बाबा आमटे यांची संपूर्ण माहिती Baba Amte Information In Marathi

Baba Amte Information In Marathi बाबा आमटे हे एक थोर समाजसेवक होते ,त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य कुष्ठ रोग्यांची सेवा करण्यामध्ये घालवले ,तसेच त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये वन्य जीवन रक्षणासाठी अनेक आंदोलने केली.अशाच या थोर समाजसेवकाबद्दल म्हणजे बाबा आमटे यांच्याबद्दल आपण आजच्या लेखामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाद्वारे बाबा आमटे यांच्या जीवना विषयी विस्तार मध्ये माहिती पाहुयात.

Baba Amte Information In Marathi

बाबा आमटे यांची संपूर्ण माहिती Baba Amte Information In Marathi

बाबा आमटे यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब / Birth of Baba Amte and his Family in Marathi

बाबा आमटे यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ मध्ये महाराष्ट्र राज्यातील वर्धा येथे झाला.बाबा आमटे यांच्या वडिलांचे नाव देविदास आमटे होते ,तर त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आमटे होते.बाबा आमटे यांचे वडील सावकार होते ,त्यामुळे बाबा आमटे यांचे लहानपण मजेत गेले .

बाबा आमटे यांचे खरे नाव मुरलीधर आमटे असे होते ,परंतु त्यांचे आई वडील त्यांना प्रेमाने बाबा म्हणून हाक मारत आणि ह्याच बाबा नावाने पुढे ते ओळखू लागले.बाबा आमटे यांचे वडील देविदास आमटे हे त्याकाळचे ब्रिटिश काळातील जमीनदार होते ,त्यामुळे लहानपणी बाबा आमटे यांना कोणत्याच गोष्टीची कमी पडत नव्हती.असे म्हणतात की बाबा आमटे यांच्या घरी त्याकाळी बंदूक होती.

नाव –बाबा आमटे
जन्म –२६ डिसेंबर १९१४
जन्म स्थान –हिंगनघाट,वर्धा ,महाराष्ट्र
आईचे नाव –लक्ष्मीबाई आमटे
वडिलांचे नाव –देविदास आमटे
पत्नीचे नाव –साधना आमटे
शिक्षण –ख्रिश्चन मिशन स्कूल नागपूर , नागपूर युनिव्हर्सिटी
सहभाग घेतलेल्या आंदोलनाची नावे –भारत स्वतंत्र आंदोलन ,भारत जोडो आंदोलन ,
मृत्यू –९ फेब्रुवारी २००८

त्याकाळी महात्मा गांधी ,मदर तेरेसा यांच्यासारखी माणसे समाज सेवा करत होते ,यांच्यासारखे बाबा आमटे यांनी देखील आपले संपूर्ण आयुष्य कुष्ठ रोग्यांची सेवा करण्यामध्ये घालवले.

बाबा आमटे यांचे प्राथमिक शिक्षण आणि त्यांचा विवाह / Primary school of Baba Amte and his Marriage in Marathi

बाबा आमटे यांचे प्राथमिक शिक्षण नागपूर मधील ख्रिश्चन मिशन स्कूल मध्ये झाले आणि त्यांनी पुढे जाऊन नागपूर युनिव्हर्सिटी तून वकिली चे शिक्षण पूर्ण केले .बाबा आमटे यांच्या घरी चांगली परिस्थिती असल्यामुळे वकिलीचे काम मिळताना ही त्यांना जास्त त्रास झाला नाही आणि बाबा आमटे एक यशस्वी वकील झाले.

वर्ष १९४६ मध्ये बाबा आमटे यांचा विवाह साधना गुलशास्त्री नावाच्या मुलीशी झाला.पुढे जाऊन बाबा आमटे आणि साधना गुलशास्त्री यांना दोन मुले झाले आणि त्यांची नावे त्यांनी प्रकाश आमटे आणि विकास आमटे अशी ठेवली.

बाबा आमटे यांच्या समाजसेवेच्या कामामध्ये त्यांच्या पत्नीने त्यांना खूप मदत केली आणि बाबा आमटे यांची दोन्ही मुले डॉक्टर आहेत आणि आपल्या वडिलांनी कुष्ठ रोग्यांची सेवा करण्याचे काम केले ,तर त्यांची दोन मुले हे कुष्ठ रोग्यांची सेवा करण्याचे काम पुढे चालवत आहेत.

बाबा आमटे यांच्या घरची परिस्थिती चांगली होती ,तरीही बाबा आमटे यांना लोकांची सेवा करायला आवडत होते.बाबा आमटे हे विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांच्या विचारांशी प्रभावित झाले होते ,आणि बाबा आमटे यांनी त्या काळात झालेल्या स्वतंत्र लढ्यामध्ये सहभाग देखील घेतला होता.

बाबा आमटे यांनी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशातील खेडे पाड्यांची यात्रा केली होती ,आणि खेडे पाड्यातील लोकांच्या समस्या काय आहे ?याची माहिती बाबा आमटे यांनी घेतली होती.इंग्रजांना भारत देशातून बाहेर काढण्यासाठी ८ ऑगस्ट १९४२ मध्ये चालू झालेल्या भारत छोडो आंदोलनामध्ये बाबा आमटे यांनी सहभाग घेतला होता ,बाबा आमटे हे पेशाने वकील होते ,आणि या काळात त्यांनी देशातील वकील लोकांना एकत्रित करण्याचे काम केले.

कुष्ठ रोग्यांच्या सेवेसाठी आनंदवन ची स्थापना / Established Anandavan to serve leprosy patients in Marathi

बाबा आमटे यांनी जेव्हा एका कुष्ठ रोग्याला बघितले , तेव्हापासून बाबा आमटे यांचे आयुष्य बदलले.त्याकाळी आपला समाज कुष्ठ रोगांपासून लांब पळत होता , त्याकाळचा समाज कुष्ठ रोग झालेल्या व्यक्तीला वाळीत टाकत असे,तो त्या कुष्ठ रोगी व्यक्तीच्या जवळ देखील जात नसे ,त्यामुळे ज्या व्यक्तीला कुष्ठ रोग झाला आहे ,त्या व्यक्तीचे खच्चिकरण होई ,इथून पुढचे आपले संपूर्ण आयुष्य कुष्ठ रोग्यांसाठी लढायचे असे बाबा आमटे यांनी ठरवले आणि बाबा आमटे यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी वकिलीची नोकरी सोडली आणि त्यांनी आपले पुढचे आयुष्य कुष्ठ रोग्यांच्या सेवा करण्यासाठी घालवायचे ठरवले आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

बाबा आमटे यांनी कुष्ठ रोग्यांसाठी आनंदवन नावाच्या आश्रमाची स्थापना केली आणि या आनंदवन नावाच्या आश्रमात आज देखील कुष्ठ रोग्यांवरती मोफत उपचार होते आहेत ,तसेच कुष्ठ रोगी यांना या आनंदवन आश्रमामध्ये कर्मयोगी देखील बनवले जाते.आनंदवन व्यतिरिक्त बाबा आमटे यांनी अन्य काही आश्रमाची देखील स्थापना केली , ज्याला त्यांनी सोमनाथ ,अशोकवन असे नावे दिली.

भारत जोडो यात्रा / Bharat Jodo Yatra in Marathi

बाबा आमटे यांनी देशातील लोक एकत्र यावीत म्हणून वर्ष १९८५ मध्ये भारत जोडो यात्रा केली आणि ही यात्रा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत होती.याव्यतिरिक्त बाबा आमटे यांनी वर्ष १९८८ मध्ये दुसरी भारत जोडन्यासाठी ,भारत जोडो यात्रा केली ,आणि ही यात्रा आसाम पासून गुजरात पर्यंत होती.

बाबा आमटे यांचे साहित्य / Literature of Baba Amte in Marathi

बाबा आमटे यांना समाजेसेवेमध्ये आवड तर होतीच ,परंतु याउलट त्यांना लिखणामध्ये देखील आवड होती ,बाबा आमटे यांनी त्यांनी स्वतः लिहिलेले बरेच काव्यसंग्रह आणि कादंबऱ्या प्रकाशित देखील केल्या आहेत.यातल्या बाबा आमटे यांनी लिहिलेल्या दोन काव्यसंग्रह यांना त्यांनी ज्वाला आणि फुले असे नाव दिले होते.याचोसबत त्यांनी “उज्ज्वल उद्यासाठी” नावाचे काव्यसंग्रह देखील लिहिले.

बाबा आमटे यांना मिळालेले पुरस्कार / Awards get by Baba Amte in Marathi

बाबा आमटे यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कुष्ठ रोग्यांची सेवा केली ,त्यांच्या या चांगल्या कामासाठी त्यांचा सन्मान म्हणून त्यांना भारत सरकारकडून भरपूर पुरस्कार देखील मिळाले आहेत.वर्ष १९७१ मध्ये बाबा आमटे यांच्या कामासाठी त्यांना भारत सरकार कडून पद्मश्री पुरस्कार मिळाला ,तर १९७८ मध्ये त्यांच्या कामाचा सन्मान म्हणून त्यांना राष्ट्रीय भूषण हा पुरस्कार मिळाला आणि वर्ष १९८६ मध्ये भारत सरकारकडून बाबा आमटे यांचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

बाबा आमटे यांचे निधन / Death of Baba Amte in Marathi

९ फेब्रुवारी २००८ मध्ये वयाच्या ९४ व्या वर्षी थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे निधन झाले .परंतु बाबा आमटे यांनी कुष्ठ रोग्यांची सेवा करण्याचे चालू केलेले काम आजही त्यांचा मुलगा प्रकाश आमटे पुढे चालवत आहेत आणि आजही डॉक्टर प्रकाश आमटे हे आनंदवन मध्ये कुष्ठ रोग्यांची सेवा करत आहेत.

FAQ

बाबा आमटे यांचे खरे नाव काय होते ?

बाबा आमटे यांचे खरे नाव मुरलीधर आमटे हे होते.

बाबा आमटे हे कोण होते ?

बाबा आमटे हे एक थोर समाजसेवक होते आणि त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य कुष्ठ रोग्यांची सेवा करण्यासाठी खर्च केले.

बाबा आमटे यांचा जन्म केव्हा झाला?

बाबा आमटे यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ साली महाराष्ट्र राज्यातील वर्धा येथील हिंगणघाट येथे झाला.

बाबा आमटे यांच्या आईचे नाव काय होते ?

बाबा आमटे यांच्या आईचे नाव “लक्ष्मीबाई आमटे ” हे होते.

बाबा आमटे यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

बाबा आमटे यांच्या वडिलांचे नाव “देविदास आमटे ” हे होते.

बाबा आमटे यांच्या पत्नीचे नाव आणि त्यांच्या मुलांची नावे काय आहे ?

बाबा आमटे यांच्या पत्नीचे नाव साधना आमटे होते ,तर त्यांच्या मुलांची नावे प्रकाश आमटे आणि विकास आमटे अशी आहेत.

बाबा आमटे यांनी कुष्ठ रोग्यांसाठी कोणकोणत्या आश्रमाची स्थापना केली ?

बाबा आमटे यांनी कुष्ठ रोग्यांसाठी आनंदवन ,सोमनाथ आणि अशोकवन या आश्रमाची स्थापना केली.

बाबा आमटे यांना त्यांच्या समाजसेवेच्या कामासाठी कोणकोणते पुरस्कार मिळाले ?

बाबा आमटे यांना त्यांच्या समाजसेवेच्या कामासाठी भारत सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण ,राष्ट्रीय भूषण ,इत्यादी यांसारखे पुरस्कार मिळाले.

बाबा आमटे यांचे निधन कोणत्या वर्षी झाले ?

वयाच्या ९४ व्या वर्षी ९ फेब्रुवारी २००८ मध्ये बाबा आमटे यांचे निधन झाले.

Leave a Comment