जंजिरा किल्ल्याची संपूर्ण माहिती Janjira Fort Information In Marathi

Janjira Fort Information In Marathi आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर किल्ले आहेत ,त्यातील काही किल्ले जमिनीवर आहेत ,तर काही किल्ले हे समुद्रात आहे.आजच्या लेखामध्ये आपण अशाच समुद्रामध्ये स्थित असलेल्या एका किल्ल्या विषयी म्हणजे जंजिरा किल्ला विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाद्वारे अजिंक्य जंजिरा किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Janjira Fort Information In Marathi

जंजिरा किल्ल्याची संपूर्ण माहिती Janjira Fort Information In Marathi

किल्ल्याचे नाव जंजिरा किल्ला
जिल्हा रायगड
राज्य महाराष्ट्र
किल्ल्याचा प्रकार समुद्री किल्ला
बुरुजांची संख्या १९
तोफांची संख्या ५७२

जंजिरा किल्ला (Janjira fort in Marathi)

जंजिरा किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड येथील एका बेटा वर स्थित आहे.या किल्ल्याच्या चारी बाजूला समुद्राचे खारे पाणी आहे ,परंतु या किल्ल्यावर गोड पाण्याचे विहीर आहे.लोकांना अजूनही शोध लावता आला नाही की ,चारही बाजूने खारे पाणी असूनही देखील किल्ल्यावर गोड पाण्याची विहीर कशी काय आहे ?

जंजिरा किल्ल्याची विशेषतः ही की ,या किल्ल्याचा मुख्य दरवाजा किनाऱ्या पासून दिसत नाही.आपण जेव्हा किल्ला पाहण्यासाठी किल्ल्याच्या दिशेने समुद्रात काही अंतरावर जातो ,तेव्हा आपल्याला या किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसतो.

अजिंक्य जंजिरा (undefeated Janira in Marathi)

जंजिरा किल्ला हा १५ व्या शतकातील एक समुद्री किल्ला आहे .जंजिरा किल्ला हा २२ एकर च्या क्षेत्रफळामध्ये वसलेला आहे आणि जंजिरा किल्ला संपूर्ण बनण्यासाठी २२ वर्षाचा कालावधी लागला होता.जंजिरा किल्ल्याला जिंकण्याचा प्रयत्न खूप जणांनी केला ,परंतु जंजिरा किल्ला कोणालाच जिंकता आला नाही ,त्यामुळे या किल्ल्याला “अजिंक्य” असे देखील म्हणले जाते.

जंजिरा किल्ल्याचे मुख्य द्वार किनाऱ्यावरून दिसत नसल्यामुळे ,जे जंजिरा किल्ल्यावर आक्रमण करायला येत असे ,त्यांना समजत नसे कि, किल्ल्याचे मुख्य द्वारे कोठे आहे ते ? .आणि किल्ला जिंकायला आलेले जर जंजिरा किल्ल्याच्या मुख्य द्वाराच्या जवळ आले तर त्यांच्यावर तोफांनी हमला केला जात असे ,त्यामुळे जंजिरा किल्ला हा कोणालाच जिंकता आला नाही .जंजिरा किल्ला अजिंक्य राहण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जंजिरा किल्ल्याची बांधणी. जुन्या काळातील तोफा आजदेखील जंजिरा किल्ल्यावर स्थित आहे.

जंजिरा किल्ल्याची संरचना (Structure of Janjira fort in Marathi)

जंजिरा किल्ल्याची रचना अशा पद्धतीने तयार करण्यात आले होती की ,”हा किल्ला कोणालाही जिंकता न यावा आणि या किल्ल्यावरून समुद्री आक्रमणापासून राज्याचे रक्षण करता यावे.”

जंजिरा किल्ल्यावर दोन मुख्य दरवाजे आहेत ,त्यातील पहिला दरवाजा किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी बनवण्यात आला होता आणि आपत्कालीन काळात किल्ल्यावरून बाहेर जाण्यासाठी दुसऱ्या दरवाज्याची निर्मिती करण्यात आली होती.

या किल्ल्यावर असणारी गोड पाण्याची विहीर प्रेक्षकांना आकर्षित करते.कारण हा किल्ल्याच्या चारही बाजूला समुद्र आहे ,चारही बाजूला खारे पाणी आहे ; परंतु किल्ल्यावर असणाऱ्या गोड विहिरींमध्ये गोड पाणी कुठून येते ? हा प्रश्न आजही लोकांना पडतो .

जंजिरा किल्ला पर्यटकांना बघण्यासाठी चालू आणि बंद होण्याची वेळ (Janjira fort Starting and closing point for tourists in Marathi)

जंजिरा किल्ला हा पर्यटकांसाठी आठवड्यातील सातही दिवस उघडा असतो.हा किल्ला पर्यटकांसाठी सकाळी ७ ला उघडला जातो आणि हा किल्ला पर्यटकांसाठी सायंकाळी ६ वाजता बंद केला जातो.हा किल्ला समुद्रामध्ये स्थित असल्यामुळे संध्याकाळच्या ६ नंतर या किल्ल्यावर कोणालाही सोडले जात नाही.

जंजिरा किल्ला बघण्यासाठी असणारे प्रवेश शुल्क (Entry fee for Janjira fort in Marathi)

आपल्याला जंजिरा किल्ला बघण्यासाठी २५ रुपये इतके प्रवेश शुल्क भरावे लागते आणि हा किल्ला समुद्रामध्ये स्थित असल्यामुळे या किल्ल्या पर्यंत पोहोचण्यासाठी बोटची मदत घ्यावी लागते ,मग हा किल्ल्या पर्यंत पोहोचण्यासाठी ह्या बोटस चे जेवढे शुल्क असेल तेवढे आपल्याला भरावे लागते.

जंजिरा किल्ल्याजवळ असणारी पर्यटन स्थळे (Tourist places near Janjira fort in Marathi)

जंजिरा किल्ला हा एतहासिक किल्ला आहे आणि या किल्ल्याजवळ भरपूर पर्यटन स्थळे आहेत.जंजिरा किल्ल्याजवळ असणारी काही पर्यटन स्थळे खालीलप्रमाणे :

१) मुरुड बीच ( Murud beach in Marathi )

मुरुड बीच हा रायगड जिल्ह्यामध्ये जंजिरा किल्ल्याच्या जवळ आहे.या मुरुड बीच वरून सायंकाळचा सुर्यास्ताचा मनमोहक नजारा आपल्याला दिसतो.

२) पद्मदुर्ग (कासा) किल्ला ( padmadurg fort in Marathi )

 जंजिरा जवळ अजून एक समुद्री किल्ला असावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी पद्मदुर्ग ( कासा) या किल्ल्याची निर्मिती केली होती.वर्तमानात जंजिरा किल्ला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात बोट उपलब्ध असतात ; परंतु पद्मदुर्ग किल्ला बघण्यासाठी जास्त बोट उपलब्ध नाहीत ,त्यामुळे आपल्याला जर पद्मदुर्ग (कासा) किल्ला पाहायचा असेल तर ,आपल्याला खाजगी बोट ची मदत घ्यावी लागेल.

३) गरंबी धबधबा (Garambi Waterfall in Marathi)

गरंबी धबधबा हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे.पावसाळ्यात गरंबी धबधबा पर्यटकांची मने आपल्याकडे आकर्षित करतो.जर तुम्ही पावसाळ्यात जंजिरा किल्ला बघायला जात असाल तर ,जंजिरा किल्ल्याजवळ असणारा गरंबी धबधबा पाहणे हा देखील तुमच्यासाठी चांगला पर्याय असेल.

जंजिरा किल्ला बघण्यासाठी योग्य ऋतू (Best Season to visit Janjira fort in Marathi)

तसे तर आपण जंजिरा किल्ला बघण्यासाठी वर्षामध्ये कोणत्याही महिन्यात जाऊ शकतो.परंतु जंजिरा किल्ला हा समुद्रामध्ये स्थित असल्यामुळे उन्हाळ्यात इथे खूप उष्ण वातावरण असते त्यामुळे जास्त पर्यटक उन्हाळ्यात हा किल्ला बघण्यासाठी जात नाहीत.जास्तकरून हिवाळ्यात पर्यटक ह्या किल्ल्याला भेट देतात.

जंजिरा किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठीचे पर्याय (Best options to reach Janjira fort in Marathi)

जंजिरा किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ हे मुंबईचे “छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ” आहे आणि या किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे ” रोहा रेल्वे स्टेशन” आहे.तुम्ही या जवळच्या विमानतळ किंवा रेल्वे स्टेशन जवळ आला तर ,तुम्ही लोकल गाड्यांच्या मदतीने मुरुड मध्ये पोहचू शकता आणि तुम्ही पुढे मुरुड मधून बोटीतून जंजिरा किल्ल्यावर जाऊ शकता.

FAQ

जंजिरा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात आहे ?

जंजिरा किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात स्थित आहे.

जंजिरा किल्ला हा कोणत्या प्रकारचा किल्ला आहे ?

जंजिरा किल्ला हा समुद्री किल्ला आहे.

जंजिरा किल्ल्याची निर्मिती कोणत्या शतकात करण्यात आली होती ?

जंजिरा किल्ल्याची निर्मिती १५ व्या शतकामध्ये करण्यात आली होती.

जंजिरा किल्ला कोणी बांधला होता ?

१५ व्या शतकात जंजिरा किल्ल्याची निर्मिती मलिक अंबर याने केली होती.

भूतकाळात जंजिरा किल्ल्यावर किती तोफा होत्या ?

भूतकाळात जंजिरा किल्ल्यावर ५७२ तोफा होत्या ,ज्या शत्रू पासून किल्ल्याचे रक्षण करत होत्या .

जंजिरा किल्ल्यावर किती बुरूजे आहेत ?

जंजिरा किल्ल्यावर १९ बुरूजे आहेत आणि दोन बुरुजांमधील अंतर ९० फूट इतके आहे .

जंजिरा किल्ल्याच्या जवळचे रेल्वे स्टेशन कोणते आहे ?

जंजिरा किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे “रोहा रेल्वे स्टेशन” आहे.

जंजिरा किल्ल्याच्या जवळचे विमानतळ कोणते आहे ?

जंजिरा किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ हे “छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ ,मुंबई” आहे.

जंजिरा किल्ला बघण्यासाठी कोणता ऋतू उत्तम मानला जातो ?

हिवाळा ऋतू जंजिरा किल्ला बघण्यासाठी उत्तम मानला जातो.

अजिंक्य असणारा जंजिरा !! आजच्या लेखामधून आपण अजिंक्य जंजिरा किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली.आजच्या लेखामध्ये आपण जंजिरा किल्ल्याचा इतिहास ,जंजिरा किल्ल्याची संरचना ,जंजिरा किल्ला बघण्यासाठी उत्तम ऋतू ,जंजिरा किल्ला चालू आणि बंद होण्याची वेळ आणि जंजिरा किल्ला पर्यंत पोहोचण्याचे मार्ग,या विषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment