जीएसटीची संपूर्ण माहिती GST Information In Marathi

GST Information In Marathi आपल्या पैकी काही जण नोकरी करत असतील ,तर काही जणांचा स्वतःचा व्यवसाय असेल. आपण नोकरी करत असो ,अथवा आपला स्वतःचा व्यवसाय असो ;आपल्याला आपल्या कमाईतून विशिष्ट रक्कम सरकारला टॅक्स म्हणून द्यावे लागते. देशामध्ये जीएसटी कर प्रणाली चालू करण्याचा विचार २००० सालापासून च चालू होता ; परंतु २०१७ मध्ये जीएसटी ला संपूर्ण रित्या देशामध्ये मंजुरी मिळाली. या जीएसटी कर प्रणाली अंतर्गत देशातील सर्व नागरिकांना एकच टॅक्स संबंधी नियम लागू झाले आहेत.

GST Information In Marathi

जीएसटीची संपूर्ण माहिती GST Information In Marathi

आजच्या लेखामध्ये आपण याच जीएसटी कर प्रणाली विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे जीएसटी विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

प्रणालीचे नाव जीएसटी कर प्रणाली
फुल्ल फॉर्म गूड अँड सर्व्हिसेस टॅक्स
लागू झालेली तारीख १ जुलै २०१७
ऑफिशियल वेबसाईट https://www.gst.gov.in/”

जीएसटी (GST in Marathi)

१ जुलै २०१७ पासून देशातील सरकारने देशामध्ये सर्व नागरिकांना जीएसटी कर प्रणाली लागू करण्याची घोषणा केली होती. जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा यांच्यावर लागलेला कर. जीएसटी शब्दाचा फुल्ल फॉर्म “गूड अँड सर्व्हिसेस टॅक्स” असा होतो.

जेव्हा कोणतीही वस्तू आपल्या सारख्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहचते , तेव्हा ती वस्तू कच्चा मालापासून बनवली जाते ,त्यानंतर त्या वस्तूचे उत्पादन होते. नंतर ती वस्तू होलसेल विक्रेत्याकडे जाते ,त्यानंतर ती वस्तू रीटेलर विक्रेत्याकडे जाते आणि शेवटी ती वस्तू आपल्या सारख्या खरेदीदाराकडे पोहोचते.

तर वस्तू बनवण्या पासून ती खरेदीदाराकडे पोहोचण्या पर्यंत काही पायऱ्या आहेत आणि या प्रत्येक पायऱ्या साठी वेगळा जीएसटी कर लागतो ; त्यामुळेच जीएसटीला बहु – स्तरीय कर प्रणाली देखील म्हणले जाते.

जीएसटी कर प्रणाली उदाहरण (Example of GST tax system in Marathi)

चला तर आपण आता जीएसटी कर प्रणाली शर्टच्या उदाहरणावरून जाऊन घेऊयात. आपण जो शर्ट खरेदी करतो ,तेव्हा तो शर्ट सुरवातीला दोऱ्यातून विणला जातो ,नंतर तो शर्ट वेअरहाऊस मध्ये पाठवला जातो. त्यानंतर त्या शर्ट वर ब्रँडेड कंपनीचा लेबल लावण्यासाठी पाठवले जाते. नंतर तो शर्ट होलसेल विक्रेत्याकडे पाठवला जातो. होलसेल विक्रेत्याकडून तो शर्ट रीटेलर कडे पाठवला जातो आणि तो शेवटी शर्ट रीटेलर कडून आपल्या द्वारे खरेदी केला जातो.

तो शर्ट जेव्हा धाग्यात विणला जातो ,तेव्हा त्याची किंमत कमी असते. नंतर तो शर्ट जेव्हा पुढच्या प्रक्रियेसाठी वेअरहाऊस कडे पाठवला जातो ,तेव्हा त्याच्या किंमतीमध्ये थोडी वाढ होते. नंतर जेव्हा तो शर्ट ब्रँडेड कंपनीचा लेबल लावण्यासाठी पाठवला जातो ,तेव्हा त्याची किंमत अजून थोडी वाढवली जाते.

नंतर तो शर्ट होलसेल विक्रेत्याकडे पाठवला जातो तेव्हा ,त्याची किंमत अगोदरच्या किंमती पेक्षा थोडी वाढवली जाते. शेवटी तो शर्ट रीटेलर कडे पाठवला जातो आणि तेव्हा देखील त्या शर्ट च्या किंमती मध्ये देखील वाढ केली जाते.

जेव्हा तो शर्ट सुरवातीला धाग्यामध्ये विणला जातो ,तेव्हा त्याची जी किंमत असते ती कमी असते आणि जेव्हा तो खरेदीदाराद्वारे खरेदी केला जातो ,तेव्हा जी त्या शर्ट ची किंमत असते ती धाग्यामध्ये विणलेल्या शर्ट पेक्षा जास्त असते आणि सुरवातीला धाग्यामध्ये विनण्या पासून ते खरेदीदाराद्वारे तो शर्ट खरेदी करण्यापर्यंत जेवढ्या पायऱ्या असतात ,त्या सर्व पायऱ्या मध्ये जीएसटी कर द्यावा लागतो.

जीएसटी कर हा विविध वस्तूंवर वेगवेगळा लावला जातो. जीएसटी परिषदने विविध वस्तूंवर ५% ,१२% , १८% आणि २८% इतका जीएसटी कर लावला आहे. चला तर मग आपण आता कोणकोणत्या गोष्टींवर किंवा वस्तूवर किती जीएसटी कर लागतो याविषयीची माहिती पाहुयात.

५% जीएसटी कर लागणाऱ्या काही वस्तू (Certain items subject to 5% GST tax in Marathi)

भारतीय मिठाई ,खाद्यतेल , साखर ,चहा , कॉफी ,कोळसा ,बायोगॅस ,अगरबत्ती ,पतंग ,इत्यादी.

१२% जीएसटी कर लागणाऱ्या काही वस्तू (Certain items subject to 12% GST tax in Marathi)

प्लास्टिकच्या वस्तू ,डिझेल इंजिन ऑईल ,वह्या ,कपडे शिवण्याची मशीन, डेअरी वस्तू ,इत्यादी

१८% जीएसटी कर लागणाऱ्या काही वस्तू (Certain items subject to 18% GST tax in Marathi)

दारू ,१०० पेक्षा जास्त किंमत असणारे मूव्ही तिकीट, इलेट्रिकल ट्रान्सफॉर्मर, इत्यादी.

२८% जीएसटी कर लागणाऱ्या काही वस्तू (Certain items subject to 28% GST tax in Marathi)

वॉशिंग मशीन ,५ स्टार हॉटेल मध्ये भोजन खाणे ,सिमेंट , इत्यादी.

जीएसटी मध्ये निवेदन करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स (Documents required for GST registration in Marathi)

१) आधार कार्ड

२) पैन कार्ड

३) वोटर आयडी

४) अड्रेस प्रूफ

५) इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट

जीएसटी साठी ऑनलाइन निवेदन करण्याची प्रक्रिया ( online registration process for GST in Marathi)

आपल्या भारतातील पहाडी क्षेत्रातील राज्यांमधील ज्यांचे वार्षिक उत्पन्न १० लाख किंवा २० लाखाच्या वर आहे अशा व्यावसायिकांना जीएसटी मध्ये रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. जीएसटी मध्ये रजिस्टर केल्यानंतर ३ ते ४ दिवसाच्या आत तुम्हाला जीएसटी चा एक १५ अंकी सांख्यिकी कोड मिळतो.

१) जीएसटी साठी ऑनलाइन निवेदन करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी जीएसटी च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. तुम्ही या “https://www.gst.gov.in/” जीएसटी च्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा.

२) त्यानंतर पुढच्या पेज वर तुम्ही  “न्यू रजिस्ट्रेशन” या पर्यायावर तुम्ही क्लिक करा.

३) त्यानंतर पुढच्या पेज वर तुम्हाला मोबाईल नंबर,ईमेल आयडी,इत्यादी सारखी माहिती विचारली जाईल ,ती माहिती तुम्ही व्यवस्थित रित्या भरा.

४) मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी कोड येईल ,तो ओटीपी कोड तुम्ही व्यवस्थित रित्या भरा.

५) त्यांनतर तुमचे टीआरएन कोड साठीचे निवेदन यशस्वी रित्या सबमिट होईल.

६) तुम्हाला टीआरएन कोड भेटल्यानंतर तुम्ही जीएसटी वेबसाईट वर टीआरएन कोड द्वारे परत लॉगिन करा.

७) त्यानंतर पुढे कॅपचा येईल ,तो कॅपचा तुम्ही व्यवस्थित रित्या भरा.

८) त्यानंतर पुढच्या पेज वर तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल ,मोबाईल नंबर तुम्ही व्यवस्थित रित्या टाका आणि त्यानंतर मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी देखील व्यवस्थित रित्या टाका.

९) त्यानंतर तुम्ही जीएसटी रजिस्ट्रेशन च्या पेज वरती याल. त्यानंतर पुढच्या पेज वर तुम्हाला तुमच्या कंपनीचे नाव किंवा व्यवसायाचे नाव , पैन कार्ड ,राज्याचे नाव ,इत्यादी माहिती भरावी लागेल. ती सर्व माहिती तुम्ही योग्य रित्या भरा.

१०) त्यानंतर तुम्हाला तुमच्या कंपनीचा व व्यवसायाचा जो भागीदार असेल त्याची माहिती भरावी लागेल.

११) त्यानंतर तुम्हाला तुमच्या कंपनीच्या बँक खात्याची माहिती भरावी लागेल. ती माहिती तुम्ही योग्य रित्या भरा.

१२) त्यानंतर तुम्हाला तुमची डिजिटल सही अपलोड करावी लागेल ,ती डिजिटल सही तुम्ही योग्य रित्या अपलोड करा.

१३) शेवटी सबमिट पर्यायावर क्लिक करा. तुमचे जीएसटी कोड साठीचे निवेदन यशस्वी रित्या सबमिट होईल. त्यानंतर काही दिवसात तुमच्या मोबाईल नंबर वर तुम्हाला एआरएन संख्या प्राप्त होईल.

FAQ

जीएसटी चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

जीएसटी चा फुल्ल फॉर्म “गूड अँड सर्व्हिसेस टॅक्स” असा होतो.

भारत देशामध्ये कोणत्या दिवसापासून जीएसटी कर प्रणाली लागू झाली आहे ?

भारत देशामध्ये १ जुलै २०१७ पासून जीएसटी कर प्रणाली लागू झाली आहे.

जीएसटी कर प्रणाली किती प्रकारामध्ये आकारली जाते ?

जीएसटी कर प्रणाली ही विविध वस्तुंसाठी ५%,१२% ,१८% आणि २८% या चार प्रकारामध्ये आकारली जाते.

जीएसटी ची ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे ?

जीएसटी ची ऑफिशियल वेबसाईट ही “https://www.gst.gov.in/” आहे.

जीएसटी मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणकोणत्या डॉक्युमेंट ची आवश्यकता असते ?

जीएसटी मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार कार्ड , पैन कार्ड , वोटर आयडी ,अड्रेस प्रूफ ,इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट,इत्यादी डॉक्युमेंट ची आवश्यकता असते.

आजच्या लेखामध्ये आपण आपल्या देशातील जीएसटी कर प्रणाली विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण जीएसटी कर प्रणालीचे उदाहरण ,कोणकोणत्या वस्तुंसाठी किती जीएसटी आकारली जाते याची माहिती ,जीएसटी मध्ये निवेदन करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स, जीएसटी साठी ऑनलाइन निवेदन करण्याची प्रक्रिया, जीएसटी विषयी संबंधी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment