डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi

Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक महान पुरुषानंपैकी एक महान पुरुष म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारताचे पहिले कायदामंत्री, अस्पृश्यांचे कैवारू म्हणून ज्यांची ओळख आहे. आंबेडकरांना फक्त भारतातच नाही तर बाहेरच्या देशातही ओळखतात.

Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi

पुर्ण नावभीमराव रामजी आंबेडकर
जन्म14 एप्रिल 1891 मध्यप्रदेश,भारत
आईभीमाबाई सपकाळ
वडीलरामजी सपकाळ
पत्नीरमाबाई आंबेडकर (विवाह 1906 – निधन 1935)   सविता आंबेडकर (विवाह 1947 – निधन 2003)
अपत्ययशवंत आंबेडकर
धर्मबौध्द धर्म
राष्ट्रीयत्वभारतीय
शिक्षणमुंबई विद्यापीठ कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनमिक्स ग्रेज इन, लंडन बॉन विद्यापीठ, जर्मनी
महत्वाचे कारभारराज्यसभेचे सदस्य (मुंबई राज्य) (3 एप्रिल 1952 – 6 डिसेंबर 1956)   भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री (15 ऑगस्ट 1947 – 6 ऑक्टोंबर 1951)   संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष (30 ऑगस्ट 1947 – 24 जानेवारी 1950)   भारतीय संविधान सभेचे सदस्य (9 डिसेंबर 1946 – 24 जानेवारी 1950)
मृत्यू6 डिसेंबर 1956 (वय 65) दिल्ली,भारत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण || Childhood information of Dr.Babasaheb Ambedkar in marathi :

बाबासाहेब हे भीमाबाईचे 16 वे अपत्य होते.बाबासाहेबांच्या बालपणीच त्यांच्या आईचे निधन झाले.तस त्यांचे नाव “भीम” म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर ठेवण्यात आले होते.पण नंतर ते सर्वांचे बाबासाहेब झाले.त्यांना सांभाळ त्यांच्या आत्या मीराबाईनीं केला.बाबासाहेबांचे वडील रामजी सपकाळ यांना नेहमी वाटायचे हा भीम हुशार व्ह्यावा, याने

दीन-दलितांची सेवा करावी.त्यासाठी त्यांची त्याच्यावर चांगले मूल्यसंस्कार रुजवले. बाबासाहेबांनी याच पालन केल.याचेच फळं म्हणजे हाच भीम नंतर दलीतांचा कैवारू ,भारतीय राज्यघटनेचा निर्माता झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण || Educational information of Dr.Babasaheb Ambedkar in marathi:

बाबासाहेब लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते.पण दलीत असल्यामुळे त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला.त्यांचे शालेय शिक्षण सातारा येथे झाले. एल्फिन्स्टन हायस्कूल,(बाँबे) येथून त्यांनी मॅट्रिक चे शिक्षण पूर्ण केले.

बाबासाहेबांनी 1912 साली पदवीचे शिक्षण पूर्ण करून अर्थशास्त्राची पदवी घेतली. बाबासाहेब दिवसाचे 18 तास अभ्यास करत. पुढे त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथून त्यांनी इतिहास, समाजशास्त्र, तत्वज्ञान या विषयांत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून Ph.d ची डिग्री संपादन केली.

नंतर लंडनला गेल्यावर अर्थशास्त्र आणि राजकारणात पदव्युत्तर पदवी घेतली. बाबासाहेबांनी इ.स.1927 मध्ये कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. बाबासाहेबांना वाचनाचे प्रचंड वेड होते. त्यांच्या लायब्ररीत 50 हजारांहून जास्त पुस्तके होती आणि ती त्यावेळेची जगातील सर्वात होती लायब्ररी होती.

परदेशामधून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट पदवी मिळवणारे आंबेडकर हे पहिले भारतीय होते. तसेच दक्षिण आशिया खंडातून दोनदा डॉक्टरेट पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई ठरले.डॉ. बाबासाहेब हे त्यांच्या हायातीतील सर्वाधिक उच्च विद्ाविभूषित व्यक्ती मानले जात होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वैवाहिक जीवन || Information about married life of Dr.Babasaheb Ambedkar:

1906 मध्ये बाबासाहेबांचे लग्न दापोलीच्या रमाबाई यांच्याशी झाले.भीमरावांनी त्यांना लिहायला ,वाचायला शिकवले.बाबासाहेब आणि रमाबाइंना एकूण 5 अपत्ये झाली.पण पाहिलं अपत्य यशवंतखेरीज बाकीचे बालपणीच मरण पावले. दीर्घ आजारपणामुळे रमाबाईंचे इ.स. 1935 मध्ये निधन झाले.

इ.स. 1940 मध्ये बाबासाहेब खूप आजारी पडले.तेव्हा ते उपचारासाठी मुंबईला गेले असताना त्यांनी ओळख डॉ. शारदा कबीर यांच्याशी झाली आणि पुढे बाबासाहेबांनी 15 एप्रिल 1948 रोजी शारदा कबिरांशी नोंदणी पद्धतीने विवाह केला. लग्नानंतर शारदा कबिरांनी “सविता” हे नाव स्वीकारले. सविता आणि बाबसाहेबांना अपत्य नव्हते. बाबासाहेबांचे अनुयायी सविता आंबेडकरांना आदराने माईसाहेब म्हणत. पुढे 2003 मध्ये वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईत निधन झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय कारकीर्द || Information about political career of Dr.Babasaheb Ambedkar in marathi:

इ. स. 1926 पासून बाबासाहेबांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. डिसेंबर 1926 मध्ये ते मुंबई विधान सभेचे सदस्य झाले. यादरम्यान त्यांनी अनेक आर्थिक विषयांवर भाषणे दिली.1936 पर्यंत ते मुंबई विधान सभेचेसदस्य होते.त्यांनी काही काळ विरोधी पक्षनेते म्हणून पण काम केले.1935 मध्ये बाबासाहेबाना शासकीय विधी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून नियुक्त केले.या पदाचा कारभार त्यांनी 2 वर्ष सांभाळला.

पुढे त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आणि 1937 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकून 1942 पर्यंत विधानसभेचे सदस्य राहिले. इ.स. 1942 मध्ये बाबासाहेबांनी दलीत समाजाच्या हक्कासाठी ऑल “इंडिया scheduled कास्टस फेडरेशन” ही एक सामाजिक – राजकीय  संघटना स्थापन केली. 1942 ते 1946 पर्यंत बाबासाहेबांनी कामगार मंत्री म्हणून काम केले.

भारताच्या स्वतंत्रलढ्यातही बाबासाहेबांचा सहभाग होता.1952 साली बाबासाहेबांनी आपली पहिली लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यात त्यांचा पराभव झाला.दुसऱ्या लोकसभा निवडणूकीपर्यंत बाबासाहेबांचे निधन झाले होते. बाबासाहेब दोनदा भारतीय संविधान सभेचे सदस्य बनले.

बाबासाहेबांनी इ. स.1956 मध्ये “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” बरखास्त करून “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया” स्थापन करण्याची घोषणा केली. पण हा पक्ष स्थापन होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक कार्य || Social Work of Dr. Babasaheb Ambedkar:

बाबासाहेबांच वाचन अफाट होत. त्यांना कळून चुकले होते की ज्ञानामुळेच एक व्यक्ती, समाज,राज्य,राष्ट्राची प्रगती होऊ शकते.त्यांनी सर्वसामान्य माणसाला जागं केल. त्याला आत्मसन्मान, स्वाभिमान व स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. गुलगिरीतून मुक्त करून हक्काने जगायले शिकवले. समाजात समता आणि न्याय निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक सत्याग्रह केलेत.

भारताच्या नव्या उभारणीत बाबासाहेबांचा खूप मोठा आणि मोलाचा वाटा आहे. त्यांनी आदर्श समाज निर्माण करण्याकरिता लोकशाही शासनाचा स्वीकार केला.ही एक राजकीय लोकशाही असली तरी याच रुपांतर एक सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत व्हाव अस त्यांना नेहमी वाटायचं.

बाबासाहेबांनी भारताला पुढील काळात सर्वांगीण विकास करता येईल अशी राष्ट्राला राज्यघटना दिली. बाबासाहेबांनी भारताला “संविधान” दिलं.त्यांनी अनुयायांना “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” असा संदेश दिला. त्यांच्या महान कार्यामुळे इ.स. 1990 मध्ये राष्ट्रीय सन्मान “भारतरत्न” हा देशाचा सर्वोच् नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महपरिनिर्वाण: Information of mahaparinirvan of Dr.Babasaheb Ambedkar in marathi.

6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे निधन झाले. भारतीयांवर दुःखाचा डोंगर पसरला.भारताचा महामानव गेला. दुसऱ्या दिवशी मुंबईतील चैत्यभूमीत बाबासाहेबांवर बौध्द पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी बाबासाहेबांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी आपल्या अनुयायांसह बौध्द धर्म स्विकारला होता. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथिसाठी ” महानिर्वाण” हा बौध्द शब्द वापरण्यात आला.

आंबेडकर हे बौद्ध गुरू होते. बाबासाहेबांच्या महापरनिर्वाणानिमित्त दरवर्षी मुंबईतील चैत्यभूमी येथे 25 लाखांहून अधिक भीमअनुयायी जमतात.त्यांच्या प्रतिमेला वंदन करतात. ह्या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी दिली जाते.

FAQ

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव काय होते?

भीमराव रामजी आंबेडकर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान केव्हा दिले?

26 नोव्हेंबर 1949

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय?

मूळ नाव डॉ. शारदा कुबेर
लग्नानंतर सविता ज्यांना लोक आदराने माईसाहेब म्हणत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याचे कधी घोषित झाले?

31 मार्च 1990

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचे नाव काय?

यशवंत आंबेडकर

निष्कर्ष || conclusion :

डॉ. बाबासाहेब आंबेकरांना सर्व क्षेत्रांचे ज्ञान आणि माहिती होती. सामाजिक,आर्थिक,राजकीय, शैक्षणिक,धार्मिक,कायदेविषयक अशा सर्वच क्षेत्रांबद्दल ते जाणून होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अष्टपैलू व्यकतिमत्त्व होते.

डॉ. आंबेडकरांच्या कुशल नेतृत्वाने आणि अमोघ वक्तृत्वामुळे दिन-दलिताना, शोषकांना अंधकारमय जीवनातून बाहेर काढले. बाबासाहेबांनी समाजाला स्वतःच्या हक्कासाठी लढायला शिकवले.

आजच्या लेखात आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी, त्यांचे शिक्षण, कार्य अशी सर्व माहिती बघितली आहे.

Leave a Comment