दौलताबाद किल्याची संपूर्ण माहिती Daulatabad Fort Information In Marathi

Daulatabad Fort Information In Marathi आपल्या महाराष्ट्र राज्याला किल्ल्यांची एतहासिक देणगी लाभली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बरेच एतहासिक किल्ले आहेत आणि त्या प्रत्येक किल्ल्यांचा स्वतःचा स्वतंत्र असा गौरवशाली इतिहास आहे. आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित असलेल्या अशाच एका एतहासिक किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर आजच्या लेखाद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थित असलेल्या दौलताबाद किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Daulatabad Fort Information In Marathi

दौलताबाद किल्याची संपूर्ण माहिती Daulatabad Fort Information In Marathi

किल्ल्याचे नाव दौलताबाद किल्ला
जिल्हा छत्रपती संभाजीनगर
उंची २९७५ फूट
जवळील पर्यटन स्थळे घृष्णेश्वर मंदिर ,अजिंठा वेरूळ लेणी,बिबी का मकबरा,इत्यादी.

दौलताबाद किल्ला (Daulatabad fort in Marathi)

दौलताबाद किल्ला हा छत्रपती संभाजीनगर शहराच्या जवळ असून छत्रपती संभाजीनगर शहराचे अंतर दौलताबाद किल्ल्यापासून साधारण १५ किलो मीटर इतके आहे. इतिहासकारांच्या मते दौलताबाद किल्ल्याची निर्मिती १२ व्या शतकात करण्यात आली होती.

दौलताबाद किल्ला चढून वर जाण्यासाठी आपल्याला साधारण ७५० पायऱ्यांची मदत घ्यावी लागते. ह्या किल्ल्यावरून आसपासचा परिसर आपले मन मोहून टाकतो. दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव “देवगिरी” असे होते ,काही लोक आजही या किल्ल्याला “देवगिरी” नावानेच ओळखतात.

दौलताबाद किल्ल्याचा इतिहास (History of Daulatabad fort in Marathi)

दौलताबाद किल्ल्याची निर्मिती यादवांद्वारें ११८७ मध्ये करण्यात आली होती. त्याकाळी दिल्ली वर तुगलक यांची सत्ता होती आणि नंतर तुगलक यांच्या वंशांनी १३२७ मध्ये देवगिरी किल्ला जिंकून घेतला.

तूगलक सत्तेने जेव्हा दौलताबाद किल्ला जिंकला होता ,तेव्हा त्या किल्ल्याचे नाव “देवगिरी” असे होते आणि नंतर तुगलक यांनी देवगिरी किल्ल्याचे नाव बदलून “ दौलताबाद” असे केले होते. दौलताबाद किल्ला हा तुगलक सत्तेची राजधानी देखील होता ; परंतु त्याकाळी दौलताबाद किल्ल्याजवळ तुगलक सत्तेला पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागला ,त्यामुळे त्यांनी हा किल्ला सोडला.

दौलताबाद किल्ल्याची संरचना (Structure of Daulatabad fort in Marathi)

दौलताबाद किल्ल्याची उंची ही साधारण २९७५ फूट इतकी आहे. तुगलक सत्ते वेळी ह्या किल्ल्यावर भरपूर प्रमाणात तोफा होत्या आणि ह्या तोफा त्याकाळी किल्ल्याचे रक्षण शत्रू पासून करत होत्या. तुगलक यांचे जेव्हा ह्या किल्ल्यावर राज्य होते ,तेव्हा ह्या किल्ल्यावर ३० मीटर आकाराचा चांद मिनार देखील होता.

दौलताबाद किल्ल्याच्या आसपास असणारी काही पर्यटन स्थळे (tourists places near Daulatabad fort in Marathi)

तुम्ही जर दौलताबाद किल्ला पाहायला जाण्याची योजना बनवत असाल ,तर तुम्हाला दौलताबाद किल्ल्याच्या आसपास असणाऱ्या पर्यटन स्थळांविषयी माहिती माहीत असणे गरजेचे आहे. चला तर आपण आता दौलताबाद किल्ल्याच्या आसपास असणाऱ्या काही पर्यटन स्थळांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दौलताबाद किल्ल्याच्या आसपास असणारी काही पर्यटन स्थळे खालीलप्रमाणे :

१) अजंठा वेरूळ लेणी – अजंठा वेरूळ लेणी ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थित असून ही अजंठा वेरूळ लेणी दौलताबाद किल्ल्या पासून काही अंतरावरच स्थित आहे. आपल्या भारत देशातील सरकारने देशातील १२ प्रतिष्ठित पर्यटन स्थळांची सूची बनवली होती ,त्या सुचीमध्ये त्यांनी अजंठा वेरूळ लेनींचा समावेश केला होता.

२०१३ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील ७ आश्चर्यांची सूची बनवली होती आणि या सूचीमध्ये अजंठा वेरूळ लेणीला विशेष स्थान देण्यात आले होते. अजंठा लेणी ही बौद्ध धर्मातील इतिहासाचे वर्णन करते. जर तुम्ही दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी जाणार असाल तर तुम्ही ही दौलताबाद किल्ल्या पासून काही अंतरावर स्थित असलेली अजंठा वेरूळ लेणी पाहण्यासाठी नक्की जा.

२) घृष्णेश्वर मंदिर – आपल्या हिंदू धर्मामध्ये १२ ज्योतिर्लिंग यांना विशेष महत्व आहे. १२ ज्योतिर्लिंग पैकी एक ज्योतिर्लिंग हे दौलताबाद किल्ल्याच्या जवळ अजंठा वेरूळ लेणी जवळ आहे. घृष्णेश्वर मंदिर हे महादेवांचे मंदिर आहे. आपल्या हिंदू धर्मामधील पवित्र ग्रंथ असणाऱ्या महाभारत ,रामायण ,शिवपुराण इत्यादी ग्रंथांमध्ये या घृष्णेश्वर मंदिराचा उल्लेख केलेला आपल्या दिसतो.

हे मंदिर दौलताबाद किल्ल्यापासून ११ किलो मीटर च्या अंतरावर आहे. तुम्ही जर दौलताबाद किल्ला पाहण्याची योजना बनवत असाल तर तुम्ही दौलताबाद किल्ल्यापासून काही अंतरावर स्थित असलेले घृष्णेश्वर मंदिर पाहणे तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल.

३) बिबी का मकबरा – बिबी का मकबरा ही भव्य वास्तू दौलताबाद किल्ल्यापासून काही अंतरावरच स्थित आहे. बिबी का मकबराची निर्मिती औरंगजेबाच्या मुलाने केली होती ,औरंगजेबाच्या मुलाने आपल्या आईच्या स्मरणात बिबी का मकबरा या भव्य वास्तूची स्थापना केली होती.

काही लोक बिबी का मकबरा याला माराठवड्यातील “ताजमहल” देखील म्हणतात. तुम्ही जर दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी जायची योजना बनवत असाल तर ,दौलताबाद किल्ल्या सोबत तुम्ही बिबी का मकबरा ही वास्तू देखील पाहू शकता.

दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी उत्तम महिने (Best months to visit Daulatabad fort in Marathi)

तसे तर दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी वर्षाच्या बाराही महिन्यात पर्यटकांची अफाट गर्दी असते. दौलताबाद किल्ला हा एतहासिक किल्ला असल्यामुळे इथे भरपूर लोक भेट देत असतात. तसेच हा किल्ला ट्रेकर्स साठी देखील उत्तम मानला जातो ,त्यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी ट्रेकर्स देखील इथे नेहमी येत असतात.

तसे तर आपण वर्षाच्या कोणत्याही महिन्यात दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी जाऊ शकतो; परंतु काही लोकांच्या मते हिवाळ्यातील महिने हा किल्ला पाहण्यासाठी उत्तम मानले जातात.

दौलताबाद किल्ल्याच्या जवळचे रेल्वे स्टेशन (Nearest railway station from Daulatabad fort in Marathi)

दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ हे छत्रपती संभाजीनगर येथे आहे आणि छत्रपती संभाजीनगर येथे असणाऱ्या या रेल्वे मार्गाला राज्यातील मोठ्या शहरातील रेल्वे मार्ग जोडलेले आहेत. तुम्ही जर महाराष्ट्र राज्यामध्ये कोठेही राहत असाल तर, तुम्ही रेल्वे च्या मदतीने छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्टेशन मध्ये येऊ शकता आणि येथून पुढे लोकल गाड्यांच्या सहायाने दौलताबाद किल्ल्या जवळ पोहचू शकता.

दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ (Nearest Airport from Daulatabad fort in Marathi)

दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ हे दौलताबाद किल्ल्यापासून साधारण १० किलो मीटर च्या अंतरावर छत्रपती संभाजीनगर येथे स्थित आहे.

FAQ

दौलताबाद किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

दौलताबाद किल्ला हा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात स्थित आहे.

दौलताबाद किल्ल्याची निर्मिती कोणी केली होती ?

दौलताबाद किल्ल्याची निर्मिती यादवांद्वारे १२ व्या शतकामध्ये करण्यात आली होती.

दौलताबाद किल्ल्याची उंची किती फूट आहे ?

दौलताबाद किल्ल्याची उंची ही २९७५ फूट इतकी आहे.

दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते ?

दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव “देवगिरी किल्ला” असे होते.

दौलताबाद किल्ल्याच्या आसपास कोणकोणती पर्यटन स्थळे आहेत ?

दौलताबाद किल्ला हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थित आहे आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये बरीच पर्यटन आणि धार्मिक स्थळे आहेत ,ज्यामध्ये अजंठा वेरूळ लेणी,घृष्णेश्वर मंदिर,बिबी का मकबरा,इत्यादी स्थळांचा समावेश आहे.

दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ हे कोठे आहे ?

दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ हे छत्रपती संभाजीनगर येथे आहे.

दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे कोठे आहे ?

दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजीनगर येथे आहे.

दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी उत्तम महिने कोणते मानले जातात ?

दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी उत्तम महिने हे हिवाळ्याचे मानले जातात.

आजच्या लेखामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या दौलताबाद किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण दौलताबाद किल्ल्याचा इतिहास,दौलताबाद किल्ल्याची संरचना ,दौलताबाद किल्ल्या जवळ असणारी काही पर्यटन स्थळे ,दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आणि विमानतळ ,दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी असणारे उत्तम महिने ,दौलताबाद किल्ल्या विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment