कबड्डी खेळाची संपूर्ण माहिती Kabaddi Game Information In Marathi

Kabaddi Game Information In Marathi कबड्डी हा एक भारतीय खेळ असून सांघिक पद्धतीने खेळला जातो. या प्राचीन खेळाचा उगम भारतातील तामिळनाडू राज्यातून झाला. कबड्डी हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो, ज्यात प्रत्येक संघामध्ये प्रत्येकी 7 खेळाडू असतात. हा खेळ कोणतीही व्यक्ती खेळू शकते,हा खेळ खेळण्यासाठी काही सामानाची गरज पडत नाही.अगदी खेड्यापाड्यातील मूल सुद्धा हा खेळ आनंदाने खेळता. कबड्डी हा खेळ राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा खेळला जातो.

Kabaddi Game Information In Marathi

कबड्डी खेळाची संपूर्ण माहिती Kabaddi Game Information In Marathi

खेळाचे नावकबड्डी
सर्वोच्च संघटनाअंतरराष्ट्रीय कबड्डी संघटना
खेळाचे उपनावकौडी,भवतिक, पकाडा, हादुदू, सादुकुडा, हिमोशिका, हुतुतू.
संघ सदस्य07
वर्गीकरणमैदानी खेळ
साधननाही
मैदानकबड्डी मैदान किंवा कबड्डी कोर्ट
मैदानाची लांबी रुंदी (पुरुष कबड्डी)10×13 मीटर
मैदानाची लांबी रुंदी (महिला कबड्डी)8×12 मीटर
भारतीय कबड्डी स्पर्धाप्रो कबड्डी लीग
ऑलिंपिक1936 ऑलिंपिक

कबड्डी खेळाचा इतिहास (History of kabaddi game)

कबड्डी हा एक सांघिक खेळ असून हा खेळ भारतीय उपखंड आणि इतर आसपासच्या आशियाई देशांमध्ये पण लोकप्रिय आहे.भारताच्या प्राचीन इतिहासात कबड्डी या खेळाचे वर्णन केलेले आढळते. 20 व्या शतकापासून हा खेळ स्पर्धात्मक प्रकारे खेळाला जाऊ लागला.

इ.स. 1934 मध्ये कबड्डी या खेळाचे नियम तयार झाले.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी इ.स. 1936 मध्ये कबड्डी च्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये एक सामना खेळून दाखवला. नंतर

इ.स. 1938 पासून कबड्डी हा खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून खेळला जाऊ लागला. तर अखिल भारतीय कबड्डी संघाची स्थापना इ.स.1950 मध्ये झाली.भारतीय कबड्डी फेडरेशनने पुरुषांसाठी 1952 पासून तर महिलांसाठी 1955 पासून राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे आयोजन केले.

कबड्डी हा बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ आहे. कबड्डी हा भारतातील महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, ओडिशा, पंजाब, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा खेळ आहे. कबड्डी हा मूळचा भारतीय खेळ असला तरी पाकिस्तान, भूतान, नेपाल,श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया यांसारख्या देशात पण खेळला जातो. जपान या देशापर्यंत कबड्डी हा खेळ प्रसारित झाला आहे.

कबड्डी हा खेळ कसा खेळला जातो (How to play kabaddi game)

कबड्डी हा सांघिक खेळ असून दोन संघांमध्ये खेळला जातो. या खेळात प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात पण  सामन्यात सात खेळाडू खेळतात.कबड्डीत एका खेळाडूला “रेडर” म्हणून संबोधले जाते.हा रेडर विरुध्द संघाच्या अर्ध्या कोर्टापर्यंत धाव घेतो आणि शक्य होईल तितक्या बचावकर्त्याना स्पर्श करतो.नंतर मग स्वतःच्या अर्ध्या कोर्टात परत येतो.हे सर्व त्या रेडर ने एका दमात केले पाहिजे आणि विरोधी संघाच्या बचावकर्त्यांचा स्पर्श होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

कबड्डीत रेडरने स्पर्श केलेल्या प्रत्येक खेळाडूंसाठी रेडरच्या संघाला गुण भेटता. विरोधी संघाने जर रेडरला त्यांच्या भागाच्या कोर्टात थांबवलं तर त्याबद्दल विरोधी संघाला एक गुण मिळतो. रेडरने स्पर्श केलेल्या किंवा

हाताळले गेलेल्या विरोधी संघांच्या खेळाडूंना खेळातून बाहेर काढले जाते.पण त्या विरोधी संघाला टॅग किंवा टॅकलमधून मिळवलेल्या प्रत्येक गुणांसाठी त्या संघाला त्यांचे खेळाडू परत भेटतात.अशाप्रकारे कबड्डी हा मैदानी खेळ खेळला जातो.

कबड्डी खेळाला लागणारे मैदान (Playground of kabaddi game)

कबड्डी या खेळात महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या आकाराची मैदाने असतात. कबड्डीचे मैदान हे आयातकृती असते. पुरुषांसाठी 12.50 मीटर बाय 10  मीटर असते, तर महिलांसाठी 11 मीटर बाय 8 मीटर चे

आयातकृती क्रीडांगण बनवले जाते. कबड्डीचे मैदान बनवताना बारीक , चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करतात आणि सपाट मैदान बनवतात. पूर्वीच्या काळी कबड्डी हा खेळ असाच खुल्या मैदानावर खेळवला जायचा पण आता हा खेळ बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जातोय.

कबड्डीमध्ये अनेकांनी आपले नाव कमावले. कबड्डी खेळात पुरूषांमध्ये पवन सेहरावत,अनुप कुमार,राहुल चौधरी व परदिप नरवाल हे प्रसिद्ध कबड्डी खेळाडू आहेत, तर महिला खेळाडूंमध्ये अभिलाषा म्हात्रे,दिपाली जोसेफ या प्रसिद्ध कब्बडी खेळाडू आहे. कबड्डी हा खेळ खेळताना चढाया करतानी खेळाडूस “कबड्डी” या शब्दाचा सलग उच्चार करावा लागतो. अन्यथा तो खेळाडू बाद होतो.

कबड्डी खेळाचे प्रकार आणि विविध नावे ( Types of kabaddi and its various names )

कबड्डी या खेळाचे प्रमुख दोन प्रकार आहेत.त्यातील  एक म्हणजे “पंजाबी कबड्डी” आणि दुसरा प्रकार म्हणजे “मानक शैली”.  पंजाबी कबड्डीला “वर्तुळ शैली” असेही म्हणतात. हा खेळ गोलाकार मैदानावर खेळला जातो. या प्रकारात पारंपारिक प्रकारच्या खेळांचा समावेश होतो. दुसरा प्रकार आहे “मानक शैली”.ह्या प्रकारात खेळ आयताकृती कोर्टवर खेळला जातो. आशियाई खेळांमध्ये आणि प्रमुख व्यावसायिक लीग सारख्या  आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हीच शैली वापरली जाते.

कबड्डी हा खेळ भारतात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये कबड्डीला चेडुगुडू ,पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये कबडी किंवा हा-डु-डू असे म्हणतात.महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये कबड्डी म्हणून ओळखतात.

तर मालदीव मध्ये कबड्डी खेळाला भाविक, पंजाब राज्यात कौड्डी किंवा कबड्डी या नावाने ओळखले जाते.

पूर्व भारतात हुदूदू म्हणून ,पश्चिम भारतात हुतूतू  तर दक्षिण भारतात चडकुडू म्हणून कबड्डी खेळाला संबोधले जाते. नेपाळ देशात कबड्डी खेळाला कपर्डी म्हणतात तर भारतातील तामिळनाडूमध्ये कबडी किंवा सादुगुडू असे म्हणतात.

कबड्डी खेळाबद्दल इतर माहिती (Other information about kabaddi game)

कबड्डी खेळाच्या प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. पण प्रत्यक्षात सामन्यात मात्र सात खेळाडू खेळत आणि इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून राखीव ठेवले जात. कबड्डीत दोन डाव खेळवले जातात. त्यातील पुरुषांचे डाव हे वीस मिनिटांचे ,तर महिलांचे डाव हे पंधरा मिनिटांचे असतात. दोन संघांच्या गुणांत बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन सामने खेळवले जातात.

महाराष्ट्र राज्याने कबड्डी ह्या खेळासाठी काही नियम निश्चित केले होते ,आज त्या नियमांनुसार संपूर्ण  भारतात कबड्डी हा खेळ खेळवला जात आहे. नंतर पुढे कबड्डीच्या झालेल्या प्रचार आणि प्रसारामुळे हा खेळ देशाच्या सीमापार गेला. कबड्डी खेळाला आंतरराष्टीय स्थरापर्यंत पोहचवण्यात महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आहे.

कबड्डी या खेळात पुरुष आणि महिला या दोन्ही संघांनी देखील विश्वकप जिंकला आहे. प्रो कबड्डी सारख्या सामन्यांमुळे तर गेल्या काही वर्षात कबड्डी खेळाला संजीवनी मिळाली आहे.

कबड्डी खेळाचे प्रमुख सामने (Major matches of kabaddi game)

कबड्डी खेळाच्या अनेक प्रतिष्ठित स्पर्धा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होतात. त्यातील काही महत्त्वाच्या स्पर्धांबद्दल आपण या लेखात बघणार आहोत.

प्रो कबड्डी लीग :

2014 मध्ये प्रो कबड्डी लीगची स्थापना करण्यात आली.

या लीग ची रचना क्रिकेटच्या इंडियन प्रीमियर लीगसारखीच आहे. दूरदर्शन वरील स्टार स्पोर्ट्स या चॅनेलवर प्रो कबड्डी चे थेट प्रक्षेपण करते. हा स्पोर्ट्स शो भारतीय टेलिव्हिजनवर प्रचंड हिट ठरला.

कबड्डी विश्वचषक :

कबड्डी विश्वचषक ही स्पर्धा 2004 मध्ये सर्वप्रथम आयोजित केली गेलेली.कबड्डी विश्वचषक हा कबड्डी  खेळातील सर्वात महत्वाचा सामना असून ,यामध्ये जगभरातील संघ भाग घेतात.

2010 पासून कबड्डी विश्वचषक ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते.भारताने सर्व कबड्डी विश्वचषक स्पर्धा जिंकल्या आहेत. 2016 मध्ये भारतातील गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. हा वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला. ज्याचे नेतृत्व अनूप कुमारने केले होते. या स्पर्धेत एकूण बारा देशांनी सहभाग घेतला होता.

जागतिक कबड्डी लीग :

जागतिक कबड्डी लीगची 2014 साली स्थापना झाली.

ही लीग म्हणजे  इंग्लंड, पाकिस्तान ,कॅनडा ,आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या चार राष्ट्रांनी बनलेली आठ संघांची परिषद होय. या लीग मधील संघांचे अनेक कलाकार मालक आहे.

ऑगस्ट ते डिसेंबर ,2014 मध्ये या कबड्डी लीगचा पहिला हंगाम आयोजित करण्यात आला होता आणि या सामन्यात बर्मिंगहॅम, इंग्लंडमधील युनायटेड सिंग्सने चॅम्पियनशिप जिंकली होती. अनेक कलाकार या लीग मधील संघांचे मालक आहेत.

FAQ

कबड्डी या खेळात एका संघात किती खेळाडू असतात?

कबड्डी या खेळात एका संघात बारा खेळाडू असतात,पण प्रत्यक्षात सामन्यात सात खेळाडू असतात आणि बाकीचे पाच खेळाडू हे राखील म्हणून ठेवलेले असतात.

अखिल भारतीय कबड्डी संघाची स्थापना कधी झाली?

अखिल भारतीय कबड्डी संघाची स्थापना इ.स.1950 मध्ये झाली.

कबड्डी खेळ हा कोणत्या राष्ट्राचा राष्ट्रीय खेळ आहे?

कबड्डी खेळ हा बांगलादेशाचा राष्ट्रीय खेळ आहे.

भारतीय कबड्डी फेडरेशनने महिलांसाठी कधी पासून राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे आयोजन केले?

भारतीय कबड्डी फेडरेशनने महिलांसाठी 1955 पासून राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे आयोजन केले.

भारतात कोणत्या सालचा कबड्डी वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता?

भारतात 2016 सालचा कबड्डी वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता.

निष्कर्ष || Conclusion:

बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ असणारा कबड्डी हा खेळ संपूर्ण जगात प्रसिध्द झाला आहे. असे म्हणले जाते की महाभारताच्या काळापासून कबड्डी हा खेळ चालू आहे. महाभारतात श्रीकृष्ण आणि अभिमन्यू यांनी कबड्डी खेळ खेळलेला असे म्हणतात.सर्वसामान्य माणूस पण हा खेळ खेळू शकतो. या खेळासाठी जास्त जागेची, काही साधनांची गरज नसते. कबड्डी हा खेळ शारीरिक पराक्रम, रणनीती आणि सांघिक कार्य यांचा मेळ आहे.

Leave a Comment