प्रगती करायची असल्यास सामजिक विकास पण करणे गरजेचा होता,हे सावित्रीबाईंना लक्षात आले.स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचं होत, त्याशिवाय हे कार्य होणार नव्हत. सावित्रीबाईंनी  समाजघातक रूढी-परंपरांना आळा घातला.

बाल-जरठ विवाह या प्रथेमुळे मुली वयाच्या अवघ्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. पतीच्या निधनानंतर विधवांना सती जावे लागत किंवा त्या स्त्रियांचे केशवपन करून त्यांना कुरूप बनविले जाई. विधवांचा पुनर्विवाह तर त्या काळी ब्राह्मण समाजात अजिबात मान्य नव्हता. या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनून गरोदर  झाल्यास, एक गरोदर विधवा म्हणून समाज त्रास देणार या विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा त्या गर्भाची भ्रूणहत्या करत.शेवटी अन्याय हा त्या स्त्री वरचं व्हायचा.

यावर उपाय म्हणून जोतिरावांनी एक बालहत्या प्रबंधक गृह सुरू केले.सावित्रीबाई हे गृह चालवत. ज्या स्त्रिया फसल्या गेल्या आहेत किंवा बलात्कारामुळे गरोदर राहिलेल्या स्त्रियांचं बाळंतपण सावित्रीबाई करत.जन्मलेल्या मुलांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. यातीलच एका मुलाला सावित्रीबाईंनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव “यशवंत” ठेवले.

केशवपन बंद व्हावे, विधवा पुनर्विवाह कायदा व्हावा यासाठी सावित्रीबाईंनी प्रयत्न केले. जोतिबांच्या सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाई हातभार लावत.जोतीरावांच्या मृत्यूनंतरही सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाचे कार्य चालू ठेवले.

1896 च्या सुमारास पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाई- माणसांना सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजात आणले. त्यांना आश्रय दिला,त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली.त्यांच्या या कार्यात पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी सुद्धा त्यांना हातभार लावला.

आपले विचार त्यांनी साहित्यांच्या माध्यमातून प्रसारित केले. काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ ही काव्यसंग्रहे त्यांनी लिहिली. तसेच सावित्रीबाई या एक लेखिका पण होत्या.त्यांनी मराठी भाषेत लिखाण पण केले.

सावित्रीबाई फुले यांना मिळालेले सन्मान ||

Awards of Savitribai phule :

फुले दांपत्याचे शैक्षणीक कार्य बघून 1852 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा जाहीर सत्कार केला आणि त्यांच्या शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. सावित्रीबाईंनी “गृहिणी” नावाच्या मासिकात पण लेखन केले.सावित्रीबाईंच्या नावाने महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने अनेक पुरस्कारांची निर्मीती केली तसेच त्यांच्या सन्मानार्थ एक डाक तिकीट देखील काढले आहे.

समाजाचा विकास व्हावा तसेच फुले दांपत्यांच्या कार्याचा प्रसार व्हावा या उद्देशाने आता पर्यंत दोन मालिका प्रदर्शित झाल्या आहेत. 2015 मध्ये दूरदर्शनच्या किसान वाहिनीवर “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले”  ही मालिका प्रदर्शित करण्यात आली होती. तसेच 2020 साली सोनी मराठीवर “सावित्रिजोती” ही मालिका दशमी क्रिएशन ने प्रदर्शित केली.

सावित्रीबाई फुले यांचे निधन ||

Death of Savitribai phule :

पुण्यात 1896-97 च्या दरम्यान प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा संसर्गजन्य रोग अनेकांचे जीव घेऊ लागला. यातून होणारे हाल बघून सावित्रीबाईंनी प्लेगच्या रुग्णांसाठी पुण्याजवळ दवाखाना सुरू केला. सावित्रीबाई येथे रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या, त्यांची सेवा करत .असच प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंना प्लेग झाला. आणि त्यातून 10 मार्च 1897 रोजी त्यांचे दुःखद निधन झाले.

सावित्रीबाईंचा जन्मदिवस 3 जानेवारी हा महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. 2015 मध्ये सावित्रीबाईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुणे विद्यापीठाचे नामकरण “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ” असे करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमित्त 3 जानेवारी  2017 रोजी गूगलने  “गूगल डूडल” प्रसिद्ध केले आणि त्यांना अभिवादन दिले.

FAQ

सावित्रीबाईंच्या मुलाचे नाव काय होते?

सावित्रीबाईंच्या मुलाचे नाव यशवंत असे होते.

सावित्रीबाईंना कोणत्या टोपणनावाने ओळखले जात होते?

सावित्रीबाईंना क्रांतिज्योती ,ज्ञानज्योती या टोपणनावांनी ओळखले जात होते.

सावित्रीबाईंचा जन्म कधी पण कोठे झाला?

सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्हयातील नायगाव या गावी झाला.

सावित्रीबाईंनी पहिली मुलींची शाळा कोठे सुरू केली?

सावित्रीबाईंनी पहिली मुलींची शाळा  पुण्यातील भिडे यांच्या वाड्यात सुरू केली.

सावित्रीबाईंच्या वडिलांचे नाव काय होते?

सावित्रीबाईंच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे असे होते.

निष्कर्ष ||

Conclusion :

सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राच्या सामाजिक विकास चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात.त्यांनी शैक्षणिक विकासाबरोबरच सामाजिक विकास पण केला.स्वतःच्या साहित्यातून लोकांमध्ये वैचारिक प्रगती व्हावी यासाठी काम केले. सावित्रीबाईंनी समाजातील जात ,लिंग यावरून होणारे भेदभाव तसेच अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी आपले जीवनभर कार्य केले. अशाप्रकारे महिलांना शिक्षित करण्यात ,त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सावित्रीबाईंनी आपले जीवन खर्ची घातले.

Leave a Comment