ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची संपूर्ण माहिती A.P.J. Abdul Kalam Information In Marathi

A.P.J. Abdul Kalam Information In Marathi भारताचे “मिसाईल मॅन” ,एक थोर शास्त्रज्ञ तसेच भारताचे 11 व्ह राष्ट्रपती म्हणून ज्यांची ओळख जाणारे ए. पी. जे. अब्दुल कलाम होय. कलाम हे एक एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केलेला. कलाम यांचे पूर्ण नाव डॉ अवुल पाकीर जैनउल्लाब्दीन अब्दुल कलाम असे होते.

A.P.J. Abdul Kalam Information In Marathi

ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची संपूर्ण माहिती A.P.J. Abdul Kalam Information In Marathi

पूर्ण नावडॉ अवुल पाकीर जैनउल्लाब्दीन अब्दुल कलाम
जन्म15 ऑक्टोबर 1931 रामेश्वरम, तमिळनाडू राज्य, भारत देश.
आईअसिन्मा
वडीलजैनुलब्दीन
विश्रांतीस्थानडॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम देशीय निनायवगम, पेई करुंबू, रामेश्वरम, तामिळनाडू.
राष्ट्रीयत्वभारतीय
राजकीय पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
व्यवसायएरोस्पेस अभियंता, एरोस्पेस शास्त्रज्ञ, लेखक.
शिक्षणसंस्थासेंट जोसेफ कॉलेज, तिरुचिरापल्ली मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
भारत देशाचे राष्ट्रपतीभारताचे 11 वे राष्ट्रपती
मृत्यू27 जुलै, 2015 शिलाँग, मेघालय राज्य, देश भारत.
लेखन कार्यविंग्ज ऑफ फायर, इंडिया 2020, इग्नायटेड माइंड्स.

ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे बालपण आणि शिक्षण (A.P.J. Abdul Kalam’s childhood and education information)

अब्दुल कलाम यांचे संपूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते. कलामांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तमिळनाडू राज्यांतील रामेश्वरम येथे झाला. अब्दुल कलाम यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दीन कलाम तर आईचे नाव असिन्मा कलाम असे होते. त्यांचे वडील हे बोटीचे मालक आणि स्थानिक मशिदीचे इमाम पण होते.

अब्दुल कलाम हे पाच भावंडांमधील सर्वात लहान होते.

कलाम यांचा जन्म तमिळनाडू येथील एका गरीब मुस्लिम कुटुंबात झाला. कलाम यांचे पूर्वज श्रीमंत होते, पण 1920 च्या दशकात पूर्वजांना आपली संपत्ती गमावली लागली होती. अब्दुल कलामांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे कुटुंब गरिबीने ग्रस्त होते. आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी अब्दुल कलामांना लहानपणीच वर्तमानपत्रे विकावी लागली होती.

अब्दुल कलाम यांनी आपले शालेय शिक्षण श्वार्ट्झ हायर सेकंडरी स्कूल, रामनाथपुरम येथे पूर्ण केले. शालेय जीवनात कलाम हे एक सामान्य विद्यार्थी होते. पण ते मेहनती सुद्धा होते. ते गणित विषयाचा बराच वेळ अभ्यास करायचे. नंतर त्यांनी सेंट जोसेफ कॉलेज, तिरुचिरापल्ली येथे प्रवेश घेऊन पुढील शिक्षण घेतले. येथे कलाम यांनी भौतिकशास्त्रात विषयात पदवी प्राप्त केली.

पुढे एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी अब्दुल कलाम यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये 1955 मध्ये प्रवेश घेतला. तेथे आपल्या मेहनतीने कलाम यांनी डीनला सुद्धा प्रभावित केले. कलामांचे फायटर पायलट होण्याचे स्वप्न थोड्यावरून अपूर्ण राहिले कारण आयएएफमध्ये फक्त आठ जागा होत्या आणि ते नवव्या स्थानावर होते.

शास्त्रज्ञ म्हणून ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्द (A.P.J. Abdul Kalam’s work information as scientist)

पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अब्दुल कलाम हे 1960 मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) सदस्य बनले आणि त्यानंतर तेथेच एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटमध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. तेथे कलाम यांनी एक लहान हॉवरक्राफ्ट डिझाईन केले. प्रसिद्ध अंतराळ शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या अंतर्गत असलेल्या INCOSPAR समितीत देखील कलाम यांनी भाग घेतला.

अब्दुल कलाम यांनी 1970 आणि 1990 मध्ये पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV) आणि SLV-III प्रकल्पामध्ये काम केले, जे दोन्ही यशस्वी झाले. कलाम यांनी 1970 च्या दरम्यान प्रोजेक्ट डेव्हिल आणि प्रोजेक्ट व्हॅलिअंट या दोन प्रकल्पांचे दिग्दर्शन केले. ज्या प्रकल्पात SLV प्रोग्रामच्या तंत्रज्ञानातून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्याचे काम होते.

अब्दुल कलाम यांनी इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम (IGMDP) नावाच्या मिशन अंतर्गत  क्षेपणास्त्रे विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यात अग्नी, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, पृथ्वी आणि सामरिक क्षेपणास्त्र यांचा समावेश होतो.

ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी 1992 ते 1999 या दरम्यान पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे सचिव म्हणून काम पाहिले. तसेच पोखरण-II च्या अणुचाचणीतही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.

भारताचे राष्ट्रपती म्हणून ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्द (A.P.J. Abdul Kalam’s work information as president of india)

25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 हा काळ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. कलाम हे जनतेचे राष्ट्रपती होते. ऑफिस ऑफ प्रॉफिट बिलावर स्वाक्षरी करणे हा कलाम यांनी घेतलेला सर्वात कठीण निर्णय होता. अब्दुल कलाम यांनी 2005 मध्ये बिहारमध्ये “राष्ट्रपती राजवट” लागू करण्याचा निर्णयही घेतला होता.

2003 मध्ये झालेल्या PGI चंडीगढ या संस्थेमधील संवादात्मक सत्रात, अब्दुल कलाम यांनी भारताची लोकसंख्या लक्षात घेऊन भारतात समान नागरी संहितेची गरज आहे असे म्हणाले.

ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार( Rewards of A.P.J. Abdul kalam)

भारत सरकारने 1981 मध्ये ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना  “पद्मभूषण” ,तर  1990 मध्ये  “पद्मविभूषण” देऊन सन्मानित केले. कलाम यांना 1998 मध्ये भारताचा सर्वोच्च किताब “भारतरत्‍न”  देऊन त्यांचा सन्मान केला.

भारत सरकारचा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार तसेच वीर सावरकर पुरस्कार आणि रामानुजन पुरस्कार हे पुरस्कार देखील अब्दुल कलाम यांना मिळालेले आहे.

ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके( Books of A.P.J. Abdul kalam)

ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी अनेक पुस्तके लिहिली,त्यातील काही पुस्तकांची नावे खालीलप्रमाणे:

  • अदम्य जिद्द(याचा मराठी अनुवाद देखील उपलब्ध आहे)
  • इग्नायटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया ( मराठीत नाव:प्रज्वलित मने )
  • इंडिया – माय-ड्रीम
  • उन्‍नयन (ट्रान्सेन्डन्सचा मराठी अनुवाद)
  • एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन
  • फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
  • विंग्ज ऑफ फायर (हे एक आत्मचरित्र आहे)

(मराठीत नाव:  अग्निपंख)

  • सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (हे एक आत्मकथन आहे)
  • टर्निंग पॉइंट्‌स (याचा मराठी अनुवाद देखील उपलब्ध आहे)

ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन ( death of of A.P.J. Abdul kalam)

शिलाँग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे व्याख्यान देत असताना ए. पी. जे. अब्दुल कलाम कोसळले. वयाच्या 83 व्या वर्षी 27 जुलै 2015 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने कलाम यांचे निधन झाले. रामेश्वरम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांसह हजारो लोक तेथे उपस्थित होते. तेथे अब्दुल कलाम यांना पूर्ण सन्मानाने दफन करण्यात आले. अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ त्यांचा जन्म दिवस 15 ऑक्टोबर हा “जागतिक विद्यार्थी दिवस” म्हणून जगभरात पाळला जातो.

FAQ

अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय होते?

अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव डॉ अवुल पाकीर जैनउल्लाब्दीन अब्दुल कलाम असे होते.

अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होऊन गेले?

अब्दुल कलाम हे भारताचे 11 वे राष्ट्रपती होऊन गेले.

अब्दुल कलाम यांचा जन्म कधी व कोठे झाला?

अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम, राज्य तमिळनाडू येथे झाला.

अब्दुल कलाम यांच्या आईचे नाव काय होते?

अब्दुल कलाम यांच्या आईचे नाव असिन्मा असे होते.

अब्दुल कलाम हे कोणत्या राजकीय पक्षाचे होते?

अब्दुल कलाम हे “राष्ट्रीय लोकशाही आघाडी” या पक्षाचे होते.

अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस जगभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस जगभरात “जागतिक विद्यार्थी दिवस” म्हणून साजरा केला जातो.

निष्कर्ष : (Conclusion)

ए. पी. जे. अब्दुल कलाम हे एक महान भारतीय शास्त्रज्ञ होते. त्यांनी भारताचे 11 व राष्ट्रपती म्हणून देखील काम केले, ते फक्तं राष्ट्रपती नव्हते तर ते जनतेचे राष्ट्रपती होते. अब्दुल कलाम यांनी शास्त्रज्ञ तसेच राष्ट्रपती असतानी अनेक महान , समाजोपयोगी कामे केली. राष्ट्रपती पदानंतर देखील अब्दुल कलाम यांच सार्वजनिक सेवेच कार्य चालूच होत.

Leave a Comment