डी फार्मसी कोर्सची संपूर्ण माहिती D Pharmacy Course Information In Marathi

D Pharmacy Course Information In Marathi फार्मास्युटिकल क्षेत्र दिवसेंदिवस प्रगती करत आहे आणि फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये नोकरीची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. फार्मास्युटिकल क्षेत्राच्या वाढत्या डिमांड मुळे बॅचलर ऑफ फार्मसी आणि डिप्लोमा इन फार्मसी हे दोन कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे.

D Pharmacy Course Information In Marathi

डी फार्मसी कोर्सची संपूर्ण माहिती D Pharmacy Course Information In Marathi

आजच्या लेखामध्ये आपण या दोन कोर्स पैकी एका कोर्स विषयी म्हणजे “डी फार्मसी” कोर्स विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे डी फार्मसी या कोर्स विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

कोर्स चे नाव डी फार्मसी
फुल्ल फॉर्म डिप्लोमा इन फार्मसी
कालावधी २ वर्ष
फी ५०,००० ते १,५०,०००
पात्रता निकष १२ वी सायन्स
कोर्स लेव्हल डिप्लोमा

फार्मास्युटिकल क्षेत्र (Pharmaceutical field in Marathi)

मागच्या दोन तीन वर्षापूर्वी आपण सर्वांनी कोरोना सारख्या महामारीचा सामना केला आहे. जेव्हा कोरोना महामारी मुळे संपूर्ण जग बंद पडले होते ,प्रत्येक कामधंदे बंद पडले होते ; तेव्हा काही मोजकेच विभाग चालू होते. या मोजक्याच क्षेत्रामध्ये फार्मास्युटिकल क्षेत्राचा देखील समावेश आहे. फार्मास्युटिकल क्षेत्र कोरोना सारख्या काळामध्ये देखील चालू होते.

फार्मास्युटिकल क्षेत्राची डिमांड दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि फार्मास्युटिकल क्षेत्राविषयी ज्ञान ग्रहण करण्यासाठी विद्यार्थी बॅचलर ऑफ फार्मसी आणि डिप्लोमा इन फार्मसी या दोन कोर्स साठी चांगल्या कॉलेज मध्ये एडमिशन घेतात आणि या कोर्स मध्ये फार्मास्युटिकल क्षेत्राचे ज्ञान घेऊन आपल्या करियर मध्ये पुढे प्रगती करतात.

आपण जर बॅचलर ऑफ फार्मसी किंवा डिप्लोमा इन फार्मसी ह्या दोन्ही कोर्स पैकी कोणताही एक कोर्स केला ,तर आपल्याला आपली स्वतःची मेडिकल टाकण्याचे देखील लायसन्स मिळते. आपण डिप्लोमा इन फार्मसी कोर्स पूर्ण करून चांगली नोकरी देखील करू शकतो किंवा स्वतःची मेडिकल टाकून स्वतःचा व्यवसाय देखील चालू करू शकतो.

डी फार्मसी फुल्ल फॉर्म (Full form of D pharmacy in Marathi)

डी फार्मसी चा फुल्ल फॉर्म “डिप्लोमा इन फार्मसी” असा होतो. हा कोर्स २ वर्षाचा असतो आणि या कोर्स च्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ४ सेमीस्टर असतात.

या ४ सेमीस्टर मध्ये पास झाल्यानंतर आपल्याला डिप्लोमा पूर्ण केलेले सर्टिफिकेट मिळते. या कोर्स च्या ४ सेमीस्टर मध्ये आपल्याला रसायनशास्त्र ,फार्मास्युटिकल संबंधी विषयांचे ज्ञान दिले जाते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला मेडिकल उघडण्याचे लायसन्स देखील मिळते.

डी फार्मसी कोर्स पूर्ण केल्यानंतर असणाऱ्या काही करियर च्या संधी (Career opportunities after completion of D pharmacy course in Marathi)

डी फार्मसी कोर्स पूर्ण केल्यानंतर करियर च्या संधी भरपुर आहेत. आपण जर चांगल्या कॉलेज मधून डी फार्मसी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले तर आपल्याला पुढे चांगली नोकरी लागू शकते ,तसेच आपण फार्मास्युटिकल संबंधी व्यवसाय देखील करू शकतो.

डी फार्मसी कोर्स पूर्ण केल्यानंतर असणाऱ्या करियर च्या काही संधी खालीलप्रमाणे आहेत :

१) डी फार्मसी कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण मेडिकल मध्ये काम करू शकतो.

२) तसेच डी फार्मसी कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण आपल्या शहरामध्ये छोट्या किंवा मोठ्या दवाखान्यामध्ये देखील नोकरी करू शकतो.

३) आपल्या भारत देशामध्ये फार्मास्युटिकल क्षेत्रासंबंधी भरपूर कंपन्या आहेत. तुम्ही डी फार्मसी कोर्स पूर्ण केल्यानंतर या मोठ मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी करू शकता. डी फार्मसीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला क्वालिटी कंट्रोलर ,प्रोसेस कंट्रोलर , मैण्युफॅक्चर हेड ,इत्यादी पदांची नोकरी लागू शकते.

४) डी फार्मसी कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही चिकित्सा प्रतिनिधी ची नोकरी देखील करू शकता.

५) तुम्ही डी फार्मसी कोर्स पूर्ण केल्यानंतर फार्मास्युटिकल क्षेत्रासंबंधी स्किल्स शिकले तर तुम्ही तुमचे करियर उज्वल बनवू शकता.

६) तुम्हाला जर डी फार्मसी कोर्स पूर्ण झाल्यानंतर फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये बॅचलर आणि मास्टर चे शिक्षण पूर्ण करायचे असेल तर ,तुम्ही डी फार्मसी कोर्स पूर्ण झाल्यानंतर बॅचलर ऑफ फार्मसी कोर्स साठी एडमिशन घेऊ शकता आणि बॅचलर ऑफ फार्मसी कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मास्टर ऑफ फार्मसी कोर्स करू शकता.

फार्मसी क्षेत्रामध्ये मास्टर चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्याला पुढे जाऊन चांगली नोकरी लागू शकते आणि आपण मास्टर ऑफ फार्मसी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर फार्मसी कॉलेज मध्ये प्रोफेसर ची नोकरी देखील करू शकतो.

डी फार्मसी कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला खालील पोस्ट साठी नोकरी लागू शकते :

१) क्लिनिकल फार्मसिस्ट

२) कम्युनिटी फार्मसिस्ट

३) फार्मसी असिस्टंट

४) हॉस्पिटल फार्मसिस्ट

५) मेडीसिन मॅनेजमेंट टेकनिशियन

डी फार्मसी कोर्स साठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for D pharmacy course in Marathi)

१) भारतामधील टॉप च्या कॉलेज मध्ये डी फार्मसी कोर्स साठी एडमिशन घेण्यासाठी त्यांची स्वतंत्र प्रवेश परीक्षा असते ,ज्यामध्ये आपल्याला चांगले मार्क्स पडले तरच आपल्याला त्या टॉप च्या कॉलेज मध्ये डी फार्मसी कोर्स साठी एडमिशन मिळते.

२) डी फार्मसी कोर्स साठी एडमिशन घेण्यासाठी आपले १२ वी सायन्स पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे आणि आपल्याला १२ वी मध्ये रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे दोन विषय असेल पाहिजेत.

३) तुम्हाला जर १२ वी सायन्स मध्ये चांगले मार्क्स पडले असतील ,तर तुम्हाला डी फार्मसी कोर्स साठी एडमिशन मिळण्याची शक्यता जास्त असते ,त्यामुळे डी फार्मसी कोर्स साठी एडमिशन घेण्यासाठी आपल्याला १२ वी मध्ये चांगले मार्क्स पाडणे गरजेचे असते.

FAQ

डी फार्मसी चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

डी फार्मसी कोर्स चा फुल्ल फॉर्म “डिप्लोमा इन फार्मसी” असा होतो.

डी फार्मसी हा किती वर्षाचा कोर्स आहे ?

डी फार्मसी हा २ वर्षाचा कोर्स आहे आणि या दोन वर्षांमध्ये ४ सेमीस्टर असतात.

जर माझे १२ वी चे शिक्षण आर्ट्स मधून झाले आहे तर ,मी डी फार्मसी कोर्स साठी एडमिशन घेऊ शकतो का ?

नाही तुम्ही डी फार्मसी कोर्स साठी एडमिशन नाही घेऊ शकत , डी फार्मसी कोर्स साठी एडमिशन घेण्यासाठी तुमचे १२ वी पर्यंतचे शिक्षण सायन्स विभागातून पूर्ण असले पाहिजे ,तेव्हाच तुम्ही डी फार्मसी कोर्स साठी एडमिशन घेऊ शकता.

डी फार्मसी कोर्स ची फी किती असते ?

डी फार्मसी कोर्सची फी ही कॉलेज वरती आधारित असते. आपण जर चांगल्या कॉलेज मध्ये डी फार्मसी कोर्स साठी एडमिशन घेणार असू ,तर आपली डी फार्मसी कोर्स ची फी जास्त असते ; पण जर आपण इतर कॉलेज मध्ये डी फार्मसी कोर्स साठी एडमिशन घेणार असू ,तर आपली डी फार्मसी कोर्स ची फी कमी असते ; परंतु साधारण डी फार्मसी कोर्स ची एका वर्षाची फी ही टॉप च्या कॉलेज मध्ये पन्नास हजार ते दीड लाख पर्यंत असते ,तर इतर कॉलेज मध्ये डी फार्मसी कोर्स ची फी ही ५०,००० च्या आत असते.

डी फार्मसी कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपण पुढे काय करू शकतो ?

डी फार्मसी कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपण पुढे बॅचलर ऑफ फार्मसी कोर्स साठी एडमिशन घेऊ शकतो आणि आपले बॅचलर चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण मास्टर ऑफ फार्मसी कोर्स साठी एडमिशन घेऊ शकतो. डी फार्मसी कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जर पुढे शिकण्याची इच्छा नसेल तर ,आपण डी फार्मसी नंतर नोकरी देखील करू शकतो किंवा आपला स्वतःचा व्यवसाय देखील चालू करू शकतो.

आजच्या लेखामध्ये आपण डी फार्मसी कोर्स विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण डी फार्मसी कोर्स चा फुल्ल फॉर्म ,डी फार्मसी कोर्स पूर्ण झाल्यानंतर असणाऱ्या करियर च्या संधी ,डी फार्मसी कोर्स साठी असणारी पात्रता निकष, डी फार्मसी कोर्स विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment