जगदीश चंद्र बोस यांची संपूर्ण माहिती Jagdish Chandra Bose Information In Marathi

Jagdish Chandra Bose Information In Marathi आपल्या भारत देशाला एका प्रगतीच्या , विकासाच्या गटाकडे नेण्यासाठी कित्येक क्रांतिवीर , अभ्यासक , शास्त्रज्ञ लाभले , त्यातलेच एक जगदीश चंद्र बोस .जगदीश चंद्र बोस हे भारतातील पहिले वैज्ञानिक संशोधक होते त्यांनी विज्ञान , जीवशास्त्र , भौतिकशास्त्र् , या विषयांतील शोध आणि प्रयोगांनी संपूर्ण जगाला प्रभावित केलं . या विषयांना भारतीय संस्कृतीशी जोडण्याचे काम त्यांनी केलं आहे . ह्यांच्याबद्दल आपण अधिक माहिती ह्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

Jagdish Chandra Bose Information In Marathi

जगदीश चंद्र बोस यांची संपूर्ण माहिती Jagdish Chandra Bose Information In Marathi

पूर्ण नावजगदीश चंद्र बोस  
जन्म३० नोव्हेंबर , १५५८
जन्म ठिकाणढाका जिल्ह्यातील फरीदपूर येथील मेमेनसिंग [ सध्याचा बांगलादेश ] येथील ररौली गाव
वडिलांचे नावभगवान चंद्र बोस
पत्नीचे नावआबाला बोस
शिक्षण  / ओळख जीवशास्त्रज्ञ , भौतिक शास्त्रज्ञ , वनस्पती शास्त्रज्ञ
निधन २३ नोव्हेंबर , १९३७

जगदीशचंद्र बोस यांचा जन्म आणि कुटुंब ( Birth of Jagadish Chandra bose and his family in Marathi ) :

जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानि घराणे होते. जगदीश चंद्र बोस ह्यांचा जन्म ३० नोव्हेंबर , १५५८ रोजी ढाका जिल्ह्यातील फरीदपूर येथील मेमेनसिंग [ सध्याचा बांगलादेश ] येथील ररौली गावात झाला . हे आता बांग्लादेशात आहे. त्यांची आई सुशील होती. 

त्यांच्या वडिलांचे नाव भगवान चंद्र बोस होते , हे ब्रह्म समाजाचे नेते होते, त्यांनी फरीदपूर , वर्धमानसह अनेक ठिकाणी उपदंडाधिकारी आणि सहाय्यक आयुक्त म्हणून काम केले होते . बोस यांचे बालपण फरीदपूरमध्ये गेले . बोस यांचे प्रारंभिक शिक्षण त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या त्याच गावातील शाळेत पूर्ण झाले. त्या काळी इंग्रजीत बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले.

जगदीशचंद्र बोस ह्यांचे सुरुवातीचे जीवन ( Early life of Jagadish Chandra bose ) :

बोस ह्यांना लहानपणापासूनच निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची खूप आवड होती . लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे , त्याचे बारकाईने निरीक्षण करायचे . निरीक्षण केल्यानंतर त्यांना प्रत्येक गोष्टीबाबत प्रश्न पडायचे . त्यांची बुद्धी खूप चौकसबुद्धी असायची , ते नेहमी वडिलांना प्रश्न विचारायचे असच का ? तसच का ? भगवान  चंद्र त्यांच्या प्रश्नाची उत्तरे त्यांचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत समजावून सांगायचे.

जगदीशचंद्र बोस ह्यांचे  शैक्षणिक जीवन  आणि करियर ( Educational life and career of Jagadish Chandra bose ) :

झाडे , फुले , निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद यानिमित्ताने त्यांची जीवशात्रातील आवड जागृत झाली. सुरुवातीला त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच शाळेत झाले . काही काळ त्यांच्या मूळ गावी शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या ११ व्या वर्षी ते कलकत्याला आले .

डॉ जगदीशचंद्र बोस कोलकता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले . त्यांनी भौतिकशास्त्र बी ए ची परीक्षा उत्तीर्ण केली. या काळात त्यांना भौतिकशास्त्र लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले आणि नंतर वैद्यकीय शास्त्रचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले , परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी डॉक्टर होण्याचा विचार सोडून दिला.

क्राईस्ट कॉलेज , केंब्रिज येथून नैसर्गिक विज्ञानात बी ए ची पदवी घेतली आणि नंतर लंडन विद्यापीठातून विज्ञान विषयामध्ये पदवी प्राप्त केली.  जगदीशचंद्र बोस १८८५ मध्ये भारतात आल्यानंतर प्रेसिडेन्सी कॉलेज , कोलकत्ता येथे सहाय्य्क प्राध्यापक म्हणून शिकवू लागले.

जगदीशचंद्र बोस ह्यांचे  वैयत्किक जीवन( Persnoal life of Jagadish Chandra bose ) :

जगदीश चंद्र बोस ह्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्त्रीवादी , अधिकारवादि, सामाजिक कार्यकर्त्या आबाला बोस यांच्याशी लग्न केले.

जगदीशचंद्र बोस  ह्यांचा वनस्पती शास्त्र मधील प्रवास  ( Journey in Botany of Jagadish Chandra bose ) :

जगदीश चंद्र बोस  भारतातील महान वैज्ञानिकांपैकी एक. बोस यांनी कॅस्कोग्राफ नावाच्या उपकरणाचा शोध लावला ते परिसरातील विविधी लहरी मोजू शकत होते. बोस यांनी हे सिद्ध करून दाखवले कि वनस्पतींपैकी उत्तेजनाचा संचार रासायनिक माध्यमाऐवजी विद्युतीय माध्यमातून होतो, या कल्पनेच्या आधारे त्यांनी वनस्पतींच्या पेशिंवर विद्युत सिग्नलचा प्रभाव यावर बरेच संशोधन केले.

नंतर त्यांच्या प्रयोगातून ते सिद्ध झाले कि झाडे निर्जीव नसतात  त्यांनाही जीवन असते, ते मानवाप्रमाणे व इतर सजीव प्राण्यामध्ये श्वास घेतात.  हे सिद्ध करण्याचा त्यांचा हा प्रयोग रॉयल सोसायटीमध्ये झाला, या शोधाचे जगभारत बोस यांचे कौतुक झाले.

जगदीशचंद्र बोस  ह्यांची रेडिओ कम्युनिकेशनचे जनक म्हणून ओळख :

जगदीश चंद्र बोस हे रेडिओ आणि मायक्रोवेव्ह ऑप्टिक्सचा शोध लावणारे पहिले शास्त्र होते . वैज्ञानिक विभागात असे मानले जाते कि यांच्या वायरलेस रेडिओसारख्या उपकरणातूनच रेडिओ विकसित केला गेला त्यांनी हे बनविलेले उपकरण आकाराने लहान असल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते अगदी सहजरित्या नेता येऊ शकत होते.

जगदीशचंद्र बोस ह्यांना त्यांच्या महान कार्यासाठी मिळालेले प्रमुख पुरस्कार आणि पदवी ( Awards and Degree received by Jagadish Chandra bose ) :

  • 1917 मध्ये महान शास्त्रज्ञ बोस यांना ब्रिटीश सरकारने नाईट  पदवीने सन्मानित केले होते.
  • 1986 मध्ये रेडिओ विज्ञानाचे जनक  बोस यांना लंडन विद्यापीठातून विज्ञान विषयात डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.
  • 1920 मध्ये  बोस यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली.
  • 1903 मध्ये  यांना ब्रिटीश सरकारने कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (CIE) हा पुरस्कार दिला.

जगदीशचंद्र बोस ह्यांनी लिहिलेली पुस्तके ( Books Written by Jagadish Chandra bose ) :

1)     इरिटेबिलिटी ऑफ प्लॅंट्स

2)     इलेक्ट्रो-फिजिओलॉजी ऑफ प्लॅंट्स

3)     ट्रॉपिक मुव्हमेंट ॲन्ड ग्रोथ ऑफ प्लॅंट्स

4)     दि नव्‍‌र्हस मेकॅनिझम ऑफ प्लॅंट्स

5)     प्लॅंट रिस्पॉन्स

6)     दि फिजिऑलॉजी ऑफ फोटोसिंथेसिस

7)     दि मोटार मेकॅनिझम ऑफ प्लॅंट्स

8)     रिस्पॉन्सेस इन द लिव्हिंग ॲन्ड नॉन लिव्हिंग

9)     लाइफ मुव्हमेंट्स ऑफ प्लॅंट्स (भाग १ ते ४)

जगदीश चंद्र बोस यांचे निधन (Death of Jagadish Chandra bose) :

आपले महत्वपूर्ण योगदान ह्यांनी विज्ञान क्षेत्रात दिले अश्या ह्या महान शास्त्रज्ञ जगदीश बोस यांनी वयाच्या ७८ वर्षी २३ नोव्हेंबर , १९३७ रोजी गिरिडीह  बंगाल प्रेसिडेन्सी येथे अखेरचा श्वास घेतला . असे हे महान व्यक्तिमत्व त्यांनी विज्ञानात केलेल्या महान अश्या शोधांसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील .

FAQ

जगदसिह चंद्र बोस यांचा जन्म केव्हा आणि कोठे झाला ?

जगदीश बोस ह्यांचा जन्म ३० नोव्हेंबर , १५५८ रोजी ढाका जिल्ह्यातील फरीदपूर येथील मेमेनसिंग येथील ररौली गावात झाला.

जगदीश चंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

जगदीश बोस ह्यांच्या वडिलांचे नाव भगवान चंद्र बोस होते.

जगदीश बोस ह्यांचे शिक्षण काय होते ?

भौतिकशास्त्र , वनस्पतीशास्त्र , जीवशास्त्र ह्या विषयांत ते पदवीधर होते.

जगदीश चंद्र बोस ह्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले आहे ?

जगदीश बोस यांना ब्रिटीश सरकारने कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (CIE) हा पुरस्कार दिला.

रेडिओ विज्ञानाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

जगदीश चंद्र बोस ह्यांना रेडिओ विज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाते.

जगदीश चंद्र बोस ह्यांचे निधन केव्हा झाले ?

जगदीश बोस यांनी वयाच्या ७८ वर्षी २३ नोव्हेंबर , १९३७ रोजी गिरिडीह , बंगाल प्रेसिडेन्सी येथे अखेरचा श्वास घेतला.

आजच्या लेखामध्ये आपण वैज्ञानिक शास्त्रज्ञ आणि आपल्या देशाला एका गतीच्या वाटचालीकडे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे जगदीश बोस ह्यांच्या जीवनाविषयी माहिती पहिली. आजच्या लेखामधून आपण त्यांचा जन्म ,  त्यांचे कुटुंब, शैक्षणिक जीवन , त्यांचं करियर , त्यांचे कार्य त्यांना त्यांच्या कार्यासाठी मिळालेले पुरस्कार , पदवी त्याचप्रमाणे त्यांनी कोणती पुस्तके लिहिली , बोस ह्यांचे निधन,बोस ह्यांच्याविषयी विचारले जाणारे प्रश्न उत्तरे इत्यादी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment