बदक पक्षाची संपूर्ण माहिती Duck Bird Information In Marathi

Duck Bird Information In Marathii जगामध्ये विविध प्रजातीचे पशु – पक्षी आढळले जातात आणि ते प्रत्येक पशु – पक्षी आपल्या निसर्गाची शोभा वाढवत असतात. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका पक्ष्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे “बदक” या पक्ष्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Duck Bird Information In Marathi

बदक पक्षाची संपूर्ण माहिती Duck Bird Information In Marathi

पक्ष्याचे नाव बदक
संघ रज्जूकी
प्रजाती ४० पेक्षा जास्त
प्रकार १) गोड्या पाण्यातील बदक २) समुद्रातील खारट पाण्यातील बदक
इंग्रजी शब्द डक

बदक (Duck bird in Marathi)

बदक हा एक जलीय पक्षी आहे आणि बदक पक्ष्याचे दोन प्रकार पडतात. पहिल्या प्रकारातील बदक हे समुद्रातील खारट पाण्यामध्ये राहतात ,तर दुसऱ्या प्रकारातील बदक हे गोड्या पाण्यामध्ये राहतात. बदकाचे पाय हे पाण्यावर तरंगण्यामध्ये बदकाची मदत करतात ,तर त्याचे पंख हे कधीच ओले होत नाहीत. जगामध्ये अंटार्टिका खंड सोडला तर इतर सर्व खंडामध्ये बदकाच्या प्रजाती आढळल्या जातात. बदकांच्या काही प्रजाती झाडावर देखील बसतात.

आपण खूप ठिकाणी बदकांचा आवाज ऐकला असेल. बदक “क्वेक – क्वेक” असा आवाज करतात. काही लोकांना पदक पाळण्याचा देखील छंद असतो. ते बदकाला कृत्रिम तलावामध्ये ठेवतात. भारतामध्ये काही ठिकाणी बदकाचे मांस विकले जाते. बदकाचे मांस खूप लोकांद्वारे पसंद केले जाते. बदकाच्या अंड्यामध्ये देखील भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात ,त्यामुळे बदकांच्या अंड्यांना सध्याच्या मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे.

संपूर्ण जगामध्ये ४० पेक्षा जास्त बदकांच्या प्रजाती आढळतात. मादी बदक एका वर्षामध्ये ३०० पर्यंत अंडी देऊ शकते आणि या अंड्यातून २८ दिवसाच्या आत नवीन बदक जन्म घेते. बदक हे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे भोजन ग्रहण करू शकतात. ते पाण्यातील माश्यांना देखील खातात तर ,पाण्यामध्ये असलेल्या झाडांना व वेलांना देखील ते खातात.

बदकांचा जीवन काळ हा साधारण ८ ते १० वर्षांचा असतो. बदकांच्या काही प्रजाती १० वर्षापेक्षा जास्त काळ देखील जगतात. बदकांचे अंडे भारी भक्कम असते आणि त्या अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वांचा देखील समावेश असतो.

बदकांचे वर्णन (Description of Ducks in Marathi)

जगभरातील विविध देशामध्ये बदक पक्षी हा वेगवेगळ्या रंगामध्ये आढळला जातो ; परंतु जास्तकरून बदक हे आपल्याला पांढऱ्या रंगामध्ये पाहायला मिळतात. बदक हे दिसताना खूप आकर्षक दिसतात. बदकांचे पंख हे जाळीदार असतात आणि त्यांचे पंख त्यांना पाण्यावर पोहण्यामध्ये त्यांची मदत करतात. बदकांची चोच ही चपटी असते.

बदकांचे प्रकार (Types of Ducks in Marathi)

बदकांचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे समुद्रातील खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे बदक आणि दुसरा प्रकार म्हणजे तलाव सारख्या गोड्या पाण्यामध्ये राहणारे बदक. समुद्रातील गोड्या पाण्यात राहणाऱ्या बदकांचा जीवन काळ हा गोड्या पाण्यात राहणाऱ्या बदकांच्या जीवन काळापेक्षा जास्त असतो. समुद्रातील बदक हे समुद्रामध्ये खूप दूरवर प्रवास करू शकतात.

बदक पालन व्यवसाय (Ducks breeding business in Marathi)

आपला भारत देश हा एक कृषी प्रधान देश आहे आणि आपल्या देशामधील ग्रामीण भागातील बऱ्यापैकी लोक हे शेती करून आपला उदरनिर्वाह करत असतात. काही शेतकरी शेती व्यतिरिक्त इतर व्यवसाय देखील करतात ,ज्यामध्ये पशुपालनाचा समावेश आहे. शेतकरी पशुपालन व्यवसायामध्ये मत्स्यपालन , कुकुटपालन , गायी – म्हशी पालन इत्यादी व्यवसायांचा समावेश आहे. या पशुपालन व्यवसायामध्ये बदक पालनाचा देखील समावेश आहे.

वर्तमानात देशामध्ये बदक पालन करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. देशामध्ये बरेच लोक कुकुटपालन करतात ; परंतु खूप कमी लोक हे बदक पालन करतात. कोंबडीच्या अंड्याच्या तुलनेत बदकाच्या अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात ,तसेच बदकाच्या मांसामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात आणि बदक पालन करणाऱ्यांची संख्या देखील कमी आहे.

भारतामध्ये पशुपालन करणाऱ्या लोकांपैकी १०% च लोक हे बदक पालन व्यवसाय करतात. त्यामुळे वाढत्या बदकांच्या अंड्याच्या डिमांड मुळे आणि हा व्यवसाय कमी लोक करत असल्यामुळे आपण जर हा बदक पालनाचा व्यवसाय केला तर ,त्याचा आपल्याला भविष्यात नक्की फायदा होईल. मादी बदक हे वर्षातून ३०० च्या आसपास अंडी देतात ,त्यामुळे आपण जर बदक पालन हा व्यवसाय केला तर आपल्याला त्याचा फायदा नक्की होईल.

बदक पक्ष्या विषयी १० रोचक गोष्टी (10 Interesting Facts about Ducks in Marathi)

१) बदकाचा जीवन काळ हा ८ ते १० वर्षांचा असतो.

२) बदक मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही प्रकारचे भोजन ग्रहण करू शकतात. बदक पाण्यातील मासे खाऊन आपला उदरनिर्वाह करतात तर ,बदक पाण्यात असणारी वेल देखील खाऊ शकतात.

३) बदक हे पाण्यामध्ये राहतात त्यामुळे त्यांना “जलीय पक्षी” असे देखील म्हणले जाते.

४) बदकाचे पंख हे कधीच ओले होत नाहीत ,त्यामुळे बदक हे थंड पाण्यामध्ये देखील राहू शकतात.

५) बदकाची “डब्लिंग प्रजाती” ही बऱ्यापैकी संपूर्ण जगामध्ये सर्वत्र आढळते आणि ही डब्लिंग नावाची प्रजाती पाण्या सोबत जमिनीवर देखील अन्नाची खोज करते.

६) बदक हे हंस पक्ष्यासारखे दिसतात ; परंतु बदकाची मान ही हंस पक्ष्याच्या तुलनेत खूप छोटी असते.

७) बदकाचे पंख हे जाळीदार असतात ,त्यामुळे त्यांच्या पंखामध्ये कधीच पाणी शिरत नाही.

८) जगामध्ये भरपूर लोक बदकाचे मांस खातात आणि बदकाचे मांस हे पोष्टिक देखील असते. तसेच बदकाच्या अंड्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पोषक तत्वांचा समावेश असतो ,त्यामुळे जगामध्ये बदकाची अंडी देखील मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात.

९) संपूर्ण जगामध्ये ४० पेक्षा जास्त बदकाच्या प्रजाती आढळतात.

१०) मादी बदक हे एका वर्षामध्ये २५० ते ३०० अंडी देऊ शकतात आणि दिलेल्या अंड्या मधून २८ दिवसाच्या आत छोटे बदक बाहेर पडतात.

FAQ

संपूर्ण जगामध्ये बदकाच्या किती प्रजाती आढळल्या जातात ?

संपूर्ण जगामध्ये ४० पेक्षा जास्त बदकाच्या प्रजाती आढळल्या जातात.

बदकाचे किती प्रकार पडतात आणि ते दोन प्रकार कोणते ?

बदकाचे दोन प्रकार पडतात. त्यातील पहिल्या प्रकारातील बदक हे गोड्या पाण्यामध्ये राहतात ,तर दुसऱ्या प्रकारातील बदक हे समुद्रातील खारट पाण्यामध्ये राहतात.

बदकांचा जीवन काळ हा किती वर्षांचा असतो ?

बदकांचा जीवन काळ हा साधारण ८ ते १० वर्षे इतका असतो. काही बदकांच्या प्रजाती १० वर्षा पेक्षा जास्त काळ देखील जगतात.

मादी बदक एका वर्षामध्ये किती अंडी देते ?

मादी बदक हे एका वर्षामध्ये साधारण २५० ते ३०० इतकी अंडी देते.

बदक हा शाकाहारी पक्षी आहे का मांसाहारी पक्षी आहे ?

बदक ते शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे अन्न खातात. बदक हे पाण्यातील मासे खातात ,तसेच ते पाण्यामधील पाला पाचोळा खाऊन देखील आपला उदरनिर्वाह करत असतात.

बदक हे कोणत्या संघाचे पक्षी आहेत ?

बदक हे “रज्जुकी” या संघाचे पक्षी आहेत.

बदक पालन हा व्यवसाय चालू केला तर तो फायद्याचा ठरेल का ?

हो ,आपण बदक पालन हा व्यवसाय चालू केला तर तो भविष्यात नक्की फायद्याचा ठरेल. आपल्या देशामध्ये बऱ्यापैकी लोक कुकुटपालन करतात. आपल्या देशामध्ये बदक पालन व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्या कुकुटपालन करणाऱ्या लोकांपेक्षा खूप कमी आहे. कोंबडीच्या अंड्याच्या तुलनेत बदकाच्या अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात आणि सध्या मार्केट मध्ये बदकांच्या अंड्याचे डिमांड देखील वाढले आहे ,त्यामुळे बदक पालन हा व्यवसाय करणे नक्कीच फायद्याचे ठरेल.

आजच्या लेखामध्ये आपण बदक या पक्ष्याविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण बदकांचे वर्णन , बदकांचे प्रकार ,बदक पालन व्यवसाय, बदक पक्ष्याविषयी असणाऱ्या काही रोचक गोष्टी, बदक पक्ष्याविषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment