डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची संपूर्ण माहिती Doctor Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi

Doctor Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi देशाचे भविष्य हे विद्यार्थ्यावर आधारित असते ,आणि विद्यार्थ्यांचे भविष्य हे चांगल्या शिक्षकांवर आधारित असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान दिले तरच ते विद्यार्थी भविष्यात आपल्या देशाचे नाव रोशन करतील. देशाचे भविष्य हे जेवढे विद्यार्थ्यांवर आधारित असते , त्याचरोबर ते शिक्षकांवर देखील आधारित असते.

Doctor Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची संपूर्ण माहिती Doctor Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi

आजच्या लेखामध्ये आपण भारत देशामध्ये जन्म घेतलेल्या एका थोर शिक्षका विषयी म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

नाव डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
जन्म ५ सप्टेंबर १८८८
जन्मस्थान चीतुर ,तमिळनाडू
आईचे नाव सीताम्मा
वडिलांचे नाव सर्वपल्ली विरास्वामी
क्षेत्र शिक्षक
पुरस्कार भारतरत्न
निधन १७ एप्रिल १९७५

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म आणि त्यांचे सुरवातीचे जीवन (Birth of Doctor Sarvepalli Radhakrishnan and his early life in Marathi)

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ मध्ये तामिळनाडू राज्यातील चीतुर जिल्ह्यात एका ब्राम्हण परिवारात झाला होता.डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वडिलांचे नाव ” सर्वपल्ली विरास्वामी” असे होते ,तर त्यांच्या आईचे नाव “सीताम्मा” असे होते.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रारंभिक शिक्षण त्यांच्या गावात झाले होते. पुढचे शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या वडिलांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे एडमिशन तिरुपती मधील ख्रिश्चन मिशनरी शाळांमधे केले होते.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपले डिग्री पर्यंतचे शिक्षण मद्रास ख्रिश्चन कॉलेज मधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एम ए कोर्ससाठी एडमिशन घेऊन मास्टर चे शिक्षण पूर्ण केले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे अभ्यासात खूप हुशार होते , त्यांनी आपले संपूर्ण शिक्षण स्कॉलरशिप च्या मदतीने पूर्ण केले होते.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा विवाह (Married Life of Doctor Sarvepalli Radhakrishnan in Marathi)

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा विवाह खूप कमी वयात झाला होता. त्यांचा विवाह वयाच्या १६ व्या वर्षी “सिवकमु” नावाच्या महिलेशी झाला होता. पुढे जाऊन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आणि त्यांच्या पत्नींना ५ मुलगी आणि एक मुलगा झाला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा मुलगा ” सर्वपल्ली गोपाल” हे पुढे जाऊन खूप मोठे इतिहासकार झाले.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे करियर (Career of Doctor Sarvepalli Radhakrishnan in Marathi)

आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९०९ मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज मधे फिलॉसॉफी विषयात प्रोफेसर ची नोकरी करू लागले. पुढे त्यांनी मैसूर विश्व विद्यालयात देखील फिलॉसॉफी विषयात  प्रोफेसर ची नोकरी केली.

पुढे १९२६ मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी हार्वर्ड विश्वविद्यालयात भारताचे प्रतिनिधित्व केले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक थोर शिक्षक होते ,त्यामुळे त्यांची निवड जगात प्रसिद्ध असलेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये ” स्पैल्डिंग प्रोफेसर” च्या पदी करण्यात आली.

वर्ष १९३१ ते वर्ष १९३६ च्या दरम्यान डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आंध्र विश्वविद्यालयाचे कुलपती होते. तसेच पुढे जाऊन १९३९ मध्ये ते काशी हिंदू विश्वविद्यालयाचे ते कुलपती झाले आणि या कुलपती पदासाठी त्यांनी १९४८ पर्यंत नोकरी केली.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांच्या कार्यासाठी ब्रिटिश सरकारकडून त्यांना “सर” ही पदवी मिळाली होती आणि संपूर्ण देशभर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिवशी “शिक्षक दिवस” साजरा केला जातो. या “शिक्षक दीन” दिवशी देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे राजकीय जीवन (Political Life of Doctor Sarvepalli Radhakrishnan in Marathi)

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक थोर शिक्षक होतेच ,परंतु यासोबत ते एक थोर राजकीय नेते देखील होते. डॉक्टर सर्वपल्ली हे १९५२ मध्ये उपराष्ट्रपती पदावर कार्यरत झाले होते आणि १९६२ मध्ये ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अनमोल कार्यासाठी १९५४ मध्ये भारत सरकारकडून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे ५ अनमोल विचार ( 5 golden thoughts of Doctor Sarvepalli Radhakrishnan in Marathi)

१) सनातन हिंदु धर्माविषयी बोलताना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात की ,” सनातन धर्म हा फक्त बोलण्याचा विषय नाहीये ,तर तो अनुभव करण्याचा विषय आहे “.

२) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या मते ,” शिक्षक तो नाही जो विद्यार्थ्यांना फक्त पाठ्यक्रमातील पाठ शिकवतो ,तर शिक्षक तो आहे जो विद्यार्थ्यांना भविष्यातील समस्यांसाठी तयार करतो.

३) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या मते ,” एकांत मध्ये पुस्तके वाचणे आपल्याला वेगळाच आनंद देते.”

४) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या मते ,” जीवनाकडे नकारात्मक दृष्टीने पाहणे ,हे चुकीचे आहे .आपण जीवनाकडे सदैव सकारात्मक दृष्टिने पाहिले पाहिजे.”

५) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात की ,” आपण शिक्षणाद्वारे आपल्या बुद्धीचा वापर जगाच्या हितासाठी करू शकतो”.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन (Death of Doctor Sarvepalli Radhakrishnan in Marathi)

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन चेनई मध्ये वयाच्या ८६ वर्षी १७ एप्रिल १९७५ मध्ये झाले. 

FAQ

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म केव्हा झाला ?

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ मध्ये तामिळनाडू राज्यातील चीतुर जिल्ह्यात झाला.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वडिलांचे नाव “सर्वपल्ली विरास्वामी” होते.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आईचे नाव काय होते ?

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आईचे नाव “सीताम्मा” असे होते.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पत्नीचे नाव काय होते ?

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पत्नीचे नाव “सिवकमु” असे होते.

भारतामध्ये शिक्षक दिवस केव्हा साजरा केला जातो ? आणि भारतामध्ये शिक्षक दिवस कशा पद्धतीने साजरा केला जातो ?

भारतामध्ये दरवर्षी ५ सप्टेंबर ला “शिक्षक दिवस” मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी देशभरातील शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी शाळेमध्ये शाळेतील मुले शिक्षकांची भूमिका बजावतात.

भारतामध्ये शिक्षक दिवस का साजरा केला जातो ?

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक थोर शिक्षक होते आणि त्यांच्या आठवणीत त्यांच्या जयंती दिवशी भारतामध्ये दरवर्षी ५ सप्टेंबर ला शिक्षक दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी कोणते कार्य केले ?

उत्तर – डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे फिलॉसॉफी विषयाचे प्रोफेसर होते आणि ते काशी हिंदू विश्वविद्यालयाचे आणि ते आंध्र विश्वविद्यालयाचे कुलपती देखील होते.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांच्या कार्यासाठी कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत ?

१९५४ मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारत सरकारकडून भारत देशाचा सर्वोत्तम नागरिक पुरस्कार भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन केव्हा झाले ?

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन १७ एप्रिल १९७५ मध्ये वयाच्या ८६ वर्षी चेनई येथे झाले.

आजच्या लेखामध्ये आपण भारताचे उपराष्ट्रपती असलेल्या ,तसेच भारताचे दुसरे राष्ट्रपती असणाऱ्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म आणि त्यांचे सुरवातीचे जीवन ,डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा विवाह ,डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे करियर आणि त्यांचे राजकीय जीवन ,डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे ५ अनमोल विचार ,डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन ,डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती आपण पाहिली.

Leave a Comment