खो-खो खेळाची संपूर्ण माहिती Kho kho Game Information In Marathi

Kho kho Game Information In Marathi अनेक भारतीय मैदानी खेळांपैकी एक पारंपरिक तसेच प्राचीन खेळ म्हणजेच खो-खो हा खेळ होय. अगदी शालेय जीवनापासून हा स्पर्धात्मक खेळ मुलांमध्ये खेळला जातो. खो-खो हा खेळ दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर खेळला जातो.

Kho kho Game Information In Marathi

खो-खो खेळाची संपूर्ण माहिती Kho kho Game Information In Marathi

संघ सदस्य12 पैकी 9 मैदानात आणि 3 राखीव
खेळाच वर्गीकरणमैदानी
साधननाही
खेळासाठी मैदानखो खो मैदान
खो खो च्या क्षेत्रातील डाव2 डाव (4 वेळा)
मैदानाचा आकारअयाताकृती
मैदानाची लांबी व रुंदी29 ×16 मीटर
एका खेळासाठी दिलेला वेळ40 मिनिटे
ऑलिंपिकनाही

खो-खो खेळाचा इतिहास ( history of kho-kho game )

खो खो या खेळाचा उगम नेमका कधी झाला हे सांगणे अवघड आहे. पकडापकडी या खेळातून खो खो या खेळाचा जन्म झाला असावा असे मानले जाते. या खेळाची सुरुवात महाराष्ट्राच्या मातीत झाली. खो खो या खेळाचे नियम बनवण्यासाठी पहिल्यांदा 1914 साली पुणे जिमखाना येथे एक समिती स्थापन करण्यात आली.

खो खोची नियमावली 1924 मध्ये बडोदा जिमखान्याने प्रसिद्ध केली. आंध्रप्रदेश राज्यातील विजयवाडा येथे खो-खो या खेळाची पहिली राष्ट्रीय स्पर्धा 1959-60 मध्ये आयोजित केली गेली.

खो-खो या खेळाचे मैदान (Playground of kho-kho game)

खो खो या खेळाचे मैदान हे आयाताकृती असून त्याची एकुण लांबी व रुंदी त्या क्षेत्राच्या सर्व बाजूंनी असलेल्या लॉबीसह 30 मीटर x 19 मीटर आहे. तसेच दोन्ही ध्रुवांच्या मागे असलेल्या मुक्त क्षेत्रासह खो खो  खेळण्याचे एकूण क्षेत्र हे 27 मीटर x 16 मीटर असते.

मध्यवर्ती लेन ही दोन ध्रुवांना जोडणारी असून त्याची लांबी 24 मीटर तर त्याची रुंदी 30 सेमी. इतकी असते. क्रॉस लेन ही मध्यवर्ती लेनला छेदत असते आणि प्रत्येक लेन ची लांबी व रुंदी ही 16 मीटर ×35 मीटर असते. खो खो खेळाच्या दोन्ही टोकांना जे खांब असतात त्यांची उंची ही साधारण 120 सेमी ते 125 सेमी असते आणि त्या खांबांचा व्यास हा 9-10 सेमी असतो.

खो-खो हा खेळ कसा खेळाला जातो (How to play kho-kho game)

खो-खो या मैदानी खेळात दोन संघ भाग घेतात आणि संघामध्ये प्रत्येकी 12 खेळाडू असतात. पण प्रत्यक्षात फक्त 9 खेळाडू मैदानावर खेळत असतात.खो खो या खेळाच्या सुरुवातीला पंच नाणेफेक करतात. जो संघ नाणेफेक जिंकतो तो संघ पळती किंवा पाठलाग यांची निवड करू शकतो.

खो खो हा खेळ दोन भागांमध्ये खेळला जातो. या दोन भागांदरम्यान 5 मिनिटे विश्रांतीसाठी देखील दिले जातात. यातील प्रत्येक भागात पुन्हा दोन उपभाग पडतात. पहिल्या उपभागात पहिला संघ पाठलाग करत असतो आणि दुसरा संघ स्वतःचा बचाव करत असतो. तसेच दुसऱ्या उपभागात याच्या उलट परिस्थिती असते, या वेळेस पहिला संघ बचाव करत असतो तर दुसरा संघ पाठलाग करत असतो. या दोन्ही उपभागांदरम्यान 2 मिनिटे विश्रांतीसाठी दिले जातात.

खो खो हा संपूर्ण खेळ 37 मिनिटे चालतो. खो खो खेळाच्या सुरुवातीला जो संघ पाठलाग करत असतो, त्या संघाचे आठ खेळाडू दोन खांबांमध्ये असणाऱ्या आठ चौकोनात विरुद्ध दिशांना तोंड करून बसलेले असतात. त्याच संघातील नववा खेळाडू दोन्हीपैकी एका खांबाजवळ उभा असतो. तर बचाव करणाऱ्या संघातील तीन खेळाडू मैदानात असतात.

खो खो हा खेळ सुरू झाल्यावर पाठलाग करणाऱ्या संघातील नववा खेळाडू बचाव करणाऱ्या संघातील तीन खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न करत असतो. जो खेळाडू पाठलाग करत असतो त्यावर काही बंधने असतात, जसे की एकदा एका खांबाकडील दिशा पकडल्यावर तो दुसरी दिशा बदलू शकत नाही.त्याला दिशा बदलण्यासाठी खांबाला स्पर्श करणे अनिवार्य असते तसेच तो दोन खांबांना जोडणारी रेषा ओलांडू शकत नाही.

त्या पकडणाऱ्या खेळाडूला पळण्याची दिशा बदलायची असल्यास इतर खेळाडूंना खो देऊन ते तो खेळाडू  साध्य करू शकतो. या वेळेस मात्र “खो” हा शब्द उच्चारणे अनिवार्य असते. जर एखाद्या खेळाडूने नियमयांचा भाग केला तर त्या खेळाडूला बाद केले जाते. बचाव करणाऱ्या खेळाडूवर पळताना कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतात.

खो खो या खेळाच्या दरम्यान बाद केलेल्या प्रत्येक खेळाडूच्या बदल्यात प्रतिस्पर्धी संघाला एक गुण मिळत असतो. खेळातील पहिला भाग झाल्यावर प्रत्येक संघाचे गुण बघितले जातात. ज्या संघाने जास्त गुण मिळवलेले असतात, त्या संघाची त्याच्या प्रतिस्पर्धी संघावर दोन्ही संघांतील  गुणांच्या फरकाइतकी आघाडी धरली जाते.

दुसऱ्या भागाच्या शेवटी, जो संघ आघाडी मिळवितो, तो विजयी संघ म्हणून घोषित होतो.

खो खो खेळाची इतर माहिती (Other information of kho kho game)

खो खो हा खेळ दक्षिण आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांसारख्या बाहेरील प्रदेशांमध्ये देखील हा खेळ खेळला जातो.

खो खो या खेळात टी शर्ट, हॉफ पँट, पायमोजे, बूट असा हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचा पेहराव असतो. खो-खो हा खेळ महिला, पुरुष, मुली, मुले असे सारेजण खेळू शकतात. हा खेळ खेळण्यासाठी वयाचे कोणत्याही प्रकारचे बंधन नसते. तसेच घरासमोरील अंगणात, बागेमध्ये किंवा पळण्यासाठी जेथे जागा असेल तेथे देखील हा खेळ खेळला जाऊ शकतो.

खो खो या खेळात दोन पंच असतात आणि एक वेळ-अधिकारी असतो. दोन अधिकारी गुण लिहीत असता. ज्या संघाचे गुण अधिक होतात तो संघ विजयी होतो. अलीकडे तर शाळा व कॉलेजमध्ये देखील  खो-खो या खेळाच्या स्पर्धा घेतल्या जातात तसेच खेळाचे राज्यस्तरीय सामने पण खेळले जातात. अशा प्रकारे खो-खो हा मैदानी खेळ खेळला जातो.

सतीश राय, पंकज मल्होत्रा,मंदाकिनी माझी, सारिका काळे, प्रवीण कुमार हे काही प्रसिध्द भारतीय खो खो खेळाडू आहेत.

खो खो या खेळाच्या स्पर्धा (Competitions of kho kho game)

भारत देशामध्ये खो-खो या खेळाच्या काही स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्या खालीलप्रमाणे :

 • राष्ट्रीय स्पर्धा
 • राष्ट्रीय कुमार स्पर्धा
 • राष्ट्रीय निम्नस्तरीय कुमार स्पर्धा
 • आंतर्विद्यापीठ स्पर्धा
 • आंतरशालेय (उच्च्माध्यमिक) स्पर्धा
 • आंतरशालेय (माध्यमिक) स्पर्धा
 • आंतरशालेय प्राथमिक स्पर्धा
 • राष्ट्रीय महिला स्पर्धा

खो खो खेळासाठी दिले जाणारे पुरस्कार (Rewards of kho-kho game)

खो-खो खेळातील खेळाडूंना भारत सरकारकडून काही  पुरस्कार मिळतात. ते खालीप्रमाणे :

 • अर्जुन पुरस्कार
 • एकलव्य पुरस्कार (पुरुष खेळाडूंसाठी)
 • राणी लक्ष्मीबाई पुरस्कार (महिला खेळाडूंसाठी)
 • अभिमन्यू पुरस्कार (18 वर्षे वयोगटाखालील मुलांसाठी)
 • जानकी पुरस्कार (16 वर्षे वयोगटाखालील मुलींसाठी)

FAQ

खो- खो हा खेळ वैयक्तिक खेळला जाणारा खेळ आहे की सांघिक  खेळला जाणारा खेळ आहे ?

खो- खो हा खेळ सांघिक  खेळला जाणारा खेळ आहे.

खो खो या खेळात एकूण किती खेळाडू भाग घेतात?

खो खो या खेळात एकूण 12 खेळाडू भाग घेतात.

खो खो या खेळाचे नियम बनवण्यासाठी कधी आणि कोठे समिती स्थापन करण्यात आली?

खो खो या खेळाचे नियम बनवण्यासाठी पहिल्यांदा 1914 साली पुणे जिमखाना येथे एक समिती स्थापन करण्यात आली.

खो खो खेळाच्या मैदानाची लांबी व रुंदी किती असते?

खो खो खेळाच्या मैदानाची लांबी व रुंदी 29 ×16 मीटर असते.

भारत सरकारकडून 16 वर्षे वयोगटाखालील मुलींसाठी कोणता पुरस्कार दिला जातो?

भारत सरकारकडून 16 वर्षे वयोगटाखालील मुलींसाठी जानकी पुरस्कार दिला जातो?

खो खो हा संपूर्ण खेळ किती वेळ चालतो?

खो खो हा संपूर्ण खेळ 37 मिनिटे चालतो.

खो खो या खेळातील खांबांची उंची किती असते?

खो खो खेळाच्या दोन्ही टोकांना जे खांब असतात त्यांची उंची ही साधारण 120 सेमी ते 125 सेमी असते.

निष्कर्ष :(Conclusion)

खो खो हा खेळ भारत आणि पाकिस्तानमधील शाळकरी मुले नेहमी खेळतात, हा एक स्पर्धात्मक तसेच शारीरिक हालचालींना वाव देणारा एक मैदानी खेळ आहे. खो-खो या खेळामुळे मुलांमधील तग धरण्याची क्षमता वाढविण्यास मदत होते तसेच शाळकरी मुलांच्या सामाजिक आणि मानसिक विकासास मदत होते. तसे पाहता खो खो हा खेळ सर्वयायामी आहे.

Leave a Comment