मांजर प्राण्याची संपूर्ण माहिती Cat Animal Information In Marathi

Cat Animal Information In Marathi आपण काही लोकांना मांजरे पाळताना पाहिले असेल. मांजर हा खूप प्रेमळ प्राणी आहे आणि मांजर प्राणी आपल्या घरातील उंदरे घराबाहेर काढण्यासाठी देखील आपली मदत करत असतात.

Cat Animal Information In Marathi

मांजर प्राण्याची संपूर्ण माहिती Cat Animal Information In Marathi

आजच्या लेखामध्ये आपण याच मांजर प्राण्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामध्ये आपण मांजर प्राण्या विषयी माहिती ,आंतरराष्ट्रीय मांजर दिवस ,मांजर प्राण्या विषयी काही रोचक गोष्टी ,मांजर या प्राण्या विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे मांजर या पाळीव प्राण्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

प्राण्याचे नाव मांजर
वैज्ञानिक नाव Felis catus
हिंदी नाव बिल्ली
इंग्रजी नाव कॅट

मांजर प्राणी (Cat animal in Marathi)

मांजर हा एक पाळीव प्राणी आहे आणि मांजराचे वैज्ञानिक नाव “Felis catus” असे आहे. मांजर प्राण्याला इतर प्राण्यांच्या तुलनेत प्रकाश कमी असताना देखील समोरचे स्पष्ट दिसते. मांजराची त्वचा खूप मुलायम असते. इतर प्राण्यांच्या तुलनेत मांजराचे दात हे खूप मजबूत असतात.

या दातांच्याच मदतीने मांजर उंदरांची आणि घरातील कीटकांची शिकार करत असतात. आपले घर उंदीर किंवा इतर कीटक अस्वच्छ करत असतात. मांजर हा प्राणी घरातील उंदरांची आणि कीटकांची शिकार करून आपले घर स्वच्छ करण्यामध्ये ते आपली मदत करतात.

काही लोकांना मांजरे पाळायला खूप आवडतात. मांजराची लहान पिल्ले दिवसभर संपूर्ण घरभर उड्या मारत खेळत असतात ,तसेच आपण जर त्याच्यापुढे बॉल फेकला तर ते मांजर त्या बॉल चा पाठलाग करते. आपल्या घरात उंदरे असतील ,तर काही मांजरे त्या उंदरांची शिकार करतात.

आपण जर गावी राहत असलो आणि आपण नवीन मांजराचे पिल्लू पाळण्यासाठी घरी आणले असेल तर ,आपण त्या लहान मांजराच्या पिल्लाचे गल्लीतील कुत्र्यापासून रक्षण केले पाहिजे ,कारण कुत्रा हा प्राणी मांजरांची शिकार करत असतो.

मांजर प्राण्याचे वर्णन (Description of Cats in Marathi)

मांजर प्राणी दिसायला खूप आकर्षित असतात. जगामध्ये विविध देशांमध्ये विविध रंगाचे मांजर आढळतात. परंतु जास्तकरून पांढऱ्या ,काळ्या आणि तांबड्या रंगाचे मांजर आपल्याला पाहायला मिळतात. काही मांजरे केसाळू असतात. मांजरांना दोन डोळे ,दोन कान ,एक नाक आणि चार पाय असतात. मांजरांच्या पायांना नखे असतात आणि या नखांच्या मदतीने मांजरे शिकार करतात, तसेच या नखांच्या मदतीने मांजरे आपले रक्षण देखील करतात.

प्राचीन काळात केली जात होती मांजरांची पूजा (Cats were worshiped in ancient times in Marathi)

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये प्रत्येक प्राण्याला देवाचा दर्जा दिला जातो. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये प्रत्येक प्राण्याची पूजा केली जाते ,याचप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृती मध्ये निसर्गातील प्रत्येक घटकाची देखील पूजा केली जाते. याचप्रमाणे प्राचीन काळामध्ये मांजरांची पूजा केली जात होती.

आंतरराष्ट्रीय मांजर दिवस (International Cat day in Marathi)

जगभरामध्ये दरवर्षी ८ ऑगस्ट ला “आंतरराष्ट्रीय मांजर दिवस” मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. “इंटरनेशल फंड फॉर एनिनल वेल्फेअर” संस्थेने सुरवातीला “आंतरराष्ट्रीय मांजर दिवस” दरवर्षी ८ ऑगस्ट ला साजरा करण्याची घोषणा केली होती.

तेव्हापासून जगाच्या विविध देशांमध्ये ८ ऑगस्टला “आंतरराष्ट्रीय मांजर दिवस” मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या “आंतरराष्ट्रीय मांजर दिवस” दिवशी जगभरामध्ये विविध मांजर प्राण्या संबंधी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

मांजर प्राण्या संबंधी काही रोचक गोष्टी ( Some Interesting Facts about Cats in Marathi)

१) इतर प्राण्यांच्या तुलनेत मांजर या प्राण्याला अंधारामध्ये दिसण्याची क्षमता जास्त असते. मांजराच्या डोळ्यामध्ये रोड नायट्रोजन नावाचे प्रोटीन असते , जे मांजराला कमी प्रकाशात देखील स्पष्ट दिसण्यासाठी मदत करते.

२) मांजर या प्राण्याची उडी मारण्याची क्षमता जास्त असते. मांजर प्राणी आपल्या उंचीच्या सहा पट उंचीवर उडी मारू शकते.

३) मांजर या प्राण्याला आळशी प्राणी समजले जाते आणि मांजर हा प्राणी दिवसामध्ये १५ ते २० तास झोप घेतो. मांजराच्या जीवन काळातील ७०% भाग हा झोप घेण्यातच निघून जातो.

४) मांजराच्या शरीरामध्ये ५०० हून अधिक मासपेशी असतात ,तर २०० हून अधिक हाडे मांजराच्या शरीरामध्ये उपलब्ध असतात. मांजराच्या शेपटी मध्ये २३ हाडे उपलब्ध असतात.

५) आतापर्यंत सर्वात जास्त जगणाऱ्या मांजराचा जीवन काळ हा ३८ वर्षांचा होता.

६) मिस्र देशातील एका पाळीव मांजराचा वेग हा ४८ किलो मिटर पर तास इतका होता.

७) साईप्रेस देशामध्ये उत्खनन खात्याने एक कबर शोधली होती ,ज्यामधे एका मानवाला आणि मांजराला साधारण ९००० वर्षां पूर्वी पुरण्यात आले होते.

८) मांजर हा प्राणी स्वतःची खराब झालेली त्वचा स्वतःच्या जिभेनेच स्वच्छ करतो.

९) मांजर हा प्राणी मांसाहारी अन्न ग्रहण करणारा प्राणी आहे ,तो घरातील कीटकांची आणि उंदरांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करत असतो. तसेच मांजर या प्राण्याला दूध प्यायला देखील आवडते.

१०) दोन लहान मांजरे जर एकत्र आली तर ,ती एकमेकांसोबत खेळताना ,भांडताना आपल्याला दिसतात.

११) घरी मांजर पाळण्याचा छंद हा खूप जुना आहे. पूर्वीच्या काळी देखील माणसे घरामध्ये मांजरे पाळत होती.

१२) प्राचीन काळातील विविध संस्कृती मध्ये मांजरांची पूजा केली जात होती. प्राचीन ग्रंथामध्ये मांजर या प्राण्याला दुर्गा देवीचे रूप मानले जात होते.

१३) मांजर प्राण्यांच्या समुहाला क्लाउडर म्हणले जाते.

FAQ

मांजर या प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे ?

मांजर या प्राण्याचे वैज्ञानिक नाव “Felis catus” असे आहे.

आंतरराष्ट्रीय मांजर दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

दरवर्षी ८ ऑगस्ट ला “आंतरराष्ट्रीय मांजर दिवस” साजरा केला जातो.

जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय मांजर दिवस कशा पद्धतीने साजरा केला जातो ?

आंतरराष्ट्रीय मांजर दिवस दरवर्षी जगातील विविध भागांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मांजर प्राण्या संबंधी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

आंतरराष्ट्रीय मांजर दिवस साजरा करण्याची सुरवात केव्हा झाली होती ?

वर्ष २००२ मध्ये आंतरराष्ट्रीय मांजर दिवस साजरा करण्याची सुरवात झाली.

आंतरराष्ट्रीय मांजर दिवस साजरा करण्याची प्रथा कोणी चालू केली होती ?

“इंटरनेशल फंड फॉर एनिनल वेल्फेअर” संस्थेने २००२ मध्ये आंतरराष्ट्रीय मांजर दिवस साजरा करण्याची प्रथा चालू केली होती.

मांजर शाकाहारी प्राणी आहे की मांसाहारी प्राणी आहे ?

मांजर हा प्राणी मांसाहारी अन्न ग्रहण करणारा प्राणी आहे आणि  मांजर हा प्राणी घरातील उंदरांची आणि कीटकांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करत असतात.

मांजरांच्या शरीरामध्ये किती मासपेशी असतात ?

मांजराच्या शरीरामध्ये ५०० हून अधिक मासपेशी असतात.

मांजरांच्या शरीरामध्ये किती हाडे असतात ?

मांजरांच्या शरीरामध्ये २०० हून अधिक हाडे असतात आणि मांजरांच्या शेपटी या अवयवा मध्ये २३ हाडे असतात.

मांजरांच्या समुहाला काय म्हणले जाते ?

मांजरांच्या समुहाला “क्लाउडर” असे म्हणले जाते.

मांजर हा प्राणी एका दिवसामध्ये किती तास झोप घेतो ?

मांजराला आळशी प्राणी समजले जाते आणि साधारण मांजर हा प्राणी एका दिवसामध्ये १५ ते २० तास एवढी झोप घेतो.

आजच्या लेखामध्ये आपण मांजर या पाळीव प्राण्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण मांजर प्राण्या विषयी माहिती ,आंतरराष्ट्रीय मांजर दिवस ,मांजर प्राण्या विषयी काही रोचक गोष्टी ,मांजर या प्राण्या विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment