चंद्रशेखर आझाद यांची संपूर्ण माहिती Chandrashekhar Azad Information In Marathi

Chandrashekhar Azad Information In Marathi आपल्या भारत देशावर खूप काळ ब्रिटिशांनी राज्य केले. आपला भारत देश ब्रिटिश राजवटीपासून मुक्त होण्यासाठी भरपूर स्वांतत्र्य सेनानी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका स्वातंत्र्य चळवळीत महत्वाची भूमिका असणाऱ्या एका महान व्यक्तिमत्वाबद्दल म्हणजे “चंद्रशेखर आझाद ” यांच्या बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे चंद्रशेखर आझाद यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Chandrashekhar Azad Information In Marathi

चंद्रशेखर आझाद यांची संपूर्ण माहिती Chandrashekhar Azad Information In Marathi

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म आणि त्यांचे सुरवातीचे जीवन (Birth of Chandrashekhar Azad and his family in Marathi)

नाव चंद्रशेखर आझाद
जन्म २३ जुलै १९०६
जन्मस्थान मध्य प्रदेश
संघटना हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन
मृत्यू २७ फेब्रुवारी १९३१

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै १९०६ मध्ये मध्यप्रदेश राज्यातील भाभरा गावी झाला होता. त्यांचे खरे नाव ” चंद्रशेखर तिवारी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव “सीताराम तिवारी” होते. चंद्रशेखर आझाद यांच्या वडिलांची नोकरी गेली ,त्यामुळे त्यांच्या वडिलांना उत्तर प्रदेश राज्य सोडावे लागले होते आणि ते मध्य प्रदेश राज्यात राहू लागले.

इथेच चंद्रशेखर आझाद यांचा जन्म झाला. चंद्रशेखर आझाद यांचे संपूर्ण बालपण मध्यप्रदेश राज्यातील आदिवासी विभागात गेले होते. इथे चंद्रशेखर आझाद यांनी धनुर्विदीचे शिक्षण घेतले होते.

लहानपापासूनच चंद्रशेखर आझाद यांना देशभक्तीची आवड होती आणि जालियनवाला येथे झालेल्या बाग हत्याकांडाचा चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला होता. जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांडाची घटना घडली ,तेव्हा चंद्रशेखर आझाद हे बनारस मध्ये शिक्षण घेत होते.

या घटने नंतर चंद्रशेखर आझाद यांनी आपले पुढचे संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढण्यासाठी खर्च करण्याचे ठरवले. चंद्रशेखर आझाद यांना ब्रिटिशांची गुलामी करणे कदापी मान्य नव्हते. त्यांनी तरुण वयातच आपले जीवन देशासाठी अर्पण करण्याचे ठरवले होते. पुढे त्यांनी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता.

चंद्रशेखर यांची आझाद म्हणून ओळख (Identity of Chandrashekhar as Azad in Marathi)

महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या असहयोग आंदोलनामध्ये चंद्रशेखर आझाद यांना अटक झाली होती. जेव्हा चंद्रशेखर आझाद यांना जज समोर पेश करण्यात आले होते ,तेव्हा जज ने त्यांना पहिला प्रश्न विचारला होता की ,” तुझे नाव काय आहे ?” यावर चंद्रशेखर आझाद उत्तर देतात की ,” माझे नाव आझाद आहे” , पुढे जज दुसरा प्रश्न विचारतात की ,” तुझ्या वडिलांचे नाव काय आहे ?” ,यावर चंद्रशेखर आझाद उत्तर देतात की ,”माझ्या वडिलांचे नाव स्वातंत्र्य आहे”.

पुढे जज पुढचा प्रश्न विचारतात की ,” तुझ्या आईचे नाव काय आहे ? “, यावर चंद्रशेखर आझाद हे उत्तर देतात की ,” भारत माता ही माझी आई आहे “.चंद्रशेखर आझाद यांनी दिलेल्या सर्व उत्तरामुळे जज ना राग येतो आणि ते चंद्रशेखर आझाद यांना १५ बेल्ट मारण्याची शिक्षा सुनवतात.

चंद्रशेखर आझाद यांना ही १५ बेल्ट मारण्याची शिक्षा देऊन झाल्यानंतर त्यांना ३ आने दिले जातात. चंद्रशेखर आझाद हे दिलेले आने पोलिसाच्या चेहऱ्यावर फेकून मारतात. या घटने पासून चंद्रशेखर तिवारी यांना सर्वजण चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखू लागले होते.

सुरवातीला चंद्रशेखर आझाद यांनी महात्मा गांधीच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. महात्मा गांधी हे अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याची लढाई लढत होते. परंतु चंद्रशेखर आझाद यांना वाटले की, “आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर आपल्याला अहिंसेचा मार्ग न धरता, आपण हातात बंदूक घेऊन ब्रिटिशांशी हिंसेच्या मार्गाने लढले पाहिजे”. यासाठी ते बनारस येथे आले. येथे बनारस मध्ये चंद्रशेखर आझाद हे ” हिंदुस्थान प्रजातंत्र संघ ” या संस्थेत शामिल झाले.

काकोरी कांड (Kakori incident in Marathi)

काकोरी येथे झालेली घटना देशाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहे. त्यावेळी दहा लोकांनी कोकोरी येथे सरकारी रेल्वे लुटली होती. या काकोरी कांडंच्या बदल्यात रामप्रसाद बिस्मिल,अश्फाक खान , राजेंद्रनाथ लाहिडी आणि ठाकूर रोशन सिंह यांना ब्रिटिश सरकारकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन (Hindustan socialist Republican Association in Marathi)

या काकोरी कांडानंतर ब्रिटिश सरकारकडून चंद्रशेखर आझाद यांच्या गटातील सदस्यांना अटक करण्यात येत होते. ब्रिटिश सरकार चंद्रशेखर आझाद यांचा देखील पाठलाग करत होते ,परंतु चंद्रशेखर आझाद ब्रिटिशांच्या हाती सापडले नाहीत.

आपल्या गटातील लोकांना ब्रिटिश सत्ता अटक करत आहे ,त्यामुळे आपल्या गटातील सदस्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे ,यामुळे गटामध्ये नवीन सदस्य शामिल करण्यासाठी चंद्रशेखर आझाद हे लपून छपून दिल्लीच्या फिरोज शहा कोटला मैदानावर आले. इथे त्यांची भेट भगत सिंह यांच्याशी झाली.

इथे चंद्रशेखर आझाद यांनी गटामध्ये काही नवीन सदस्य शामिल केले आणि या गटाचे नाव बदलून “हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन” करण्यात आले आणि चंद्रशेखर आझाद हे या नवीन गटाचे “कमांडर इन चीफ” होते.

या गटातील सदस्यांनी काही क्रांतिकारी घटना केल्या होत्या,त्यामुळे ब्रिटिश सरकार या गटातील सदस्यांना पकण्यासाठी त्यांचा पाठलाग करू लागले.  १९२८ मध्ये सायमन कमिशन च्या विरोधात झालेल्या प्रदर्शनामध्ये लाला लजपतराय यांचे निधन झाले.

लाला लजपतराय यांच्या निधनाचा बदला म्हणून भगत सिंह,सुखदेव आणि राजगुरू यांनी लाहोर येथील पोलिस अधीक्षक जेपी सांडरस यांना मारण्याची योजना आखली आणि योजने नुसार राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस अधीक्षक जेपी सांडरस यांच्यावर गोळी झाडली आणि त्यांची हत्या करण्यात आली. ब्रिटिश पोलीस अधीक्षक जेपी सांडरस यांच्या हत्येनंतर ब्रिटिशांनी भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना पकडुन त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.

चंद्रशेखर आझाद यांचे निधन (Death of Chandrashekhar Azad in Marathi)

चंद्रशेखर आझाद यांच्या गटातील सदस्यांची संख्या हळू हळू कमी होऊ लागली. भगत सिंह,सुखदेव आणि राजगुरू यांच्या फाशीची शिक्षा ऐवजी त्यांना उमरकैद ची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करण्यासाठी चंद्रशेखर आझाद हे प्रयागराज येथे आले.  गुप्त खात्याकडून चंद्रशेखर आझाद हे प्रयागराज येथे आले आहेत, याची खबर ब्रिटिशांना समजली आणि त्यांनी चंद्रशेखर आझाद यांना पकडण्यासाठी पोलिसांची फौज पाठवली.

चंद्रशेखर आझाद ज्या पार्क मध्ये थांबले होते ,त्या पार्क ला ब्रिटिश पोलिसांनी घेरले आणि चंद्रशेखर आझाद यांनी आत्मसमर्पण करावे यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. परंतु चंद्रशेखर आझाद यांनी आत्मसमर्पण केले नाही. २० मिनिटे झालेल्या या लढाईमध्ये शेवट पर्यंत चंद्रशेखर आझाद यांनी आत्मसमर्पण केले नाही. शेवटी चंद्रशेखर आझाद यांनी स्वतःची स्वतः गोळी मारली आणि आपले जीवन संपवले. अशा या थोर क्रांतिकारकाचे निधन २७ फेब्रुवारी १९३१ मध्ये झाले.

FAQ

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म केव्हा झाला होता ?

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै १९०६ मध्ये मध्य प्रदेश येथे झाला होता.

चंद्रशेखर आझाद यांचे खरे नाव काय होते ?

चंद्रशेखर आझाद यांचे खरे नाव “चंद्रशेखर तिवारी ” होते.

चंद्रशेखर आझाद यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

चंद्रशेखर आझाद यांच्या वडिलांचे नाव “सीताराम तिवारी” असे होते.

चंद्रशेखर आझाद यांना आझाद नाव कसे पडले ?

महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या असाहयोग आंदोलनामध्ये चंद्रशेखर आझाद यांना अटक झाली होती. जेव्हा जज ने चंद्रशेखर आझाद यांना प्रश्न विचारला होता की ,”तुझे काय नाव आहे ?” ,यावर चंद्रशेखर आझाद उत्तर देतात की ,” माझे नाव आझाद आहे “.  तेव्हापासून चंद्रशेखर तिवारी यांना “चंद्रशेखर आझाद ” असे म्हणले जाते.

चंद्रशेखर आझाद यांचे निधन केव्हा झाले ?

चंद्रशेखर आझाद यांचे निधन २७ फेब्रुवारी १९३१ मध्ये झाले.

आजच्या लेखामध्ये आपण थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण चंद्रशेखर आझाद यांचा जन्म आणि त्यांचे सुरवातीचे जीवन ,चंद्रशेखर यांची आझाद म्हणून ओळख ,हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन संस्थेचे कार्य ,चंद्रशेखर आझाद यांचे निधन ,चंद्रशेखर आझाद यांच्या विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची माहिती पाहिली.

Leave a Comment