बीसीए कोर्सची संपूर्ण माहिती BCA Course Information In Marathi

BCA Course Information In Marathi सध्या आयटी क्षेत्रामध्ये संपूर्ण जग प्रगती करत आहे आणि आयटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची डिमांड देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आजच्या लेखामध्ये आपण अशाच आयटी क्षेत्राशी सबंधित असलेल्या एका कोर्स विषयी म्हणजे बीसीए कोर्स विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे बीसीए कोर्स विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

BCA Course Information In Marathi

बीसीए कोर्सची संपूर्ण माहिती BCA Course Information In Marathi

कोर्सचे नाव बीसीए कोर्स
फुल्ल फॉर्म बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन
कोर्सचा कालावधी ३ वर्ष
पोस्ट ग्रॅज्युएशन संधी एमसीए ,एमबीए

बीसीए कोर्स (BCA Course in Marathi)

बीसीए शब्दाचा फुल्ल फॉर्म “बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन” हा आहे. बीसीए कोर्स हा पदवी चा कोर्स आहे आणि ज्यांनी आपली बारावी विज्ञान क्षेत्रातून केली आहे आणि ज्यांच्या बारावीमध्ये त्यांना गणित हा विषय होता ,असे सर्व जण बीसीए कोर्स मध्ये एडमिशन घेऊ शकतात. वाढत्या आयटी क्षेत्रातील डिमांड मुळे बीसीए कोर्स साठी एडमिशन घेणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

बीसीए कोर्सचा कालावधी हा तीन वर्षाचा असतो ,या तीन वर्षांमध्ये सहा सेमीस्टर असतात आणि तुम्ही ह्या सर्व सेमीस्टर परीक्षा पास झाला ,तर तुम्हाला बीसीए कोर्स ची पदवी मिळते. ज्या विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात काम करण्याची आवड आहे ,ज्या विद्यार्थ्यांना कोडींग करण्याची आवड आहे ,अशा विद्यार्थ्यांसाठी बीसीए कोर्स हा चांगला पर्याय आहे.

बीसीए कोर्स च्या सिलॅबस मध्ये आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज शिकवल्या जातात ,ज्यामध्ये जावा ,पायथन , जावा स्क्रिप्ट ,एच टी एम एल ,इत्यादी सारख्या प्रोग्रामिंग लँग्वेज शामिल आहेत. आपण जर बीसीए कोर्स दरम्यान आयटी क्षेत्रात संबंधी कौशल्ये विकसित केलीत तर ,हा बीसीए कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला चांगली नोकरी देखील लागू शकते.

भविष्यामध्ये बीसीए कोर्स पूर्ण झालेल्या मुलांचे करियर उज्वल आहे कारण बीसीए कोर्स केल्यानंतर आयटी क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती करण्याच्या खूप संधी मिळतात.

बीसीए कोर्स साठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for BCA Course in Marathi)

सर्वात पहिल्यांदा बीसीए कोर्स मध्ये एडमिशन घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञान क्षेत्राची आवड असायला हवी ,जर आपल्याला आयटी क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड आणि उत्सुकता असेल ,तरच आपण पुढे जाऊन या क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतो. जर आपल्याला आयटी क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड नसेल आणि आपण दुसऱ्यांचा सांगण्यावरून किंवा भविष्यातील संधी बघून बीसीए कोर्स साठी एडमिशन घेतले तर, त्यात आपलेच नुकसान आहे.

बीसीए कोर्स साठी पात्रता निकष खालीलप्रमाणे असते :

१) बीसीए कोर्स साठी एडमिशन घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्ही विज्ञान शाखेतून बारावी चे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

२) नंतर बीसीए कोर्स साठी एडमिशन घेण्यासाठी तुम्हाला बारावी मध्ये ४५ % पेक्षा जास्त मार्क्स पडली असायला हवी.

३) नंतर बारावी मध्ये एकतर तुमचा विषय कॉम्प्युटर असावा किंवा गणित असावा. आपला जर बारावी मध्ये गणित ग्रुप नसून बायलोजी ग्रुप असेल ,तर बऱ्यापैकी सर्व बीसीए कोर्स असणाऱ्या कॉलेज मध्ये आपल्याला बीसीए कोर्स साठी एडमिशन भेटत नाही ; परंतु भारतामध्ये असे देखील काही कॉलेज आहेत जिथे बारावी मध्ये बायलोजी ग्रुप असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील बीसीए कोर्स साठी एडमिशन मिळते.

४) भारतातील टॉप च्या बीसीए कोर्स असणाऱ्या कॉलेज मध्ये त्यांची स्वतःची प्रवेश परीक्षा असते. ती प्रवेश परीक्षा आपण पास केली ,तरच आपल्याला त्या कॉलेज मध्ये बीसीए कोर्स साठी एडमिशन मिळते.

बीसीए कोर्स साठी असणारी फी (Fee for BCA Course in Marathi)

भारतामध्ये बीसीए कोर्स साठी असणारी फी ही प्रत्येक कॉलेज वरती आधारित असते. बीसीए कोर्स असणाऱ्या काही टॉप च्या कॉलेज मध्ये या कोर्स साठी फी जास्त असते. भारतामध्ये बीसीए कोर्स असणाऱ्या टॉप च्या कॉलेज मध्ये बीसीए कोर्सची एका वर्षाची फी ही १ लाख ते ५ लाखच्या दरम्यान असते. मोठ्या शहरांमध्ये असणाऱ्या कॉलेज मध्ये देखील बीसीए कोर्सची फी जास्त असते. बाकी इतर कॉलेज मध्ये बीसीए कोर्स साठी फी ही १५ हजार ते ५० हजारच्या दरम्यान असते.

बीसीए कोर्स केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याच्या संधी ( Post Graduation opportunity after BCA Course in Marathi)

आपल्याला जर बीसीए कोर्स नंतर जॉब करायचा असेल तर, आपण बीसीए कोर्स च्या मदतीने नोकरी देखील शोधू शकतो ; परंतु बीसीए कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला अजून पुढे शिकण्याची आवड असेल तर ,आपण खालील कोर्स मध्ये एडमिशन घेऊ शकतो :

१) एमसीए कोर्स – एमसीए कोर्स हा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे आणि हा कोर्स दोन वर्षांचा असतो. काही कॉलेज मध्ये ह्या कोर्स छा कालावधी हा तीन वर्षाचा असतो. बीसीए कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपण एमसीए कोर्स मध्ये एडमिशन घेऊ शकतो. एमसीए कोर्स करण्याचे फायदे खूप आहेत आणि एमसीए कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्या जॉब च्या खूप संधी उपलब्ध होतात.

एमसीए कोर्स केल्यानंतर जॉब च्या संधी खालीलप्रमाणे आहेत :

१) सॉफ्टवेअर इंजिनिअर

२) डेटा सायंटिस्ट

३) सॉफ्टवेअर टेस्टर

४) नेटवर्क इंजिनियर

२) एमबीए कोर्स – बीसीए कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण एमबीए कोर्स मध्ये देखील एडमिशन घेऊ शकतो. एमबीए हा मॅनेजमेंट चा कोर्स आहे ,त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट क्षेत्रात आवड आहे ,ते बीसीए कोर्स पूर्ण झाल्यानंतर एमबीए कोर्स मध्ये एडमिशन घेऊ शकतात.

एमबीए कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला मॅनेजमेंट क्षेत्रात नोकरी लागते. एमबीए कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण कंपनीचा एचआर देखील बनू शकतो.

बीसीए कोर्स पूर्ण केल्यानंतर जॉब च्या संधी (Jobs opportunity after completion of BCA Course in Marathi)

बीसीए कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला भरपूर जॉब च्या संधी उपलब्ध होतात. बीसीए कोर्स हा एक अंडर ग्रॅज्युएशन कोर्स आहे ,त्यामुळे आपण बीसीए कोर्स पूर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीच्या परीक्षा देऊ शकतो जसे की, MPSC ,UPSC,बँकिंग परीक्षा ,इत्यादी. या सरकारी नोकरीच्या परीक्षा देण्यासाठी आपले ग्रॅज्युएशन पर्यंत चे शिक्षण पूर्ण असणे गरजेचे असते. बीसीए कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपले ग्रॅज्युएशन पूर्ण होते ,त्यामुळे आपण ह्या सरकारी नोकरीच्या परीक्षा देऊ शकतो.

याव्यतिरिक्त बीसीए कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपण प्रायव्हेट सेक्टर मध्ये नोकरी करू शकतो.

बीसीए कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपण खालील नोकरीच्या पोस्ट साठी निवेदन करू शकतो :

१) डेटा अनालिस्ट

२) डेटा सायंटिस्ट

३) मशीन लर्निग इंजिनिअर

४) पॉवर बीआय डेव्हलपर

५) sql डेव्हलपर

६) सॉफ्टवेअर टेस्टिंग

FAQ

बीसीए शब्दाचा फुल्ल फॉर्म काय आहे ?

बीसीए शब्दाचा फुल्ल फॉर्म हा ” बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन” हा आहे.

बीसीए कोर्स हा किती वर्षाचा पदवी कोर्स आहे ?

बीसीए कोर्स हा तीन वर्षाचा पदवी कोर्स आहे.

बीसीए कोर्स साठी एडमिशन घेण्यासाठी पात्रता निकष काय आहे ?

बीसीए कोर्स साठी एडमिशन घेण्यासाठी आपण बारावी विज्ञान विभागातून पूर्ण केलेली असायला हवी ,तसेच बीसीए कोर्स साठी एडमिशन घेण्यासाठी आपल्याला बारावी मध्ये गणित किंवा कॉम्प्युटर विषयी असावा लागतो आणि आपल्याला बारावी मध्ये ४५% पेक्षा जास्त मार्क्स पडलेली असायला हवीत.

बीसीए कोर्स ची फी किती असते ?

साधारण भारतातील टॉप च्या बीसीए कोर्स असणाऱ्या कॉलेज मध्ये बीसीए कोर्स ची फी १ लाख ते ५ लाख च्या दरम्यान असते आणि इतर कॉलेज मध्ये बीसीए कोर्सची फी ही १५ हजार ते ५० हजारच्या दरम्यान असते.

आजच्या लेखामध्ये आपण आयटी क्षेत्राच्या सबंधित असणाऱ्या एका कोर्स विषयी म्हणजे “बीसीए कोर्स” विषयी संपूर्ण माहिती पाहिली.तसेच आजच्या लेखामध्ये आपण बीसीए कोर्स विषयी संपूर्ण माहिती ,बीसीए कोर्स मध्ये एडमिशन घेण्यासाठी असणारी पात्रता निकष ,बीसीए कोर्स पूर्ण झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन च्या संधी ,तसेच बीसीए कोर्स नंतर जॉबच्या संधी ,बीसीए कोर्स विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment