खाशाबा जाधव यांची संपूर्ण माहिती Khashaba Jadhav Information In Marathi

Khashaba Jadhav Information In Marathi ऑलिम्पिक स्पर्धा ही खेळाच्या दुनियेतील सर्वोत्तम स्पर्धा मानली जाते. १९५२ मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये स्वतंत्र भारताकडून पाहिले व्यक्तिगत ऑलिम्पिक मेडल हे पैलवान खाशाबा जाधव यांनी जिंकले होते. आपण आजच्या लेखामध्ये भारत देशाला पाहिले व्यक्तिगत ऑलिम्पिक मेडल जिंकून देणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे खाशाबा जाधव यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Khashaba Jadhav Information In Marathi

खाशाबा जाधव यांची संपूर्ण माहिती Khashaba Jadhav Information In Marathi

नाव खाशाबा दादासाहेब जाधव
जन्म १५ जानेवारी १९२६
पेशा पैलवान
वडिलांचे नाव दादासाहेब जाधव
पुरस्कार अर्जुन पुरस्कार
मृत्यू १४ ऑगस्ट १९८४

खाशाबा जाधव यांचा जन्म आणि त्यांचे सुरवातीचे जीवन ( Birth of Khashaba Jadhav and His early life in Marathi)

खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ मध्ये महाराष्ट्र राज्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वर गावात झाला. गोळेश्वर हे कराड शहराच्या बाजूला वसलेले छोटेसे गाव. खाशाबा जाधव यांच्या वडिलांचे नाव ” दादासाहेब जाधव” होते .खाशाबा जाधव यांचे वडील दादासाहेब जाधव हे देखील एक पैलवान होते. दादासाहेब जाधव यांना पाच मुले होती आणि खाशाबा जाधव हे त्या पाच मुलांपैकी सर्वात लहान होते.

खाशाबा जाधव यांनी आपले सुरवातीचे शिक्षण कराड तालुक्यातील टिळक हायस्कूल येथे पूर्ण केले. खाशाबा जाधव यांचे वडील स्वतः पैलवान असल्यामुळे खाशाबा जाधव यांना लहानपणापासूनच कुस्ती खेळण्याची आवड निर्माण झाली होती.

खाशाबा जाधव यांचे कुस्ती करियर (Wrestling Career of Khashaba Jadhav in Marathi)

खाशाबा जाधव यांना त्यांचे वडील लहानपणापासूनच कुस्तीचे वेगवेगळे डाव शिकवीत असत. खाशाबा जाधव हे जेव्हा लहान होते ,तेव्हा त्यांचे कुस्तीतले गुरू हे त्यांचे वडील म्हणजे दादासाहेब जाधवच होते. पुढे जेव्हा खाशाबा जाधव हे कॉलेज ला शिक्षणासाठी गेले तेव्हा त्यांचे कुस्तीचे गुरू “बाबूराव बलावडे” हे झाले. खाशाबा जाधव यांना ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयार करण्यामध्ये त्यांच्या वडिलांचा आणि त्यांच्या कॉलेज मधील कुस्ती गुरू बाबुराव बलावडे यांचा मोलाचा वाटा आहे.

खाशाबा जाधव हे दिवसरात्र कुस्तीची तयारी करत असत. १९४८ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी ६ वा क्रमांक पटकावला होता. या लंडन ऑलिम्पिक स्पर्धे मध्ये ६ वा क्रमांक मिळवणारे खाशाबा जाधव हे एकमेव भारतीय होते. या लंडन ऑलिम्पिक स्पर्धे पासून खाशाबा जाधव यांची प्रसिध्दी हळू हळू वाढू लागली. देशातील लोक त्यांना त्यांच्या कामगिरीमुळे ओळखू लागले.

खाशाबा जाधव यांना लहानपणापासूनच मातीत कुस्ती खेळण्याची सवय होती ; परंतु लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी कुस्ती मैट वरती खेळली होती. मैट वरती कुस्ती खेळण्याचा सराव खाशाबा जाधव यांना न्हवता ,तसेच त्यांना आंतरराष्ट्रीय कुस्तीचे नियम देखील माहीत न्हवते ,तरी देखील त्यांनी या स्पर्धेत ६ वा क्रमांक पटकावला होता.

पुढच्या चार वर्षानंतर १९५२ मध्ये हेलसिंकी येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खाशाबा जाधव यांनी दिवसरात्र मेहनत केली. हेलसिंकी येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकायचे ,हे त्यांचे स्वप्न होते ,यासाठी ते दिवसरात्र प्रयत्न करत होते.

१९५२ मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खाशाबा जाधव यांनी ५७ किलो वजनी गटात सहभाग घेतला होता. खाशाबा जाधव यांच्या समवेत या ५७ किलो वजनी गटात इतर २४ देशातील पैलवांनानी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेतील प्रत्येक सामना खाशाबा जाधव जिंकत होते ,परंतु सेमी फायनल मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता ;परंतु तिसऱ्या म्हणजे कांस्य पदकासाठी होणाऱ्या सामन्यामध्ये त्यांनी चांगलाच कमबॅक केला आणि १९५२ मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी देशाला कांस्य पदक जिंकून दिले.

भारत देशाला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये व्यक्तिगत मेडल मिळवून देणारे खाशाबा जाधव हे पहिले भारतीय ठरले. या अगोदर भारतीय हॉकी संघाने देशाला ऑलिम्पिक मेडल जिंकून दिले होते.

खाशाबा जाधव यांना त्यांच्या कार्यासाठी मिळालेले पुरस्कार ( Awards received by Khashaba Jadhav for his work in Marathi)

खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये भारत देशाला पाहिले व्यकिगत ऑलिम्पिक चे मेडल मिळवून दिले होते. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना भारत सरकारकडून काही पुरस्कार देखील मिळाले आहेत. खाशाबा जाधव यांना महाराष्ट्र सरकारने १९९२-९३ मध्ये मरणोपरांत छत्रपती पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

वर्ष २००० मध्ये भारत सरकारकडून खाशाबा जाधव यांना मरणोपरांत अर्जुन पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. २०१० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिल्लीतील राष्ट्रमंडल खेळांच्या स्पर्धेतील कुस्ती स्थळाला “खाशाबा जाधव” यांचे नाव देण्यात आले होते.

खाशाबा जाधव यांचे निधन (Death of Khashaba Jadhav in Marathi)

१९५५ मध्ये खाशाबा जाधव हे पोलीस सब इन्स्पेक्टर च्या माध्यमातून भारतीय पोलीस दलात शामिल झाले. खाशाबा जाधव यांनी पोलीस खात्यातून देखील भरपूर स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि त्यांनी पोलीस खात्यातून सहभाग घेतलेल्या भरपूर स्पर्धा जिंकल्या देखील होत्या.

पोलिस सब इन्स्पेक्टर म्हणून २७ वर्ष देशाची सेवा केल्यानंतर त्यांनी पोलीस खात्यातून निवृती घेतली ; परंतु सब इन्स्पेक्टर ला मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ त्यांना घेता आला नाही. आपल्याला पेन्शन चालू व्हावी यासाठी त्यांनी संघर्ष केला ; परंतु त्यांना शेवट पर्यंत पेन्शन मिळाली नाही.

भारत देशाला पाहिले व्यक्तिगत ऑलिम्पिक मेडल जिंकून देणाऱ्या खाशाबा जाधव यांचे निधन १४ ऑगस्ट १९८४ मध्ये एका रोड अपघातात झाले.

FAQ

खाशाबा जाधव यांचे संपूर्ण नाव काय होते ?

खाशाबा जाधव यांचे संपूर्ण नाव “खाशाबा दादासाहेब जाधव ” असे होते.

खाशाबा जाधव यांचा जन्म केव्हा झाला होता ?

खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ मध्ये कराड तालुक्यातील गोळेश्र्वर येथे झाला होता.

खाशाबा जाधव यांचे सुरवातीचे शिक्षण कुठे झाले होते ?

खाशाबा जाधव यांचे शिक्षण कराड शहरातील टिळक हायस्कूल येथे झाले होते.

भारत देशाला पाहिले व्यक्तिगत ऑलिम्पिक मेडल कोणी मिळवून दिले होते ?

खाशाबा जाधव यांनी भारत देशाला पाहिले व्यक्तिगत ऑलिम्पिक मेडल जिंकून दिले होते.

खाशाबा जाधव यांनी किती वजनी गटामध्ये मेडल मिळाले होते ?

खाशाबा जाधव यांना ५७ किलो वजनी गटामध्ये मेडल मिळाले होते.

१९४८ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खाशाबा जाधव यांनी कितवा क्रमांक पटकावला होता ?

१९४८ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खाशाबा जाधव यांनी ६ वा क्रमांक पटकावला होता.

खाशाबा जाधव यांना त्यांच्या कार्यासाठी कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत ?

भारत सरकारकडून मरणोपरांत अर्जुन पुरस्कार देऊन खाशाबा जाधव यांना २००० मध्ये सन्मान करण्यात आला होता. तसेच महाराष्ट्र सरकारकडून १९९२-९३ मध्ये खाशाबा जाधव यांना “मरणोपरांत छत्रपती पुरस्कार ” देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते

खाशाबा जाधव यांचे निधन केव्हा झाले ?

१४ ऑगस्ट १९८४ मध्ये खाशाबा जाधव यांचे निधन एका रोड अपघातात झाले होते.

आजच्या लेखामध्ये आपण भारत देशाला १९५२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पाहिले व्यक्तिगत ऑलिम्पिक मेडल जिंकून देणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली.तसेच आजच्या लेखामधून आपण खाशाबा जाधव यांचा जन्म आणि त्यांचे सुरवातीचे जीवन, खाशाबा जाधव यांचे कुस्ती करियर ,त्यांच्या कार्यासाठी त्यांना मिळालेले पुरस्कार ,खाशाबा जाधव यांचे निधन ,खाशाबा जाधव यांच्या विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment