सी.वी. रमण यांची संपूर्ण माहिती C.V. Raman Information In Marathi

C.V. Raman Information In Marathi वैज्ञानिकांच्या आविष्काराचे मुख्य उद्देश्य हे असते की ,” मानवी जीवन सरळ आणि सोपे व्हावे “. आपल्या भारतामध्ये भरपूर महान वैज्ञानिक होऊन गेले ,ज्यांनी मानव समाजाच्या हितासाठी वैज्ञानिक अविष्कारांची निर्मिती केली.

C.V. Raman Information In Marathi

सी.वी. रमण यांची संपूर्ण माहिती C.V. Raman Information In Marathi

आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका थोर वैज्ञानिका विषयी म्हणजे सी.वी.रमण यांच्या जीवना विषयी आणि त्यांनी केलेल्या कार्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे सी.वी.रमण यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

नाव सी.वी.रमण
जन्म ७ नोव्हेंबर १८८८
जन्मस्थान तिरुचिरापल्ली,तामिळनाडू
क्षेत्र वैज्ञानिक
पुरस्कार नोबेल पुरस्कार,भारतरत्न पुरस्कार
मृत्यू २१ नोव्हेंबर १९७०

सी.वी. रमण यांचा जन्म आणि त्यांचे प्रारंभिक जीवन (Birth of C.V.raman and his early life in Marathi)

सी.वी. रमण यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ मध्ये तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथे झाला होता. सी.वी. रमण यांचे पूर्ण नाव “चंद्रशेखर व्यंकट रमण” असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव “चंद्रशेखर रमानाथन अय्यर” हे होते ,तसेच त्यांच्या आईचे नाव “पार्वती अम्मल ” हे होते. सी.वी. रमण यांचे वडील हे गणित आणि फिजिक्स विषयाचे शिक्षक होते. सी.वी. रमण हे त्यांच्या आईवडिलांचे दुसरे पुत्र होते.

सी.वी.रमण यांच्या जन्मापूर्वी त्यांच्या वडिलांचे आर्थिक स्थिती इतकी चांगली न्हवती ;परंतु सी.बी.रमण हे जेव्हा चार वर्षाचे होते ,तेव्हा त्यांच्या वडिलांना म्हणजे चंद्रशेखर रमनाथन अय्यर यांना शिक्षकाची नोकरी लागली होती ,तेव्हापासून सी.वी.रमण यांच्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारली.

सी.वी.रमण यांना लहानपणापासूनच शिक्षणाचे महत्व पटले होते आणि ते अभ्यासात देखील हुशार होते. सी.वी.रमण हे आपल्या वडिलांची फिजिक्स आणि गणित विषयाची पुस्तके वाचत असत ,तसेच ते कॉलेज मध्ये असताना आपल्या मित्रांकडून फिसिक्स आणि गणिताची पुस्तके पैसे देऊन विकत घेत आणि ती पुस्तके ते वाचत असत. सी.वी.रमण यांना फीसिक्स आणि गणित हे दोन विषय आवडत होते.

सी.वी.रमण यांचे शिक्षण (Education of C.V.raman in Marathi)

सी.वी.रमण यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज मधून आपले बॅचलर पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सी.वी.रमण यांनी आपल्या कॉलेज मध्ये इंग्लिश आणि फिजिक्स विषयात खूप मेडल्स जिंकली होती. सी.वी.रमण हे अभ्यासात हुशार असल्यामुळे कॉलेज भर टॉपर म्हणून त्यांची ख्याती होती.

पुढे सी.वी.रमण यांच्या प्रोफेसर नी त्यांना इंग्लंड मध्ये जाऊन मास्टर चे शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला ; परंतु सी.वी.रमण यांची शारीरिक स्थिती ठीक नसल्यामुळे ते इंग्लंड येथे मास्टर डिग्री घेण्यासाठी गेले नाहीत. त्यांनी आपले मास्टर चे शिक्षण भारतातील प्रेसिडेन्सी कॉलेज येथे पूर्ण केले.

आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरवातीला आर्थिक क्षेत्रात अकाऊंट ची नोकरी केली. पुढे १९१६ मध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कोकलता मध्ये फिजिक्स विषयात प्रोफेसर ची नोकरी केली. इथेच प्रोफेसर ची नोकरी करत करत त्यांनी प्रकाशा सबंधित विविध गोष्टींवर रिसर्च केले.

सी.वी.रमण यांचे कार्य (Work of C.V.raman in Marathi)

सी.वी.रमण हे एक थोर वैज्ञानिक होते. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सी.वी.रमण यांनी सुरवातीला अकाऊंटटची नोकरी केली. पुढे ते कोलकता येथे सहायक महालेखाकार ची नोकरी करू लागले. नोकरी करत करत रिसर्च करण्यामध्ये खंड पडू नये ,म्हणून त्यांनी घरामध्ये एक छोटीशी प्रयोगशाळा तयार केली.

सी.वी.रमण हे आपली नोकरी करत करत. “Indian Association for Cultivation of Science” मध्ये रिसर्च देखील करत होते.सी.वी. रमण हे नोकरी वर जायच्या आधी ते लॅब मध्ये रिसर्च करण्यासाठी जात होते. पुढे १९१७ मध्ये त्यांना वाटले की ,”आपल्याला नोकरी आणि लॅब मधील रिसर्च ह्या दोन्ही गोष्टी करण्यासाठी वेळ पुरेनासा झालाय” ,तेव्हा त्यांनी आपली सरकारी नोकरी सोडली आणि त्यांनी आपला संपूर्ण वेळ रिसर्च करण्यासाठी देण्याचे ठरवले.

ऑप्टिक्स च्या क्षेत्रात केलेल्या शोधामुळे सी.वी.रमण यांना लंडन येथील ” रॉयल सोसायटी” चे सदस्य बनवण्यात आले होते. कोणत्याही वैज्ञानिकासाठी रॉयल सोसायटीचे सदस्य बनने ही खूप मोठी गोष्ट होती ,जी सी.वी.रमण यांनी कष्टाने मिळवली होती.

२८ फेब्रुवारी १९२७ मध्ये सी.वी.रमण यांनी ” रमण इफेक्ट” चा शोध लावला. या शोधाची घोषणा त्यांनी आंतरराष्ट्रीय न्युज चैनेल वर केली. १६ मार्च १९२८ मध्ये त्यांनी या इफेक्ट वर बँगलोर येथील विज्ञान संघात भाषण केले. पुढे जाऊन संपूर्ण जगातील लॅब मध्ये सी.वी.रमण यांनी शोध लावलेल्या ” रमण इफेक्ट” वरती रिसर्च करणे चालू झाले.

सी.वी.रमण यांनी विज्ञान क्षेत्रात केलेल्या अद्भुत कार्यामुळे १२२९ मध्ये त्यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विज्ञान क्षेत्राचे अध्यक्ष बनवण्यात आले. त्याच्या पुढच्याच वर्षी १९३० मध्ये त्यांच्या भौतिक विषयातील कार्यामुळे त्यांचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.

१९३४ मध्ये सी.वी.रमण यांना बँगलोर येथे स्थित भारतीय विज्ञान संस्थान चे डायरेक्टर बनवण्यात आले. १९४८ मध्ये त्यांनी या नोकरीतून निवृती घेतली.

सी.वी.रमण यांच्या कार्यासाठी त्यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान (Awards received by C.V.raman in Marathi)

सी.वी.रमण हे भारतातील एक थोर वैज्ञानिक होते आणि त्यांच्या कार्यासाठी त्यांना भरपूर पुरस्कार देखील मिळाले आहेत.

सी.वी.रमण यांच्या कार्यासाठी त्यांना मिळालेले काही पुरस्कार आणि सन्मान खालीलप्रमाणे आहेत :

१) सी.वी.रमण यांना लंडन येथील रॉयल सोसायटी चे सदस्य बनवण्यात आले होते.

२) २८ फेब्रुवारी १९२८ मध्ये सी.वी.रमण यांनी “रमण इफेक्ट” चा शोध लावला होता. या दिवसापासून दरवर्षी भारतामधे २८ फेब्रुवारी हा दिवस ” राष्ट्रीय विज्ञान दिवस” म्हणून साजरा केला जातो.

३) १९३० मधे भौतिक क्षेत्रात सी.वी.रमण यांच्या कार्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

४) १९५४ मध्ये भारत देशाचा सर्वोत्तम पुरस्कार असणारा भारतरत्न पुरस्कार सी.वी.रमण यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

सी.वी.रमण यांचे निधन (Death of C.V.raman in Marathi)

सी.वी.रमण यांनी भौतिक क्षेत्रात विविध शोध लावले .१९७० च्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये सी.वी.रमण यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना दवाखान्यात ॲडमिट करण्यात आले होते आणि २१ नोव्हेंबर १९७० मध्ये वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

FAQ

सी.वी.रमण यांचा जन्म केव्हा झाला होता ?

सी.वी.रमण यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ मध्ये तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथे झाला होता.

सी.वी.रमण यांचे पूर्ण नाव काय होते ?

सी.वी.रमण यांचे पूर्ण नाव “चंद्रशेखर व्यंकट रमण” असे होते.

सी.वी.रमण यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

सी.वी.रमण यांच्या वडिलांचे नाव “चंद्रशेखर रमानाथन अय्यर” असे होते.

सी.वी.रमण यांच्या कार्यासाठी त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत ?

सी.वी.रमण यांच्या कार्यासाठी त्यांना भरपूर पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या कार्यासाठी त्यांना भौतिक क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाला आहे ,तसेच १९५४ मध्ये भारत सरकारकडून भारत देशाचा सर्वोत्तम पुरस्कार असणारा भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

सी.वी.रमण यांचे निधन केव्हा झाले ?

ऑक्टोंबर १९७० मध्ये सी.वी.रमण यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि २१ नोव्हेंबर १९७० मध्ये वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

आजच्या लेखामध्ये आपण भारतरत्न आणि भौतिक क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळलेल्या थोर वैज्ञानिकाविषयी म्हणजे सी.वी.रमण यांच्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment