कपिल देव यांची संपूर्ण माहिती Kapil Dev Information In Marathi

Kapil Dev Information In Marathi आपल्या भारत देशामध्ये क्रिकेट खेळाला स्वतंत्र धर्माचा दर्जा दिला जातो. आपल्या भारत देशामध्ये क्रिकेट या खेळाची क्रेझ ही १९८३ च्या वर्ल्ड कप पासून झाली होती. १९८३ चा वर्ल्ड कप हा भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता.

Kapil Dev Information In Marathi

कपिल देव यांची संपूर्ण माहिती Kapil Dev Information In Marathi

आजच्या लेखामध्ये आपण याच भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कर्णधाराविषयी म्हणजे कपिल देव यांच्या जीवना विषयी आणि त्यांनी केलेल्या कार्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे कपिल देव यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

नाव कपिल देव
जन्म ६ जानेवारी १९५९
पत्नीचे नाव रोमी भाटिया
पुरस्कार अर्जुन पुरस्कार (१९७९-८०) पद्मश्री (१९८२) पद्म भूषण (१९९१) आयसीसी हॉल ऑफ फेम (२०१०)

कपिल देव यांचे सुरवातीचे जीवन (Early life of Kapil Dev in Marathi)

कपिल देव यांचा जन्म ६ जानेवारी १९५९ रोजी पंजाब राज्यातील चंदिगढ येथे झाला होता. कपिल देव यांच्या वडिलांना एकूण ७ अपत्ये होते. त्यात ४ मुली होत्या आणि ३ मुले होती आणि त्या ३ मुलांपैकी कपिल देव हे एक होते.

कपिल देव यांचे प्राथमिक शिक्षण डीएवी शाळेतून झाले होते ,तसेच त्यांचे पुढचे शिक्षण सेंट एडवर्ड कॉलेज मधून पूर्ण झाले. कपिल देव यांना लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. त्यांची क्रिकेट खेळण्याची आवड त्याच्या कुटुंबियांनी ओळखली होती आणि त्यांनी कपिल देव यांना क्रिकेट खेळातील कौशल्य अवगत करण्यासाठी ट्रेनिंग साठी प्रेम आझाद यांच्याकडे पाठवले. प्रेम आझाद यांच्याकडे कपिल देव यांनी क्रिकेट खेळातील महत्वाचे डावपेच शिकले.

जेव्हा भारत – पाकिस्तान विभाजन झाले होते ,तेव्हा कपिल देव यांचे कुटुंब पाकिस्तान येथील रावलपिंडी येथे राहत होते. तेथून त्यांचे कुटुंब भारतात आले. भारतात आल्यानंतर कपिल देव यांच्या वडिलांनी लाकडाचा व्यवसाय चालू केला होता.

कपिल देव (Kapil Dev in Marathi)

कपिल देव हे क्रिकेटच्या इतिहासातील एक महान ऑल राऊंडर पैकी एक ऑल राऊंडर होते. ते एक उजव्या हाताचे फलंदाज असून ते भारतीय क्रिकेट टीमच्या मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजी करत होते ; तसेच ते वेगवान गतीने गोलंदाजी करणारे गोलंदाज होते.

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ साली झालेला वर्ल्ड कप जिंकला होता. १९८३ मध्ये झालेल्या वर्ल्ड कप चा फायनल सामना हा भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असा होता. त्याकाळी वेस्ट इंडिज हा संघ सर्वात जबरदस्त संघापैकी एक संघ होता आणि सर्वांना वाटत होते की ,“वेस्ट इंडिज संघ फायनल मध्ये भारताला हरवून १९८३ चा वर्ल्ड कप जिंकेल !” ; परंतु आपल्या भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिज संघाला हरवून १९८३ चा वर्ल्ड कप जिंकला होता.

१९८३ मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तीन वर्षानंतर भारतीय क्रिकेट संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंड मध्ये टेस्ट सीरिज जिंकली.

कपिल देव यांचे क्रिकेट करियर (Cricketing career of Kapil Dev in Marathi)

कपिल देव हे एक तेजीने फलंदाजी करणारे फलंदाज होते ,तसेच ते विरुद्ध संघाच्या मुख्य खेळाडूंची विकेट घेणारे तेज गोलंदाज देखील होते. कपिल देव यांचे क्रिकेट करियर १९७५ मध्ये चालू झाले होते. १९७५ मध्ये कपिल देव हे हरियाणा संघाकडून खेळत होते आणि त्यावेळी कपिल देव यांचा पहिला सामना हा हरियाणा संघ विरुद्ध पंजाब संघ असा होता.

या सामन्यामध्ये कपिल देव यांनी उत्कृष्ठ पारी खेळली होती आणि या सामन्यामध्ये हरियाणा संघाला विजयी करण्यामध्ये कपिल देव यांचे मोलाचे योगदान होते.

कपिल देव यांनी आपला पाहिली आंतरराष्ट्रीय सामना हा पाकिस्तान संघाविरुद्ध खेळला होता. हा सामना १९७८ मध्ये खेळला गेला होता. या सामन्यामध्ये कपिल देव यांनी फक्त १३ धावा केल्या होत्या ,तर त्यांनी गोलंदाजी करून पाकिस्तान संघाच्या एका खेळाडूची विकेट घेतली होती.

कर्णधार – कपिल देव (Captain -Kapil Dev in Marathi)

कपिल देव हे देशासाठी उत्कृष्ट खेळ खेळत होते. ते भारतीय क्रिकेट संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी करत होते. त्यांचे हे कौशल्य पाहून कपिल देव यांना वेस्ट इंडिज विरुद्ध असणाऱ्या एका एकदिवसीय शृंखला मध्ये कर्णधार बनवण्यात आले होते.

कपिल देव ज्या सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार बनले होते ,तो सामना भारताने जिंकला होता. या सामन्यामध्ये सुनील गावसकर आणि कपिल देव यांनी उत्कृष्ठ पारी खेळली होती ,तसेच कपिल देव यांनी वेस्ट इंडिज संघाच्या काही मुख्य विकेट्स देखील घेतल्या होत्या.

कपिल देव यांच्याकडे संघाचे नेतृत्व करण्याचे कौशल्य देखील होते ,त्यामुळे त्यांना १९८३ च्या एकदिवसीय वर्ल्ड कप मधील भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार बनवण्यात आले होते.

कोच – कपिल देव (Coach – Kapil Dev in Marathi)

कपिल देव यांनी आपल्या निवृतीच्या अगोदर भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार बनून आपल्या भारत देशाचे नाव जगात रोशन केले होते. त्यांनी भारत देशासाठी पहिला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. पुढे कपिल देव यांच्या निवृती नंतर त्यांना भारतीय क्रिकेट संघाचा कोच देखील बनवण्यात आले होते ; परंतु कपिल देव हे जास्त काळ भारतीय क्रिकेट संघाचे कोच राहिले नाहीत ,त्यांनी भारतीय संघाचे कोच पद फक्त १० महिनेच सांभाळले आणि १० महिन्यानंतर त्यांनी भारतीय संघाच्या कोच पदाचा राजीनामा दिला.

कपिल देव यांच्या कार्यासाठी त्यांना मिळालेले पुरस्कार (Awards received by Kapil Dev for his work in Marathi)

कपिल देव यांच्या कार्यासाठी त्यांना भारत सरकारकडून भरपूर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. १९७९-८० मध्ये कपिल देव यांच्या प्रदर्शनावर प्रभावित होऊन भारत सरकारकडून त्यांना अर्जुन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. तसेच १९८२ मध्ये कपिल देव यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

१९९१ मध्ये भारत सरकारकडून कपिल देव यांना पद्म भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. तसेच आयसीसी कडून २०१० मध्ये कपिल देव यांना “आयसीसी क्रिकेटचा हॉल ऑफ द फेम” पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

त्यानंतर तीन वर्षानंतर २०१३ मध्ये कपिल देव यांना एनडीटीव्ही कडून भारतातील “एक महान महापुरुष किताब” देऊन त्यांचा सन्मानित करण्यात आले होते. कपिल देव यांनी भारतीय सेने द्वारे कर्नल पद देखील मिळाले आहे.

FAQ

कपिल देव यांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला होता ?

कपिल देव यांचा जन्म ६ जानेवारी १९५९ मध्ये चंदिगढ ,पंजाब येथे झाला होता.

कपिल देव यांच्या पत्नीचे नाव काय आहे ?

कपिल देव यांच्या पत्नीचे नाव “ रोमी भाटिया” असे आहे आणि कपिल देव आणि रोमिया भाटिया यांचा विवाह १९८० मध्ये झाला होता.

१९८३ चा वर्ल्ड कप भारत कोणाच्या नेतृत्वाखाली जिंकले होते ?

१९८३ चा वर्ल्ड कप भारतीय क्रिकेट संघ कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता.

कपिल देव यांनी आपला पाहिला आंतरराष्ट्रीय सामना कोणत्या संघा विरुद्ध खेळला होता ?

कपिल देव यांनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा पाकिस्तान संघाविरुद्ध खेळला होता आणि या सामन्यामध्ये कपिल देव यांनी १३ धावा केल्या होत्या आणि त्याच सामन्यामध्ये त्यांनी १ विकेट घेतली होती.

कपिल देव यांना त्यांच्या कार्यासाठी कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत ?

कपिल देव यांना १९७९-८० मध्ये भारत सरकारकडून अर्जुन पुरस्कार मिळाला होता. तसेच १९८२ मध्ये कपिल देव यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा  सन्मान करण्यात आला होता. १९९१ मध्ये कपिल देव यांना पद्म भूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तसेच २०१० मध्ये आयसीसी कडून कपिल देव यांना “आयसीसी हॉल ऑफ द फेम” पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.

आजच्या लेखामध्ये आपण भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण कपिल देव यांचे सुरवतीचे जीवन ,कपिल देव यांचे क्रिकेट करियर ,कर्णधार कपिल देव ,कोच कपिल देव ,कपिल देव यांच्या कार्यासाठी त्यांना मिळालेले पुरस्कार,कपिल देव यांच्या विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment