डॉ. होमी भाभा यांची संपूर्ण माहिती Dr. Homi Bhabha Information In Marathi

Dr. Homi Bhabha Information In Marathi आपल्या भारत देशामध्ये भरपूर थोर वैज्ञानिक होऊन गेले आणि त्या प्रत्येक वैज्ञानिकांनी विविध क्षेत्रात विविध शोध लावले. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका थोर वैज्ञानिकाच्या जीवनाविषयी म्हणजे डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे थोर वैज्ञानिक डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांच्या जीवना विषयी आणि त्यांनी केलेल्या कार्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Dr. Homi Bhabha Information In Marathi

डॉ. होमी भाभा यांची संपूर्ण माहिती Dr. Homi Bhabha Information In Marathi

नाव डॉक्टर होमी जहांगीर भाभा
जन्म ३० ऑक्टोंबर १९०९
आईचे नाव मेहराबाई भाभा
वडिलांचे नाव जहांगीर भाभा
क्षेत्र वैज्ञानिक
पुरस्कार ऍडम्स (१९४२) पद्म भूषण (१९५४)
मृत्यू २४ जानेवारी १९६६

डॉक्टर होमी भाभा ( Doctor Homi bhabha in Marathi)

डॉक्टर होमी जहांगीर भाभा हे देशातील प्रमुख वैज्ञानिकांपैकी एक वैज्ञानिक आहेत. त्यांनी १९४४ मध्ये कमी सहकाऱ्यांच्या मदतीने अनु ऊर्जेवर अनुसंधान ची निर्मिती केली होती.

ज्याकाळी लोकांना अनु उर्जे विषयीचे जास्त ज्ञान न्हवते ,त्याकाळी डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी अनु ऊर्जेच्या सहायाने विविध शोध लावले होते. त्याकाळी अनु ऊर्जेतून विद्युत निर्मिती होते ,हे कोणीही मानायला तयार नव्हते. डॉक्टर होमी जहांगीर भाभा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळवून अनु उर्जेतून विद्युत उत्पादनाची निर्मिती केली होती.

होमी जहांगीर भाभा यांचा जन्म आणि त्यांचे सुरवातीचे जीवन ( birth of doctor Homi bhabha and his early life in Marathi )

डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोंबर १९०९ साली मुंबई येथील एका श्रीमंत पारसी कुटुंबात झाला. होमी भाभा यांच्या वडिलांचे नाव “जहांगीर होर्मुसजी” होते ,तर त्यांच्या आईचे नाव ” मेहरबाई” होते. डॉक्टर होमी भाभा यांचे वडील एक वकील होते.

होमी भाभा यांना लहानपणी संगीताची आवड होती. त्यांना वायोलीन आणि पियानो वाजवायचे शिक्षण देखील देण्यात आले होते. डॉक्टर होमी भाभा यांना चित्रकलेची देखील आवड होती. त्याकाळी मुंबई मध्ये आयोजित केलेल्या प्रसिद्ध चित्रकला स्पर्धेत डॉक्टर होमी भाभा यांना दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते.

त्याकाळचे टाटा समूहाचे अध्यक्ष दोराबजी टाटा हे होमी भाभा यांचे काका होते ,त्यामुळे होमी भाभा लहानपणी सतत दोराबजी टाटा यांच्या घरी जात असत.दोराबजी टाटा यांच्या घरी महात्मा गांधी आणि मोतीलाल नेहरू येत असत. होमी भाभा त्यांच्या काकांची आणि या स्वातंत्र्य सेनानिंचे संभाषण ऐकत असत.

डॉक्टर होमी भाभा यांचे शिक्षण ( Education of Doctor Homi bhabha in Marathi )

डॉक्टर होमी भाभा यांना लहापणापासूनच विज्ञान आणि गणित विषयात आवड होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई येथील जॉन कॉनल शाळेत झाले होते. पुढे त्यांनी रॉयल इन्स्टिट्युट ऑफ सायन्स मधून “बॅचलर ऑफ सायन्स” चे शिक्षण पूर्ण केले. होमी भाभा यांनी पुढे जाऊन इंग्लंड मधील केंब्रिज विद्यापीठात मेकॅनिकल इंजिनिअर चे शिक्षण घेतले .१९३४ मध्ये होमी भाभा यांनी डॉक्टरेट ची पदवी प्राप्त केली.

डॉक्टर होमी भाभा यांचा पहिला रिसर्च पेपर ( First Research paper of Doctor Homi bhabha in Marathi)

डॉक्टर होमी भाभा यांनी जर्मनी मध्ये जाऊन  कोस्मिक किरणांवर अध्ययन केले. तसेच पुढे जाऊन त्यांनी डॉक्टरेट ची पदवी मिळवायच्या एक वर्ष अगोदर म्हणजे १९३३ मध्ये आपला पाहिला रिसर्च पेपर प्रदर्शित केला आणि याला त्यांनी ” द ऑब्जरवेशन ऑफ कोस्मिक रेडीएशन” असे नाव दिले. या रिसर्च पेपर मुळे वर्ष १९३४ मध्ये डॉक्टर होमी भाभा यांना ” आइजैक न्यूटन यांची स्टूडेंट शिप देखील मिळाली .

डॉक्टर होमी भाभा यांचे कार्य ( work of Doctor Homi bhabha in Marathi)

आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्ष १९३९ मध्ये डॉक्टर होमी भाभा भारतात परत आले ,पुढे जाऊन ते भारतातील बँगलोर मधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधे नोकरी करू लागले .इथे त्यांनी कॉस्मिक किरणांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला. डॉक्टर होमी भाभा यांना वर्ष १९४१ मध्ये रॉयल सोसायटी चे सदस्यत्व मिळाले.

डॉक्टर होमी भाभा यांच्या कार्यावर प्रभावित होऊन त्यांना वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी १९४४ मध्ये प्रोफेसर करण्यात आले होते. डॉक्टर होमी भाभा हे त्यांच्या कॉस्मिक किरणांच्या अभ्यासामुळे देशभर प्रसिद्ध होऊ लागले. डॉक्टर होमी भाभा यांच्या कामावर प्रभावित होऊन थोर वैज्ञानिक आणि नोबेल पुरस्कार विजेते “सी.वी. रमन” हे डॉक्टर होमी भाभा यांना ” भारताचे लीयोनार्डो डी विंची” म्हणून हाक मारत.

१९४८ मध्ये डॉक्टर होमी भाभा यांनी परमाणू आयोगाची स्थापना केली आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर होमी भाभा यांची परमाणू कार्यक्रमाच्या निर्देशक पदी निवड केली. ह्या परमाणू कार्यक्रमामध्ये परमाणू हत्यारे तयार करण्याचे काम डॉक्टर होमी भाभा यांच्याकडे सोपवले होते.

१९५० मध्ये डॉक्टर होमी भाभा यांनी “IAEA” संमेलनाचे प्रतिनिधित्व केले आणि १९६० ते १९६३ च्या दरम्यान डॉक्टर होमी भाभा हे “इंटर नॅशनल युनियन ऑफ प्यूर अँड अपलाइड फिजिक्स “चे अध्यक्ष होते.

“टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च” ची स्थापना ( Establishing Tata institute of fundamental research in Marathi )

१९४३ मध्ये डॉक्टर होमी भाभा यांची निवड राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या भौतिक विभागाच्या अध्यक्ष पदी झाली. डॉक्टर होमी भाभा यांनी काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांना देशामध्ये परमाणू कार्यक्रम करण्यासाठी विनंती केली. त्यांनी जेआरडी टाटांच्या मदतीने मुंबई मध्ये “टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च” ची स्थापना केली.

डॉक्टर होमी भाभा यांना त्यांच्या कार्यासाठी मिळालेले पुरस्कार ( Awards received by Doctor Homi bhabha in Marathi )

डॉक्टर होमी भाभा यांना त्यांच्या कार्यासाठी भरपूर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. डॉक्टर होमी भाभा यांना १९४२ मध्ये केंब्रिज विद्यापीठात “एडम्स पुरस्कार देण्यात आला होता. भारत सरकारकडून डॉक्टर होमी भाभा यांचा सन्मान म्हणून १९५४ मध्ये त्यांना पद्म भूषण हा पुरस्कार देण्यात आला होता. डॉक्टर होमी भाभा यांनी भौतिक क्षेत्रात केलेल्या शोधांमुळे त्यांचे नोबेल पुरस्कारामध्ये नामांकन करण्यात आले होते.

डॉक्टर होमी भाभा यांचे निधन ( Death of Doctor Homi bhabha in Marathi )

डॉक्टर होमी भाभा यांनी आपले संपूर्ण आयुष्य भौतिक क्षेत्रात संशोधन करण्यासाठी खर्च केले. डॉक्टर होमी भाभा यांचे निधन २४ जानेवारी १९६६ मध्ये एका विमान अपघातात झाले.

डॉक्टर होमी भाभा यांच्या निधनानंतर त्यांचा सन्मान म्हणून मुंबई येथील परमाणू अनुसंसाधनाचे नाव बदलून ” डॉक्टर होमी भाभा परमाणू अणुसंसाधन” असे करण्यात आले होते.

FAQ

डॉक्टर होमी भाभा यांचा जन्म केव्हा झाला ?

डॉक्टर होमी भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोंबर १९०९ मध्ये मुंबई येथे झाला.

डॉक्टर होमी भाभा यांच्या आईचे नाव काय होते ?

डॉक्टर होमी भाभा यांच्या आईचे नाव “मेहराबाई भाभा” असे होते.

डॉक्टर होमी भाभा यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

डॉक्टर होमी भाभा यांच्या वडिलांचे नाव “जहांगीर भाभा” असे होते.

डॉक्टर होमी भाभा यांनी कोणत्या क्षेत्रात संशोधन केले ?

डॉक्टर होमी भाभा यांनी भौतिक आणि कॉस्मीक रेडीएशन क्षेत्रात संशोधन केले.

डॉक्टर होमी भाभा यांना त्यांच्या कार्यासाठी कोणते पुरस्कार मिळाले आहेत ?

डॉक्टर होमी भाभा यांच्या कार्यासाठी त्यांचा भारत सरकारकडून ” पद्म भूषण” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.

डॉक्टर होमी भाभा यांचे निधन केव्हा झाले ?

डॉक्टर होमी भाभा यांचे निधन २४ जानेवारी १९६६ मध्ये एका विमान अपघातात झाले.

आजच्या लेखामध्ये आपण थोर वैज्ञानिक आणि भारताच्या परमाणू कार्यक्रमाचे जनक मानले जाणाऱ्या डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांच्या जीवना विषयी आणि त्यांनी केलेल्या संशोधना विषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment