क्रिकेट खेळाची संपूर्ण माहिती Cricket Game Information In Marathi

Cricket Game Information In Marathi भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे आपल्या सर्वांच्या अवडतीचा क्रिकेट. या खेळात प्रत्येकी 11 खेळाडूंचे दोन संघ भाग घेतात. 16 व्या शतकात इंग्लंड मध्ये  या बॅट आणि बॉल खेळाचा शोध लागला. इतर संघांपेक्षा जास्त धावा करणे हे या खेळाचे ध्येय होय.

Cricket Game Information In Marathi

क्रिकेट खेळाची संपूर्ण माहिती Cricket Game Information In Marathi

सर्वोच्च संघटनाआयसीसी
उपनावद जंटलमन्स गेम
सुरुवात18 वे शतक
संघ सदस्य11 खेळाडू संघागणिक बदली खेळाडू केवळ जखमी किंवा आजारी खेळाडूसाठी
मिश्रहो, वेगळ्या स्पर्धा
वर्गीकरणसांघिक, चेंडफळी
साधनक्रिकेट बॅट, क्रिकेट चेंडू, यष्टी
मैदानक्रिकेट मैदान
ऑलिंपिक1900 उन्हाळी ऑलंपिक केवळ

क्रिकेटचा इतिहास || History of cricket :

13 व्या शतकात क्रिकेट ची सुरुवात झाली याचे व्यवस्थित पुरावे नाहीत. पण 16 व्या शतकातील क्रिकेट बद्दलचे पुरावे आढळले आहेत.ज्यामध्ये गील फोर्डच्या जमिनीवर क्रिकेट खेळला गेल्याचे सांगितले आहे.

सुरुवातीला क्रिकेट हा लहान मुलांचा खेळ आहे अशी समज होती.परंतु नंतर प्रौधांनी हा खेळ खेळण्यास सुरुवात केली असे 16 व्या शतकातील पुरव्यांमधून कळते. सुरुवातीच्या काळात अमेरिकेत क्रिकेटची ओळख झाली. सर्वात जुना सामना इंटर- पॉलिश मध्ये खेळवला गेला.

दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये 17 शतकाच्या सुमारास खेळाचा प्रसार झाल्याचे संदर्भ सापडतात. 1660 मध्ये इंग्लंडच्या जीर्णोद्धारानंतर क्रिकेट हा पहिला व्यावसायिक खेळ म्हणून पाहिला जाऊ लागला.क्रिकेट या खेळामध्ये 18 व्या शतकात बरेच परिवर्तन झाले. खेळाचा एक गडी हा प्रकार 1748 मध्ये लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर होता.

 सन 1760 मध्ये गोलंदाजीच्या तंत्रामध्ये मोठा बदल करण्यात आला. गोलंदाज आधी चेंडू घरंगळत टाकत पण नंतर गोलंदाज चेंडूचा टप्पा टाकू लागले. त्यामुळे बॅटच्या रचनेमध्ये सुद्धा बदल करण्यात आला कारण, उसळणाऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी आधुनिक बॅटची गरज होती.18 व्या शतकात तीन यष्टी असलेली खेलपट्टी आणि पायचीतचा समावेस असे नवीन नियम लागू झालेत.

क्रिकेट हा खेळ परदेशात पोहचवण्यात ब्रिटिश साम्राज्याचा महत्त्वाचा वाटा आहे.19 व्या शतकाच्या मध्यापर्यंत क्रिकेट भारतात येऊन लोकप्रिय झालेला.

21व्या शतकात ट्वेंटी20 या मर्यादित षटकांच्या प्रकाराची क्रिकेटमध्ये सुरुवात करण्यात आली. आणि हा प्रकार लवकरच लोकप्रिय झाला.

क्रिकेट खेळ आणि नियम || Cricket game and it’s rules :

क्रिकेट हा खेळ प्रत्येकी 11 खेळाडूंच्या दोन संघांमध्ये खेळला जातो. बॅट आणि चेंडूने खेळला जाणारा हा खेळ आहे. या खेळात एक संघ धावा करण्याचा प्रयत्न करत फलंदाजी करत असतो, तर दुसरा संघ गोलंदाजी करत असतो आणि धावा रोखण्याचा प्रयत्न करत असतानाच फलंदाजाला बाद करण्यासाठी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो.

क्रिकेट मध्ये प्रतिस्पर्धी संघापेक्षा जास्त धावा करणे हे या खेळाचे उद्दीष्ट असते. क्रिकेट खेळाचा काही प्रकारांमध्ये, प्रतिस्पर्धी संघाचे सर्व खेळाडू बाद करणे  सामना जिंकण्यासाठी गरजेचे असते, अन्यथा सामना अनिर्णित राहिला जातो.सामना सुरू होण्याआधी संघांचे कर्णधार नाणेफेक करतात, जो कर्णधार नाणेफेक जिंकतो त्याला फलंदाजी किंवा गोलंदाजी आधी करण्याची निवड करू अधिकार असतो.

क्रिकेटचे मैदान वर्तुळाकार किंव्हा लंबवर्तुळाकार असते आणि मध्यभागी आयताकार खेळपट्टी असते. मैदानाच्या कडेला सीमारेषा म्हणतात.आयाताकृती खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला लाकडी लक्ष्य असते त्याला यष्टी असे म्हणतात.या दोन यष्टिंमधले अंतर 20 मी. असते.या यष्ट्यांमध्ये दोन आडव्या बेल्स असतात.यातली एक बेल किंव्हा एखादी यष्टी खाली पडली तर खेळाडू बाद होतो.

खेळपट्टीचा दोन्ही बाजूला दोन फलंदाज असतात.क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील  एक गोलंदाज, दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या फलंदाजाकडे गोलंदाजी करत असतो.जो फलंदाज गोलंदाजांच्या बाजूला असतो त्याला नॉन – स्ट्रायकर म्हणतात.जो क्षेत्ररक्षण करणारा संघ असतो त्यातील एक खेळाडू,यष्टिरक्षक,स्ट्रायकरच्या यष्ट्यांमागे उभा राहत असतो आणि इतर 9 खेळाडू मैदानावर वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात.

या खेळात तीन पंच असतात त्यातील दोन पंच हे मैदानावर असता आणि तिसरा पंच हा समालोचनाच्या ठिकाणी असतो. खेळात पंचाचा कोणताही निर्णय मग तो चुकीचा निर्णय असला तरीही तोच अंतिम निर्णय मानला जातो. नेहमी सामन्याच्या स्वरूपावरून डाव आणि षटकांची संख्या ठरत असते.

क्रिकेट सामन्यांचे प्रकार || Types of cricket match :

व्यावसायिक क्रिकेट खेळामध्ये मुख्य तीन प्रकार पडतात.एक दिवसीय सामने, टेस्ट सामने व वीस-वीस षटकांचे सामने हे असे ते तीन प्रकार. एक दिवसांच्या खेळाच्या सामन्यात पन्नास षटकांचा खेळ असतो. एक दिवसीय सामन्यात प्रत्येक संघ एकदाच फलंदाजी करू शकतो.टेस्ट सामना हा पाच दिवसांचा असतो. ह्या प्रकारात प्रत्येक संघ दोनदा फलंदाजी करतो.  टेस्ट सामने हे कधीकधी अनिर्णित राहतात किंवा बरोबरीत राहतात. टेस्ट सामने हे फक्त दिवसा खेळले जातात. मर्यादित षटकांचे सामने हा प्रकार मात्र, दिवसा किंवा दिवस-रात्र असा खेळला जातो.

क्रिकेटमधील पोशाख आणि इतर माहिती || Cricket uniform and other information in marathi :

क्रिकेट या खेळात फलंदाज आणि गोलंदाज याना दुखापत होऊ नये म्हणून गरजेनुसार पोटाला कव्हर, हातात ग्लोव्हज, डोक्याला शिरस्त्राण, पायाला पॅड वापरतात. या खेळात पांढरा व तांबडा असे दोन रंगांचे चेंडू वापरले जातात.

या खेळात कोणत्याही खेळाडूच्या गैरशिस्त किंवा नियमबाह्य वर्तणुकीबद्दल त्या खेळाडूला दंडात्मक शासन केले जाते. क्रिकेट मध्ये चौकार, षटकार, एक रन, दुहेरी असे धावांचे प्रकार आहेत. नो बॉल, डेड बॉल आणि वाइड बॉल हे चेंडू फेकण्याचे प्रकार आहेत. कॅच, एल. बी. डब्ल्यू , स्टंप आऊट, क्लिन बोल्ड,व रनआऊट हे फलंदाज बाद होण्याचे प्रकार क्रिकेट या खेळात आहेत.

या खेळामध्ये खेळ खेळत असताना चहापान, विश्रांतीसाठी आणि जेवणासाठी वेळ देतात. दोन्ही संघांतील ज्या संघाच्या धावा जास्त होतात तो संघ विजयी म्हणून घोषित केला जातो. क्रिकेट संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला “सामन्याचा मानकरी” म्हणून किताब देतात.

अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) || International cricket council (ICC):

प्रत्येक देशात एक राष्ट्रीय क्रिकेट मंडळ असते. हे क्रिकेट मंडळ देशात खेळल्या जाणाऱ्या सामन्यांचे नियमन करते तसेच क्रिकेट मंडळाकडे राष्ट्रीय संघाची निवड करणे, मायदेशातील आणि परदेशातील दौऱ्यांचे आयोजन करणे ही जबाबदारीसुद्धा असते.

तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर एक समिती आहे. या आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीची स्थापना 15 जून 1909 रोजी लॉर्ड्स येथे झाली ,पण नंतर तिचे नाव “आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद” असे ठेवण्यात आले, या समितीचे मुख्यालय दुबई येथे आहे.ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे देश या समितीचे संस्थापक आहेत.

या क्रिकेट समितीचे एकूण 104 सदस्य आहे. ज्यातील 10 संपूर्ण सदस्य जे अधिकृत कसोटी सामने खेळू शकतात आणि, 24 सहयोगी सदस्य, 60 संलग्न सदस्य आहेत.आयसीसी क्रिकेट विश्वचषक यासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन आणि शासन करते.

सर्व अधिकृत कसोटी सामने, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तसेच ट्वेंटी20 सामने यासाठी लागणारे पंच आणि सामनाधिकारी आयसीसी नियुक्त करते. क्रिकेट या खेळाला अजूनही ऑलिंपिक मध्ये सामावून घेतलेले नाही.

भारतीय क्रिकेट संघ || Indian cricket team :

क्रिकेट हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे.

कसोटी खेळणाऱ्या संघापैकी एक भारतीय क्रिकेट संघ हा आहे. भारताने पहिला अधिकृत कसोटी सामना हा जून 25, 1932 रोजी खेळला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया) म्हणजेच बीसीसीआय ही भारतीय क्रिकेटची प्रशासकीय संघटना होय.

भारतीय क्रिकेट संघाने 1ला विश्वचषक हा 1975 साली जिंकला. तसेच संघाने आतापर्यंत एकूण 11 विश्वचषकांमध्ये सहभाग घेतलेला आहे. रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि शिखर धवन हे भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे कर्णधार आहेत.

FAQ

क्रिकेट खेळात प्रत्येक संघात किती सदस्य असतात?

क्रिकेट खेळात प्रत्येक संघात 11 सदस्य असतात.

भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे कर्णधार कोण आहेत?

भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि शिखर धवन हे तिघे आहेत.

क्रिकेट या खेळात एकूण किती पंच असतात?

क्रिकेट या खेळात एकूण तीन पंच असतात.

क्रिकेटचे मैदान कोणत्या आकाराचे असते?

क्रिकेटचे मैदान हे वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार असते.

आयसीसी ची स्थापना कधी झाली?

आयसीसी ची स्थापना 15 जून 1909 रोजी झाली.

निष्कर्ष || Conclusion:

क्रिकेट हा एक मैदानी आणि सांघिक खेळला जाणारा खेळ आहे. खरतर क्रिकेट खेळ हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे पण नंतर इतर देशांमध्येही हा खूप जास्त लोकप्रिय झाला.भारतात तर इतर कोणत्याही खेळापेक्षा क्रिकेटचे अधिक आकर्षण आहे. आज क्रिकेट हा जागतिक सर्वात लोकप्रिय खेळ बनला आहे.

Leave a Comment