गॅलिलिओ गैलीली यांची संपूर्ण माहिती Galileo Galilei Information In Marathi

Galileo Galilei Information In Marathi आजच्या लेखामध्ये आपण एका भौतिक  शास्त्रज्ञ ,गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ यांच्या जीवना विषयी आणि त्यांनी केलेल्या संशोधनाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामधून आपण गॅलिलिओ गैलीली यांचे सुरवातीचे जीवन ,गॅलिलिओ गैलीली यांचे करियर ,गॅलिलिओ गैलीली यांनी केलेले वैज्ञानिक प्रयोग, गॅलिलिओ गैलीली यांच्या द्वारे लावण्यात आलेला दूरदर्शक दुर्बिणीचा शोध ,गॅलिलिओ गैलीली यांचे निधन ,गॅलिलिओ गैलीली यांच्या विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे, इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Galileo Galilei Information In Marathi

गॅलिलिओ गैलीली यांची संपूर्ण माहिती Galileo Galilei Information In Marathi

चला तर मग आजच्या लेखाद्वारे “गॅलिलिओ गैलीली” यांच्या जीवना विषयी आणि त्यांनी केलेल्या कार्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

नाव गॅलिलिओ गैलीली
जन्म १५ फेब्रुवारी १५६४
आईचे नाव गिउलिया अमानती
वडिलांचे नाव विन्सौन्जो गैलिली
कार्यक्षेत्र खगोलशास्त्रज्ञ ,भौतिक शास्त्रज्ञ ,गणितज्ञ,इत्यादी.
मृत्यू ८ जानेवारी १६४२

गॅलिलिओ गैलीली यांचे सुरवातीचे जीवन (Early life of Galileo Galilei in Marathi)

गॅलिलिओ गैलीली यांचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ मध्ये इटली देशातील पीसा या शहरात झाला होता. गॅलिलिओ गैलीली यांच्या आईचे नाव “गिउलिया अमानती” असे होते ,तर त्यांच्या वडिलांचे नाव “विन्सौन्जो गैलिली” असे होते. गॅलिलिओ गैलीली यांचे वडील विन्सौन्जो गैलिली हे एक संगीतकार होते. विन्सौन्जो गैलिली हे ल्युट नावाचे वाद्य वाजवत असत.

१५७० मध्ये गॅलिलिओ गैलीली यांचे संपूर्ण कुटुंब फ्लोरेन्स येथे आले. इथेच गॅलिलिओ गैलीली यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले ,तसेच त्यांचे पुढचे शिक्षण पीसा येथील एका विद्यालयात पूर्ण झाले. गॅलिलिओ गैलीली यांना लहानपणापासूनच गणित विषयात आवड होती आणि त्यांना गणित विषय असणाऱ्या क्षेत्रामध्येच आपले करियर करायचे होते.

गॅलिलिओ गैलीली यांच्या वडिलांचा पहिल्यांदा या गोष्टीला नकार होता ; परंतु गॅलिलिओ गैलीली यांनी आपले करियर गणित विषयात करण्याचा निर्णय घेतला होता.

गॅलिलिओ गैलीली यांचे करियर (Career of Galileo Galilei in Marathi)

गॅलिलिओ गैलीली यांना गणित विषयाची आवड लहानपणापासूनच होती ,तसेच त्यांना दुसऱ्यांना शिकवण्याचे कौशल्य देखील प्राप्त होते. त्यामुळे त्यांनी पुढे जाऊन १५८१ मध्ये एका कॉलेज मध्ये “अरिस्टोटेलियन दर्शन” हा विषय शिकवण्यास सुरवात केली.

गॅलिलिओ गैलीली यांनी आपले ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण देखील केले नाही आणि त्यांनी त्यांचे शिक्षण मध्येच सोडले. पुढे त्यांनी आपला संपूर्ण वेळ शिकवण्यामधे आणि संशोधन करण्यामध्ये घालवण्याचे ठरवले.

१५८८ मध्ये त्यांनी फ्लोरेंस येथील एका विद्यालयात गणित विषयाच्या प्रोफेसर ची नोकरी केली ,तसेच त्यांनी पुढे जाऊन १५९२ मध्ये पादूआ विश्वविद्यालयात “खगोलशास्त्र” विषयामध्ये प्रोफेसरची नोकरी केली आणि त्यांनी या विश्वविद्यालयात १६१० पर्यंत प्रोफेसर ची नोकरी केली. इथेच त्यांनी आपला बऱ्यापैकी वेळ हा संशोधन करण्यामध्ये खर्च केला.

गॅलिलिओ गैलीली यांनी केलेले वैज्ञानिक प्रयोग (Scientific experiments by Galileo Galilei in Marathi)

“प्रकाशाचा वेग किती आहे ?” ,हे आज आपल्या सर्वांना माहीत आहे ; परंतु तुम्हाला हे माहीत आहे का ,“प्रकाशाचा वेग किती आहे याचा शोध लावण्याचा पहिला प्रयोग कोणी केला होता ?”.तर ह्याचे उत्तरे हे की ,“प्रकाशाचा वेग किती आहे याचा पहिला प्रयोग गॅलिलिओ गैलीली यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्याने केला होता”.

या प्रयोगामध्ये ते आणि त्यांचे सहकारी रात्रीच्या अंधारामध्ये दोन वेगळ्या पर्वतावर कंदील घेऊन गेले होते. एका पर्वतावर कंदील घेऊन गॅलिलिओ गैलीली उभे होते ,तर दुसऱ्या पर्वतावर गॅलिलिओ गैलीली यांचे सहकारी कंदील घेऊन उभे होते.

तर त्यांनी असे ठरवले होते की ,“जेव्हा गॅलिलिओ गैलीली यांच्या कंदीलाचा प्रकाश त्यांच्या सहकाऱ्याला दिसेल तेव्हा त्याने तो वेळ नमूद करून ठेवायचा.” त्यांचा हा प्रयोग करून झाला. गॅलिलिओ गैलीली यांना त्या दोन्ही पर्वतामधील अंतर आधीपासूनच माहीत होते ,त्यामुळे त्यांनी प्रकाशाचा वेग किती असेल याचा अंदाज या प्रयोगावरून लावला.

त्यांनी हा वरील प्रयोग पुन्हा करायचे ठरवले आणि ह्यावेळी त्यांनी दोन पर्वतामधील अंतर हे पहिल्या प्रयोगावेळी घेतलेल्या दोन पर्वताच्या अंतरापेक्षा जास्त घेतले. त्यांनी पहिल्या प्रयोगाची प्रक्रिया पुन्हा दुसऱ्या प्रयोगावेळी केली. या दुसऱ्या प्रयोगावरून त्यांनी हा निष्कर्ष लावला की ,“ह्या प्रयोगाद्वारे आपण योग्य रित्या प्रकाशाच्या गतीचा शोध लावू शकत नाही”.

गॅलिलिओ गैलीली यांच्या द्वारे दूरदर्शक दुर्बिणीचा शोध (Invention of the telescope by Galileo Galilei in Marathi)

१६०८ मध्ये हॉलंड मध्ये दूरदर्शक दुर्बिणीचा शोध लागला होता. ह्या शोधाची माहिती जेव्हा गॅलिलिओ गैलीली यांना कळली तेव्हा, त्यांनी स्वतःची आणि हॉलंड मध्ये प्रदर्शित केलेल्या दूरदर्शक दुर्बिणीपेक्षा शक्तिशाली दूरदर्शक दुर्बीण बनवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली आणि अखेर गॅलिलिओ गैलीली यांनी २५ ऑगस्ट १६०९ मध्ये आपली स्वतःची दूरदर्शक दुर्बीण प्रदर्शित केली.

गॅलिलिओ गैलीली यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये २०० पेक्षा जास्त दूरदर्शक दुर्बिणीचा शोध लावला होता आणि त्या सर्व दूरदर्शक दुर्बीण त्यांनी शैक्षणिक संस्थांना भेट म्हणून दिल्या होत्या.

गॅलिलिओ गैलीली यांचे निधन (Death of Galileo Galilei in Marathi)

गॅलिलिओ गैलीली हे एक थोर खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये विविध शोध लावले. बृहस्पति ग्रहावर असणाऱ्या चार उपग्रहांचा शोध देखील गॅलिलिओ गैलीली यांनी लावला होता. अशा या थोर गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ “गॅलिलिओ गैलीली” यांचे निधन वयाच्या ७७ व्या वर्षी ८ जानेवारी १६४२ मध्ये झाले.

FAQ

गॅलिलिओ गैलीली यांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला होता ?

गॅलिलिओ गैलीली यांचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ मध्ये इटली देशातील पीसा या शहरात झाला होता.

गॅलिलिओ गैलीली हे कोण होते ?

गॅलिलिओ गैलीली हे एक थोर शास्त्रज्ञ,खगोलशास्त्रज्ञ ,भौतिक विज्ञान तज्ञ होते.

गॅलिलिओ गैलीली यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

गॅलिलिओ गैलीली यांच्या वडिलांचे नाव “विन्सौन्जो गैलिली” असे होते.

गॅलिलिओ गैलीली यांच्या आईचे नाव काय होते ?

गॅलिलिओ गैलीली यांच्या आईचे नाव “गिउलिया अमानती” असे होते.

गॅलिलिओ गैलीली यांचे शिक्षण कोणत्या विद्यापीठातून झाले होते ?

गॅलिलिओ गैलीली यांचे शिक्षण “पीसा विद्यापीठातून” झाले होते.

गॅलिलिओ गैलीली हे कोठे नोकरी करत होते ?

गॅलिलिओ गैलीली हे “पादूआ विद्यापीठात” गणित विषयाचे प्रोफेसर म्हणून नोकरी करत होते.

गॅलिलिओ गैलीली यांना किती मुले होती ?

गॅलिलिओ गैलीली यांना दोन मुली होत्या, तर त्यांना एक मुलगा होता.

गॅलिलिओ गैलीली यांनी आपल्या आयुष्यभर कोणते कार्य केले ?

गॅलिलिओ गैलीली हे एक थोर खगोलशास्त्रज्ञ होते. प्रकाशाची गती मोजण्यासाठीचा पाहिला प्रयोग हा गॅलिलिओ गैलीली आणि त्यांच्या सहकाऱ्याने केला होता. तसेच गॅलिलिओ गैलीली यांनी बृहस्पति ग्रहाच्या ४ उपग्रहांचा देखील शोध लावला होता.

गॅलिलिओ गैलीली यांचे निधन केव्हा झाले ?

गॅलिलिओ गैलीली यांनी भौतिक विज्ञान आणि खगोल क्षेत्रात बरेच संशोधन केले आहेत. अशा या थोर खगोलशास्त्रज्ञाचे निधन वयाच्या ७७ व्या वर्षी ८ जानेवारी १६४२ मध्ये झाले.

आजच्या लेखामध्ये आपण एका थोर गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गैलीली यांच्या जीवना विषयी आणि त्यांनी केलेल्या कार्याविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण गॅलिलिओ गैलीली यांचे सुरवातीचे जीवन ,गॅलिलिओ गैलीली यांचे करियर ,गॅलिलिओ गैलीली यांनी केलेले वैज्ञानिक प्रयोग,गॅलिलिओ गैलीली यांच्या द्वारे लावण्यात आलेला दूरदर्शक दुर्बिणीचा शोध ,गॅलिलिओ गैलीली यांचे निधन ,गॅलिलिओ गैलीली यांच्या विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे, इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment