गणेश चतुर्थी सणाची संपूर्ण माहिती Ganesh Chaturthi festival Information In Marathi

Ganesh Chaturthi festival Information In Marathi आपल्या भारत देशाची विशेष गोष्टी ही की ,आपल्या देशामध्ये सर्व सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात. आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठा वाटा असणाऱ्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली होती ,तेव्हापासून आपल्या भारत देशामध्ये गणेश चतुर्थी सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. आजच्या लेखामध्ये आपण याच गणेश चतुर्थी सणा विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे गणेश चतुर्थी सणा विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Ganesh Chaturthi festival Information In Marathi

गणेश चतुर्थी सणाची संपूर्ण माहिती Ganesh chaturthi festival Information In Marathi

सणाचे नाव गणेशोत्सव / गणेश चतुर्थी
पहिला दिवस गणेश चतुर्थी
शेवटचा दिवस अनंत चतुर्दशी
तिथी भाद्रपद शुक्ल चतुर्थी

गणेश चतुर्थी सणाचे महत्व ( Importance of Ganesh chaturthi festival in Marathi)

हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थी सणाचे खूप महत्व आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांना सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणले जाते. गणपती बाप्पा हे आपल्याला सुखाचा मार्ग दाखवण्यामध्ये आपली मदत करतात ,तसेच आपण जर कधी संकटात सापडलो असेल तर ,गणपती बाप्पा हे त्या संकटाला सामोरे जाण्यामध्ये आपली मदत करतात.

कोणत्याही गोष्टीची सुरवात करताना आपण नेहमी गणपती बाप्पांचे नाव घेतो ,यामध्ये अशी मान्यता आहे की ,” आपण जर कोणत्याही कामाची सुरवात करताना गणपती बाप्पांच्या नावाने त्या कामाची सुरवात केली ,तर ते काम करताना त्या कामामध्ये आपल्याला कोणताही अडथळा येत नाही”.

असे म्हणतात की ,”गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंतचे दहा दिवस गणपती बाप्पा हे पृथ्वीवरच असतात”. ते दहा दिवस प्रत्येकांच्या घरात विराजमान असतात आणि प्रत्येक घरातील व्यक्तींची दुःखे ते दूर करत असतात. आपण जर  हे दहा दिवस गणपती बाप्पांची मनोभावे सेवा केली तर ,गणपती बाप्पा आपली इच्छा नक्की पूर्ण करतात.

गणेश चतुर्थी सणाचा इतिहास (History of Ganesh chaturthi festival in Marathi)

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाबाई यांनी आपली हिंदू संस्कृती वाचावी म्हणून गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत चालू केली होती .ते या गणेश चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांची भक्ती करत होते.

पुढे जाऊन पेशव्यांनी देखील ही गणेशोत्सव साजरी करण्याची परंपरा चालू ठेवली. पेशवे गणेश चतुर्थी दिवशी ब्राम्हणांना आनंदाने भोजन घालत ,तसेच ते या सणा वेळी गरजू लोकांना मदत करत होते.

पुढे जेव्हा भारतावर ब्रिटिश सत्तेने राज्य केले ,तेव्हापासून गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत हळू हळू बंद होऊ लागली ; परंतु पुढे जाऊन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सव साजरा करण्याची जुनी पद्धत परत चालू केली. त्यांनी आपल्या समाजातील आणि देशातील लोक एकत्र यावेत म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत चालू केली.

घरामध्ये गणेश चतुर्थी सण साजरा करण्याची पद्धत ( How we celebrate Ganesh chaturthi festival in home in Marathi)

गणेश चतुर्थी हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण आहे. हा सण देशातील विविध राज्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये विराजमान केली जाते. या सणाची सुरवात गणेश चतुर्थीच्या आधी काही होते. देशातील लोक गणपती बाप्पासाठी गणेश चतुर्थीच्या अगोदर काही दिवस आकर्षक अशी सजावट करतात.

गणेश चतुर्थी दिवशी घरी सकाळी घरातली सर्व माणसे लवकर उठतात आणि अंघोळ करतात. घरातील पुरुष मंडळी आणि लहान मुले गणपती बाप्पाला आणण्यासाठी जातात ,घरातील स्त्रिया गणपती बाप्पांसाठी मोदक चा नैवद्य तयार करण्यासाठी लागतात.

घरची पुरुष मंडळी गणपती बाप्पांना जेव्हा घरी घेऊन येतात ,तेव्हा घरातील स्त्रिया गणपती बाप्पांची पूजा करतात आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीला घरामधे विराजमान केले जाते. गणेश चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. गणपती बाप्पांच्या आगमनाने घरातील लहान मुलांपासून ते घरातील म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्व मंडळी खुश असतात.

घरातील मंडळी दहा दिवस घरात विराजमान झालेल्या गणपती बाप्पांची मनोभावे भक्ती करतात. ते दररोज सकाळ अन संध्याकाळ गणपती बाप्पांची आरती करतात ,गणपती बाप्पांना दुर्वा आवडते ,म्हणून दररोज शेतात जाऊन दुर्वा काडून ती दुर्वा ते गणपती बाप्पांना वाहतात. दहा दिवस अगदी घरामध्ये आनंदाचे वातावरण असते. अन् गणपती सणाचे दहा दिवस कसे निघून जातात हे आपल्याला समजत देखील नाही.

शेवटी अनंत चतुर्दशी चा दिवस उजाडतो. ह्या दिवशी गणपती बाप्पा आपल्याला सोडून जाणार म्हणून घरातील सर्व जण दुःखी असतात. दहा दिवस ज्यांची आपण मनोभावे भक्ती केली ,आजच्या दिवशी आपल्याला त्यांचे विसर्जन करावे लागणार म्हणून घरातील सर्वांचे डोळे पाण्याने भरलेले असतात.

शेवटी अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पांचे पाण्यात विसर्जन केले जाते.या दिवशी सगळीकडे ” गणपती बाप्पा मोरया ,अन् पुढच्या वर्षी लवकर या ” चा जयघोष चालू असतो. दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरात राहून अनंत चतुर्दशी दिवशी ते आपला निरोप घेतात आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याची आस सर्वांना लावून जातात.

मंडळामध्ये गणेश चतुर्थी सण साजरा करण्याची पद्धत ( How we celebrate Ganesh chaturthi festival in Manda in Marathi)

गणेश चतूर्थी दिवशी मंडळामध्ये देखील गणपती बाप्पांना विराजमान केले जाते. मंडळातील कार्यकर्ते दिवसरात्र मंडळात विराजमान झालेल्या गणपती बाप्पांची सेवा करत असतात. गणेश चतुर्थी सणाच्या दहा दिवसांपैकी काही दिवशी मंडळामध्ये खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते ,या खेळांच्या स्पर्धेत जे कोणी विजयी झाले आहे त्यांना पारितोषिक दिले जाते.

एके दिवशी मंडळामध्ये सत्यनारायणाची पूजा घातली जाते आणि मंडळातील सर्व व्यक्तींसाठी महाप्रसादाचे नियोजन केले जाते. तसेच अनंत चतुर्दशी दिवशी संपूर्ण गावभर गणपती बाप्पांची मिरवणूक काढली जाते आणि आनंदात गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते.

FAQ

गणेशोत्सव सण कोणत्या तिथीला साजरा केला जातो ?

भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी दिवशी गणेशोत्सव सण साजरा केला जातो. या दिवशी घरात आणि मंडळात गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान केली जाते आणि दहा दिवस घरातील आणि मंडळातील गणपती बाप्पांची सेवा केली जाते. शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते.

गणपती बाप्पा यांचा जन्म केव्हा झाला होता ?

पौराणिक कथांच्या मते गणपती बाप्पा यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी दिवशी झाला होता. याच दिवशी भारतामध्ये दरवर्षी गणेशोत्सव सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो.

गणेशोत्सवाची सुरवात कोणी केली होती ?

गणेशोत्सवाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाबाई यांनी केली होती. त्याकाळी आपल्या भारतभर मुघलांची सत्ता होती .आपली हिंदू संस्कृती टिकून राहावी, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी गणेशोत्सवाची सणाची सुरवात केली होती. पुढे जाणून ब्रिटिशांमुळे ही गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत हळू हकु बंद होऊ लागली होती ; परंतु आपला समाज एकत्र यावा म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा परत चालू केली.

गणपती विसर्जन केव्हा केले जाते ?

गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना घरोघरी केली जाते. घरातील माणसे दहा दिवस गणपती बाप्पांची मनोभावे सेवा करतात. त्यांना दुर्वा वाहतात ,त्यांची आरती करतात ,त्यांना मोदकाचा नैवेद्य दाखवतात. अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते.

आजच्या लेखामध्ये आपण सुखकर्ता आणि दुःखहर्ता असणाऱ्या गणपती बाप्पांच्या गणेश चतुर्थी सणा विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण गणेश चतुर्थी सणाचे महत्व ,गणेश चतुर्थी सणाचा इतिहास ,गणेश चतुर्थी सण घरामध्ये साजरी करण्याच्या पद्धत ,तसेच गणेश चतुर्थी सण मंडळामध्ये साजरी करण्याची पद्धत ,गणेश चतुर्थी सणाविषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment