होळी सणाची संपूर्ण माहिती Holi Festival Information In Marathi

Holi Festival Information In Marathi आपल्या भारत देशामध्ये आपण प्रत्येक सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे करतो.उत्सव साजरे करण्यामागे एक उदेश्य हा असतो की , समाजातील सर्व लोक एकत्र येऊन आपल्या सणांचा आनंद घेऊ शकतील.

Holi Festival Information In Marathi

होळी सणाची संपूर्ण माहिती Holi Festival Information In Marathi

आपल्या भारत देशामध्ये भरपूर सण साजरे केला जातात,प्रत्येक सणाचे काहीतरी महत्व असते.या महत्वाच्या सनांपैकी असणारा एक सण म्हणजे होळी .आजच्या लेखामध्ये आपण होळी या सणा विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाद्वारे होळी सणा विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

सणाचे नावहोळी
तिथीफाल्गुन पौर्णिमा
ऋतूवसंत
उदेश्यवाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टीचा विजय

होळी सण हा दरवर्षी वसंत ऋतू मध्ये येतो ,त्यामुळे या सणाला वसंतोत्सव देखील म्हणले जाते.हिंदू पंचांग नुसार वसंत ऋतूतील फाल्गुन महिन्यातील एका पौर्णिमेला होळी सण साजरा केला जातो.

होळी सण साजरे करणारे देश ( Country who celebrates Holi festival in Marathi )

होळी हा सण हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे आणि भारत आणि नेपाळ देशामध्ये प्रामुख्याने हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.भारत आणि नेपाळ या देशा व्यतिरिक्त ज्या देशांमध्ये हिंदू लोक राहतात ,त्या देशांमध्ये देखील हा होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

होळी सण साजरा करण्याची पद्धत (How we celebrate Holi festival in Marathi)

होळी सण हा प्रामुख्याने दोन दिवस साजरा केला जातो.पाहिल्या दिवशी रात्री होलिका दहन केले जाते.ज्यामध्ये असे म्हणतात की ,आपण या होलिका दहन सोबत आपण आपल्या अंगात असणाऱ्या वाईट गुणांचे देखील दहन केले पाहिजे.या होलिका दहन दिवशी पोळ्यांचा नैवैद्य केला जातो.

दुसऱ्या दिवशी रंगाची होळी खेळली जाते.काही ठिकाणी या दिवसाला “धुलीवंदन” म्हणले जाते.यादिवशी सकाळी उठून ,गावातील किंवा शहरातील सोसायटी मधील लोक जुनी – पुराणी कपडे घालून एका विशिष्ट ठिकाणी एकत्र येतात आणि आपल्या प्रियजनांना रंगाने रंगवतात.

या दिवशी सर्व ठिकाणी आनंदाचे वातावरण असते आणि संपूर्ण आसपासचा परिसर रंगाने मोहून गेलेला असतो.ही रंगाची होळी दुपार पर्यंत खेळली जाते आणि संध्याकाळी या दिवशी माणसे एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकांमध्ये मिठाई वाटतात.

होळी सणाचा इतिहास (History of Holi festival in Marathi)

होळी हा सण भारताच्या प्राचीन सणापैकी एक सण आहे.नारद पुराण आणि भविष्य पुराण सारख्या प्राचीन पुराणांमध्ये देखील होळीचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतो.विंध्य क्षेत्रातील रामगड स्थानावर इसवी सन पूर्व ३०० वर्षापूर्वी लिहिलेल्या अभिलेखामध्ये देखील होळी सणाचा उल्लेख केला गेला आहे.

संस्कृत साहित्यकारांनी होळी सणा विषयी भरपूर साहित्य लिहिले आहे.होळी हा हिंदू धर्मीय लोकांचा सण आहे ;परंतु भूतकाळातील मुस्लिम राजवटी मध्ये देखील होळी सण साजरा केला जात होता.मुस्लिम राजवटी तील राजा अकबर आणि त्याची पत्नी जोधा हे दोघे होळी खेळत होते.तसेच जहांगीर आणि नुर्जहा हे देखील होळी सण साजरे करत होते. अलविर संग्रहालयातील एक चित्र जहांगीर होळी खेळतानाचा आहे.

या व्यतिरिक्त प्राचीन मंदिरे आणि गुहांमध्ये असणाऱ्या भिंतीवर देखील होळी सण साजरा करतानाचे चित्र सापडले आहेत.त्याकाळच्या विजयनगर राज्याची राजधानी हंपी मध्ये देखील होळी सण साजरा करतानाचे चित्र सापडले आहेत.या चित्रामध्ये त्याकाळचे राजकुमार आणि राजकुमारी आपल्या दासिंसोबत होळी खेळताना आपल्याला दिसतील.

होळी सणा विषयी असणारी कथा (Mythological Story of Holi festival in Marathi)

तशा तर होळी सणा विषयी भरपूर कथा आहेत .त्यातील एक कथा अशी की ,प्राचीन काळामध्ये हिरण्यकश्यप नावाचा राक्षस होता.त्याला आपल्या राज्यातील लोकांनी देवाचे नाव काढले तर लगेच राग येत होता.त्याला इतका अहंकार झाला होता की ,त्याला वाटत होते की तोच देव आहे म्हणून.त्याच्या राज्यातील जे लोक देवांची भक्ती करतील ,अशा लोकांना तो मारत असे.

त्याच्या मुलांचे नाव होते प्रल्हाद.प्रल्हाद हे श्री विष्णू भक्त होते आणि ते सैदव प्रभूंचे नामजप करत असत .त्यांचे हे नामजप करणे हिरण्यकश्यप ला आवडत नसे.त्याने भक्त प्रल्हाद यांना ईश्वराची भक्ती करतो म्हणून किती तरी वेळी जीवे मारण्याचा प्रयत्न केला ,परंतु दरवेळी ईश्वर भक्त प्रल्हाद यांना मदत करत असत.एकदा हिरण्यकश्यप च्या आदेशावरून भक्त प्रल्हाद यांना सापांच्या जंगलात सोडले होते,जेणेकरून साप चावून त्यांचा मृत्यू होईल.पण या परिस्थितीत देखील भक्त प्रल्हाद यांची मदत ईश्वरांनी केली,त्यांना कोणत्याही सापांनी दंश केला नाही.

हिरण्यकश्यप च्या बहिणीचे नाव होते ” होलिका” आणि तिला अग्निमध्ये भस्म न होण्याचे वरदान मिळाले होते. हिरण्यकश्यप ने आपल्या बहिणीला भक्त प्रल्हाद ला कुशीमध्ये घेऊन अग्नीत जाण्याचा आदेश केला.त्याला वाटले की ,होलिका ला अग्नीत भस्म न होण्याचे वरदान भेटले आहे ,त्यामुळे ती वाचेल आणि भक्त प्रल्हाद यांचा अग्नी मध्ये भस्म होऊन मृत्यू होईल.

भावाच्या सांगण्यावरून होलिका ने भक्त प्रल्हाद यांना कुशीत घेऊन अग्निमध्ये उडी घेतली.पण घडले उलटे ! भक्त प्रल्हाद अग्निमध्ये भस्म झाले नाहीत आणि होलिका जीला अग्निमध्ये भस्म न होण्याचे वरदान मिळाले होते ,ती अग्निमध्ये भस्म झाली.यादिवसापासूनच होलिका दहन करून होळी सण साजरा केला जातो.या दिवशी असत्यावर सत्याचा विजय झाला होता ,तेव्हापासून होलिका दहन वेळी आपल्या अंगातील वाईट गुणांना अग्निमध्ये विसर्जन करण्याची परंपरा आहे.

FAQ

होळी सण हा कोणत्या धर्मातील सण आहे ?

होळी सण हा प्रामुख्याने हिंदू धर्मातील लोक साजरा करतात ,परंतु देशातील इतर धर्मीय लोक देखील होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

होळी सण हा कोणत्या ऋतूत साजरा केला जातो ?

होळी सण हा वसंत ऋतूत साजरा केला जातो ,त्यामुळे या सणाला “वसंतोत्सव” देखील म्हणले जाते.

होळी सण हा दरवर्षी कोणत्या महिण्यामध्ये येतो ?

हिंदू धर्मातील पंचांग नुसार होळी सण हा दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो.

होळी सण कशा पद्धतीने साजरा केला जातो ?

प्रामुख्याने दोन दिवसामध्ये होळी सण साजरा केला जातो.यातील पहिल्या दिवशी रात्री होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या प्रियजनांना रंग लावून होळी सण साजरा केला जातो.

होळी सण का साजरा केला जातो ?

प्राचीन काळात हिरण्यकश्यप नावाचा राक्षस होता आणि त्याला प्रभूंचे नाव कोणी घेतलेले आवडत नसे ,परंतु त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद च सदैव प्रभूंचे नामस्मरण करत असे,हिरण्यकश्यप च्या बहिणीचे नाव होलिका होते आणि तिला अग्निमध्ये भस्म न होण्याचे वरदान मिळालेले असते.भक्त प्रल्हाद ला मारण्यासाठी त्याला होलिका च्या कुशीमध्ये घेऊन होलिका ला अग्नीत उडी मारायला हिरण्यकश्यप सांगतो.परंतु त्या अग्निमध्ये होलिका भस्म होते आणि भक्त प्रल्हाद वाचतात.यावरूनच दरवर्षी होलिका दहन करून होळी सण साजरा केला जातो.

होळी सण साजरा करण्यामागे उदेश्य काय आहे ?

होळी सण साजरी करण्याचा उदेश्य हा की ,”वाईट गोष्टीवर चांगल्या गोष्टींचा विजय किंवा असत्यावर सत्याचा विजय”

भारतामध्ये रंगाचा सण कोणता आहे ?

भारतामध्ये होळी हा रंगांचा सण आहे.

हिंदू धर्मातील प्रमुख सणापैकी एक प्रमुख सण म्हणजे होळी ! आजच्या लेखामधून आपण होळी सणा विषयी संपूर्ण माहिती पाहिली.आजच्या लेखामध्ये आपण होळी सणाचा इतिहास ,होळी सण साजरा करण्याची पद्धत ,आणि होळी सण साजरा करण्यामागची पौराणिक कहाणी याविषयी माहिती पाहिली.d

Leave a Comment