पक्ष्यांची संपूर्ण माहिती Birds Information In Marathi

Birds Information In Marathi आजच्या लेखामध्ये आपण दहा पक्ष्यांविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आजच्या लेखामध्ये आपण घार ,पोपट ,शमा पक्षी,राजहंस,घुबड ,बाज पक्षी, नीलपंख पक्षी ,बहिरी ससाणा,कावळा आणि चिमणी या दहा पक्ष्यां विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे या दहा पक्ष्यांविषयी  संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Birds Information In Marathi

पक्ष्यांची संपूर्ण माहिती Birds Information In Marathi

पक्ष्याचे नाव – वैज्ञानिक नाव घार Milvus migrans
पक्ष्याचे नाव – वैज्ञानिक नाव पोपट Psittaciformes
पक्ष्याचे नाव – वैज्ञानिक नाव शमा पक्षी Copsychus malabaricus
पक्ष्याचे नाव – वैज्ञानिक नाव राजहंस Phoenicopterus
पक्ष्याचे नाव – वैज्ञानिक नाव घुबड Strigiformes
पक्ष्याचे नाव – वैज्ञानिक नाव बाज पक्षी Accipiter striatus
पक्ष्याचे नाव – वैज्ञानिक नाव नीलपंख पक्षी Coracias benghalensis
पक्ष्याचे नाव – शास्त्रीय नाव बहिरी ससाणा Falco peregrinus
पक्ष्याचे नाव – वैज्ञानिक नाव कावळा Corvus spp
पक्ष्याचे नाव – वैज्ञानिक नाव चिमणी Passer domesticus

पक्षी (Birds in Marathi)

आपल्या निसर्गाचे संतुलन राखण्यामध्ये पक्ष्यांचा मोलाचा वाटा असतो. पक्षी हे निसर्गाची शोभा वाढवत असतात. जगभरामध्ये विविध देशामध्ये विविध प्रजातींचे पक्षी आढळतात. काही पक्षांना निसर्गाकडून विविध रंगांची देणगी मिळालेली असते. काही पक्ष्यांचे रंग आपले मन मोहून टाकतात.

जगभरामध्ये काही प्रजातींच्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तर पक्ष्यांच्या काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वर्तमानात उपलब्ध असणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातींचे आपण संवर्धन केले पाहिजे आणि त्यांच्या रक्षणासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.

आपल्या भारत देशामध्ये १२०० हून अधिक विविध प्रजातीचे पक्षी आढळले जातात. भारतामध्ये काही प्रजातींचे पक्षी हे मूळ भारताचे असतात ,तर काही पक्ष्यांच्या प्रजातींचे मूळ हे दुसऱ्या देशातील असते, तर पक्ष्यांच्या काही प्रजाती काही महिन्यांसाठी उडत उडत भारतामध्ये आलेल्या असतात आणि ते पक्षी काही महिने निघून गेल्यानंतर आपल्या मूळ जागी जातात.

चला तर मग भारत देशामध्ये आढळणाऱ्या १० पक्ष्यांच्या प्रजाती विषयी संपूर्ण माहिती पाहुयात.

१) घार – घार प्रजातीचे पक्षी भारत देशामध्ये मोठ्या संख्येमध्ये आढळले जातात. घार पक्षी आकाशात उंच भरारी घेतो आणि घार हा पक्षी छोट्या कीटकांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करत असतो. उंदीर आणि ससा हे घार पक्ष्याचे आवडते शिकार आहेत.

घार पक्षी उंच आकाशामध्ये गिरक्या घेत असतात. घार पक्षी हा आग आणि धुराकडे आकर्षित होत असतो. घार हा पक्षी जमिनीवर जिथे कचरा जास्त आहे ,जिथे घान जास्त आहे ,अशा ठिकाणी आढळला जातो. घार पक्षाला इंग्रजी मध्ये “ब्लॅक काईट” म्हणले जाते.

२) पोपट – पोपट हा पक्षी दिसायला खूप आकर्षित असतो. पोपट हा हिरव्या रंगाचा पक्षी आहे आणि पोपटाची चोच ही लाल रंगाची असते. पोपट पक्ष्याला नकल करण्याच्या गुणासाठी ओळखले जाते. पोपट पक्षी माणसांची नकल करतात ,तसेच पोपट हा पक्षी इतर प्राण्यांची देखील नकल करतात.

भारतामध्ये बऱ्याच लोकांना पोपट पाळण्याचा छंद आहे. पाळीव पक्ष्यांमध्ये सर्वात जास्त पोपट हा पक्षी पाळला जातो. पोपट पक्ष्याचा आवाज खूप गोड असतो. पोपट पक्षी हे झुंड मध्ये राहतात आणि पक्षी हे झुंड ने झाडावर राहतात. पोपट पक्ष्याला हिंदी मध्ये “तोता” असे म्हणले जाते ,तर पोपट पक्ष्याला इंग्रजी मध्ये “पैरट” असे म्हणले जाते.

३) शमा पक्षी – शमा पक्षी हे दिसायला खूप आकर्षित असतात. या शमा पक्ष्यांची विशेष गोष्ट अशी आहे की ,”शमा पक्ष्याची शेपटी इतर पक्षांपेक्षा आकाराने मोठी असते.”. शमा पक्ष्यांच्या प्रजाती ह्या जंगलामध्ये राहणे पसंद करतात.

४) राजहंस – या पक्षांच्या ५ प्रजाती जगभरामध्ये विविध ठिकाणी आढळल्या जातात. आपल्या भारतामध्ये ह्या पक्ष्याची “लेसर फ्लेमिंगो” ही प्रजाती आढळली जाते आणि भारतामध्ये या प्रजातीला “राजहंस” म्हणले जाते. राजहंस पक्षी हा एक आकर्षित पक्षी आहे आणि राजहंस पक्ष्याचा रंग हा लाल गुलाबी रंगाचा असतो.

५) घुबड – घुबड ह्या पक्ष्याला भारतामध्ये नकारात्मक नजरेने पाहिले जाते. आपल्या भारतीय समाजामध्ये घुबडाचे नाव घेणे देखील अपशकून समजले जाते. काही लोकांना घुबडाचे शरीर हे खूप भीतीदायक वाटते. घुबड पक्ष्याचा रंग हा पिवळ्या रंगांचा असतो. घुबड हे जुन्या झाडावर राहणे पसंद करतात. आपल्याला घुबड हे जास्तकरून रात्रीचे दिसतात ,कारण दिवसाचे घुबड हे आपल्या घरटात बसलेले असतात. घुबडाला इंग्रजी भाषेमध्ये “owl” म्हणले जाते ,तर घुबडाला हिंदी भाषेमध्ये “उल्लू” असे म्हणले जाते.

६) बाज पक्षी – बाज पक्षी हा मांसाहारी प्रकारातील पक्षी आहे आणि तो आपल्या पेक्षा छोट्या पश्यांची शिकार करून उदरनिर्वाह करत असतो. बाज पक्षी मेलेले पक्षी ,मासे देखील खातो. बाज पक्षी हा आकाशामध्ये उंच उडतो. बाज पक्ष्याला मागे छोटी शेपटी असते. बाज पक्षी हे आकाराने मोठ्या घरट्यामध्ये राहतात.

७) नीलपंख पक्षी – नीलपंख हे छोट्या आकाराचे पक्षी असतात. भारत देशामध्ये जास्तकरून दक्षिण भारतामधील पर्वतीय प्रदेशात नीलपंख पक्षी आढळतात. नीलपंख पक्ष्याच्या शरीराचा रंग हा निळ्या रंगाचा असतो ,तर त्याचे डोके देखील निळ्या रंगाचे असते. नीलपंख पक्षी छोट्या कीटकांना खाऊन आपला उदरनिर्वाह करत असतात आणि नीलपंख पक्षाचा आवाज हा कावळ्या सारखा कर्कश असतो.

८) बहिरी ससाणा – बहिरी ससाणा पक्षी हा खूप वेगवान असतो,जगातील सर्वात वेगवान पक्ष्यांपैकी बहिरी ससाणा हा एक पक्षी आहे. बहिरी ससाणा पक्ष्याचे शास्त्रीय नाव हे “Falco peregrinus” असे आहे. तो हवेमध्ये उंच उडू देखील शकतो आणि पाण्यामध्ये पोहू देखील शकतो. निसर्गाकडून बहिरी ससाणा पक्ष्याला उडण्याची आणि पोहण्याची देणगी मिळालेली आहे. बहिरी ससाणा पक्षी हा इतर पक्ष्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करत असतो. बहिरी ससाणा पक्षी हा हवेमध्ये देखील इतर प्राण्यांची शिकार करू शकतो.

९) कावळा – कावळा पक्षी हा काळ्या रंगाचा असतो आणि कावळ्याचा आवाज आपल्याला कर्कश वाटतो. कावळा पक्षी हा खूप बुद्धिमान पक्षी आहे ,तसेच कावळा पक्ष्याची जिज्ञासू पक्षी अशी ओळख आहे. आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये कावळ्याचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. कावळ्याला हिंदी भाषेमध्ये “कव्वा” म्हणले जाते ,तर कावळा पक्ष्याला इंग्रजी भाषेमद्ये “crow” म्हणले जाते.

१०) चिमणी – चिमणी हा पक्षी पिवळसर रंगाचा असतो. काही वर्षांपूर्वी चिमणी पक्षाची संख्या भारतामध्ये खूप जास्त होती ,आपल्याला आपल्या अंगणामध्ये त्याकाळी भरपूर प्रमाणात चिमण्या दिसत होत्या ;परंतु आजकाल आपल्या भारत देशामध्ये चिमण्यांची संख्या खूप कमी झाली आहे.

आपल्या भारत देशामध्ये चिमणी ह्या पक्ष्याच्या प्रजाती नष्ट होण्याच्या कगारीवर आहेत. चिमणी पक्ष्याला हिंदी भाषेमध्ये “चिडिया” म्हणले जाते ,तर चिमणी पक्ष्याला इंग्रजी भाषेमध्ये “Sparrow” असे म्हणले जाते.

FAQ

आपल्या भारत देशामध्ये किती प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आढळल्या जातात ?

आपल्या भारत देशामध्ये १२०० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळल्या जातात.

इंग्रजी भाषेमध्ये घार पक्षाला काय म्हणले जाते ?

घार पक्ष्याला इंग्रजी भाषेमध्ये “ब्लॅक काईट” असे म्हणले जाते.

घार पक्षाचे वैज्ञानिक नाव काय आहे ?

घार पक्ष्याचे वैज्ञानिक नाव “Milvus migrans” असे आहे.

कावळा पक्षाचे वैज्ञानिक नाव काय आहे ?

कावळा पक्ष्याचे वैज्ञानिक नाव “Corvus spp” असे आहे.

राजहंस पक्षाचे वैज्ञानिक नाव काय आहे ?

राजहंस पक्ष्याचे वैज्ञानिक नाव “Phoenicopterus” असे आहे.

आजच्या लेखामध्ये आपण भारत देशामध्ये आढळणाऱ्या दहा पक्ष्यांच्या प्रजाती विषयी संपूर्ण माहिती पाहिली. आजच्या लेखामधून आपण भारत देशामध्ये आढळणाऱ्या घार ,पोपट ,शमा पक्षी,राजहंस,घुबड ,बाज पक्षी, नीलपंख पक्षी ,बहिरी ससाणा,कावळा आणि चिमणी या दहा पक्ष्यां विषयी संपूर्ण माहिती पाहिली ,तसेच आपण या दहा पक्ष्यां विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे देखील आजच्या लेखामधून पाहिली.

Leave a Comment