धनुरासनची संपूर्ण माहिती Dhanurasana Information In Marathi

Dhanurasana Information In Marathi योग ही आपल्या भारताने संपूर्ण जगाला दिलेली देणगीच आहे. नियमित योग केल्याने आपले शरीर मजबूत आणि तंदुरुस्त राहते. पशु पक्ष्यांच्या चित्र विचित्र मुद्रेपासून योगांची निर्मिती करण्यात आली होती. योग हे प्राचीन काळापासून लोक करत आले आहेत. पूर्वीच्या काळी माणसे तंदुरुस्त होती ,त्यांच्या तंदुरुस्त राहण्या मागचे महत्वाचे कारण हे की ; ते नियमित योग करत होते. तसेच आपल्या जीवनामध्ये आयुर्वेदाचा वापर देखील ते करत होते. आजच्या लेखामध्ये आपण एका आसना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे “धनुरासन” विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Dhanurasana Information In Marathi

धनुरासनची संपूर्ण माहिती Dhanurasana Information In Marathi

आसनाचे नाव धनुरासन
कालावधी १० ते १५ सेकंद
मुद्रा धनुष्य बाण
उत्तम वेळ सकाळची

योगाचे महत्व (Importance of Yoga in Marathi)

आजकाल आपण सर्वजण खूप व्यस्त झालो आहोत. आपण आपल्या कामामध्ये इतके व्यस्त झालो आहोत की ,आपल्या सर्वांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी देखील वेळ पूरेनासा झालाय.

मग याच दगदगीच्या जीवनामुळे आपल्याला बऱ्याच आजारांचा सामना करावा लागत आहे. आपल्याला होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी आणि आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपण नियमित योग किंवा व्यायाम केला पाहिजे.

धनुरासन (Dhanurasana in Marathi)

धनुरासन हे आसनांच्या १२ मुख्य आसना पैकी एक आसन आहे. यामध्ये आपल्या पाठेला स्ट्रेचिंग करून आपल्या शरीराचा आकार धनुष्य बाणासारखा बनवला जातो.

नियमित धनुरासन केल्यामुळे आपली पाठ मजबूत बनते ,तसेच नियमित धनुरासन केल्यामुळे आपल्याला आपल्या कमरेत लवचिकपणा जाणवतो. धनुरासन करताना आपल्या शरीराची मुद्रा धनुष्य बाण सारखी होते , त्यामुळे या आसनाला “धनुष्य आसन” देखील म्हणले जाते.

धनुरासन करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी (Precautions to be taken before performing Dhanurasana in Marathi)

धनुरासन करण्याचे बरेच फायदे आहेत ; परंतु धनुरासन करताना आपण योग्य ती काळजी घेऊन धनुरासन केले नाही तर ,त्याचे आपल्या शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतात. चला तर मग आता जाणून घेऊयात धनुरासन करण्यापूर्वी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे.

१) आपण धनुरासन हे उपाशी पोटी केले पाहिजे. आपण धनुरासन हे जेवल्यानंतर केले नाही पाहिजे.

२) धनुरासन करण्याची उत्तम वेळ ही सकाळी सूर्योदय व्हायच्या अगोदरची आहे ; परंतु जर तुम्ही सकाळी लवकर उठला नाही किंवा तुम्हाला सकाळी काही कारणास्तव धनुरासन करता आले नाही तर ,तुम्ही सायंकाळी देखील धनुरासन करू शकता.

३) धनुरासन हे जेवल्यानंतर ५ ते ६ तासाने केले पाहिजे ,धनुरासन उपाशी पोटी केले तर उत्तमच ; परंतु आपल्याला जर सकाळी काही कारणास्तव धनुरासन करता आले नाही तर ,आपण जेवल्यानंतर ५ ते ६ तासाने सायंकाळी धनुरासन केले पाहिजे. जेवल्यानंतर ५ ते ६ तासाने धनुरासन केल्यामुळे आपल्या शरीराला हवी ती एनर्जी मिळते.

४) जर तुम्ही सकाळचे धनुरासन करणार असाल तर ,तुम्ही पहिल्यांदा शौचालय करून नंतर धनुरासन केले पाहिजे.

खालील गोष्टीवेळी आपण धनुरासन केले नाही पाहिजे :

१) आपल्या पोटाचे जर ऑपरेशन झाले असेल तर ,आपण धनुरासन केले नाही पाहिजे.

२) जर आपल्याला टी.बी चा त्रास असेल तर ,आपण धनुरासन केले नाही पाहिजे.

३) गरोदर स्त्रियांनी धनुरासन केले नाही पाहिजे.

धनुरासन करण्याची क्रिया (Process of doing Dhanurasana in Marathi)

आपण जर नियमित धनुरासन केले तर आपले शरीर मजबूत व तंदुरुस्त बनते, तसेच आपल्याला लवचिकपणा जाणवतो.

आपण खालील क्रिया पाळून धनुरासन केले पाहिजे.

१) सर्वात पहिल्यांदा धनुरासन करण्यासाठी आपण सकाळी लवकर उठायला हवे ,सकाळी लवकर उठणे आपल्याला शक्य नसेल तर ,आपण सायंकाळी धनुरासन केले पाहिजे.

२) सकाळी उठल्यानंतर धनुरासन करण्यासाठी मैट वरती पालथे झोपा.

३) पालथे झोपल्यानंतर आपले पाय खालून मागच्या बाजूला वरती उचला.

४) नंतर हात देखील समोरील बाजूने उचलून पायाच्या जवळ न्ह्या.

५) आता हाताने पायाला पकडा आणि आपला छाती जवळील हिस्सा जमिनीच्या वर उचला. आता तुमच्या शरीराची मुद्रा धनुष्य बाण सारखी झाली असेल.

६) नंतर आपल्या समोरच्या दिशेला पाहा आणि आपले संपूर्ण ध्यान श्वासावर केंद्रित करा.

तुम्ही जर याआधी कधीच धनुरासन केले नसेल तर, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा धनुरासन कराल ,तेव्हा धनुष्य बाण मुद्रेमध्ये तुम्ही १० सेकंद ते १५ सेकंद थांबा आणि जशी जशी तुम्हाला धनुरासन करण्याची सवय होईल ,तसे तसे तुम्ही आपल्या क्षमतेनुसार धनुरासन करण्याचा कालावधी वाढवू शकता.

नियमित धनुरासन करण्याचे फायदे (Benefits of Doing daily Dhanurasana in Marathi)

नियमित धनुरासन करण्याचे बरेच फायदे आहेत ,त्यातील काही फायदे खालीलप्रमाणे :

१) तुम्ही जर नियमित धनुरासन केले तर ,तुमच्या पाठीचा कणा मजबूत बनतो. तसेच नियमित धनुरासन केल्यामुळे पोटा जवळील मासपेशी मजबूत बनण्यास मदत होते.

२) आजकाल सर्वजण कॉम्प्युटर वरती काम करत आहेत. दिवसभर कॉम्पुटर वर काम केल्यामुळे आपल्या पाठीचा कणा दुखू लागतो किंवा आपला पाठीचा कणा समोरच्या दिशेला वाकतो. आपल्याला जर ही समस्या जाणवत असेल ,तर आपण नियमित धनुरासन केले पाहिजे. नियमित धनुरासन केल्यामुळे आपला वाकलेला पाठीचा कणा सरळ होण्यामध्ये मदत होते.

३) नियमित धनुरासन केल्यामुळे आपल्या हाताची आणि पायाची हाडे मजबूत बनतात.

४) आपण जर तणावात असू तर ,नियमित धनुरासन केल्यामुळे आपला तणाव कमी होण्यामध्ये आपली मदत होते.

धनुरासन करण्यामागचे विज्ञान (Science behind Dhanurasana in Marathi)

शास्त्रज्ञांच्या मते आपल्या पाठीचा कणा हा आपल्या शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक अवयव आहे आणि धनुरासन करताना जास्तकरून आपल्या पाठीच्या कणाचा वापर होतो ,त्यामुळे नियमित धनुरासन केल्यामुळे आपल्या पाठीचा कणा मजबूत होतो.

FAQ

धनुरासन करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे ?

धनुरासन हे आपण उपाशी पोटी किंवा जेवल्यानंतर ५ ते ६ तासाने केले पाहिजे ,आपण जर सकाळी लवकर उठून धनुरासन केले तर ,त्याचा फायदा आपल्याला होतो.

धनुरासन कोणी कोणी केले नाही पाहिजे ?

गरोदर महिलांनी धनुरासन केले नाही पाहिजे ,तसेच ज्या लोकांचे पोटाचे ऑपरेशन झाले आहे ,अशा लोकांनी देखील धनुरासन केले नाही पाहिजे.

आपण जर पहिल्यांदा धनुरासन करत असू ,तर आपण धनुष्य बाण मुद्रे मध्ये किती वेळ थांबले पाहिजे ?

आपण जर याआधी कधीच धनुरासन केले नसेल तर ,जेव्हा आपण पहिल्यांदा धनुरासन करू तेव्हा आपण १० ते १५ सेकंद धनुष्य बाण मुद्रे मध्ये थांबले पाहिजे आणि जसा जसा आपण धनुरासनचा सराव करू ,तसे तसे आपण आपल्या क्षमतेनुसार धनुष्य बाण मुद्रे मध्ये राहण्याचा कालावधी वाढवला पाहिजे.

नियमित धनुरासन करण्याचे कोणकोणते फायदे आहेत ?

नियमित धनुरासन करण्याचे बरेच फायदे आहेत. आपल्याला जर पाठीचा कणा दुखण्याचा त्रास असेल किंवा आपला जर पाठीचा कणा वाकलेला असेल ,तर आपण ही समस्या नियमित धनुरासन करून दूर करू शकतो. तसेच नियमित धनुरासन केल्याने आपल्या हाताची आणि पायाची बोटे मजबूत बनतात.

धनुरासन करण्याची उत्तम वेळ कोणती आहे ?

धनुरासन करण्याची उत्तम वेळ ही सकाळी सूर्योदय होण्यापूर्वीची आहे.

आजच्या लेखामध्ये आपण योगातील एका आसना विषयी म्हणजे “धनुरासन” विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण योगाचे महत्व, धनुरासन करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी, धनुरासन करण्याची क्रिया ,नियमित धनुरासन करण्याचे फायदे ,धनुरासन करण्यामागचे विज्ञान ,धनुरासन विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

1 thought on “धनुरासनची संपूर्ण माहिती Dhanurasana Information In Marathi”

Leave a Comment