भगत सिंह यांची संपूर्ण माहिती Bhagat Singh Information In Marathi

Bhagat Singh Information In Marathi आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वांतत्र्य सेनांनी आपल्या प्राणाची पर्वा केली नाही.या स्वातंत्र्य लढ्यात काहीं लोकांनी अहिंसा चा मार्ग अवलंबला तर ,काही लोकांनी अहिंसेचा मार्ग अवलंबला. आजच्या लेखामध्ये आपण अशाच ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणाऱ्या एका स्वातंत्र्य सेनानी विषयी म्हणजे भगत सिंह यांच्या विषयी आणि त्यांच्या जीवनातील संघर्षांविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे शहीद भगत सिंह यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहुयात.

Bhagat Singh Information In Marathi

भगत सिंह यांची संपूर्ण माहिती Bhagat Singh Information In Marathi

नाव भगत सिंह
जन्म २७ सप्टेंबर १९०७
आईचे नाव विद्यावती कौर
वडिलांचे नाव सरदार किशन सिंह
मृत्यू २३ मार्च १९३२

भगत सिंह यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब ( Birth of Bhagat Singh and his family in Marathi)

भगत सिंह यांचा जन्म २७ सप्टेंबर १९०७ मध्ये झाला. भगत सिंह यांचा जन्म लायलपुर जिल्ह्यात झाला आणि हा लायलपुर जिल्हा वर्तमानात पाकिस्तान देशात आहे. भगत सिंह यांच्या वडिलांचे नाव ” सरदार किशन सिंह ” होते ,तर त्यांच्या आईचे नाव “विद्यावती कौर” होते.

भगत सिंह यांचे वडील सरदार किशन सिंह आणि त्यांचे काका अजित सिंग आणि श्वान सिंह हे आधीपासूनच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात शामिल होते. भगत सिंह यांच्या कुटुंबातील व्यक्ती आधीपासूनच स्वातंत्र्य लढ्यात शामिल होते ,त्यामुळे भगत सिंह यांना लहानपणापासूनच देशभक्ती चे वेड लागले होते. भगत सिंह यांच्या जीवनावर त्यांच्या वडिलांचा आणि दोन्ही काकांचा प्रभाव पडला होता.

भगत सिंह यांचा जन्म व्हायच्या आधी भगत सिंह यांचे वडील आणि त्यांचे काका हे जेल मध्ये होते. भगत सिंह यांचा जेव्हा जन्म झाला ,तेव्हा त्यांच्या वडिलांची आणि काकांची जेल मधुन सुटका झाली होती.घरातील दोन मुख्य मंडळी जेल मधुन सुटून आल्यानंतर घरामध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते ,घरातली सर्व मंडळी खूप होती.

भगत सिंह ( Bhagat Singh in Marathi)

भगत सिंह यांनी आपला भारत देश स्वतंत्र होण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे ,त्यांनी आपल्या देशातील तरुण पिढीसाठी नवा आदर्श स्थापित केला आहे ,आपल्या भारतातील तरुण पिढीने भगत सिंह यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्यांनी देश हिताची कामे केली पाहिजेत.

भगत सिंह यांनी डी.ए.वी शाळेतून नववी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि जेव्हा भगत सिंह दहावीत गेले ,तेव्हा त्यांच्या घरची मंडळी भगत सिंह यांचे लग्न करण्याचा विचार करू लागली. भगत सिंह यांनी विवाहाचा विचार ऐकून ते पळून लाहोर पासून कानपूर येथे आले.

परत भगत सिंह यांनी आपले पुढचे आयुष्य देशाच्या स्वातंत्र्लढ्यासाठी खर्च करायचे ठरवले.भगत सिंह हे जेव्हा १४ वर्षाचे होते ,तेव्हा त्यांनी पंजाब मधील काही क्रांतिकारी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता.भगत सिंह हे लाला लजपतराय यांच्या विचारांवर प्रभावित झाले होते.

भगत सिंह यांचे विचार ( Thoughts of Bhagat Singh in Marathi )

भगत सिंह यांना हिंदी ,उर्दू ,पंजाबी ,इंग्रजी आणि बांग्ला या भाषा येत होत्या. भगत सिंह हे जेव्हा जेल मध्ये होते तेव्हा ते त्यांचे विचार लेखाद्वारे देशवासीयांपुढे मांडत असत. भगत सिंह यांना वाटत होते की ,देशात धर्म  ,जात आणि पंथ यामुळे देशातील लोकांमधील आपापसातील आपुलकी कमी होत आहे”.त्यांनी या विषयीची बरीचशी लेख जेल मध्ये असताना लिहिली.

नौजवन भारत सभेची स्थापना ( Establishment of Naujavan Bharat Sabha in Marathi )

अमृतसर मध्ये १३ एप्रिल १९१९ मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा भगत सिंह यांच्या विचारांवर प्रभाव पडला. हा हत्याकांड जेव्हा झाला तेव्हा भगत सिंह हे कॉलेज मध्ये शिक्षण घेत होते. त्यांनी या हत्याकांडानंतर कॉलेज मधील शिक्षण सोडून नौजवान भारत सभेची स्थापना केली.

काकोरी कट (kakori in Marathi )

९ ऑगस्ट १९२५ मध्ये उत्तर प्रदेश राज्यातील काकोरी रेल्वे स्टेशन येथे क्रांतिकारकांनी सरकारी तिजोरी लुटली. “ह्या पैश्यातून हत्यारे खरेदी करायची  ,जेणेकरून त्या हत्यार्यांचा वापर पुढे जाऊन ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढण्यासाठी होईल”हा काकोरी रेल्वे स्टेशन वरची सरकारी तिजोरी लुटण्या मागचा मुख्य उद्देश होता. या काकोरी कटाचे नेतृत्व रामप्रसाद बिस्मिल यांनी केले होते.

या काकोरी कटाची गोष्ट जेव्हा ब्रिटिशांना समजते, तेव्हा ते रामप्रसाद बिस्मिल आणि त्यांच्या अन्य १६ सहकाऱ्यांनी अटक करून ,त्यातील काहींना फाशीची शिक्षा आणि काहींना कारावास ची शिक्षण सूनवतात. या काकोरी कटाचा देखील भगत सिंह यांच्यावर प्रभाव पडतो आणि ते चंद्रशेखर आझाद यांच्या “हिन्दुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन” या पार्टीत शामिल होतात.पुढे जाऊन या पार्टीचे नाव बदलून ते “हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन ” असे ठेवण्यात येते.

भगत सिंह ,राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा ( Bhagat Singh ,Rajguru and sukhdev were sentenced to death in Marathi )

१७ डिसेंबर १९२८ मध्ये भगत सिंह आणि सुखदेव यांनी मिळून लाहोर येथे ब्रिटिश सत्तेतील सहायक पोलिस अधीक्षक जेपी सांडर्स यांची हत्या केली होती. या हत्ये मध्ये चंद्रशेखर आझाद यांनी भगत सिंह यांची मदत केली होती. नंतर भगत सिंह यांनी बटुकेश्वर दत्त यांना घेऊन ८ एप्रिल १९२९ मध्ये दिल्लीतील अलीपुर रोड येथे पाच बॉम्ब फेकले होते.

या लाहोर मध्ये झालेल्या हत्तेची गोष्ट जेव्हा ब्रिटिशांना समजली ,तेव्हा त्यांनी भगत सिंह ,सुखदेव आणि राजगुरू यांना २३ मार्च १९३१ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली. खर तर ब्रिटिश सरकारने ही फाशीची शिक्षा २४ मार्च १९३१ रोजी देण्याचे सुनावले होते ,परंतु देशातील जनतेच्या भीतीने त्यांनी भगत सिंह,राजगुरू आणि सुखदेव यांना २३ मार्च च्या मध्यरात्री फाशीची शिक्षा दिली.

भगत सिंह आणि त्यांच्या सहकऱ्यांच्या मृत्यूनंतर देशामध्ये भारत देश स्वतंत्र्य होण्याची चळवळ तेजीने वाढू लागली. भगत सिंह यांनी आपले तरुण पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी खर्च केले आणि ते देशासाठी शहीद झाले. शहीद भगत सिंह यांच्या निधनानंतर देशाच्या स्वतंत्र चळवळी मध्ये तरुणांची संख्या वाढू लागली.

FAQ

भगत सिंह यांचा जन्म केव्हा झाला ?

भगत सिंह यांचा जन्म २७ सप्टेंबर १९०७ मध्ये लायलपुर जिल्ह्यात झाला आणि वर्तमानात हा लायलपुर जिल्हा पाकिस्तानात आहे.

भगत सिंह यांच्या आईचे नाव काय होते ?

भगत सिंह यांच्या आईचे नाव ” विद्यावती कौर” असे होते.

भगत सिंह यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

भगत सिंह यांचा वडिलांचे नाव “सरदार किशन सिंह” असे होते.

भगत सिंह यांनी कोणते कार्य केले ?

भगत सिंह यांनी आपल्या जीवनभर ब्रिटिश सत्ते विरुद्ध लढण्याचे काम केले. या ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी हिंसेचा मार्ग अवलंबला.

भगत सिंह यांनी कोणता नारा दिला होता ?

भगत सिंह यांनी ” इंकलाब झिंदाबाद ” हा नारा दिला होता.

भगत सिंह यांना अटक कोणत्या वर्षी झाली होती ?

भगत सिंह यांना अटक १९२८ मध्ये झाला होती.

भगत सिंह यांना फाशी कोणत्या वर्षी झाली होती ?

भगत सिंह यांना फाशी १९३१ मध्ये झाली होती.

भगत सिंह यांचे निधन त्यांच्या वयाच्या कोणत्या वर्षी झाले होते ?

भगत सिंह यांचे निधन २३ व्या वर्षी झाले होते.

आजच्या लेखामध्ये मध्ये आपण शहीद भगत सिंह यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली. आजच्या लेखामधून आपण त्यांनी केलेल्या कार्याविषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment