नारळाच्या झाडाची संपूर्ण माहिती Coconut Tree Information In Marathi

Coconut Tree Information In Marathi आपण जेव्हा समुद्र किनारी कोकणामध्ये फिरण्यासाठी जातो तेव्हा ,तिथे आपल्याला भरपूर प्रमाणात नारळाची झाडे पाहायला मिळतात. नारळाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात आणि आजारी माणसाला नारळाचे पाणी दिले जाते.

Coconut Tree Information In Marathi

नारळाच्या झाडाची संपूर्ण माहिती Coconut Tree Information In Marathi

आजच्या लेखामध्ये आपण याच नारळाच्या झाडाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे नारळाच्या झाडाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

नाव नारळ
वैज्ञानिक नाव कोकोस न्युसिफेरा
जीवन काळ ६० वर्ष – ८० वर्ष
उंची ६० फूट – ८० फूट
हिंदी शब्द नारियल
इंग्रजी शब्द कोकोनट

नारळाचे झाड (Coconut tree in Marathi)

नारळाचे झाड हे पाम प्रजातीतील एक झाड आहे आणि नारळाच्या झाडाची उंची साधारण ६० फूट ते ८० फूट इतकी असते. नारळाच्या झाडाचा जीवन काळ हा साधारण ६० ते ८० वर्षा पर्यंत असतो. नारळाच्या काही प्रजातीतील झाडे १०० वर्षा पेक्षा जास्त काळ देखील टिकतात.

जास्तकरून नारळाचे झाड हे आपल्याला समुद्र किनारी पाहायला मिळते. भारतामध्ये नारळाचे झाड केरळ ,आंध्रप्रदेश या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. केरळ राज्यातच साधारण दीड करोड पेक्षा जास्त नारळाची झाडे आहेत.

नारळाचे वैज्ञानिक नाव “कोकोस न्युसिफेरा” असे आहे. नारळाला इंग्रजी भाषेमध्ये “कोकोनट” असे म्हणतात ,तर नारळाच्या झाडाला हिंदीमध्ये “नारियाल” असे म्हणतात. नारळाच्या झाडापासून तेलाची निर्मिती केली जाते ,तसेच नारळाच्या झाडाचा वापर साबण ,सौंदर्य संबंधी वस्तू बनवण्यासाठी केला जातो. फायबर बनवण्यामध्ये देखील नारळाच्या झाडाचा वापर केला जातो.

नारळ (Coconut in Marathi)

नारळाचे झाड हे जास्त करून दक्षिण मध्य आशियामध्ये आणि भारतीय प्रशांत महासागर च्या किनारी आढळले जाते. रिसर्च च्या मते नारळाचे तेल आणि नारळाचे पाणी हे आरोग्यासाठी चांगले असते आणि नारळ खाल्ल्याने आणि नारळाचे पाणी पिण्याने आपण तंदुरुस्त राहतो.

नारळाच्या झाडांना फांद्या नसतात आणि जास्तकरून नारळाची झाडे ही उष्ण वातावरणामध्ये उगवतात. काही प्रजातीतील नारळाच्या झाडांना ५ वर्षातच नारळ येऊ लागतात ,तर नारळाच्या झाडाच्या काही प्रजातींना १५ वर्षानंतर नारळ येऊ लागतात.

नारळाच्या झाडाला वर्षातील प्रत्येक महिन्यात नारळ लागतात ; परंतु मार्च ते जुलै महिन्यामध्ये नारळाच्या झाडांना लागणाऱ्या नारळाची संख्या जास्त असते. जगभरामध्ये इंडोनेशिया देशात नारळाचे उत्पादन मोठया प्रमाणावर होते. जगामध्ये नारळाच्या झाडांचे उत्पादन होण्यामध्ये भारत देश हा तिसऱ्या स्थानावर आहे.

नारळाच्या झाडाचे धार्मिक महत्व (Religious importance of Coconut tree in Marathi)

नारळाच्या फळाला “श्रीफळ” असे देखील म्हणले जाते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र गोष्टींपुढे “श्री” लावले जाते. नारळाचे देखील आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे. नारळाची निर्मिती ऋषी विश्वामित्र यांच्याद्वारे करण्यात आली होती ,अशी मान्यता आहे.

नारळाला भगवान शिवजी यांचे प्रतीक मानले जाते. नारळाच्या फळावर जे तीन डोळ्या सारखे छिद्र असतात ,त्या तीन छिद्रांना भगवान शिवजी यांचे डोळे असे संबोधले जाते ,तर नारळाचे जे केसर असते ,त्याला भगवान शिवजी यांच्या जटा म्हणून संबोधले जाते.

हिंदू धर्मीय लोक जेव्हा शुभ कार्याची सुरवात करतात ,तेव्हा ते त्या शुभ कार्याची सुरवात नारळ फोडून करतात. तसेच आपण जेव्हा कोणा प्रतिष्ठित व्यक्तीचा सत्कार करतो ,तेव्हा देखील आपण त्या प्रतिष्ठित व्यक्तीचा सत्कार श्रीफळ देऊन करतो.

नारळाच्या तेलाचे आणि नारळाच्या पाण्याचे फायदे (Benefits of Coconut oil and Coconut water in Marathi)

नारळाचे पाणी पिण्याने आणि आपल्या दैंनदिन आहारामध्ये नारळाच्या तेलाचा वापर केल्यामुळे आपले आरोग्य तंदुरुस्त राहण्यामध्ये आपली मदत होते. नारळाचे पाणी पिण्याचे आणि नारळाचे तेल खाण्याचे भरपूर फायदे आहेत ,त्यातील काही फायदे खालीलप्रमाणे :

१) नारळाच्या फळामध्ये व्हिटॅमिन बी आणि मिनरल चे प्रमाण जास्त असते ,त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला होतो.

२) नारळाच्या फळामध्ये पोटॅशियम आणि फायबर चे प्रमाण देखील जास्त असते ,त्यामुळे नारळाचे फळ खाल्यामुळे त्याचा फायदा आपल्याला होतो.

३) नारळाच्या फळामध्ये कॅलरीज देखील जास्त असतात आणि नारळाचे फळ खाल्यानंतर ते लगेच पचते देखील.

४) नारळाच्या फळामध्ये फायबर चे प्रमाण जास्त असल्यामुळे नारळाच्या फळाचे आपण नियमित सेवन केले तर ,त्याचा फायदा आपल्याला आपले वजन कमी करण्यामध्ये होतो.

५) आपल्याला जेव्हा कमजोर वाटते किंवा जेव्हा आपण आजारी पडतो ,तेव्हा आपण नारळाचे पाणी पितो. नारळाचे पाणी आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज चे काम करते.

६) नारळाचे पाणी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपली मदत करते.

७) आपल्याला जर उलटी होत असेल किंवा मळमळण्याचा त्रास होत असेल तर ,आपण नारळाचे फळ खाल्ले पाहिजे. नारळाचे फळ खाल्यामुळे आपल्याला होणारी उलटी येण्याची आणि मळमळण्याची समस्या दूर होण्यामध्ये मदत होते.

८) जर आपण दररोज नारळाचे फळ खाल्ले किंवा नारळाचे पाणी पिल्ले तर त्याने आपली हाडे मजबूत होण्यामध्ये आपली मदत होते.

९) नारळाचे फळ खाल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण देखील कमी होते.

१०) आपल्याला जर पचना संबंधी समस्या असतील तर ,आपण नारळाचे फळ नियमित खाल्ले पाहिजे किंवा नारळाचे पाणी पिले पाहिजे ,याने आपल्याला होणारी पचना संबंधी समस्या कमी होण्यामध्ये आपली मदत होते. 

नारळाच्या झाडाचे फायदे (Benefits of Coconut tree in Marathi)

आपल्याला नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा फायदा होतो. नारळाची जी फांदी असते ,तिचा वापर कागद ,फर्निचर बनवण्यासाठी केला जातो. तर नारळाच्या तेलाचा वापर त्वचेवर लावण्यासाठी केला जातो. नारळाचे तेल त्वचेवर लावल्याने त्वचे संबंधी आजार दूर होतात.

तसेच नारळाचे तेल आपण आपल्या केसांना लावले तर ,त्या नारळाच्या तेलामुळे आपल्या केसांची वाढ होण्यामध्ये आपली मदत होते. तसेच नारळाच्या फळांचा वापर स्वादिष्ट मिठाई आणि चटणी बनवण्यासाठी देखील केला जातो. काही ठिकाणी नारळाच्या पानांचा वापर घरांना झाकण्यासाठी देखील केला जातो.

FAQ

नारळाच्या झाडाचे वैज्ञानिक नाव काय आहे ?

नारळाच्या झाडाचे वैज्ञानिक नाव हे “कोकोस न्युसिफेरा” असे आहे.

जगामध्ये जास्तकरून नारळाचे झाड हे कोणत्या देशामध्ये आढळले जाते ?

जगामध्ये जास्तकरून इंडोनेशिया देशामध्ये नारळाची झाडे आढळली जातात. भारत देश हा नारळाच्या झाडांची सर्वात जास्त संख्या असण्यामध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.

नारळाच्या झाडांचा जीवन काळ हा किती वर्षांचा असतो ?

नारळाच्या झाडांचा जीवन काळ हा साधारण ६० वर्ष ते ८० वर्षा पर्यंतचा असतो. काही प्रजातीतील नारळाची झाडे ही १०० वर्षापेक्षा जास्त काळ देखील टिकतात.

नारळाच्या झाडांची उंची किती फूट असते ?

नारळाच्या झाडांची उंची साधारण ६० फूट ते ८० फूट इतकी असते.

नारळाच्या झाडांना किती वर्षानंतर फळे येऊ लागतात ?

नारळाच्या झाडाच्या काही प्रजातींना ५ वर्षानंतर फळे येऊ लागतात तर ,नारळाच्या झाडाच्या काही प्रजातींना १५ वर्षानंतर फळे येऊ लागतात.

भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त नारळाची झाडे आढळली जातात ?

भारतामध्ये केरळ राज्यामध्ये सर्वात जास्त नारळाची झाडे आढळली जातात.

नारळाच्या झाडाचा वापर कशासाठी केला जातो ?

नारळाच्या झाडाचा वापर खूप ठिकाणी केला जातो. तसेच नारळाचे पाणी पिने आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. नारळाच्या झाडाचा वापर साबण ,सौंदर्य संबंधी वस्तू, फर्निचर बनवण्यासाठी केला जातो. तर नारळाच्या तेलाचा वापर केस वाढवण्यासाठी आणि त्वचे संबंधी रोग दूर करण्यासाठी केला जातो. तसेच नारळाचे पाणी पिण्याने आपले आरोग्य तंदुरुस्त राहते.

आजच्या लेखामध्ये आपण नारळाच्या झाडाविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण नारळाचे धार्मिक महत्व ,नारळाच्या तेलाचे आणि नारळाचे पाणी पिण्याचे फायदे ,नारळाच्या झाडाचे फायदे,इत्यादी विषयाची संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण नारळाच्या झाडा विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे देखील पाहिली.

Leave a Comment