भुजंगासनची संपूर्ण माहिती Bhujangasana Information In Marathi

Bhujangasana Information In Marathi असे म्हणतात की, “योग आणि आयुर्वेदिक हे निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याचा फॉर्म्युला आहेत”. आपल्या प्राचीन काळातील माणसांनी जंगलातील आणि आपल्या आसपास उपलब्ध असणाऱ्या जडी बुटी झाडांच्या सहायाने आयुर्वेदाचा शोध लावला होता. तसेच त्यांनी पशु – पक्ष्यांच्या मुद्रावर अभ्यास करून योगांचा शोध लावला होता.

Bhujangasana Information In Marathi

भुजंगासनची संपूर्ण माहिती Bhujangasana Information In Marathi

तसे तर योगाचे भरपूर प्रकार आहेत आणि प्रत्येक योगाचे भरपूर फायदे आहेत ; परंतु आजच्या लेखामध्ये आपण योगाच्या “भुजगांसन” या प्रकाराविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे भुजंगासन आसनाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

आसनाचे नाव भुजंगासन
कालावधी २० ते ३० सेकंद
फायदे अन्न पचण्यास मदत , शरीरातील मेटाबोलिस्म चे प्रमाण वाढण्यास मदत , पाठीचा कणा मजबूत होण्यामध्ये मदत, रक्तातील गाठी कमी होण्यामध्ये मदत , दम्या च्या रोग्यांसाठी फायदे,इत्यादी.

आयुर्वेद आणि योगाचे महत्व (Importance of Ayurveda and Yoga in Marathi)

“आयुर्वेद” आणि “योगा” ही भारत देशाने संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे. आज संपूर्ण जगाला आयुर्वेदाचे आणि योगाचे महत्व पटले आहे. आज संपूर्ण जगातील लोक नियमित योग करत आहेत आणि संपूर्ण जगातील लोक आपल्या आहारामध्ये आयुर्वेदिक घटकांचा वापर करत आहेत.

आपल्या भारतातील प्राचीन लोक नियमित व्यायाम करत होते ,तसेच ते आयुर्वेदिक झाडांचा वापर आपल्या आहारामध्ये करत होते. याचा फायदा होता की ,“आपल्या प्राचीन काळातील माणसे जास्त काळ जगत देखील होती आणि प्राचीन काळातील माणसे शरीराने मजबूत देखील होती”.

आताच्या काळात बऱ्यापैकी सर्व लोकांना वेगवेगळ्या आजारांचा त्रास आहे ,याचे मुख्य कारण हे की, “आजच्या काळातील माणूस पैसा कमवण्यामध्ये आणि यश प्राप्त करण्यामध्ये खूप व्यस्त झाला आहे. आजच्या युगातील माणसाला आपल्या आरोग्यासाठी वेळ द्यायला देखील वेळ पुरेणासा झालाय. त्यामुळे आजचा माणूस विविध आजारांनी ग्रस्त आहे.

आपल्याला जर आपले आयुष्य निरोगी आणि आनंदाने जगायचे असेल ,तर आपण आपल्या रोजच्या दिनचर्या मद्ये योगाचा वापर केला पाहिजे आणि जेव्हा आपण आजारी पडेल ,तेव्हा आपण गोळ्या औषधांसोबत आयुर्वेदिक औषधांचा देखील वापर केला पाहिजे. आपण जर आपल्या जीवनामध्ये नियमित योगाचा आणि आयुर्वेदाचा वापर केला तर आपण आपले पुढचे आयुष्य निरोगी आणि आनंदाने जगू शकतो.

भुजंगासन (Bhujangasana in Marathi)

सूर्य नमस्कार मद्ये एकूण १२ आसने आहेत ,त्यातील भुजगांसन हे ७ वे आसन आहे. भुजंगासनाला “कोब्रा आसन” असे देखील म्हणले जाते. या आसनामध्ये जमिनीवर झोपायचे असते आणि आपल्या पाठीला वरती आकाशाकडे मोडायचे असते. या आसनामध्ये आपले तोंड बरोबर समोर असते. या आसनामध्ये आपल्या शरीराचा आकार सापासारखा झालेला असतो ,त्यामुळे या आसनाला “सर्प मुद्रा” देखील म्हणले जाते.

भुजंगासन करण्याच्या अगोदर घ्यावयाची काळजी (Precaution to be taken before performing Bhujangasana in Marathi)

भुजंगासन हे आपण जेवल्यानंतर केले नाही पाहिजे. हे आसन आपण उपाशी पोटी केले पाहिजे किंवा जेवल्यानंतर ४,५ तासाने केले पाहिजे ; कारण जर आपल्या पोटातील अन्न पचले ,तर आपल्याला हे आसन करण्यासाठी योग्य ती एनर्जी मिळते.

भुजंगासन आसन करण्याची योग्य वेळ ही सकाळची मानली जाते ; परंतु काही कारणास्तव आपल्याला हे आसन सकाळचे करता आले नाही तर ,आपण हे आसन रात्रीचे देखील करू शकतो. आपण जर याआधी भुजंगासन कधीच केले नसेल तर आपण या सर्प मुद्रेमध्ये १० सेकंद पर्यंत थांबले पाहिजे आणि जशी जशी आपल्याला या आसनाची सवय होईल ,तसा तसा आपण हळू हळू या सर्प मुद्रेमध्ये राहण्याचा कालावधी वाढवला पाहिजे.

भुजंगासन करण्याची प्रक्रिया (The process of doing Bhujangasana)

१) सर्वात आधी हे आसन करण्यासाठी तुम्ही लवकर उठले पाहिजे ,जर तुम्हाला लवकर उठणे शक्य नसेल तर तुम्ही हे आसन दिवसातून कधीही करू शकता ,परंतु हे आसन करण्यापूर्वी तुम्ही या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की ,“हे आसन करताना किंवा करण्यापूर्वी तुम्ही ४ ते ५ तास आधी जेवले पाहिजे”. आपण जेवल्यानंतर हे लगेचच हे आसन केले नाही पाहिजे.

२) खाली जमिनीवर मैट किंवा चटई अंथरा. त्यावर झोपा.

३) नंतर तुमचा हात जमिनीवर टेकवा आणि आपल्या पाठीला आकाशाच्या दिशेला खेचा.

४) तुमची मुद्रा आता सापासारखी झाली असेल. या सर्प मुद्रेमध्ये २० ते ३० सेकंद थांबा.

५) अशा पद्धतीने तुम्ही भुजंगासन करू शकता.

भुजगांसन मागचे विज्ञान (Science behind Bhujangasana in Marathi)

भुजगांसन करणे हे इतर आसन करण्याच्या तुलनेत करण्यास सोपे असते. हे आसन कोणीही करू शकतो. नियमित भुजगांसन करण्याचे बरेच फायदे आहेत आणि आपण नियमित भुजगांसन केले पाहिजे.

आपल्या शरीरामध्ये एकूण ७ चक्रे असतात ,त्यातील हे आसन केल्यामुळे शरीरातील ४ चक्रे खुलण्यामध्ये मदत होते. नियमित भुजगांसन केल्यामुळे शरीरातील खुलणारे ४ चक्रे अनुक्रमे विशुद्धि चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र ,इत्यादी, हे आहेत.

भुजगांसन करण्याचे फायदे (Benefits of Doing daily Bhujangasana in Marathi)

तसे तर भुजगांसन करण्याचे बरेच फायदे आहेत ,त्यातील काही फायदे खालीलप्रमाणे :

१) आपण जर नियमित भुजगांसन केले तर आपल्या शरीराची लवचिकता वाढते ,तसेच आपल्या शरीरातील पाठीचा कणा मजबूत बनतो. आपल्याला पाठीचा कणा दुखण्याची समस्या असेल तर ,आपण भुजगांसन केले पाहिजे.

२) भुजगांसन केल्यानंतर आपल्याला असणारे पोटा संबंधी समस्यांचे प्रमाण कमी होते. या आसनामुळे आपल्या शरीरातील पोटाच्या खालचे अवयव मजबूत बनतात.

३) भुजगांसन नियमित केल्यामुळे आपल्या शरीरातील मेटाबोलिस्म चे प्रमाण वाढण्यास मदत होते.

४) भुजगांसन आसनामुळे आपल्याला खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते.

५) नियमित भुजगांसन केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताच्या गाठी असतील तर ,त्या गाठी दुरुस्त होण्यामध्ये आपली मदत होते.

६) दम्याचा आजार असणाऱ्यांसाठी नियमित भुजगांसन करणे फायद्याचे ठरते.

७) आपण जर भुजगांसन आसनाची क्रिया करताना आपले डोळे उघडे ठेवले तर, या आसनामुळे आपल्या डोळ्यांची बघण्याची क्षमता वाढण्यास मदत होते.

FAQ

सूर्यनमस्कार मद्ये किती आसने आहेत ?

सूर्यनमस्कार मद्ये एकूण १२ आसने आहेत.

भुजगांसन करण्याची योग्य वेळ कोणती मानले जाते ?

भुजगांसन करण्याची योग्य वेळ ही सकाळची मानली जाते. आपण दिवसामध्ये कधीही हे आसन करू शकतो ; परंतु आपण हे आसन जेवण केल्यानंतर ४ ते ५ तासानंतर केले पाहिजे.

भुजगांसन केल्यामुळे आपल्या शरीरातील कोणती चक्रे खुलण्यामधे मदत होते ?

नियमित भुजगांसन केल्यामुळे आपल्या शरीरातील चार चक्रे खुलण्यामधे मदत होते. भुजगांसन केल्यामुळे शरीरातील विशुद्धि चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र ,ही चार चक्रे खुलण्यामध्ये मदत होते.

आपण जर भुजगांसन पहिल्यांदा करत असेल तर ,आपण सर्प मुद्रेमध्ये किती वेळ थांबले पाहिजे ?

आपण जर भुजगांसन पहिल्यांदा करत असेल तर ,आपण सर्प मुद्रेमध्ये सुरवातीला २० ते ३० सेकंद थांबले पाहिजे आणि जशी जशी आपल्याला भुजगांसन करण्याची सवय होईल ,तसे तसे आपण सर्प मुद्रेचा कालावधी वाढवला पाहिजे.

भुजगांसन करण्याचे फायदे कोणकोणते आहेत ?

नियमित भुजगांसन करण्याचे बरेच फायदे आहेत. आपण नियमित भुजगांसन केल्यामुळे शरीरातील पाठीचा कणा मजबूत होण्यामध्ये मजबूत होते. तसेच हे आसन केल्यामुळे शरीरातील मेटाबोलिस्म वाढण्यामध्ये मदत होते. तसेच हे आसन केल्यामुळे रक्तात असणाऱ्या गाठी कमी होण्यामध्ये मदत होते. आपण जर नियमित भुजगांसन केले तर, आपले अन्न पचण्यास मदत होते.

आपल्याला जर आपले पुढचे आयुष्य निरोगी आणि आनंदाने जगायचे असेल तर ,आपण नियमित योग केले पाहिजेत. आजच्या लेखामध्ये आपण एका सोप्या आणि फायदेशीर आसना विषयी म्हणजे “भुजगांसन” आसना विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण आयुर्वेद आणि योगाचे महत्व, भुजंगासन करण्याच्या अगोदर घ्यावयाची काळजी ,भुजंगासन मागचे विज्ञान ,भुजंगासन करण्याची प्रक्रिया ,भुजंगासन करण्याचे फायदे ,भुजंगासन विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment