डीएमएलटी कोर्सची संपूर्ण माहिती DMLT Course Information In Marathi

DMLT Course Information In Marathi ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल टेक्निशियन किंवा रिसर्च टेक्निशियन म्हणून नोकरी करायची आहे ,अशा विद्यार्थ्यांसाठी डीएमएलटी कोर्स एक चांगला कोर्स आहे. आजच्या लेखामध्ये आपण याच “डीएमएलटी कोर्स” विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे डीएमएलटी कोर्स विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

DMLT Course Information In Marathi

डीएमएलटी कोर्सची संपूर्ण माहिती DMLT Course Information In Marathi

कोर्सचे नाव डीएमएलटी कोर्स
फुल्ल फॉर्म डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी
कालावधी २ वर्ष
प्रकार डिप्लोमा
फी २०,००० ते ६०,०००

डीएमएलटी चा फुल्ल फॉर्म (Full form of DMLT in Marathi)

डीएमएलटी चा फुल्ल फॉर्म हा “डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी” असा होतो आणि या डीएमएलटी कोर्स मधून हेल्थ केअर क्षेत्राविषयी ज्ञान दिले जाते.

भारतातील बऱ्याच कॉलेज मध्ये डीएमएलटी कोर्स साठी एडमिशन घेण्यासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा नसते ; परंतु भारतातील टॉप च्या कॉलेज मध्ये डीएमएलटी कोर्स साठी प्रवेश परीक्षा आयोजित केली जाते आणि या प्रवेश परीक्षेच्या मेरिट वरती त्या कॉलेज मध्ये डीएमएलटी कोर्स साठी एडमिशन दिले जाते.

डीएमएलटी कोर्स मध्ये एडमिशन घेण्यासाठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for DMLT course in Marathi)

१) डीएमएलटी कोर्स मध्ये एडमिशन घेण्यासाठी उमेदवार हा भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठातून १२ वी उत्तीर्ण असला पाहिजे.

२) डीएमएलटी कोर्स मध्ये एडमिशन घेण्यासाठी उमेदवाराने आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण केले असले पाहिजे ,तसेच डीएमएलटी कोर्स मध्ये एडमिशन घेण्यासाठी त्या उमेदवाराला १२ वी मध्ये ५०% पेक्षा जास्त मार्क्स पडली असली पाहिजेत.

३) डीएमएलटी कोर्स मध्ये एडमिशन घेण्यासाठी भारतातील काही कॉलेजेस प्रवेश परीक्षा आयोजित करते ,तर उमेदवाराला त्या कॉलेज मध्ये एडमिशन घेण्यासाठी त्या कॉलेज ची प्रवेश उत्तीर्ण होणे करणे गरजेचे असते ,तेव्हाच त्या उमेदवाराला त्या कॉलेज मध्ये डीएमएलटी कोर्स साठी एडमिशन मिळते.

४) भारतातील काही कॉलेजेस मध्ये १० वी उत्तीर्ण झालेला उमेदवार देखील डीएमएलटी कोर्स साठी एडमिशन घेऊ शकतो.

डीएमएलटी कोर्स करण्याचे फायदे (Benefits of Doing DMLT Course in Marathi)

१) डीएमएलटी कोर्स मध्ये तुम्हाला विविध रोगांवरती संशोधन करण्याचे ज्ञान मिळते आणि ज्यांनी डीएमएलटी कोर्स पूर्ण केला आहे ,त्यांच्यासाठी करियर मध्ये पुढे भरपूर नोकरीच्या संधी देखील उपलब्ध आहेत.

२) डीएमएलटी कोर्स हा हेल्थ केअर क्षेत्रा संबंधी एक कोर्स आहे आणि हेल्थ केअर क्षेत्र हे सध्याच्या तेजीने प्रगती करणाऱ्या क्षेत्रापैकी एक क्षेत्र आहे. त्यामुळे डीएमएलटी कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांचे करियर उज्वल आहे.

३) डीएमएलटी कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला चांगली नोकरी देखील मिळते आणि जर आपल्याला व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर ,आपण डीएमएलटी कोर्स पूर्ण केल्यानंतर आपला स्वतःचा व्यवसाय देखील चालू करू शकतो.

डीएमएलटी कोर्स साठी असणारी फी (Fees for DMLT course in Marathi)

डीएमएलटी कोर्स साठी असणारी फी ही विविध कॉलेज साठी वेगवेगळी असते. डीएमएलटी कोर्सची फी ही कॉलेजवर आधारित असते ,जर आपण भारतातील टॉप च्या कॉलेज मध्ये डीएमएलटी कोर्स साठी एडमिशन घेतले असेल तर ,आपली त्या टॉप च्या कॉलेज मधील डीएमएलटी कोर्सची फी जास्त असते ; परंतु जर आपण इतर कॉलेज मध्ये डीएमएलटी कोर्स साठी एडमिशन घेतले असेल तर ,आपली त्या कॉलेज मधील डीएमएलटी कोर्सची फी कमी असते. 

साधारण भारतामध्ये डीएमएलटी कोर्सची फी ही २०,००० हे ६०,०० च्या दरम्यान असते. काही कॉलेज मधील डीएमएलटी कोर्सची फी २०,००० पेक्षा कमी असते तर ,काही कॉलेज मधील डीएमएलटी कोर्सची फी ही जास्त असते.

डीएमएलटी कोर्स साठी एडमिशन प्रक्रिया (Admission process for DMLT course in Marathi)

डीएमएलटी कोर्स साठी एडमिशन हे दोन प्रक्रियेतून होते. पाहिली प्रक्रिया म्हणजे मेरिट च्या आधारावर डीएमएलटी कोर्स साठी एडमिशन. या प्रक्रियेमध्ये तुम्हाला ज्या कॉलेज मध्ये डीएमएलटी कोर्स साठी एडमिशन हवे आहे ,त्या कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन कराव्ह लागते आणि तुमचे हे रजिस्ट्रेशन १२ वीच्या मार्क्स वरती असते.

नंतर रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख झाल्यानंतर काही दिवसात ते कॉलेज १२ वी मार्क्स वरती मेरिट लिस्ट लावते. त्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचे नाव असेल तर ,तुम्हाला त्या कॉलेज मध्ये डीएमएलटी कोर्स साठी एडमिशन मिळते.

डीएमएलटी कोर्स साठी एडमिशन घेण्याची दुसरी प्रक्रिया म्हणजे प्रवेश परीक्षा द्वारे एडमिशन घेणे. या प्रक्रियेमध्ये तुम्हाला ज्या कॉलेज मध्ये डीएमएलटी कोर्स साठी एडमिशन घ्यायचे आहे ,त्या कॉलेजच्या डीएमएलटी कोर्स साठी असणाऱ्या प्रवेश परीक्षे मध्ये तुम्हाला चांगली मार्क्स पडायला हवीत. तुम्हाला जर या प्रवेश परीक्षेमध्ये चांगली मार्क्स पडली तर ,तुम्हाला त्या कॉलेज मध्ये डीएमएलटी कोर्स साठी एडमिशन मिळते.

काही कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षा न घेता किंवा १२ वीच्या मार्क्स वर मेरिट न लावता १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देखील डीएमएलटी कोर्स साठी एडमिशन मिळते.

डीएमएलटी कोर्स पूर्ण झाल्यानंतर असणाऱ्या करियरच्या संधी (Career opportunities after completion of DMLT course in Marathi)

डीएमएलटी कोर्स हा डिप्लोमा लेव्हलचा कोर्स आहे आणि हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी करू शकता. या कोर्स मध्ये तुम्हाला हेल्थ केअर क्षेत्रासंबंधी ज्ञान दिले जाते आणि वर्तमानात हेल्थ केअर क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी देखील भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.

तसेच तुम्हाला जर पुढे शिकण्याची आवड असेल तर ,तुम्ही डीएमएलटी कोर्स पूर्ण केल्यानंतर “बॅचलर ऑफ मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी” या कोर्स साठी एडमिशन घेऊ शकता आणि आपले बॅचलरचे शिक्षण मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी मधून पूर्ण करू शकता.

डीएमएलटी कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला खालील पोस्ट साठी नोकरी लागू शकते.

१) रिसर्च टेक्निशियन

२) टेक्नॉलॉजीस्ट

३) लॅबोरेटरी अनालिस्ट

४) रिसर्च असिस्टंट

५) मेडिकल टेक्नॉलॉजीस्ट

FAQ

डीएमएलटी कोर्स हा किती वर्षांचा कोर्स आहे ?

डीएमएलटी कोर्स हा दोन वर्षाचा कोर्स आहे.

डीएमएलटी कोर्स मध्ये एडमिशन घेण्यासाठी पात्रता निकष काय असते ?

डीएमएलटी कोर्स मध्ये एडमिशन घेण्यासाठी तुम्ही १२ वी उत्तीर्ण असला पाहिजे आणि तुम्ही तुमचे १२ वीचे शिक्षण हे विज्ञान शाखेतून पूर्ण केले असेल पाहिजे ,तसेच तुम्हाला १२ वी मध्ये विज्ञान शाखेतून ५०% च्या वर मार्क्स पडलेली असायला हवीत.

डीएमएलटी कोर्सची फी साधारण किती असते ?

डीएमएलटी कोर्सची फी ही वेगवेगळ्या कॉलेज साठी वेगवेगळी असते. भारतातील टॉप च्या कॉलेज मध्ये डीएमएलटी कोर्स ची फी ही जास्त असते ,तर इतर कॉलेज मध्ये डीएमएलटी कोर्सची फी ही कमी असते ; परंतु बऱ्यापैकी सर्व कॉलेज मध्ये डीएमएलटी कोर्सची फी ही २०,००० ते ६०,००० च्या दरम्यान असते.

डीएमएलटी कोर्स पूर्ण झाल्यानंतर पुढे कोणता कोर्स करणे फायद्याचे ठरेल ?

तुम्हाला जर डीएमएलटी कोर्स पूर्ण केल्यानंतर पुढे शिकण्याची आवड असेल तर, तुम्ही पुढे “बॅचलर ऑफ मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी” हा कोर्स करू शकता.

डीएमएलटी कोर्स मध्ये एडमिशन मिळण्यासाठी “नीट” ची उत्तीर्ण करणे गरजेचे आहे का ?

नाही ,तुम्ही डीएमएलटी कोर्स साठी एडमिशन नीट ची परीक्षा उत्तीर्ण न करता देखील घेऊ शकता.

माझे १२ वी चे शिक्षण वाणिज्य शाखेतून झाले आहे ,तर मग मी डीएमएलटी कोर्स साठी एडमिशन घेऊ शकतो का ?

नाही ,वाणिज्य शाखेतून १२ वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी डीएमएलटी कोर्स साठी एडमिशन घेऊ शकत नाहीत. डीएमएलटी कोर्स मध्ये एडमिशन घेण्यासाठी तुम्ही तुमचे १२ पर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण करणे गरजेचे असते.

आजच्या लेखामध्ये आपण “डीएमएलटी कोर्स विषयी” संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण डीएमएलटी कोर्सचा फुल्ल फॉर्म ,डीएमएलटी कोर्स मध्ये एडमिशन घेण्यासाठी असणारी पात्रता निकष ,डीएमएलटी कोर्स करण्याचे फायदे ,डीएमएलटी कोर्स साठी असणारी फी ,डीएमएलटी कोर्स साठी एडमिशन प्रक्रिया ,डीएमएलटी कोर्स पूर्ण झाल्यानंतर असणाऱ्या करीयरच्या संधी ,डीएमएलटी कोर्सविषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment