सीइटी परीक्षाची संपूर्ण माहिती CET Exam Information In Marathi

CET Exam Information In Marathi आपल्या भारत देशामध्ये बरेच विद्यार्थी सरकारी नोकरी मिळावी यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात ,आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका सरकारी नोकरी साठी घेतल्या जाणाऱ्या प्राथमिक परीक्षे विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे सरकारी नोकरी साठी घेतल्या जाणाऱ्या एका प्राथमिक परीक्षे विषयी म्हणजे सीइटी परीक्षे विषयी संपूर्ण माहिती पाहुयात.

CET Exam Information In Marathi

सीइटी परीक्षाची संपूर्ण माहिती CET Exam Information In Marathi

परीक्षेचे नाव सीइटी परीक्षा
फुल्ल फॉर्म कॉमन इलिजीबिलीटी टेस्ट
मराठी अर्थ सामान्य पात्रता परीक्षा
एजंसी राष्ट्रीय भरती एजंसी
विभाग बँकिंग ,रेल्वे ,एसएससी,इत्यादी.

सीइटी परीक्षा (CET exam in Marathi)

सीइटी परीक्षा ही एक प्रारंभिक परीक्षा आहे आणि या परीक्षे मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची निवड ही बँकिंग विभागामध्ये ,रेल्वे विभागामध्ये आणि एसएससी विभागामध्ये केली जाते. सीइटी परीक्षा ही प्रारंभिक परीक्षा असल्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विविध विभागासाठी त्या प्रत्येक विभागाची वेगळी स्वतंत्र मुख्य परीक्षा आणि मुलाखत चाचणी घेतली जाते आणि या सर्व चाचणी मध्ये जो उमेदवार उत्तीर्ण होतो त्याची निवड केंद्रातील गैर – राजपत्रित विभागातील विविध रिक्त पदांसाठी केली जाते.

केंद्रामधील गैर – राजपत्रित विभागातील ग्रुप सी आणि ग्रुप डी मधील पदांसाठी जेव्हा जागा सुटतात ,तेव्हा त्या सुटलेल्या जागा सीइटी परीक्षे द्वारे भरल्या जातात. ही सीइटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड मुख्य परीक्षा आणि मुलाखत चाचणी साठी केली जाते आणि त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड केंद्रामधील गैर – राजपत्रित विभागातील ग्रुप सी आणि ग्रुप डी मधील रिक्त पदांसाठी केली जाते.

सीइटी फुल्ल फॉर्म ( Full form of CET in Marathi)

सीइटी शब्दाचा इंग्रजी भाषेतील फुल्ल फॉर्म हा “कॉमन इलिजीबिलीटी टेस्ट” असा होतो तर ,सीइटी शब्दाचा मराठी अर्थ हा “सामान्य पात्रता परीक्षा” असा होतो. सीइटी परीक्षा ही एक राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे आणि ही परीक्षा “राष्ट्रीय भरती एजंसी” द्वारे आयोजित केली जाते.

या परीक्षे मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड मुख्य परीक्षा आणि मुलाखत चाचणी यासाठी केली जाते आणि या तिन्ही चाचणी मध्ये पास झालेल्या उमेदवाराची निवड ही केंद्र सरकारच्या गैर-राजपत्रित ग्रुप बी आणि ग्रुप सी पदासाठी केली जाते.

सीइटी परीक्षेचे आयोजन करण्यामागचा उद्देश्य (Motive of CET exam in Marathi)

आपल्या भारतामध्ये विविध सरकारी खात्यांसाठी वेगवेगळ्या प्राथमिक परीक्षा घेतल्या जातात आणि त्या प्रत्येक प्राथमिक परीक्षेची फी देखील जास्त असते. वेगवेगळ्या विभागातील विविध पदांसाठी वेगवेगळ्या प्राथमिक परीक्षा घेण्या ऐवजी त्या सर्व पदांसाठी एकच प्राथमिक परीक्षा घेण्यात यावी ,या उद्देश्याने सीइटी परीक्षा दरवर्षी दोन वेळा घेतली जाते.

विविध विभागातील वेगवेगळ्या प्राथमिक परीक्षा आयोजित करण्यासाठी खूप वेळ देखील द्यावा लागतो आणि उमेदवाराला विविध विभागातील वेगवेगळ्या प्रथिमक परीक्षांचे फॉर्म भरण्यासाठी खूप पैसे देखील खर्च करावे लागतात.

उमेदवारांना परीक्षा फी साठी जास्त पैसे खर्च करावे लागू नयेत आणि विविध विभागातील वेगवेगळ्या परीक्षांसाठी लागणारा वेळ देखील वाचेल ,हा सीइटी परीक्षा घेण्यामागचा मुख्य उद्देश्य आहे. सीइटी परीक्षेचा सिलॅबस हा एसएससी सीजीएल ,सीएचएसएल ,एमटीएस या परीक्षा सारखा असतो.

सीइटी परीक्षेसाठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for CET exam in Marathi)

सीइटी परीक्षा ही बँकिंग , रेल्वे आणि एसएससी विभागातील विविध पदांसाठी आयोजित केली जाते. १० वी उत्तीर्ण झालेला उमेदवार किंवा १२ वी उत्तीर्ण झालेला उमेदवार किंवा ग्रॅज्युएशन उत्तीर्ण झालेला उमेदवार देखील सीइटी परीक्षेचा फॉर्म भरून सीइटीची परीक्षा देऊ शकतो ; परंतु विविध पदांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सीइटी परीक्षेची पात्रता निकष ही वेगवेगळी असते.

सीइटी परीक्षा द्वारे घेण्यात येणाऱ्या काही पदांसाठी असणारी पात्रता निकष ही १० वी उत्तीर्ण अशी असते ,तर काही पदांसाठी असणारी पात्रता निकष ही १२ वी उत्तीर्ण अशी असते ,तर काही पदांसाठी असणारी पात्रता निकष ही ग्रॅज्युएशन उत्तीर्ण अशी असते. 

सीइटी परीक्षेची प्रक्रिया (Process of CET exam in Marathi)

सर्वात पहिल्यांदा तुम्ही जर सीइटी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी उत्सुक असाल तर ,जेव्हा पण “राष्ट्रीय भरती एजंसी” सीइटी परीक्षेची जाहिरात त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वर पब्लिश करेल ,तेव्हा ती जाहीरात तुम्ही व्यवस्थित रित्या पाहिली पाहिजे. त्यात सीइटी परीक्षेसाठी दिलेल्या निकष पात्रते मध्ये आपण बसत आहोत की नाही याची आपण खात्री केली पाहिजे.

त्यानंतर त्या जाहिरात मध्ये पुढे होणाऱ्या सीइटी परीक्षेचा फॉर्म भरण्याचा कालावधी दिला असेल ,तुम्ही जर सीइटी परीक्षेसाठी असणाऱ्या निकष पात्रते मध्ये बसत असाल तर तुम्ही सीइटी परीक्षेचा फॉर्म दिलेल्या कालावधी मध्ये भरला पाहिजे.

सीइटी परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर जेव्हा सीइटी परीक्षेची तारीख असेल त्याच्या काही दिवस आधी त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वर एडमीट कार्ड येईल ,ते एडमीट कार्ड आपण डाऊनलोड करायला हवे आणि परीक्षेला जाताना ते एडमीट कार्ड आपण सोबत नेले पाहिजे.

त्यानंतर जेव्हा तुम्ही परीक्षा द्याल त्यानंतर काही दिवसातच तुमचा सीइटी परीक्षेचा निकाल येईल ,तुम्ही जर सीइटी परीक्षे मध्ये उत्तीर्ण झालेला असाल तर ,तुम्ही विविध विभागातील पदांसाठी असणारी मुख्य परीक्षा आणि मुलाखत चाचणी देऊ शकता. जर तुम्ही दिलेल्या सीइटी परीक्षे मध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला नसाल तर ,तुम्ही पुढच्या वर्षी होणाऱ्या सीइटी परीक्षे साठी फॉर्म भरू शकता आणि दिवसरात्र मेहनत घेऊन पुढच्या वर्षी होणाऱ्या सीइटी परीक्षे मध्ये उत्तीर्ण होऊ शकता.

सीइटी परीक्षेचा सिलॅबस (Syllabus of CET exam in Marathi)

सीइटी परीक्षा ही १०० मार्क्स ची असते आणि या परीक्षेचा कालावधी हा ९० मिनिटांचा असतो. आपल्याला ९० मिनिटांमध्ये १०० प्रश्न सोडवायचे असतात , म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी ०.९ मिनिट इतका कालावधी मिळतो.

ह्या १०० प्रश्र्नांपैकी २५ प्रश्न हे सामान्य ज्ञान चे असतात ,तर २५ प्रश्न हे करंट अफेअर चे असतात आणि उरलेल्या ५० प्रश्र्नांपैकी २५ प्रश्न हे न्यूमेरिकल इलीजीबीलीटी चे असतात तर ,उरलेले २५ प्रश्न हे रिजनिंग चे असतात.

सीइटी परीक्षा संबंधी असणाऱ्या काही रोचक गोष्टी (Interesting Facts about CET exam in Marathi)

१) सीइटी परीक्षा ही वर्षातून दोनवेळा आयोजित केली जाते. ही परीक्षा राष्ट्रीय भरती एजंसी द्वारे आयोजित केली जाते.

२) ह्या परीक्षे साठी असणारी पात्रता निकष ही विविध पदांसाठी वेगवेगळी असते. १० वी उत्तीर्ण झालेले,१२ वी उत्तीर्ण झालेले आणि पदवी पूर्ण झालेले उमेदवार ही सीइटी ची परीक्षा देऊ शकतात.

३) सीइटी परीक्षा ही इंग्रजी आणि हिंदी या दोन मुख्य भाषे व्यतिरिक्त इतर १२ भाषेमध्ये आयोजित केली जाते.

४) सीइटी परीक्षा ही देशातील १००० पेक्षा जास्त केंद्रामध्ये आयोजित केली जाते ,तसेच देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये या परीक्षेचे केंद्र आहे.

५) सीइटी परीक्षे मध्ये मिळालेले गुण हे तीन वर्षांसाठी वैध असतात.

६) उमेदवार कितीही वेळा सीइटी ची परीक्षा देऊ शकतात आणि आपला सीइटी परीक्षेतील स्कोर वाढवू शकतात.

FAQ

सीइटी शब्दाचा फुल्ल फॉर्म काय आहे ?

सीइटी शब्दाचा फुल्ल फॉर्म हा “कॉमन इलिजीबिलीटी टेस्ट” असा होतो आणि मराठी भाषेमध्ये या शब्दाचा अर्थ “ सामान्य पात्रता परीक्षा” असा होतो.

सीइटी परीक्षा ही कोणा द्वारे आयोजित केली जाते ?

सीइटी परीक्षा ही “राष्ट्रीय भरती एजंसी” द्वारे आयोजित केली जाते.

वर्षातून कितीवेळा सीइटीची परीक्षा घेतली जाते ?

वर्षातून दोन वेळा सीइटीची परीक्षा घेतली जाते.

एक उमेदवार कितीवेळा सीइटीची परीक्षा देऊ शकतो ?

एक उमेदवार कितीही वेळा सीइटीची परीक्षा देऊ शकतो आणि आपला सीइटी परीक्षेचा स्कोर वाढवू शकतो.

सीइटी परीक्षेसाठी पात्रता निकष काय असते ?

सीइटी परीक्षेसाठी असणारी पात्रता निकष ही विविध पदांसाठी वेगवेगळी असते. काही पदांसाठी पात्रता निकष ही १० वी उत्तीर्ण अशी असते तर ,काही पदांसाठी पात्रता निकष ही १२ वी उत्तीर्ण अशी असते ,तर काही पदांसाठी पात्रता निकष ही ग्रॅज्युएशन उत्तीर्ण अशी असते.

आजच्या लेखामध्ये आपण बँकिंग ,रेल्वे आणि एसएससी विभागासाठी घेतल्या जाणाऱ्या प्राथमिक परीक्षे विषयी म्हणजे “सीइटी परीक्षे” विषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment