कुत्रा प्राण्याची संपूर्ण माहिती Dog animal Information In Marathi

Dog animal Information In Marathi आपल्या भारतामध्ये काही घरमध्ये लोकांना पाळीव प्राणी पाळण्याचा छंद आहे. पाळीव प्राण्यांपैकी घरी काही जण मांजर पाळतात ,तर काही जण कुत्रा पाळतात. कुत्रा या प्राण्याला सर्वात इमानदार प्राणी मानले जाते. काही लोकांच्या घराच्या आसपास इतर लोकांची घरे नसतात ,त्या लोकांचें घर रानात असते किंवा अशा ठिकाणी असते जिथे आजूबाजूला एकही घर नसते ,अशावेळी रात्रीची चोरांपासून त्यांच्या घराचे रक्षण व्हावे म्हणून ते कुत्रा पाळतात. काही लोकांना कुत्रा पाळायला आवडते ,म्हणून ते कुत्रा पाळतात तर, काही लोक आपल्या घराचे रक्षण व्हावे म्हणून कुत्रा पाळतात.

कुत्रा प्राण्याची संपूर्ण माहिती Dog animal Information In Marathi

आजच्या लेखामध्ये आपण कुत्रा या प्राण्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे कुत्रा या प्राण्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

प्राण्याचे नाव कुत्रा
इंग्रजी शब्द डॉग
हिंदी शब्द कुत्ता
जीवन काळ १२ – १५ वर्ष
प्रकार पाळीव कुत्रे जंगली कुत्रे
आहार सर्वाहारी

कुत्रा प्राण्याचे वर्णन (Description of Dog Animal in Marathi)

कुत्रा हा प्राणी विविध रंगाचा असतो; परंतु जास्तकरून कुत्रा हा प्राणी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा आपल्याला पाहायला मिळतो. कुत्र्याला दोन डोळे असतात ,तसेच त्याला चार पाय असतात. कुत्रे हे झुंड मध्ये राहणे पसंद करतात. कुत्र्यांची दाते तीक्ष्ण असतात आणि या दातांच्या मदतीने कुत्रा इतर प्राण्यांची शिकार करतो. पाळीव कुत्रे किंवा आपल्या गावात फिरणारे कुत्रे हे जास्तकरून मांजरांची शिकार करतात.

कुत्रा प्राणी (dog In Marathi)

कुत्रा या प्राण्याचा जीवन काळ १२ वर्षे इतका असतो ,काही कुत्र्यांच्या प्रजाती १२ वर्षापेक्षा जास्त काळ जगतात. कुत्र्याचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे “जंगली कुत्रे” – या जंगली कुत्रा प्रकारामधील कुत्रे हे खासकरून जंगलात आढळतात आणि हे इतर प्राण्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करत असतात. कुत्र्यांचा दुसरा प्रकार म्हणजे ” पाळीव कुत्रे “. या प्रकारातील कुत्र्यांना घरात पाळले जाते.

आपल्या भारत देशाच्या पोलीस खात्यामध्ये आणि आर्मी खात्यामध्ये देखील काही केसेस चा शोध लावण्यासाठी कुत्र्यांचा वापर केला जातो. अशा प्रकारच्या कुत्र्यांना योग्य ते ट्रेनिंग दिले जाते ,आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्या कुत्र्यांचा वापर शोधकार्यासाठी केला जातो.

कुत्रा – एक इमानदार प्राणी (Dog – an Honest animal in Marathi)

तुम्ही पाहिले असेल ,ज्या घरामध्ये कुत्र्याला पाळले जाते ,त्या घरातील मालक कुठे जरी गेला ,तरी त्यांच्या मागे मागे त्यांनी पाळलेला कुत्रा त्यांचा पाठलाग करत येत असतो. आपण जर कुत्र्याला मनापासून जीव लावला ,तर तो देखील आपल्याला जीव लावतो. 

आपण जर गावामध्ये राहत असलो ,तर तिथे आपल्याला न पाळलेल्या कुत्र्यांची संख्या जास्त दिसते. हे आळीतील किंवा गल्लीतील कुत्रे चोरांपासून संपूर्ण आळीची रक्षा करत असतात. जर रात्री एखादा चोर त्या आळीत किंवा गल्लीत शिरला असेल तर ,त्या आळीतील कुत्रे त्या अनोळखी चोराला बघून ओरडतात ,जेणेकरून तो चोर तरी तेथून पळून जातो किंवा आळीतील लोकांना तरी समजते की ,” आळी मध्ये कोणीतरी अनोळखी व्यक्ती शिरला आहे”.

कुत्र्यांच्या काही प्रजाती ( Some Species of Dogs in Marathi)

१) लैब – लैब प्रजाती चे कुत्रे भारतीय लोकांना आवडतात आणि भारतातील बऱ्यापैकी कुत्रे पाळण्याचा छंद असणारे आपल्या घरी लैब प्रजाती चे कुत्रे पाळतात. भारत देशा व्यतिरिक्त न्युझीलंड आणि कॅनडा देशातील लोक देखील लैब प्रजातीचे कुत्रे पाळतात.

भारतातील पोलीस खात्यामध्ये देखील लैब प्रजातींचा कुत्र्याचा वापर केला जातो. भारतामध्ये या लैब प्रजातीतील कुत्र्यांची किंमत ही ५,००० रुपये पासून सुरवात होते आणि या प्रजातीतील काही कुत्र्यांना लाख रुपये देऊन खरेदी केले जाते.

लैब प्रजातीतील कुत्र्यांचे वजन हे साधारण ३५ ते ४० किलो ग्रॅम च्या दरम्यान असते. तसेच या लैब प्रजातीतील कुत्र्यांचा वेग हा ३० किमी पर तास इतका असतो. या प्रजातीतील कुत्र्यांची उंची ही ६० सेमी पर्यंत असते.

२) जर्मन शेफर्ड – जर्मन शेफर्ड प्रजातीतील कुत्रे हे बुद्धिमान असतात ,तसेच ते ताकदवर देखील असतात. या प्रजातीतील पहिल्या कुत्र्याचा जन्म हा जर्मनी देशामध्ये झाला होता ,त्यामुळे या कुत्र्यांचा प्रजातीला “जर्मन शेफर्ड” असे नाव देण्यात आले होते. या प्रजातीतील कुत्र्यांचे वजन साधारण २५ किलो ग्रॅम इतके असते.

३) माल्टीज – या माल्टीज प्रजातीतील कुत्रे हे खूप संवेदनशील असतात ,तसेच या प्रजातीतील कुत्र्यांची केसे खूप मुलायम असतात. या प्रजातीतील कुत्र्यांची उंची साधारण २५ सेमी च्या आसपास असते आणि या प्रजातीतील कुत्र्यांचे वजन साधारण ४ ते ५ किलो ग्रॅम इतके असते.

४) बुलडॉग – या प्रजातीतील कुत्र्यांचा आकार मध्यम स्वरूपाचा असतो ,तसेच या प्रजातीतील कुत्र्यांचे वजन साधारण २५ किलो ग्रॅम च्या आसपास असते आणि या प्रजातीतील कुत्र्यांची शेपटी ही इतर कुत्र्यांच्या प्रजाती पेक्षा आकाराने छोटी असते.

५) पुडल – या प्रजातीतील कुत्रे हे जास्तकरून अमेरिका देशात पाळले जातात आणि या प्रजातीतील कुत्र्यांचा जीवन काळ हा १५ वर्षे इतका असतो.

कुत्र्यांच्या जीवन काळ ( Lifespan of Dogs in Marathi)

विविध कुत्र्यांच्या प्रजातींचा जीवन काळ हा वेगवेगळा असतो. परंतु साधारण कुत्र्यांचा जीवन काळ हा १२ वर्षे ते १५ वर्षे इतका असतो. काही कुत्र्यांच्या प्रजाती १५ वर्षा पेक्षा जास्त काळ देखील जगतात. जंगली कुत्र्यांच्या प्रजाती पेक्षा पाळीव कुत्र्यांच्या प्रजातींचा जीवन काळ हा जास्त असतो ; कारण जंगलांमध्ये जंगली कुत्र्यांना काही वेळा अन्नाची टंचाई जाणवते ,तर काही वेळा त्यांची शिकार जंगलातील इतर मोठ्या प्राण्यांद्वारे होते. याउलट पाळीव कुत्र्यांना मुबलक अन्न मिळते ,तसेच त्यांची शिकार होण्याचा धोका देखील कमी असतो,त्यामुळे पाळीव कुत्र्यांच्या प्रजाती ह्या जंगली कुत्र्यांच्या प्रजाती पेक्षा जास्त काळ जगतात.

कुत्र्यांची ऐकण्याची आणि वास घेण्याची क्षमता (Listen and sense ability of Dogs in Marathi)

कुत्र्यांची ऐकण्याची क्षमता ही इतर प्राण्यांपेक्षा जास्त असते ,तसेच कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता देखील इतर प्राण्यांपेक्षा जास्त असते. देशातील पोलीस खात्या द्वारे चोरांना लवकर पकडण्यासाठी कुत्र्यांची मदत घेतली जाते. कुत्र्यांचा वापर देशातील आर्मी विभागात देखील केला जातो. अशा विचित्र प्रजातीच्या कुत्र्यांना विशिष्ट ट्रेनिंग दिले जाते आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांचा वापर आर्मी खात्यामध्ये आणि पोलीस खात्यामध्ये केला जातो. 

FAQ

कुत्रा या प्राण्याचे किती प्रकार पडतात ?

कुत्रा या प्राण्याचे दोन प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे ” जंगली कुत्रे ” आणि दुसरा प्रकार म्हणजे ” पाळीव कुत्रे “.

प्राण्यांपैकी सर्वात इमानदार प्राणी कोणत्या प्राण्याला म्हणले जाते ?

कुत्रा या प्राण्याला सर्वात इमानदार प्राणी म्हणले जाते.

कुत्र्यांचा वापर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये केला जातो ?

कुत्र्यांचा वापर हा देशातील आर्मी विभागात, तसेच पोलीस विभागात केला जातो. चोरांचा शोध घेण्यासाठी काही विशिष्ट प्रजातीतील कुत्र्यांचा वापर केला जातो.

कुत्रा या प्राण्याचा जीवन काळ किती वर्षां पर्यंतचा असतो ?

कुत्रा या प्राण्याचा जीवन काळ हा १२ ते १५ वर्षां पर्यंतचा असतो.

लैब प्रजातीतील कुत्र्यांचे वजन किती असते ?

साधारण लैब प्रजातीतील कुत्र्यांचे वजन ४० किलो ग्रॅम इतके असते.

कुत्र्यांच्या पिल्लांचे डोळे किती दिवसानंतर उघडले जातात ?

कुत्र्यांच्या पिल्लांचे डोळे जन्मानंतर १० ते १५ दिवसानंतर उघडले जातात.

मादी कुत्रीला एकावेळी किती पिल्ले होतात ?

मादी कुत्रीला एकावेळी साधारण ६ च्या आसपास पिल्ले होतात .

आजच्या लेखामध्ये आपण आपल्या घराचे रक्षण करणाऱ्या कुत्रा या प्राण्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण कुत्र्यांचे वर्णन ,कुत्र्यांच्या प्रजाती ,कुत्र्यांचे प्रकार ,कुत्र्यांची वास घेण्याची आणि ऐकण्याची क्षमता ,कुत्रा प्राण्या विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment