डॉक्टर विक्रम साराभाई यांची संपूर्ण माहिती Doctor Vikram Sarabhai Information In Marathi

Doctor Vikram Sarabhai Information In Marathi आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये वैज्ञानिकांचा मोलाचा वाटा असतो ,आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका थोर वैज्ञानिकाच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ज्यांना देशातील अंतरीक्ष कार्यक्रमाचे जनक मानले जाते ,अशा डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या जीवना विषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर आजच्या लेखाद्वारे देशाचे अंतरीक्ष कार्यक्रमाचे जनक मानले जाणाऱ्या डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Doctor Vikram Sarabhai Information In Marathi

डॉक्टर विक्रम साराभाई यांची संपूर्ण माहिती Doctor Vikram Sarabhai Information In Marathi

नाव डॉक्टर विक्रम साराभाई
जन्म १२ ऑगस्ट १९१९
आईचे नाव सरलादेवी साराभाई
वडिलांचे नाव अंबालाल साराभाई
पत्नीचे नाव मृनलिनी
क्षेत्र वैज्ञानिक
पुरस्कार पद्मश्री ,पद्म विभूषण
मृत्यू ३० डिसेंबर १९७१

डॉक्टर विक्रम साराभाई यांचा जन्म आणि त्यांचे प्रारंभिक जीवन (Birth of Doctor Vikram Sarabhai and early life of Doctor Vikram Sarabhai in Marathi)

डॉक्टर विक्रम साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ मध्ये अहमदाबाद येथे झाला. डॉक्टर विक्रम साराभाई यांचे वडील हे त्याकाळचे प्रसिद्ध उद्योजक होते. तसेच त्यांच्या वडिलांच्या गुजरात राज्यामध्ये भरपूर मिल्स होत्या.

त्याकाळचे देशातील मोठे नेते जेव्हा जेव्हा गुजरात मध्ये भेट देण्यासाठी येत असत,तेव्हा तेव्हा ते मोठे नेते अंबालाल साराभाई यांच्या घरी थांबत असत. डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या वडिलांनी भारत स्वतंत्र आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता.

डॉक्टर विक्रम साराभाई यांचे कुटुंब (Family of Doctor Vikram Sarabhai in Marathi)

डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या आईचे नाव “सरलादेवी साराभाई” होते ,तर त्यांच्या वडिलांचे नाव “अंबालाल साराभाई” होते. डॉक्टर विक्रम साराभाई यांना दोन भाऊ आणि पाच बहिणी होत्या. त्यांच्या भावाची नावे “सुहरिद साराभाई” आणि “गौतम साराभाई” असे होते ,तर त्यांच्या बहिणीची नावे “भारती” ,”गिरा” ,”गीता” ,”लीना” आणि “मृदुला” असे होते.

१९४२ मध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांचा विवाह मृनलिनी यांच्याशी झाला आणि पुढे जाऊन मृनलिनी आणि डॉक्टर विक्रम साराभाई यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. त्यातील मुलाचे नाव “कार्तिकेय साराभाई” असे ठेवण्यात आले आणि मुलीचे नाव “मल्लिका साराभाई” असे ठेवण्यात आले.

डॉक्टर विक्रम साराभाई यांचे शिक्षण (Education of Doctor Vikram Sarabhai in Marathi)

डॉक्टर विक्रम साराभाई यांचे प्राथमिक शिक्षण हे गुजरात मध्येच झाले आणि पुढचे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंड येथे गेले. इंग्लंड मधील केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी आपले पुढचे शिक्षण पूर्ण केले. जेव्हा जगभरामध्ये दुसरे महायुध्द चालू होते ,त्या काळामध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांनी आपले पीएचडी चे शिक्षण पूर्ण केले आणि पीएचडी चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते भारतामध्ये परत आले.

डॉक्टर विक्रम साराभाई यांचे कार्य (Work of Doctor Vikram Sarabhai in Marathi)

भारतात आल्यानंतर डॉक्टर विक्रम साराभाई हे बेंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थान मध्ये नोकरी करू लागले. त्यानंतर १९४७ मधे डॉक्टर विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथे फिजिक्स च्या रिसर्च लायब्ररी ची निर्मिती केली. डॉक्टर विक्रम साराभाई यांचे वडील एक श्रीमंत उद्योजक होते.

त्यानंतर डॉक्टर विक्रम साराभाई यांनी आपल्या वडिलांच्या मदतीने त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या एमी.जी.सायन्स कॉलेज मध्ये प्रयोगशाळेची निर्मिती केली. डॉक्टर विक्रम साराभाई यांनी स्थापन केलेल्या या प्रयोगशाळेला “वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान परिषद” ची मान्यता देखील मिळाली होती.

डॉक्टर विक्रम साराभाई यांनी कोस्मीक किरणांवर अभ्यास केला आणि या विषयावर विविध शोध त्यांनी लावले. तसेच डॉक्टर विक्रम साराभाई यांनी अंतरिक्ष क्षेत्रात देखील विविध शोध लावले. वर्ष १९५७-५८ मध्ये झालेल्या LGW कार्यक्रमामध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांचे विशेष योगदान होते.

डॉक्टर होमी भाभा यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर, १९६६ नंतर डॉक्टर विक्रम साराभाई यांना भारतातील ‘परमाणू ऊर्जा आयोगाचे’ अध्यक्ष बनवण्यात आले. डॉक्टर विक्रम साराभाई आणि इतर वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नानंतर १९७५ मध्ये भारताने “आर्यभट” नावाचे पाहिले सैटेलाईट अंतरीक्ष कक्षेमध्ये यशस्वी रित्या लाँच केले.

डॉक्टर विक्रम साराभाई हे एक थोर वैज्ञानिक होते आणि त्यांचे देशाच्या अंतरीक्ष क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. डॉक्टर विक्रम साराभाई आणि त्यांच्या सहकारी वैज्ञानिकांनी १९६३ मध्ये एक छोटे रॉकेट अंतरीक्ष मध्ये यशस्वी रित्या लाँच केले होते. आपल्या भारत देशाची अंतरीक्ष क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी इस्रो ह्या संस्थेची स्थापना करण्यामध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांचा मोलाचा वाटा होता आणि इस्रो संस्थेचे पाहिले चेअरमन हे ‘डॉक्टर विक्रम साराभाई’ हे होते.

डॉक्टर विक्रम साराभाई यांना त्यांच्या कार्यासाठी मिळालेले पुरस्कार आणि सन्मान (awards received by Doctor Vikram Sarabhai in Marathi)

डॉक्टर विक्रम साराभाई हे एक थोर वैज्ञानिक होते आणि त्यांना भारताचे अंतरीक्ष कार्यक्रमाचे जनक म्हणून देखील ओळखले जाते. डॉक्टर विक्रम साराभाई यांना त्यांच्या कार्यासाठी भरपूर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

डॉक्टर विक्रम साराभाई यांना त्यांच्या कार्यासाठी भारत सरकारकडून वर्ष १९६६ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता ,तसेच वर्ष १९७२ मध्ये पद्म विभूषण पुरस्कार देऊन डॉक्टर विक्रम साराभाई यांना सन्मानित करण्यात आले होते.

भारत सरकारने डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नावाने एक पोस्टातील तिकीट देखील जारी केले होते. डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ तिरुअनंतपूरम मधील “थुम्बा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग केंद्राचे” नाव बदलून “डॉक्टर विक्रम साराभाई अंतरीक्ष केंद्र” असे करण्यात आले होते.

डॉक्टर विक्रम साराभाई यांचे निधन (Death of Doctor Vikram Sarabhai in Marathi)

थोर वैज्ञानिक डॉक्टर विक्रम साराभाई यांचे निधन ३० डिसेंबर १९७१ मध्ये झाले. त्यांच्या निधनाच्या एक तास आधी डॉक्टर विक्रम साराभाई आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची फोन वर चर्चा झाली होती. त्या दोघांची फोन वर चर्चा झाल्यानंतर एका तासानंतर डॉक्टर विक्रम साराभाई यांचे निधन झाले. डॉक्टर विक्रम साराभाई यांचे अंतिम संस्कार अहमदाबाद येथे करण्यात आले होते.

FAQ

डॉक्टर विक्रम साराभाई यांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला ?

डॉक्टर विक्रम साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ मध्ये गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे झाला.

डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या आईचे नाव काय होते ?

डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या आईचे नाव “सरलादेवी साराभाई” असे होते.

डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या वडिलांचे नाव “अंबालाल साराभाई” असे होते.

डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या पत्नीचे नाव काय होते ?

डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या पत्नीचे नाव “मृनलिनी साराभाई” असे होते.

भारतीय अंतरीक्ष कार्यक्रमाचे जनक कोणत्या वैज्ञानिकाला म्हणले जाते ?

भारतीय अंतरीक्ष कार्यक्रमाचे जनक हे डॉक्टर विक्रम साराभाई यांना म्हणले जाते.

भारतातील इस्रो संस्थेचे पाहिले चेअरमन कोण होते ?

डॉक्टर विक्रम साराभाई हे भारतातील इस्रो संस्थेचे पाहिले चेअरमन होते.

डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या मृत्यूनंतर कोणत्या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले आहे ?

डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या मृत्यूनंतर तिरूअनंतपुरम येथील थुम्बा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग केंद्राचे नाव बदलून त्या केंद्राला डॉक्टर विक्रम साराभाई यांचे नाव देण्यात आले होते.

डॉक्टर विक्रम साराभाई यांना त्यांच्या कार्यासाठी कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत ?

भारत सरकारकडून डॉक्टर विक्रम साराभाई यांना त्यांच्या कार्यासाठी १९६६ मध्ये पद्मश्री आणि १९७२ मध्ये पद्म विभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

डॉक्टर विक्रम साराभाई यांचे निधन केव्हा झाले ?

डॉक्टर विक्रम साराभाई यांचे निधन ३० डिसेंबर १९७१ मधे झाले.

आजच्या लेखामध्ये आपण थोर वैज्ञानिक आणि देशाच्या अंतरीक्ष क्षेत्राची प्रगती करण्यामध्ये मोलाचा वाटा असणारे डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण डॉक्टर विक्रम साराभाई यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब ,डॉक्टर विक्रम साराभाई यांचे शिक्षण ,डॉक्टर विक्रम साराभाई यांचे कार्य ,डॉक्टर विक्रम साराभाई यांना त्यांच्या कार्यासाठी मिळालेले पुरस्कार ,डॉक्टर विक्रम साराभाई यांचे निधन ,डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment