आधार कार्डची संपूर्ण माहिती Aadhar Card Information In Marathi

Aadhar Card Information In Marathi आपण परीक्षेचे किंवा नोकरीचे फॉर्म भरतो ,तेव्हा बऱ्यापैकी सर्व फॉर्म भरताना आपल्याला आधार कार्ड वरील माहिती भरावी करावी लागते. आपल्या सर्वांकडे आधार कार्ड नक्की असेल ,परंतु आपल्या पैकी बर्याच लोकांना आधार कार्ड विषयी माहिती माहीत नसेल. आजच्या लेखामध्ये आपण आधार कार्ड विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे आधार कार्ड विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Aadhar Card Information In Marathi

आधार कार्डची संपूर्ण माहिती Aadhar Card Information In Marathi

वैध कायमस्वरूपी
पात्रता निकष भारताचे नागरिक असणे गरजेचे
ऑफिशिअल वेबसाईट https://uidai.gov.in/

आधार कार्ड (Aadhar card in Marathi)

भारत सरकारने २०१६ मद्ये “यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)” ची स्थापना केली होती. आधार कार्ड चा नंबर हा १२ अंकी असतो आणि आपण नवीन आधार कार्ड साठी मोफत निवेदन करू शकतो. आधार कार्ड वरती प्रत्येक नागरिकाची जनसांख्यिक आणि बायोमेट्रिक माहिती असते.

आधार कार्ड काढण्याचे मुख्य उद्देश्य हे होते की ,“आधार कार्ड वरून देशातील नागरिकांना सरकारी सबसिडी आणि सरकारी सुविधांचा लाभ घ्याता यावा”. आधार कार्ड हे सरकारी मान्यता प्राप्त डॉक्युमेंट असल्यामुळे बँकेचे खाते उघडण्यासाठी आणि लोन साठी निवेदन करण्यासाठी आधार कार्ड वरील माहिती भरावी लागते.

आधार कार्ड साठी असणारी निकष पात्रता (Eligibility Criteria for Aadhar card in Marathi)

१) आपण एका वेळा एकाच आधार कार्ड साठी निवेदन करू शकतो.

२) जे लोक मूळ भारतीय नाहीत ; परंतु त्यांना आधार कार्ड काढायचे आहे ,तर आधार कार्ड काढण्यासाठी त्यांना १८२ दिवस भारत देशामध्ये राहावे लागते. त्यानंतरच ते आधार कार्ड काढण्यासाठी निवेदन करू शकतात.

आधार कार्ड साठी निवेदन करण्याची संपूर्ण प्रक्रिया ( Complete Process of applying for Aadhar Card )

आपल्याला जर नवीन आधार कार्ड काढण्यासाठी निवेदन करायचे असेल तर ,आपण आधार नामांकन केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड साठी निवेदन करू शकतो. आपल्या जवळच्या आधार नामांकन केंद्रा विषयी माहिती आपल्याला हवी असेल तर ,आपण आधार कार्ड च्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन आपल्या जवळच्या आधार नामांकन केंद्राची माहिती मिळवू शकतो.

देशातील काना कोपऱ्यात असणाऱ्या विभागामध्ये सर्व जणांना आधार कार्ड काढता यावे ,यासाठी भारत सरकारने १०,००० पेक्षा जास्त पोस्ट ऑफिस आणि बँका यांना आधार नामांकन केंद्र बनवले आहे. आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन नवीन आधार कार्ड काढण्यासाठी निवेदन करू शकतो.

आधार कार्ड साठी निवेदन करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागेल. त्यानंतर आपल्याला आधार कार्ड साठी निवेदन करण्यासाठी असणाऱ्या फॉर्म वरची माहिती व्यवस्थित रित्या भरावी लागेल. त्यानंतर आपली बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण होईल आणि आपले आधार कार्ड साठीचे निवेदन यशस्वी रित्या सबमिट होईल.

आधार कार्ड आवेदन स्टेटस चेक करण्याची प्रक्रिया (Procedure to check Aadhar card application status in Marathi)

आपण जर नवीन आधार कार्ड साठी निवेदन केले असेल तर ,UIDAI च्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन आपण आपल्या आधार कार्डचे आवेदन स्टेटस चेक करू शकतो. आधार कार्ड च्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन आपल्याला एक्नोलेजमेंट नंबर टाकावा लागेल ,त्यानंतर आपल्याला आपल्या आधार कार्ड चा आवेदन स्टेटस दिसेल.

लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठीची प्रक्रिया (Procedure of Aadhar card for Children’s in Marathi)

आपल्या घरात जर पाच वर्षाच्या आतील लहान मुले असतील ,तर आपण आपल्या घरा जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन लहान मुलांच्या आधार कार्ड साठी निवेदन करू शकतो. लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी पहिल्यांदा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपल्याला मुलांच्या आई वडिलांचा बायोमेट्रिक डेटा सबमिट करावा लागतो.

जेव्हा ते लहान मूल १५ वर्षाचे होते ,तेव्हा त्याला स्वतः जाऊन पोस्ट ऑफिस मध्ये आपला बायोमेट्रिक डेटा सबमिट करावा लागतो. ज्यांना लहान मुलांच्या आधार कार्ड साठी निवेदन करायचे असेल ,त्यांना त्या लहान मुलाच्या आई वडिलांची आधार कार्ड डिटेल्स पोस्ट ऑफिस मध्ये सबमिट करावी लागतात. 

आधार कार्ड संबंधी असणारी माहिती (Information related Aadhar card in Marathi)

१) व्यक्तिगत माहिती –

  • अ) जन्म
  • ब) जन्म ठिकाण
  • क) पत्ता
  • ड) बारकोड
  • इ) नामांकन नंबर

२) बायोमेट्रिक माहिती

  • अ) आइरिस स्कैन
  • ब) फिंगरप्रिंट्स
  • क) फोटो

३) UIDAI वरती आपल्याला आधार नामांकन केंद्रांची लिस्ट मिळते. जर आपल्याला नवीन आधार कार्ड काढण्यासाठी निवेदन करायचे असेल तर, UIDAI वेबसाईट वर आपल्याला आपल्या घरा जवळच्या आधार नामांकन केंद्राची माहिती मिळते. UIDAI वरती जाऊन आपण आपल्या जवळच्या आधार नामांकन केंद्राची माहिती घेऊन ,त्या आधार नामांकन केंद्राला भेट देऊन आपण नवीन आधार कार्ड काढण्यासाठी निवेदन करू शकता.

४) आपण जर आधार कार्ड साठी निवेदन केले असेल ;परंतु आपल्याला नंतर समजले की ,“आपण आधार कार्ड काढताना जी माहिती भरली आहे ,ती चुकीची आहे” ,तर आपण UIDAI वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती अपडेट करू शकतो. आपण UIDAI वेबसाईट वर जाऊन बायोमेट्रिक माहिती सोबत जनसांख्यिक माहिती देखील अपडेट करू शकतो.

५) आपल्या आधार कार्ड ला आपला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे असते ; कारण आपण आधार कार्ड विषयी कोणतीही माहिती भरली तर ,ज्या नंबर ला आपण आधार कार्ड लिंक केले आहे ,त्या नंबर ला एक ओटीपी कोड जातो. जर आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर ओटीपी कोड जाणार नाही आणि आपल्याला पुढची प्रक्रिया करता येणार नाही. आपण आधार कार्ड ला आपला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी आपल्या जवळच्या आधार नामांकन केंद्रावर जाऊन आपण आपल्या आधार कार्ड ला आपला मोबाईल नंबर लिंक करू शकतो.

६) ई – आधार कार्ड – ई – आधार कार्ड हे आपल्या आधार कार्ड चे इलेक्ट्रॉनिक व्हर्जन असते आणि आपण आपले ई – आधार कार्ड UIDAI च्या ऑफीशिअल वेबसाईट वर जाऊन डाऊनलोड करू शकतो. ई – आधार कार्ड ला देशामध्ये सर्व ठिकाणी मान्यता आहे. ई – आधार कार्ड पीडीएफ स्वरूपात असते आणि ते पासवर्ड द्वारे सुरक्षित असते.

FAQ

आधार लेटर कुठे तरी हरवले असेल तर ,आपण आपल्या आधार लेटर चे रेप्रिंट कशा पद्धतीने काढू शकतो ?

आधार लेटर चे रिप्रिंट करण्यासाठी आपल्याला UIDAI वेबसाईट ला किंवा एम आधार ॲप ला भेट द्यावी लागेल आणि ५० रुपये फी देऊन आधार लेटर रिप्रिंट साठी निवेदन करावे लागेल.

आधार कार्ड वरील नाव अपडेट करायचे असेल तर ,आपण कशा पद्धतीने आधार कार्ड वरील नाव अपडेट करू शकतो ?

आपण SSUP च्या माध्यमातून फक्त आधार कार्ड वरील पत्ता अपडेट करू शकतो ; परंतु आपल्याला जर आधार कार्ड वरील आपले नाव अपडेट करायचे असेल तर ,आपण आपले आधार कार्ड वरील नाव जवळच्या आधार नामांकन केंद्रावर जाऊन अपडेट करू शकतो.

आधार कार्ड वरील नंबर किती अंकी असतो ?

आधार कार्ड वरील नंबर हा १२ अंकी असतो आणि त्यामध्ये आपला जनसांख्यिक आणि बायोमेट्रिक डेटा सेव्ह केलेला असतो.

आधार कार्ड ला किती कालावधी पर्यंत वैध मानले जाते ?

आधार कार्ड ला मरेपर्यंत वैध मानले जाते.

आधार कार्ड वर असणाऱ्या क्यूआर कोड वरती कशाची माहिती असते ?

आधार कार्ड च्या क्यूआर कोड वर आपली वयक्तिक माहिती ,जसे की नाव ,पत्ता ,जन्म ,फोटो ,इत्यादी माहिती असते.

आजच्या लेखामध्ये आपण आधार कार्ड विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण आधार कार्ड साठी असणारी निकष पात्रता ,नवीन आधार कार्ड काढण्याची संपूर्ण प्रक्रिया ,आधार कार्ड निवेदन स्टेटस चेक करण्याची प्रक्रिया ,लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठीची प्रक्रिया ,आधार कार्ड संबंधी असणारी माहिती ,आधार कार्ड विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment